सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड
चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राईव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन
ओतत रहातात थकलेली बिले...
उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावने
चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4097
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधीच अर्थ देतोय... नंतर उगाच अर्थ मागू नका....
डु आयडी
In reply to आधीच अर्थ देतोय... नंतर उगाच अर्थ मागू नका.... by मुक्त विहारि
पेशवा हा तुमचा डु आयडी आहे का हो??
In reply to डु आयडी by अन्या दातार
नाही रे
In reply to डु आयडी by अन्या दातार
आवडली
च्यायला !
ढॅण ट ढॅण!! ढिश चिक ढिश चिक
अच्छा! हा लॉंग ड्राइव्हला
In reply to ढॅण ट ढॅण!! ढिश चिक ढिश चिक by कवितानागेश
अप्रतिम अफाट घ्या लाँग
वाह !
In reply to अप्रतिम अफाट घ्या लाँग by स्पा
स्पावडू तू मला समजलेल्या
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
>>आणि मग यक्कु त्याचे रसग्रहण
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
_/\_
आयला !!!
In reply to _/\_ by मूकवाचक
क ह र !
In reply to _/\_ by मूकवाचक
@पण या सगळ्या प्रकारात आपली
In reply to _/\_ by मूकवाचक
साहेब आपले पाय कुठे आहेत?????
In reply to _/\_ by मूकवाचक
_/\_ _/\_ _/\_
In reply to _/\_ by मूकवाचक
:)
वाह वा वाह वा
कॉलिंग चौराकाका म्हणा
In reply to वाह वा वाह वा by अमृत
@कॉलिंग चौराकाका म्हणा
In reply to कॉलिंग चौराकाका म्हणा by प्रचेतस
अनुमोदनास अनुमोदन.
In reply to @कॉलिंग चौराकाका म्हणा by अत्रुप्त आत्मा
ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी..