Skip to main content

काहीच्या काही कविता

वर्तुळ

लेखक शब्दवेडी यांनी मंगळवार, 14/07/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न … चू. भू. दे. घे. प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित वर्तुळ वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही आयुष्य व्यापून टाकेल इतका कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही …. अपुरेपणाच्या विस्तृत्वाला कोणतीच रेषा छेदत नसते कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते …. वर्तुळाच्या गोलाईचा कोणताच एक आकार नाही मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं कोणतच एक सूत्र नाही …. गुरफटलेल्या आकृत्यांना खरंतर स्वत:ची नावंच नसतात आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. - शब्दवेडी

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

लेखक खटासि खट यांनी रविवार, 12/07/2015 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला तेव्हां चर्चिल घासलेटच्या साठ्यावर फणा काढून उभा होता मी मार्क्सला म्हटलं पेटवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी माओचीही राख झाली आता इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी काढून त्यावर अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय मात्र उजवीकडून येणारा मुसळधार भगवा पाऊस म्हणाला रांडेच्या, बघतोच तुला एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना पुरूष कानात कुजबुजला माणसं पेटवतोस का ? गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात लागतील तेव्हढे !

मिपासार

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/07/2015 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

पिंपळ

लेखक पथिक यांनी सोमवार, 01/06/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा! एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.

'कविता' म्हणजे काय वेगळे

लेखक विदेश यांनी मंगळवार, 26/05/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
खोल दरीतले वाहते पाणी उंच डोंगरावर पक्षी प्राणी कानावर घोंघावणारे वादळ नितळ दिसणारा सागरतळ फांदीवर हळूच फूल डुलणारे वाऱ्यावरून पान तरंगणारे नभात चांदणी चमचमणारी सागरात बोट हेलकावणारी झाडावरून खार तुरुतरुणारी रोपट्यावर कळी मोहावणारी सशाचा डोळा लुकलुकणारा वाळूतला शिंपला चमकणारा कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे एका झुरळाचे सहस्र डोळे शब्दात रंगवणे हेच सगळे "कविता" म्हणजे काय वेगळे ..! .

विरहणी आणि वीज

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 23/05/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली. विरहणीच्या डोक्स्यावारी मी पाण्याची धार धरली वाफेचा उसळत्या डोंबावरी चालविला जनरेटर भारी अशी म्या वीज वाचविली. ज्ञानियाचा पाठीवर भाजली होती पोळी विरहणीच्या पाठीवर मी *पिज्जा बेक केला.

बाटली आणि दारू.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 23/05/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!

(सई)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/05/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते. मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही. माझी सई तशी बोल्ड आहे सीन आणि सिनेमाची गरज पाहून काय आणि कसं करायचे ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी हातात काही काम नसेल तर रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस दिग्दर्शक रोल देत नसेल तर त्याची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई त

विश्वास आजूबाजूंच्यावरचा

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 06/05/2015 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
पोट गहीवरुन आले वात गेला निसटून दोष कुणाचा लपवण्यास गवाक्ष खुले हे झाले गुन्हा केला कोणी आरोपी कुणा ठरवावे बालंट ते नाकारण्यास सगळेच भोळे झाले चर्चा केली त्यांनी संशयित शोधण्याचे ठरले ढोंग सारे रचण्यात मग लोकही कडवे झाले चौकश्याचें सत्र होते आरोपी सर्वत्र होते कोठुनी गंध तो आला रोख मात्र इतरत्र होते हायसे झाले 'निरागसाला' नाव कल्लोळी वाचले संशयात हरले सगळे पण त्याचेही सोहळे झाले

पोपट....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 03/05/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास