काथ्याकूट

साहना's picture
साहना in काथ्याकूट
3 Mar 2021 - 14:20

गावाच्या गोष्टी : मना सज्जना भक्ती पंथेची जावे.

टीप : विषय धार्मिक आहे आणि लेखन विनोदी. ज्यांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे त्यांनी वाचू नये.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
2 Mar 2021 - 04:55

गावाच्या गोष्टी : लक्षुमणाची बायको

देव देतो आणि देवचार नेतो अशी कोंकणात एक म्हण आहे. म्हणजे नशीब तुम्हाला काहीतरी देते आणि त्याच प्रकारे काही तरी वाईट घटना घडून किंवा तुम्हालाच दुर्बुद्धी सुचून ती चांगली गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाते.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
1 Mar 2021 - 13:49

गावाच्या गोष्टी : चिकनचा बेत

आमच्या घरी नॉन व्हेज म्हणजे मासे आणि अंडी प्रमुख अन्न होते. "नुस्ते" हा फक्त खाण्याचा प्रकार नसून चघळण्याचा विषय देखील होता. आज सुद्दा कोणीही दोन गौड सारस्वत लोक भेटले कि "हल्ली नुस्ते पहिल्या सारखे मिळत नाही" अशी खंत व्यक्त केली जाते.

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
1 Mar 2021 - 11:41

चालू घडामोडी - मार्च २०२१

आज मार्च महिना सुरू झाल्याने या महिन्यातील घडामोडींसाठी नवा धागा काढत आहे.

आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे लिहिताक्षणी राज्यपालांचे अभिभाषण सुरू आहे.

जानु's picture
जानु in काथ्याकूट
28 Feb 2021 - 20:09

मोदींची कॉंग्रेस?

भारतीय राजकारणाला मागील ७० वर्षात अनेक वेगवेगळी वळणे मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषक सांगतात, त्यात मला एकच महत्वाचे वाटते ते म्हणजे जे पीं चे आंदोलन ज्याने ईंदिरा कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात जनचळवळ उभारली. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण या आंदोलनाने निवडणुक जिंकायच्या अनुषंगाने अधिक धार्मिक तुष्टीकरणाचे झाले. असे माझे मत आहे. आजचा विषय हा फक्त राजकीय विचारसरणी बदल यावर आहे.

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
28 Feb 2021 - 12:14

इंटरनेट कॉल करणे भारतात कायदेशीर आहे का?

सध्या एका मनस्ताप देणार्या अनुभवातुन जात आहे.ज्या व्यक्तीच्या कृत्यामुळे मनस्ताप होतो आहे त्या व्यक्तिस कॉल करणे गरजेचे आहे पण त्या व्यक्तीने माझा फोन ब्लॉक केला आहे.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Feb 2021 - 03:10

गावाच्या गोष्टी : सल्लेखोर विद्वान

टीप: शुद्धलेखनाबाबत आपला फीडबॅक मिळाला. ह्या लेखांत विशेष काळजी घेतली आहे.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
26 Feb 2021 - 05:21

गावाच्या गोष्टी : भामटा

गांव आणि शहराचा मुख्य फरक म्हणजे गांवात सर्वच लोक एकमेकांवर अवलंबून राहतात. पापड करायचे म्हटल्यावर ४-५ बायका घरी आपले स्वतःचे लाटफळे घेऊन घरी हजर. मग आमहा मुलांची जबाबदारी पापड सुखावयाची आणि फी म्हणून काही "गुळ्या' मटकावयाची. कोहोळ्याच्या वड्या माझ्या मते कोंकण प्रांताचे विशेष व्यंजन म्हणून प्रसिद्ध असायला पाहिजे होते. ते करणे हि मोठी जबाबदारी.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
25 Feb 2021 - 13:04

गावाच्या गोष्टी : वडिलांचे प्रेम

साने गुरुजी हे शाळेंत कंपलसरी वाचन होते. साने गुरुजी कथामाला नावाचा जो प्रकार होता त्याची मला विलक्षण धास्ती होती. शिक्षक मंडळी धाक दाखवून साने गुरुजींचे "संस्कार क्षम" असे साहित्य पाठ करून घ्यायचे आणि स्टेजवर पाठवून सर्वाना मग "कथा" सांगायला लावायचे. हे मला सर्व बेगडी वाटायचे. ज्या मुलांचा जीव अलिफ लैला आणि चंद्रकांता मध्ये गुंतला आहे त्यांना श्यामची आई कशी बरे भावणार ?

