Skip to main content

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 16/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

वाचने 74234
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by उपेक्षित

साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही त्याचं असं आहे की ज्यांना वैचारिक क्लॅरिटी आहे त्यांना आपल्या प्रतिसादांच मूल्य माहिती असतं आणि त्यांचे विचार त्यांच्या लेखनातून सहज प्रकट होतात. त्यांना आपला वेळ चाललायं असं वाटत नाही तर आपण मांडलेले विचार कित्येकांचे गैरसमज दूर करु शकतात याची कल्पना असते आणि संकेतस्थळाचा एक महत्त्वाचा उद्देश विचारांचं आदान-प्रदान आहे हे देखिल त्यांना माहिती असतं. याउलट काही नुसता टिपी करणारे सदस्य असतात ज्यांना वैचारिक बैठकच नसते, ते अशा चर्चेत भागच घेऊ शकत नाहीत. मग त्यांचे दोन विभाग होतात. एका टाईपचे सदस्य इतके खंतावतात की धागा भरकटवून ते स्वतःची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांचा वैचारिक कोतेपणा आणखीनच उघडा पडतो. दुसरा टाईप काहीही वेडगळ प्रतिसाद देऊन चर्चा कशी थांबेल हे पाहतो कारण आपल्याला काहीही कंट्रीब्यूट करता येत नाही ही अस्वास्थ्याची भावना त्यांना व्यथित करत असते.

In reply to by संजय क्षीरसागर

देवा ते पर्तिसाद जरा समजल अश्या म्हराटीतून देता काय ? ता काय असा आमी दुसर्या टायपात मोड्तुया (तुमच्या भासेत वेडगळ) so येड्यांना निट समजल असे ज्ञानामृत पाजळल (आपल पाजलत ;P ) तर बर वाटल...

In reply to by उपेक्षित

तुम्हाला प्रतिसाद कळला असा होतो :) ! तुम्ही स्वतःच्या बॅटनं स्वतःचे स्टंप उडवले !

In reply to by संजय क्षीरसागर

जल्ला मेला एक वाक्य समजल्यावर पूर्ण प्यारा समजला असा डंका पिटायला आम्ही काय महाज्ञानी आहोत का तुमच्या सारखे;? :P

आमची मि.पा वर अव्यभिचारी निष्ठा आहे.. इतर संकेत स्थळावर चोचा मारायला आम्हाला आवडत नाहि.. असो..चोच्या अकुकाका

In reply to by अविनाशकुलकर्णी

अकूकाकांचे असले धगधगते बानेदार उद्गार वाचायलाच तर मी अजुन इथे राह्यलौ. अकूकाका, तुम्ही मिपाचे ब्रांड फॉर्च्यूनर आहात.

फ्रान्समधे आम्ही मुलाच्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो, त्यात त्या जोडप्याचा चार-पाच वर्षे वयाचा मुलगाही होता. तिकडे कायदेशीर लग्न सुद्धा पाच का सहा प्रकारचे असते म्हणे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी खून करणे/होणे, मुलांना सांभाळणे, पोटगी देणे, प्रॉपर्टीत समावेश, अन्य व्यक्तींशी संबंध ठेवण्यातील मोकळीक, वेगळे होण्यातील सुलभता, टॅक्सची बचत, लग्नाचा खर्च... असे अनेक मुद्दे कोणत्या प्रकारचे लग्न करावे हे ठरवताना विचारात घेतले जातात म्हणे. कुणाला याबद्दल माहितीअसल्यास द्यावी. Types of Marriages या नावाने विकीवर लेख आहे, त्यात तर खूपच प्रकार दिलेले आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Types_of_marriages

तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल. तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत हि वाक्ये वैयक्तिक टीका नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का? पहिल्या वाक्यात तर तुम्ही माझ्या व्यावसायिक क्षमतेवर घसरला आहात. सिम्पल जेनेटिक टेस्ट म्हणेज काय हे आपण लक्षात न घेता अशी विधाने करता म्हणून मला "बेफाट वक्तव्ये" लिहावे लागले. आज या जेनेटिक टेस्ट ( खरं तर हि जीन्स ची नसून डी एन ए किंवा गुणसूत्रांची चाचणी आहे) पण आपण डॉक्टर नाही म्हणून हे सोडून देऊ. डी एन ए टेस्ट मध्ये मुलाची आणि बापाची गुणसूत्रे जुळवून पाहण्यासाठी एका चाचणीला आज ( स्वस्त झाल्यामुळे ) १३ हजार रुपये पडतात. हि काही रक्तातील साखर तपासणी नव्हे कि १०० रुपये दिले आणि ऑटो ऍनालायझर वर तपासणी झाली. जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील. उदाहरणार्थ --साध्या ओशो कम्युन मध्येच ५०,००० संन्यासिनी होत्या. त्यातील फक्त १ हजार जरी स्त्रियांनी मुलांना जन्म दिला तरी हा खर्च साडे सहा कोटी होतो. यात शक्यता गृहीत अशी आहे कि हे सगळे ५००० पुरुष डी एन ए चाचणीला तयार होतील. जो पुरुष डी एन ए चाचणीलाच तयार होणार नाही तो मुलाच्या २१ वर्षे संगोपनाला काय तयार होणार? श्री नारायण दत्त तिवारी यांची समग्र केस पहिली जेथे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन हुकूम मिळवायला लागला तर एखाद्या माणसाला डी एन ए चाचणीला तयार करण्यासाठी किती कटकटी करायला लागतील हे आपल्याला लक्षात येईल. डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु असे १७६० केमिकल्स आपल्या मेंदूतून नाहीसे होत नाहीत. त्यामुळे एकदाही ना पहिल्या मुलाबद्दल परदेशी असणाऱ्या माणसाला आपल्या अपत्याबद्दल प्रेम वाटू शकते.किंवा वृद्धाश्रमात ठेवलेल्या आईला आपल्याला लाथाडणाऱ्या मुलाबद्दल प्रेमच वाटत राहत असते. म्हणूनच मी म्हणालो कि तुमचे मूळ गृहीतच चूक आहे कि डोपामाईन नष्ट झाले कि प्रेम संपले. बाकि जीवशास्त्र गणिती अचूकतेने चालत नाही हे आपल्याला लक्षात आले असावे अशी आशा आहे.

