Skip to main content

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 16/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

वाचने 74234
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???

एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)

आपण अवतारी पुरुष आहात माहित होते . पण दारू ,बाया हे नाद करताना बुद्धी शाबूत असावी लागते . असो कधीतरी लेक्चर ला या आमच्या .कॉपी पेस्ट करून थकतो माणूस .

मराठी संस्थळावरचा सर्व्हे करायला ? दिवाळीच्या फराळाची ताटं फिरवल्यासारखे लेख फिरवताय . . . . ईगल गँग, बिच्छू गँगची गोष्ट माहिती आहे का???

१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-P

मुद्दा रोजच्या जगण्यातला आहे हे नक्की. सदस्यांनी चर्चा व्यक्तिगत न होऊ देता मुद्यावर आधारित ठेवली तर ती विवाहित, उलटसुलट विचारांचा गोंधळ झाल्यानं लग्न करु की नको या द्विधेत सापडलेले अविवाहित, चुकीची विचारसरणी पसरवणारे राजवाडे (पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले), तितकीच चुकीची धारणा असलेले टफि (मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते ) आणि एकूणात भारतीय विवाह संकल्पनेमागचा विचार या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह होऊ शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो
सर यावर तुम्ही एक धागा काढत नाही? अशा ज्ञानदायी धाग्यांची मिपाला गरज आहे.

In reply to by सूड

मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते
वरच्या प्रतिसादात हे वाचलं नाही वाटतं तुम्ही. शोधा तो धागा आणि वेचा ते ज्ञानकण.

In reply to by सतिश गावडे

अरेरे, सरांच्या ज्ञानाचे कण वेचायचे म्हणजे मज पामराला होणे नाही. त्यांनी बैजवार धागा काढावा आणि सर्वांना उपकृत करावे. समस्त मानव प्रजाती त्यांची ऋणी राहील.

हा फार मोठा आणि गहन विषय आहे. तरीही १) मुक्त शरीर संबंध असणे हे पुरुषाच्या दृष्टीने फायद्याचे असले तरी स्त्रीच्या दृष्टीने ते तितके फायद्याचे नाही. आणि बालकांच्या दृष्टीने नक्कीच नाही कारण मातृत्व हे असंदिग्ध आहे( आई कोण हा प्रश्न उद्भवत नाही) पण पितृत्व संदिग्ध आहे त्यामुळे मूल हे आपले नसेल तर पुरुष त्याच्या प्रतिपाळासाठी किती कष्ट घेईल हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. २) पुरुषाची कामेच्छा हि स्त्रीपेक्षा जास्त असते आणि जास्त काळ टिकणारी असते. त्या तुलनेत स्त्रीची कामेच्छा हि बरीच हेलकावे खाणारी असते म्हणजे पाळीच्या वेळेस, गरोदरपणात रजोनिवृत्तीनंतर बरीच कमी झालेली आढळते. यामुळे एक पत्नी व्रत यात पुरुषाला कामेच्छा मारायला लागते आणि त्याची कुचंबणा होते हि वस्तुस्थिती असली तरी स्त्रीआणि मुलाच्या दृष्टीने एक पत्नीव्रत हे अंतिमतः फायदेशीर ठरते. ३) लग्न बाह्य संबंध हे बहुसंख्य वेळेस कामवासना शमवण्यासाठी उपयुक्त होतात. हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने उपयुक्त असले तरीही समाजास्वास्थ्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे जगभर बहुसंख्य समाजात लग्न संबंधांना जितकी मान्यता आहे तितकेच लग्नबाह्य संबंधांबद्दल तिरस्कार आहे. ४) पुरुषाची कामेच्छा जास्त का असते या बद्दल मी एका धाग्यात शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे याचा विस्तृत उहापोह केला होता परंतु माझे लेखन यावर टिचकी मारली असता दुसरेच काही तरी येत आहे. आणि आता तेच परत टंकायचा मूड नाही. जेंव्हा माझे लेखन उपलब्ध होईल तेंव्हा पुढच्या भागाची चर्चा करता येईल.

In reply to by सुबोध खरे

छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं टेस्टेस्टिरॉन उतारवयात बरचं कमी होत तरीही त्याचं कामेच्छा कमी होत नाही याच रहस्य काय? नातीच्या वयाच्या तरुण मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणारे म्हातारे बघितले की हा प्रश्न पडतो.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अतृप्त कामेच्छा ! त्यातून हे सगळे उपप्रश्न निर्माण होतात : १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं. २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? अतृप्त कामेच्छा ! ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते.

