लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
प्रतिक्रिया
संमं हे दशानन कोण आहेत ?
परत निरर्थक प्रतिसाद!
क्षणभर मला इथे "मी मराठी "
@ अभ्या,
क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गोदे !
हा हा हा
ते फार इंटरेस्टींग आहे !
लग्न हा एक अतिषय निरर्थक
+1.. मी पण हीच लिंक डकवणार
प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत
ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहेओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य हीधारणारहित चित्तदशा आहेआणि विवाह ही केवळमान्यताआहे. कोणतीही`मान्यता'(ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. २)ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो.दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही. ३)ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल !ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही. माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.माझा प्रतिवाद करु शकत नाहीत
ते तर मी प्रतिसादताच म्हटलंय नीट बघा !
बरं
<<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी
विमि,
सर असंच ज्ञान द्देत रहा सर!!
नमस्कार संक्षी सर !
धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद !
प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही !आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे :ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते !हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ? कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत. विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही. माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.+१
संक्षी जी ...
+1.. असंच म्हणते..
संक्षिंचा चपखल प्रतिसाद
संक्षि, चांगला प्रतिसाद.
माझ्या मते ओशोंचे विचार फार
प्रगो,
हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाहीसहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ? अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची ! ३)" केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे "पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?हे थोडं असं वाचा, मजा येईल !
पर्याय तर सांगा ना !
प्रगोमेंदुच्या कोणत्यातरी
नमस्कार सुबोध खरे सर !हे
the pursuit of happiness;
. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)गोल आणि भंपक वितंडवाद
सुखी रहा
खूप छान प्रतिसाद ... +++++१
खूप छान प्रतिसाद ... +++++१
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह
मागे तुम्हीच का कोणीतरी धागा
ख्याक
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी
लग्नसंस्थेला पर्याय ?
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी
सहमत
श्री श्री माहीतगार जी आणि श्री श्री बिरुटे सर
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
गावठी या शब्दाला
पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.
ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?मंगळसुत्र असेल तर स्त्रीला
रामराज्य येईल तेव्हा येईल हो.
तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं
अच्छा. हा कंगोरा आहे तर त्या
Pagination