In reply to by सुबोध खरे

एकदम योग्य. नंबर एक. विवाह संस्था योग्य की अयोग्य या साठी फार मोठ्या गणिताची आवश्यकता नाही. एवढा विचार केला तरी पुरे आहे. सुरुवातीला मनुष्या झुंडीनेच रहात होता तेंव्हा विवाह हा प्रकार नव्हता. पुढे तो ज्ञानाने प्रगल्भ होत गेला, मग त्याने स्वत:त भरपुर बदल केले त्यातील एक बदल म्हणजे विवाह करणे. जगाच्या पाठीवर भाषेचे, जाती-जमातीचे किती ही प्रकार असले तरीही विवाह हा प्रकार थोड्या फार फरकाने सगळी कडेच आढळतो. म्हणजे विवाह हा प्रकार हजारो वर्ष जुना असुन, त्याचा मुळ गभा अजुनही तसाच आहे. म्हणजेच कित्येक लोकांनी विचार पुर्वक घेतलेला तो निर्णय आहे. त्यामूळे @मार्कस ऑरेलियस यांचे खालील वक्तव्य निर्थक, भंपक आणि अतिशय संकुचीत विचारा अंती बनलेले मत आहे असे वाटते.
मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे @मार्कस ऑरेलियस

In reply to by सुबोध खरे

आर्थिक मुद्दा तुम्ही मांडला त्याहीपेक्षा गंभीर आहे ! जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील. प्रगोंच्या मुक्त लैंगिक व्यवस्थेत एक स्त्री कितीही पुरुषांबरोबर रत होऊ शकते. दिवसाला एक या (किमान) हिशेबानं, गर्भधारणा होईपर्यंत ती जर शंभर पुरुषांशी रत झाली असेल तर एका मुलामागे डीएनए टेस्टला १३ लाख रुपये लागतील :) ! पहिली गोष्ट हे पैसे भरणार कोण ? दुसरी गोष्ट त्या पुरुषांचा ट्रेस ठेवणार कोण ? पुढे ते सर्व जण टेस्टला तयार व्हायला हवेत आणि सरते शेवटी ती टेस्ट मान्य करुन, प्रगोंचं (माहिती नाही), पण इतर ९९ पुरुषांची जवाबदारी तो एकटा नरपुंगव स्वीकारेल काय ? आणि त्याही पुढे जाऊन, सदर नरपुंगवाची संप्रेरकं (डोपामाईन का काय ते), त्या स्त्रीला पाहून सिक्रीट झालं नाही तरीही तो त्या अपत्याचं संपूर्ण संगोपन करेल काय ?

संक्षी,खालील प्रश्नाची उत्तरे द्या. १.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात? २.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय? ३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे? ४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय????

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

१.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात? २.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय? ही पुरुषांनी पसरवलेली अफवा आहे. स्त्रीयांना सुद्धा अनेक पुरुषांबरोबर रत व्हायला तितकीच मजा येते याची तुम्हाला कल्पना दिसत नाही ! इन फॅक्ट स्त्रीयांचा क्लायमॅक्स-पॉइंट यायला पुरुषापेक्षा बराच दीर्घकाल लागतो त्यामुळे बहुतांश स्त्रीया आयुष्यात कधी ऑरगॅजम उपभोगूच शकत नाहीत. खरं तर याच कारणानं पुरुषांनी स्त्रीयांना कायम रिसिवींग रोल मधे ठेवलं आहे. जर एका वेळी स्त्री अनेकांशी रत झाली तर तिच्या ऑरगॅजमची शक्यता हमखास निर्माण होते. आणि याच लफड्यामुळे पुरुष स्त्रीयांना कायम वचकून असतात (ही उघड गोष्ट आहे. लग्न केल्यास विदा मागायची गरज उरणार नाही :) ३)३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे? माझा तुम्हाला एकदम सुरुवातीला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा ! अतृप्त कामेच्छा हे दुसरा जोडीदार हवा असं वाटण्याचं मूळ कारण आहे. ज्या जोडप्यात अनुबंध आणि जिव्हाळा आहे त्यांचा प्रत्येक संभोग अधिकाधिक सरस होत जातो कारण ते आपला आनंद एकमेकांशी शेअर करतात. याचा अर्थ फँटसी नसतेच असा नाही पण मी या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे : १) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं. ४) ४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय???? कदाचित तुम्हाल फक्त धागे काढण्यातच इंटरेस्ट आहे. प्रतिसाद काय आलेत ? ते आपण नीट वाचलेत का ? त्यावर आपण स्वतःचं मत तयार करु शकतो का ? या गोष्टींमधे काहीही रस दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तुमच्या या विधानातून निर्माण होणारे प्रश्न वर प्रगोला ऑलरेडी दाखवून दिले आहेत. आता तरी वाचा : अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ? प्रगो बहुदा या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत. तुम्ही किमान प्रश्न जरी नीट वाचलेत तरी तुमच्या धागा काढण्याचं तुम्हालाच सार्थक झाल्यासारखं वाटेल.

