Skip to main content

मन!

लेखक राघव यांनी बुधवार, 12/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं! जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास! जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!! मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप.. जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप! मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार.. जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर! मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड! जशी पावसाची सर..अलगद..अलवार.. मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात.. जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!! राघव
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2644
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली कविता.
मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप.. जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप! मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड! जशी पावसाची सर..अलगद..अलवार..
हे मस्त!

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात.. जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!
मला माझे लग्न झाल्यावर असाच अनुभव आला होता. बायकोचा हात हातात घेतल्यावर जे वाटले तो आनंद काय वर्णु, आज त्याला आप्ल्यामुळे शब्दरुप सापडले.

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप.. जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!
हे विशेष आवडलं.

तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप आनंद झाला! :) सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. राघव