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. ???!!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार. त्यांचे मत नेहमी परिपूर्ण, निर्विवाद, परफेकट असते याची त्यांना तीळमात्रही शंका नाही.

In reply to by सतिश गावडे

देवाला, गुरूला, आईला आणि अतीज्ञानीला प्रतिवाद करू नये नाहीतर थोबाड फुटते अशी म्हण आहे म्हणे हिब्रू मध्ये! ;) येथे तर देवांचे देव प्रतिसाद देत आहेत, किमान होय म्हराज!!! म्हणून गप्प व्हा ;)

In reply to by संजय क्षीरसागर

"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे." संक्षी, तुम्हाला येथे अपत्याचा विवाह असे म्हणायचे आहे का? असल्यास त्याचा योग्य खुलासा करा नाहीतर वेगळाच अर्थ निघतो :D

In reply to by दीपक११७७

काय चुकलं त्यात,मिपावर चार प्रतिसाद देणारे जेन्युन आहेत बाकी धाग्याचा खरडफळा करायला बसतात म्हणून ती कमेंट दिली आहे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

जेवत असलेल्या ताटाबद्दल / ताटामध्ये असे "शेण" का हो कालवले? मिपाच्या विरुद्ध बाजूला कधीकाळी मी पण उभा होतो, पण असा प्रकार... नाही पटला! माफी मागावी मिपाची तुम्ही.

In reply to by कपिलमुनी

ते कमरेला लटकलं आहे ते खांद्यावर असलेल्या सापाचे पिल्लू आहे की त्या सापाची शेपटी आहे?

In reply to by टवाळ कार्टा

अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले यांचे "नागाच्या पिल्लाला का गं खवळीलं" हे मत योग्य आहे की नाही याचा उलगडा होईल या माहितीने.

In reply to by सूड

काहीही नको...सर नर्तकी ऐवजी नागाचीच इतकी का चौकशी करत होते ते समजले नव्हते म्हणून विचारले

कुणाची म्हस कुणाला उठबस सिंजी हे इथे बसेल ना चपखल.+11111111111111
ती कडुन ईकडे

"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे." यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ? प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ? आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमची टांग दुखत नाही का हो आजोबा? दर वेळी गिरे भी टांग के उपरच तुमचे सुरू असते, कधी तर सज्जनपणे झालेली चूक मान्य करुन माघार घेत जावा की राव!

In reply to by दशानन

प्रयत्न चांगला होता तुमचा.. पण वेळ वाया जातोय एवढ्यात ते एलियन केप्लर वरून इथे येऊन सात बारा पण करून घेतले असते .. तेवढं बघा काय ते

In reply to by दशानन

एकतर यांची समज कमी हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे कारण यांच्या प्रतिसादाला काहीही आगापिछा नसतो. त्यात सदस्याला स्वतःचं संकेतस्थळ असल्यासारखी, काहीही संबोधण्याची यांची हिंमत कशी होते ? या आयडीला योग्य ती समज द्यावी.

In reply to by संजय क्षीरसागर

परत निरर्थक प्रतिसाद! अहो जे तुम्ही चुकीचे बोलले /लिहले आहे त्याबद्दल माफी मागा. चूक मान्य करा.

In reply to by अभ्या..

क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला. एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)

In reply to by दीपक११७७

संकेतस्थळावर व्यक्तीची ओळख त्याच्या लेखनशैलीमुळे असते. तुम्ही एकदम नवखे दिसता त्यामुळे असा गैरसमज झाला आहे. माझे प्रतिसाद वाचत चला, गैरसमज दूर होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हे सगळे तुमच्या मागे का लगले आहेत. बरेचदा सर्व प्रतिसाद वचुन सुध्दा कळले नाही. म्हणुन विचारले. :-)

In reply to by दीपक११७७

माझी मतं ही प्रचलित समाजधारणांविरुद्ध असतात त्यामुळे सदस्यांच्या कल्पनांना धक्का बसतो आणि मग सदस्य मला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतात, जेणे करुन त्यांच्या कल्पना पुन्हा प्रस्थापित होतील. आता इथेच बघा, विवाह हे बंधन आहे अशी बहुतेकांची ( म्हणजे जवळजवळ सर्वांचीच !) धारणा आहे आणि त्यांचा मुक्त लैंगिक व्यवस्थेला (मनातल्या मनात का होईना :) ) पाठींबा आहे ! माझं मत विवाह संकल्पनेला अनुकूल आहे आणि ती केवळ दोघातली मान्यता असल्यामुळे ते बंधन असू शकत नाही असा दावा आहे. त्यामुळे सदस्य मला कॉर्नर करायच्या प्रयत्नात आहेत आणि मला उत्तरं द्यायला मजा येतेयं !