टफि साहेब सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

टफि साहेब सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

टफि साहेब सिंह एकाच वेळेस अनेक सिंहिणि बरोबर संबंध ठेवतो परंतु आपल्या छाव्या वर प्रेम करतो.तेंव्हा बहुपत्नीत्व आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई मुलावर करते बाप मुलावर करतो तेही प्रेमच असते खुळचट हा गैरसमज आहे. बाकी नंतर.

मार्कस ऑरेलियस,
मी भारत सौदी अमेरिका अशा अनेक ठिकाणी काळ घालवल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांच्या संकल्पना धारणा भिन्न भिन्न असु शकतात , असतातच हे मला कळुन चुकले आहे .
नेमक्या याच कारणासाठी आपण तथ्यांवर आधारित चर्चा करूया असं म्हणालो होतो. तथ्यांसंबंधी एकवाक्यता असते. धारणा जरी विभिन्न असल्या तरी वस्तुस्थिती एकंच असते. उदाहरणादाखल एक तथ्य असं की LGBT समूहात नशेबाजी प्रचंड बोकाळते. LGBT संबंधी अनेकांच्या अनेक धारणा असतील. काही अनुकूल असतील तर काही प्रतिकूल. पण तिथे माजलेली नशेबाजी हे (निदान युरोप आणि अमेरिकेत तरी) चिरंतन तथ्य आहे. ते कधीच विवादास्पद नाही. अशा तथ्यांच्या आधारे चर्चा करायची असेल तर मी चर्चेस तयार आहे. आ.न., -गा.पै.

१) लग्न हा नॉर्मल स्त्री-पुरुषांसाठी सहजीवनाचा उत्तम पर्याय आहे. प्रगोंचे १० का काय ते पर्याय नॉर्मल स्त्री-पुरुषांसाठी नाहीत. नॉर्मल म्हणजे ज्यांना रोज शक्यतो घरचं जेवण लागतं, अपत्यप्राप्तीची इच्छा आहे आणि एकमेकांबरोबर, दोघांचं मिळून एकच सहजीवन जगण्याची इच्छा आणि तयारी आहे. २) प्रगो प्रणित मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कुणाची आणि त्याचं संगोपन कसं होणार यावर ते स्वतः कोणतही उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या १० पर्यायातला लिव-इन पर्याय सुद्धा बाद ठरतो. ३) टफिचां नवे विचार मांडण्याचा प्रयत्न सदर विचार जुनाट आणि काल्पनिक असल्यानं फसला आहे.

अजुन सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. परवाच आमच्या बिल्डींगचा कचरा घेऊन जाणारी स्त्री सांगत होती 'मला चार मुलीच आहेत. नवरा मारहाण करतो. आता तो दुसरी कोणी बाई घेऊन आला आहे आणि मला घराबाहेर काढलय. सध्या बहिणीकडे राहते.....' तिला काय ते अनुबंध कृतज्ञता कंपेटेबिलीटी वगैरे प्रवचन ऐकवायला हवं होतं.... असो.... सध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे. आणि हो भारतीय कायद्यात लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नाही याबद्दल सगळे चिडीचुप का असतात? तुमच्या बायकांना एकपती राहण्याची, शरीरसुख देण्याची किंमत मिळत असेल हो; करत असतील त्या वसूल 2bhk अन् काय न् काय... पणम्हणुन निम्नवर्गातल्या स्त्रीनेदेखील ते च नियम का पाळायचे? की आपल्यावर एकच पुरुष लिगली सोशली बलात्कार करतोय याचंच समाधान मानायचं....

In reply to by एमी

अॅमी,
पणम्हणुन निम्नवर्गातल्या स्त्रीनेदेखील ते च नियम का पाळायचे? की आपल्यावर एकच पुरुष लिगली सोशली बलात्कार करतोय याचंच समाधान मानायचं....
त्याचं काये की, संसार एकमेकांच्या सहमतीने करायचा असतो. बिछान्यात पटलं नाही म्हणून संसार मोडायचा आहे का, असा प्रश्न आहे. उत्तर होकारार्थी असल्यास संसार जमवूच नये. आ.न., -गा.पै.

