Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निओ on Fri, 08/11/2017 - 14:56
ती मला आवडते जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा किरकोळ गोष्टीला खट्याळपणे Oh My God म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते माझ्या टोमण्यांवर गुद्द्यांचा प्रसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते मी टकाटक आवरून बाहेर जाताना हूं... करून नाक मुरडते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा माझा पचका होतो तिला कशी जिरली एकाची असा लहान मुलासारखा आनंद होतो तेव्हा ती मला खूप आवडते कधी कधी माझ्या रागवण्यावर भोळा भाबडा चेहरा करते तेव्हा ती मला खूप आवडते खाण्या पिण्याचे पदार्थ चाखून ऊष्टे करून देते तेव्हा ती मला खूप आवडते अपरात्री कामावरून आल्यावर, माझ्या चाहूलीवर अर्धवट झोपेत, ओठांचा चंबू करून प्रतिसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते नवरा बायकोनं एकाच पांघरूणात झोपायचे असं जेव्हा म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते

Submitted by एस on Sat, 08/12/2017 - 11:53

Permalink

कविता आवडली हो! :-)

कविता आवडली हो! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by निओ on Sat, 08/12/2017 - 13:56

In reply to कविता आवडली हो! :-) by एस

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! :-)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3002 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com