लग्न हा एक अतिषय निरर्थक प्रकार आहे , ह्या विषयावर आमच्या गुरुदेव ओशोन्नी एक अप्रतिम प्रवचन दिले आहे : OSHO: Marriage and Children - YouTube https://www.youtube.com/watch?v=5ocbZhRQS9I ह्या पेक्षा जास्त आम्हाला काहीही बोलायचे नाही . असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

पण तुम्ही दिलेल्या लिंकमधे ते साफ चुकले आहेत. दुर्दैवानं ते माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की. एनी वे, तुम्हाला ते विचार पटले आहेत तर तुम्ही प्रतिवाद करुन दाखवा. १) ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे ओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य ही धारणारहित चित्तदशा आहे आणि विवाह ही केवळ मान्यता आहे. कोणतीही `मान्यता' (ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. २) ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो. दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही. ३) ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल ! ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही. माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

In reply to by संजय क्षीरसागर

माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की
साहेब.. तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?

In reply to by अद्द्या

पण ओशोंच्या या विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनाची वाट लागली ही वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले होते की सर्व जग हे एक कम्युन होईल तेव्हा पृथ्वी स्वर्ग होईल. पण जिथे त्यांचा कम्युनच, स्वतः ओशो हयात असतांना, सदस्यांच्या अपत्यांची जवाबदारी स्वीकारायला तयार नव्हता (आणि आता तर शक्यच नाही), तिथे सर्व जगात मुक्त लैंगिक संबंध आणि अपत्यही समाजाची जवाबदारी कशी होईल? तस्मात, सामाजिक सुव्यवस्था आणि अपत्याची जवाबदारी यासाठी विवाहसंकल्पनेला पर्याय नाही.

In reply to by अद्द्या

तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?>>> ==>> गुरु सुद्धा चुकू शकतात ना ? किती ही शिकलेसवरले तरी वैचारिक गुलामगिरी सोडायला कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव्य. गुरु जे सांगेल ते अंतिम सत्य या विचारसरणी मुळेच तर टनटणी, आसाराम, बाबा, बापूंचे पीक फोपवले.

In reply to by विशुमित

थोडा फरक आहे. ओशो सिद्ध होते याबद्दल मला कणमात्र शंका नाही आणि त्याबाबतीत जगातल्या कुणाशीही आणि कोणत्याही फोरमवर मी प्रतिवादाला तयार आहे. पण ओशोंचा विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता कारण जी जोडपी त्यांनी बघितली (इन्क्लूडींग हीज ओन पॅरेंटस !) ती सर्व विवाहाला "वास्तविकता" मानत होती. त्यामुळे विवाह ही सुद्धा एक मजेची गोष्ट असू शकते हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मी कम्युनला गेलो तेव्हा ओशो नव्हते आणि माझं लग्न झालेलं होतं ! त्यामुळे मला तिथल्या तरुणींपेक्षा सत्यशोधनात इंटरेस्ट होता. शिवाय पत्नीशी मी उत्तम धागे जुळवले होते त्यामुळे तिलाही मी तिथे नेलं (तीनं त्यात पुढे काही रस घेतला नाही ती गोष्ट वेगळी) पण माझी कार्डस ओपन होती. तस्मात, विवाह हे ओशोंच्या दृष्टीनं बंधन असेल, माझ्या दृष्टीनं नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सर असंच ज्ञान द्देत रहा सर!! नाहीतर या प्रगोसारखे ओशोच्या प्रेमात आंधळे झालेले सदस्य लोकांची दिशाभूल करत राहतील. तुम्हीच एक तारणहार आहात घनिष्ट संबंधातली गुंतागुंत समजून सांगायला.