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय ? होय ! साहचर्य ? होय ! आणखी काय?????? होय ! जमल्यास अधून मधून भांडायचे असेल तर थर्ड पार्टी शोधायचे कष्ट वाचतात. :)

मागील पानावरील पैटर्नीटीबद्दलची चर्चा लॉल आहे अगदी =)). स्त्रीचा फर्टाइल काळ तो किती... त्यात ती शंभरजणांशी रत होण्याची शक्यता किती... काय त्या फँटस्या... (की फोबिया ?)

In reply to by एमी

In general, a woman’s fertile window is the day of ovulation (usually 12 to 16 days before the menstrual period begins) and the five days preceding it. For the average woman that occurs somewhere between days 10 and 17. But the problem is that few women are average. समजा अ‍ॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे. आता अपत्याच्या पितृत्वाचा प्रश्न आहे. त्या सर्व पुरुषांचा हिशेब कोण ठेवणार ? शिवाय ऐनवेळी ते सर्व पुरुष डिएनएला तयार होणार का ? जर प्रत्येक टेस्टचा खर्च १३,००० असेल तर तो कोण करणार ? शिवाय प्रगोंचा सगळा भरवसा डोपामाईन स्त्रवण्यावर आहे. टेस्ट पश्चात पुरुषाला सदर स्त्रीकडे पाहून डोपामाईन सिक्रिट झालं नाही तर तो त्या अपत्याची जवाबदारी घेईल का ? पुन्हा स्त्रीला डोपामाईन स्त्रवलं नाही तर ती त्या पुरुषाबरोबर राहील का ? थोडक्यात, मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याच्या संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

समजा अ‍ॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे.
हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही.

In reply to by सतिश गावडे

जिथे कल्पनाच इतकी भेदी आहे तिथे वास्तव काय असेल ? तस्मात, एक पुरुष निदान एका स्त्रीच्या अपत्याची जवाबदारी घेतो ही सद्य स्थिती सोयीची आणि लॉजिकल नाही का ? शिवाय डिएनए टेस्ट आणि डोपामाईनच्या भानगडी नाहीत !

In reply to by संजय क्षीरसागर

जिथे कल्पनाच इतकी भेदी आहे तिथे वास्तव काय असेल ?
आपलं म्हणणं रेटण्यासाठी तुम्ही कल्पनेचा कडेलोट केला आहे. कल्पनेच्या नावाखाली आपण काय लिहीतोआहोत याचं भान तुम्हाला राहीलेलं नाही.

In reply to by सतिश गावडे

हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही. "आऊटलायर्स" ही संज्ञा अशी टोकाची परिस्थिती/व्यक्ती यांचा निर्देश करण्यासाठी निर्माण केली गेली आहे ! काहींना त्या टोकाच्या स्थळावर (आऊटलायर) रहायला इतके आवडते की ते त्या संज्ञेतल्या "आऊट" लाच "गेट आऊट" करून टाकतात. ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, वरच्या प्रतिसादात "परिस्थिती/व्यक्ती" यात "परिस्थिती/व्यक्ती/कल्पनेची भरारी" असा बदल करून करून वाचावे !

In reply to by संजय क्षीरसागर

नीट वाचा In general, a woman’s fertile window is the day of ovulation and the five days preceding it. For the average woman that occurs somewhere between days 10 and 17. >> याचा अर्थ स्त्रीचा फर्टाइल काळ ६-७ दिवस असतो. दुसरी गोष्ट म्हणजे पुर्ण आयुष्याचा विचार केला तर सध्या एक स्त्री ३०-३५ फर्टाइल वर्षात २/३ मुलं जन्माला घालते. कंसीव करायला अगदी १-२ वर्ष पकडली तरी ५ वर्ष एकपती राहीलं तर पुरेसं आहे. अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीत. बाकीचा काळ तिने तिला हवं तेव्हा, तिला हव्या त्याच पुरुषाशी रत व्हावे. 'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये. === समजा अॅवरेज काळ १५ दिवस धरु, यात कालात स्त्री ३० पुरुषांशी रत झाली आहे. >> असे होइल असे खरंच तुम्हाला वाटते का? एवढ्या सहजपणे स्त्रिया कोणासोबतही सेक्स करतील? त्यांचा काहीच चॉइस/ क्रायटेरीआ असणार नाही?

In reply to by एमी

एवढ्या सहजपणे स्त्रिया कोणासोबतही सेक्स करतील?>>>हायपोथेटील आहे ते ॲमी.एमबीएच्या अभ्यासक्रमात एखाद्या कंपणीतील सर्वांनी एकदम नोकरी सोडली तर काय होईल? असले हायपोथेटीकल अभ्यास असतात.प्रत्यक्षात असे घडते का?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मला देखील एक हायपोथेटिकल प्रश्न पडलाय. जर एका बिलिअनरने तुम्हाला अशी ऑफर दिली कि माझी दोन मुलं जन्माला घालायची आणि वाढवायची. त्याबदल्यात एक मिलियन ट्रस्ट फंड मध्ये ठेवले जातील. तुम्ही त्यातूनच तुमचा आणि मुलांचा खर्च भागवायच. उरलेलं पैसे मुलांना वारसा म्हणून मिळतील. तर ती ऑफर तुम्ही अकॅसेपत कराल का? त्याने अशी ऑफेर १००० स्त्रियांना दिली आहे. तुमच्याकडून सेक्स आणि मोनोगमी अपेक्षित नाही. पुरुषांनी याचे उत्तर आपण स्त्री असतो तर काय केल असते असा विचार करून द्यावे....