साहना's picture
साहना in काथ्याकूट
24 Feb 2021 - 17:04

गावाच्या गोष्टी : ऑर्केष्ट्रा

सैराट चित्रपट भयंकर हिट झाला. माझ्या मनाला ह्याचा प्रचंड आनंद झाला आणि त्याच वेळी त्याचा कारण जोहर ने बनवलेला हिंदी चित्रपट सपशेल आपटला ह्यांचा आणखीन आनंद झाला. यशाला हजार बाप असतात, अपयश नेहमी पोरके पोर असते त्या न्यायाने सैराट का हिट झाला ह्याची हजार कारणे लोक देतात. मी माझे कारण का देऊ नये ?

साहना's picture
साहना in काथ्याकूट
23 Feb 2021 - 13:52

गावाच्या गोष्टी : लायब्रेरी

इंग्लंड साठी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज चे जे महत्व आहे ते आमच्या गावाच्या साठी लायब्रेरीचे. ग्रामीण वाचनालय म्हणून भली मोठी पाटी लावली असली तर गावाचे लोक ह्याला वाचनालय सोडून सर्व काही म्हणत. लायबेरी, लिब्रेरी आणि बरेच काही. सुनीताबाई ह्या आमच्या लायबेरियन. प्रत्येकाला लायब्रेरीरीयन म्हणजे गॅझेटेड ऑफिसर बरे का म्हणून ठणकून सांगत असत.

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
22 Feb 2021 - 22:34

भिती का वाटत नाहीये? :(

करोनाची दुसरी लाट विदर्भात पसरते आहे. तिथे काही ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागला आहे.पहिल्या लाटेत अनेक लोक मेले,कर्ता माणूस गेला असेल तर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेत जावे लागले.करोनावरील उपचार गरीबांना परवडणारे नाहीत.क्क्वारंटीन केले तर तितक्या दिवसांचा पगार, रोजगार,व्यवसाय बुडतो.इतके सारे नुकसान करोना पॉझिटिव्ह असल्यास होते.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Feb 2021 - 12:42

गावाच्या गोष्टी : सांदिपनी मामा

सांदिपनी मामा हे तसे माझे मामा नव्हते. आईचे ते मानलेले भाऊ. पण सक्ख्या भावापेक्षा त्यांचे अधिक प्रेम असावे. काहीही सण, वार असो सांदिपनी मामा नेहमीच आमच्या घरी हक्काने यायचे. त्यांचे हृदय कवीचे होते आणि मन थोडे स्वच्छंद. लिहिणे वाचणे ह्यांच्या प्रचंड नाद आणि एका पायाने ते अधू होते. त्यांना पण स्वप्न होते पोलिस व्हायचे पण अधू असल्याने ते शक्य नव्हते.

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
19 Feb 2021 - 20:02

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Feb 2021 - 13:18

गावाच्या कथा : महाकंजूष डोंगरे आजोबा.

प्रत्येक गावांत लोकांचे काही तरी स्टीरीओटाईप असतातच. कंजूष पणा हा त्यातीलच एक. काही लोक महाकंजुस असतात त्यातीलच एक आपले डोंगरे आजोबा होते. ह्यांचा संपूर्ण परिवारच विचित्र होता. डोंगरे आजोबांची एक सायीकल होती जी त्यांना म्हणे हुंड्यात मिळाली होती. डोंगरे आजोबानी कधीही त्याचे ब्रेक्स वापरले नाहीत कारण वापरल्याने ते झिजले असते.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Feb 2021 - 01:27

गावच्या कथा : ती

तिला आम्ही "ती" च म्हणायचो. तसे तिला नाव होते. पण आठवत नाही. अश्यासाठी आठवत नाही की आठवण्यासारखे काहीही नाही. मी ज्या शाळेंत ३ वर्षे घालवली त्या तिन्ही वर्षांत ती सर्वांत मागच्या बेंचवर बसायची. ती कायम घाबरलेली असायची. तिला बोलताना कुणी म्हणजे कुणीच पहिलं नाही. प्रेमाने कुणी बोलल्यास शुद्ध ती फारतर डोके हलवायची.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
18 Feb 2021 - 11:51

तर्क कोडे १ : घारे डोळे

कृपया इंटरनेटवर शोधून उत्तरे देऊ नयेत. तुम्हाला आधीपासून हे कोडे ठाऊक असेल तर उत्तर देऊन इतरांचा विचका करू नये.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
17 Feb 2021 - 05:42

कार्बन प्रदूषण

कार्बन प्रदूषण

climate change

साहना's picture
साहना in काथ्याकूट
17 Feb 2021 - 00:09

गावाच्या गोष्टी ५ : फणसाचे गरे

गावाच्या गोष्टी ५ : फणसाचे गरे