In reply to by एमी

मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कोण स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे. अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीत पुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? तुमच्या सिस्टममधे संगोपनाचा खर्च ५ ते ७ लाख आहे तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ? 'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये. लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अपत्य संगोपन म्हणजे त्याला ग्रॅज्युएट करायचं तर २१ वर्ष लागतात आणि वर्षाला ५०,००० रुपये इतका खर्च धरला तरी १०.५० लाख होतील ! :) कोणता तरुण ही रक्कम आधी सुपुर्द करायला तयार होईल? आणि त्यात इतकी रक्कम त्याच्याकडे असेल का हा प्रश्नचे. असल्या भन्नाट कल्पनांनी सगळा प्रकारच स्टँड स्टीलला येईल !

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कोण स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे. >> अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत. अपघाती , नकोशी मुलं जन्माला घालू नयेत. === पुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? >> मग स्त्री ने मुल जन्माला घालू नये. किंवा स्वतः जबाबदारी घ्यावी. आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? >> लिहलंय की वर. परत काय तेचते? === तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ? >> संग करण्यासाठी ५/१० लाख? प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का? === लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? >> भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो? === का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? >> कायद्याचं बोला! === लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे. >> मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाही. === असो. बायबाय. तुमचं चालूद्या.

In reply to by एमी

१) अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत. अर्थात ! पण तुम्ही तर म्हणतायं आधी संगोपनाचा फुल खर्च पुरुषाकडून वसूल करावा. त्यात तुम्हाला विवाह मान्य नाही. त्यामुळे हे फारच इंप्रॅक्टीकल आणि हास्यास्पद आहे. २) प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का? हे बरोबरे पण नुसताच संग करायचा असेल तर मग सहजीवनाची तरी गरज काय ? ३) भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो? कायद्याचं बोला! फारच उत्तम प्रश्न ! याला दोन कारणं आहेत : अ) कायद्याचं ड्राफ्टींग सुजाण आणि विधायक विचारसरणी असणारे करतात. विवाह हा दोन मॅच्युअर्ड व्यक्तीतला एकत्र राहाण्याचा करार आहे ही किमान समज ठेवून कायदा ड्राफ्ट केला गेला आहे. तुम्ही जो विचार करता (आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' ) तितका विक्षिप्त विचार कायद्यात अंतर्भूत नाही. ब) जर उपरोल्लेखित विक्षिप्त विचार करणारे लोक असतील तर थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल. तस्मात, अशा व्यक्तींनी विवाहापासून दूर राहावं यासाठी ती तरतूद असावी. ४) मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाही बरोबर आहे. आयुष्यात किती आनंद मिळणार आणि ते किती सुखाचं होणार हे व्यक्तिगत दृष्टीकोन आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून आहे. मला सुद्धा चार मुलं असती तर कदाचित अशीच ओढाताण झाली असती ! म्हणजे धाकट्याचा अजून अभ्यास घ्यायला लागतोयं, मोठी मुलगी लिव-इनमधे राहायचं म्हणतेयं, धाकटीला उच्चशिक्षणासाठी घर जामीन ठेवून कर्ज घ्यायचंय, थोरले सुपुत्र आणि सुन पाळणाघराची उत्तम सोय म्हणून बरोबर राहातात, पत्नीशी गप्पा मारायला मोकळा वेळ ती हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट झाल्यावर मिळतो, आणि या सगळ्या उपद्व्यापात जीवाला थोडा विरंगुळा म्हणून मी दुसरीकडे सूत जमवलंय ..... वगैरे. थोडक्यात, संसार किती वाढवायचा हे समजलं नाही की परिणाम भोगावे लागणारच. ५) बाय द वे, वर तुम्ही म्हटलंय सध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे. मला एका गोष्टीचं कायम नवल वाटतं , पब्लिकला स्वतःपेक्षा दुसरा काय करतो याचीच पडलेली असते :) ! तुम्ही वरील दोन पैकी नक्की कोणत्या गटात येता ? आणि विवाहाचा तुम्हाला नेमका काय त्रास वाटतो ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचं चालू द्या.... === वाचकांना हवे असेल तर त्यांनी maneka gandhi यांचे marital rape बद्दलचे निवेदन आणि त्यावरुन झालेली काँट्रोवर्सी गुगलून पहावी. हा कायदा १७३४ साली कोणा ब्रिटिशाने त्यांच्या साठीच ड्राफ्ट केलेला. तोच इकडे आणला १८५० मधे...

In reply to by एमी

नंतर मारलेला कंप्लीट यू टर्न तुम्ही वाचलेलाच दिसत नाही ! "It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc." विवाह हा भारतीय संस्कृतीनं मानवाच्या समग्र जीवनाचा विचार करुन जगापुढे ठेवलेला विधायक पर्याय आहे. ( इंटरेस्ट असेल तर याविषयी माझे सुरुवातीचे प्रतिसाद वाचावे). मनेका बाईंना विवाह संकल्पने मागच्या या समग्र परिमाणाची कल्पनाच दिसत नाही आणि ज्यावेळी त्यांनी वैवाहिक बलात्काराची भंपक कल्पना मांडली त्या वेळी ही नव्हती. अर्थात, नंतर त्यांना किमान स्वतःच्या विधानातली व्यर्थता आणि अवास्तविकता कळली आणि त्यांनी ते मागे घेतलं, त्यासाठी मग भले त्या काहीही कारणं देवोत. तुम्हाला बहुदा त्यांच्या ओरिजिनल विधानाच्या प्रभावातून अजून सुद्धा बाहेर पडता येत नाही असं तुमच्या प्रतिसादांवरुन दिसतंय.

In reply to by संजय क्षीरसागर

काय वाचता आणि काय लिहता... धन्य आहात _/\_ ज्याला युटर्न म्हणताय ती दुसर्याची मतं त्यांनी फक्त वाचून दाखवलेली, त्या वरुनच काँट्रोवर्सी झाली आणि मग त्या परत आधीच्याच मताकडे गेल्यात.

In reply to by एमी

Answering a question in Rajya Sabha on March 10, Women and Child Development Minister Maneka Gandhi said, “It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc.” The same statement had been read out in Rajya Sabha in April 2015 by Minister of State for Home Haribhai Parathibhai Chaudhary.

In reply to by संजय क्षीरसागर

=)) कसले कॉमेडी आहात ओ तुम्ही! याच स्टेटमेंटवरुन तर काँट्रोवर्सी झाली होती. त्यानंतर परत मनेका परत बैक टू ओरीजनल स्टँड गेल्यात. सोपं करुन सांगते; बघा समजतय काः १. marital rape हा कायद्या ने गुन्हा असावा असे मनेकांनी एका मुलाखतीत सांगितले होते. २. त्या नंतर काही काळाने राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी दुसर्यानेच ड्राफ्ट केलेले उत्तर फक्त वाचून दाखवले. ३. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. ४. मग त्या परत marital rape हा गुन्हा असावा या स्टँडवर गेल्यात.

In reply to by एमी

Months after her statement that "concept of marital rape cannot be applied in the Indian context" created some controversy, Union minister Maneka Gandhi on Tuesday said even if there was a law against it, women are unlikely to complain about this kind of abuse. The Minister for Women and Child Development said women could instead file complaint of marital rape under the existing Domestic Violence law. तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर मराठीतून सांगतो. मनेका बाईंना त्यांच्या विधानातला भंपकपणा कळल्यामुळे त्यांनी तसा कोणताही कायदा भारतीय जीवनशैलीत आणता येणार नाही असा स्टँड घेतला आणि तदनंतर स्त्रीयांनी सदर प्रकारची तक्रार असेल तर ती डोमेस्टीक वायलंस म्हणून दाखल करावी असं म्हटलं. त्यांनी स्वतःचा स्टँड केव्हाच बदललायं, तुम्ही मात्र चुकीच्या स्टँडवर अजूनही अडकून आहात.

In reply to by संजय क्षीरसागर

हा त्यांना पडलेला पश्चात प्रकाश ! We have a law already on violence against women and that includes marital rape. The point is that there has never been a complaint under it, never...We can use domestic violence (law) and then build on it but at the moment there is not even one complaint," she told an All Women Journalists' Warkshop at Vigyan Bhawan. आता तरी सदर प्रकाश तुम्हाला ही पडो ही कामना : )

In reply to by संजय क्षीरसागर

आधीतर युटर्न म्हणत म्हणत ज्यावरुन काँट्रैवर्सी झाली तेच कॉपीपेस्ट करत होतात की. आत्ता वेगळे काही पेस्टताय. कधीच्या बातम्या आहेत या? तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाही पण ही http://www.governancenow.com/news/regular-story/maneka-gandhis-uturn-ma… लिंक वाचा. एप्रिल मधली आहे. मी याला युटर्न म्हणत होते. We have a law already on violence against women and that includes marital rape. >> जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ? '' थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल.'' बादवे marital rape हा भारतात क्राइम नाहीय. तो क्राइम करायचा की नाही यावरूनचतर गोंधळ चालू झालेला.

In reply to by एमी

१) लिंक उघडते आहे. नसेल तर ही यूआरेल कॉपी करुन उघडा आणि वाचा http://www.ndtv.com/india-news/can-have-law-on-marital-rape-but-women-w… तुमच्या बातमीनंतरची म्हणजे June 08, 2016 ची ही न्यूज आहे आणि बाईंना अशा कायद्याची गरज नाही हा प्रकाश पडला आहे. २) जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ? बाईश्री, एकतर तुमच्या आदर्श मनेकाबाईंनीच मॅरिटल रेपची तक्रार डोमेस्टिक वायलंसखाली गुदरायला सांगितली आहे. तस्मात, तुमची मॅरिटल रेपच्या गुन्ह्याची व्यथा निकालात निघाली आहे (किमान इतपत लॉजिक तरी समजायला हरकत नाही). या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ? माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल त्यामुळे डोमेस्टिक वायलंस खाली तक्रारी होत नसतील.

In reply to by संजय क्षीरसागर

किती मतिमंद सारखे प्रतिसाद देतात लोकं....सगळ्या विकसित देशात marital rape कायद्याने गुन्हा झालेला आहे. मुस्लिम आणि आफ्रिकन देशात मात्र तो अजूनही गुन्हा नाही. आणि आपला महान भारत देश अशा 36 वाळवंटी वृत्तीच्या लोकां सोबत असावा असे मत असणारे दुसर्याला जागाच्या पाठीमागे म्हणतायत.... जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा. तुमच्या बातमीनंतरची म्हणजे June 08, 2016 ची ही न्यूज आहे आणि बाईंना अशा कायद्याची गरज नाही हा प्रकाश पडला आहे. >> ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत. या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ? >> हा हा तुमचीच मतं फोबियाग्रस्त आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. काय तर म्हणे एक स्त्री १०० जणा सोबत सेक्स करेल. १५ दिवसात ३० जण. जरा काही बिनसल तर लगेच बलात्काराची तक्रार...चक्कु छूरी दगा फटका माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल >> तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय. असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.

लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आह
या साठी लग्न करावे लागते??? लग्न न करता लिव्ह इन किंवा अगदी "बायका ठेऊन" सहजीवनाचा आनंद घेणारी इतिहासात व वर्तमानात कितीतरी उदाहरणं आहेत.फक्त सिलेक्टीव्ह थिंकींग करत आहात?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

टफि परवडेल का विचार करा ! बायका ठेवणं सोपं काम नाही. आणि दोघात मिळून एक आयुष्य जगायचं ही कमीटमेंट असेल तर लग्नाला काय अडचणे ? इतिहासाचं सोडा स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याचा विचार करा. लोकांना कमीटमेंटची धास्ती वाटते म्हणून तर लीव-इनकडे कल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

लोकांना कमीटमेंटची धास्ती वाटते म्हणून तर लीव-इनकडे कल आहे >>>> त्यात गैर काय आहे.मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

वैयक्तिक होत असेल पण दुसऱ्या अंगाने विचार करून पहा. एखाद्या माणसाची पंचविशीतील बायको दुसऱ्या माणसाकडे त्याचा पैसे आणि प्रतिष्ठा पाहून आकर्षित झाली आणि त्याच्याशी संग करू लागली तर किती पुरुषांना हे झेपेल. जनावरांसारखे वासनेच्या आहारी जाऊन "कुणाशीही कसेही रत" होणे हे आपल्याला मुक्ततेत अध्यारुथ आहे काय? अधिकार ये जबसे साजनका हर धडकन पर माना मैने मै जबसे उनके साथ बंधी, ये भेद तभी जाना मैने कितना सुख है बंधनमे या बंधनाची "खोली" (गहराई) आपल्याला कळेल का?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

किंवा तुमचा निर्णय आधीच झाला आहे पण तुम्ही त्याबद्दल साशंक आहात म्हणून जनमत चाचपणीसाठी हा धागा काढलायं. मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का? उलट विचारही करुन पाहा म्हणजे खाडकन जाग येईल. आता तुम्हाला सायकॉलॉजिकल कारणमिमांसा देतो. ज्याला स्वतःच्या निर्णयाची खात्री नाही त्यानं लग्न न करणं उत्तम कारण तो काही रोज उठून बघायचा डोपामाईन टेस्टींगचा विषय नाही. त्यातून ज्यांना लग्न म्हणजे दोन बिएचकेच्या बदल्यात रोज ओढवून घेतलेला बलात्कार वाटतो त्यांच्यासाठी तर नक्कीच नाही. लग्न हा एकमेकांच्या सहवासाचा आणि परस्पराप्रती विश्वासाचा आनंद सोहळा आहे. वयपरत्वे रुपात फरक पडत जाणार इतकी सुद्धा मॅच्युरिटी नसेल त्यांना कमीटमेंट शक्य नाही. आणि ज्यांना स्त्री-पुरुष सहजीवन म्हणजे निव्वळ संभोगासाठी जवळीक इतकंच दिसतं ते कितीही संभोग केला तरी अतृप्तच राहाणार कारण संभोगाची खुमारी प्रितीत आहे. दोघात मिळून एक आयुष्य म्हणजे तीचं ते सर्व आपलं आणि आपलं ते सगळं तीचं ही खूणगाठ आहे. तीनं आपल्यासाठी आणि आपण तिच्यासाठी कायकाय केलं याप्रती एकमेकांना कृतज्ञता आहे. अपत्य जन्म आणि संगोपन हे दोघांचं बालपण परत येणं आणि दोघांनी मिळून ते एंजॉय करणं आहे. इतके पैसे आधी ठेव तरच मी मूल जन्माला घालीन असला भंपकपणा सुजाण विवाहितांच्या कल्पनेत सुद्धा येत नाही. एनी वे, मी स्वतः एक यशस्वी आणि आनंदाचं वैवाहिक आयुष्य जगतो त्यावरनं सर्व मतं मांडली आहेत. लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे, त्यात कुणालाच सुख नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आपण कोण आहात हे मला माहीत नाही....पण जिच्याबरोबर काही काळ तरी सुखाचा काढला आहे अशा स्त्री बद्दल ( तसे म्हटले तर कुठल्याच स्त्रीबद्दल अशी भावना बाळगणे हे चुकीचे आहे) एक रद्दी वस्तू म्हणून आपण पहात आहात हे वाचून मलाच शरम वाटते आहे. संपादक महाशय जरा इकडे लक्ष द्याल का?

In reply to by जयंत कुलकर्णी

त्यांचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. लग्न करावं की नाही हा पेच सोडवण्यासाठी त्यांनी हा धागा काढला आहे.

धाग्याची वाटचाल खालील उद्येशाच्या दिशेने जावी असा काही जणांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे... "अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे." लेखकाचा इतिहास पाहता, त्याच्याही मनात असेच काहीसे असावे असे वाटायला बराच वाव आहे ;) आणि हा उद्येश बर्‍याच अंशी सफल होत आहे हे दिसतेच आहे ! :) और आंदो !

In reply to by संजय क्षीरसागर

वा, वा ! या वेळेला तुम्हाला आमचे "मत" पूर्णपणे पटले, त्यात काहीएक कुसळ सापडले नाही का ? वॉव, अत्यानंद का काय म्हणतात ना तो झाला आहे ! :D मात्र, "अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ?"; व तत्सम अंतीम -ईये असलेले शद्बप्रयोग कौतुकाने वारंवार करणार्‍याकडून असा "वैय्याकरणीय" प्रतिसाद ! काय हे ?! स्वभावाला औषध नाही, दुसरे काय ? ;) असा फुकट सल्ला देण्यात काय फायदा नाही बघा. अध्यात्माबरोबर व्याकरणाचे क्लासेस घेणारे संस्थळ काढा आणि सल्ला देण्याचा दर दिवस / महिना / वर्ष / सल्ला चार्ज लावा. (टीप : हा सल्ला फुकट आहे.) =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्याला व्याकरण नाही म्हणत हो ! तो साधा मराठी शब्द आहे आणि तो उद्येश असा नसून उद्देश असा आहे. अध्यात्म वगैरे तर त्यात अजिबात नाही. किरकोळ गोष्टीसाठी ओढाताण नका करु जीवाची.

In reply to by संजय क्षीरसागर

"पाहिलीये" तरी कुठे प्रमाण शब्द आहे ? स्वतः "पाहिले आहे" हे आणि तत्सम चुकांसंबंधी बरोबर असलेले शब्द शंभर वेळा लिहून काढा आणि परत तशी चूक करणार नाही असे कबूल करा. नाहीतर, "लोका सांगे ब्रम्हज्ञान... " अशी किर्ती झाली आहेच तिच्यात अजून वाढच होईल. :D संबंध नसताना, नको तिथे, नको ते खुसपट काढण्याची सुरसुरी तुम्हाला आली यातच काय ते सगळे सिद्ध होत आहे. इथे तुम्हाला कोणी "कॉपी एडिटर" म्हणुन नेमले आहे का ? नाही. तेव्हा "अशी सुरसुरी स्वतःच्या खाजगी संस्थळावर भागवून घेणेच योग्य होईल" असा विनाशुल्क पण योग्य सल्ला आहे. लोकांचे जबरदस्तीने मनोरंजन करण्याची तुमची खोड जाणे कठीणच्च आहे म्हणा ! =)) =)) =)) *************** अवांतर : वैद्यकीय महाविद्यालयातले आमचे एक सर्जरीचे शिक्षक असे म्हणत असत, "कोणत्याही सर्जनमध्ये सर्जरी करण्याचे कौशल्य अत्यावश्यक आहेच, पण 'केव्हा सर्जरी करू नये' हे ज्याला नीट माहीत आहे व ते तो अमलात आणतो, केवळ तोच उत्तम सर्जन असतो." अधिक शिक्षण आणि अनुभवानंतर तो सल्ला सर्व विषयांमध्ये उपयोगी असल्याचे कळून चुकले. म्हणून, आता आम्ही खालील तत्व कटाक्षाने ध्यानात ठेवतो आणि अमलातही आणतो... एखाद्या विषयात प्राविण्य असणे हे त्या विषयातल्या तज्ञासाठी आवश्यक असतेच, पण, त्या विषयातही, आपले मत केव्हा देऊ नये हे ज्याला माहीत असते, तो उत्तम तज्ञ असतो. प्राविण्य असलेले नसलेले बाकी सगळे, "उथळ पाण्याला खळखळाट फार", या म्हणीची उदाहरणे असतात.