In reply to by संजय क्षीरसागर

नमस्कार संक्षी सर ! सर्वात महत्वाचे म्हणजे : हा प्रतिसाद देवुन मी तुमचा प्रतिवाद करायचा प्रयत्न करत नाहीये , मी केवळ माझ्या आकलनावरुन जे काही माझे मत बनले आहे ते मांडत आहे. माझे मत सार्वत्रिक सत्य असेल असे माझे म्हणणे नाही . तसेच ओशो सरही सार्वत्रिक रित्या योग्यच असतील असे ही माझे म्हणणे नाही . जो तो माणुन ज्याच्या त्याच्या जागी आणि ज्या त्या काळी योग्य असतो ( असे माझे वैयक्तिक मत आहे ). १ ) लग्न ह्या संकल्पनेला माझ्या मते अनेक पैलु आहेत : त्यातील महत्वाचे म्हणजे धार्मिक सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक. आता धार्मिक दृष्टीने पहायला गेल्यास आजकाल च्या लग्नात जे काही होते तसले काही माझ्या धर्मात अपेक्षित नाही , रादर माझ्या धर्मात लग्ना विषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्यांत निधर्मी राजसत्तेने घुसखोरी करुन नसत्या संकल्पना घुसवल्या आहेत. तस्मात धार्मिक दृष्टीने मला आजकालची लग्न संकल्पना निरर्थक वाटते. सामाजिक पैलुने पहायला गेल्यास लग्न हे एक प्रकारचे अ‍ॅव्हरेजिंग ऑऊट चाच प्रकार आहे जो की अ‍ॅन्टी नॅचरल आहे असे मला वाटते . प्रत्येकाला प्रजोत्पादनाची संधी मिळालीच पाहिजे असा काहीसा हट्ट आहे त्यात. ह्यामुळे नॅचरल सिलेक्शन चा मुलभुत नैसर्गिक नियम ओव्हर राईड केला जातो असे मला वाटते . आर्थिक पैलुतुन पहायला गेल्यास मात्र लग्न ही संकल्पना सेन्सिबल वाटते कारण पुरुष हे सहसा फक्त विकासाचा प्रगतीचा संमृध्दीचा मार्ग चोखळतात पण त्या नादात सस्टेनेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो , आणि योगा योगाने बायकांचा फोकस बहुतांश वेळा सस्टेनॅबिलीटी वर असतो . माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन तरी किमान मला तसेच वाटते की माझे जर लग्न झाले नसते तर मी आज कमावतो त्या पेक्षा किमान दुप्पट तिप्पट पैसे कमावत असतो पण आज मी फॅमिली मॅन असल्यामुळे जितका लॉन्गटर्म वेल्थ क्रियेशन चा विचार करतो तितका केला नसता आणि बहुतांश पैसा असाच उडवला असता ! आणि लास्टली वैयक्तिक पैलुतुन पहायला गेल्यास मला लग्न ही संकल्पना निरर्थक वाटते कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो तिच्या सोबत रहायला आणि सुखाने जयागला मला धर्माची राज्याची आणि समाजाची मान्यता घ्यावी लागते हा एक दुर्दैवी आणि मुर्ख प्रकार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही ! ( कदाचित हा विचार तरुणांना पटत असावा म्हणुन सध्या तरी लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार वाढताना दिसत आहे ) २) ओशो संभोग हा ड्युटी म्हणुन केला जातो असे म्हणल्याचे मला तरी आठवत नाही . परत एकदा क्लिप पहातो . ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते ! ३) ओशो म्हणतात की मुले ही कम्युनची जबाबदरी आहे हा विचार मलाही अतिरेकी आदर्शवादी वाटतो , एकदम समाजवाद किंव्वा साम्यवदासारखा ! ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो ! आता राहिला तो महत्वाचा मुद्दा म्हणजे अध्यात्मिक : अध्यात्मिक मार्गात वाटचाल करताना शुन्य लग्न करणे , एक लग्न करणे किंव्वा अनेक लग्न करणे हे तेन्ही मार्ग मोक्षाप्रत नेणारेच आहेत. ब्रह्मचारी हनुमान किंवा एकपत्नी राम किंव्वा बहुपत्नी दशरथ तिघेही धन्यच आहेत ! धन्यो गृहस्थाश्रमः असे महाभारतात स्पश्टपणे म्हणलेले आहे ! पराशर मत्स्यगंधा, कृष्ण जांबुवंती , भीम हिडींबा, अर्जुन चित्रांगदा हे तर माझे एकदम आवडते कपल्स आहे , एकदम परफेक्ट मॅरेज! ! मग हे असे असताना राजसत्तेने किव्वा समाजाने ह्यातील एकाचाच हट्ट धरावा हे अनाकलनीय , अतार्किक आणि अनैसर्गिक आहे. ह्या असल्या विचित्र नियमांमुळेच सध्याच्या काळातील लग्न संस्था निरर्थक आणि रीडंडंट ठरते . इति शम |

In reply to by प्रसाद गोडबोले

थोडक्यात तुमच्या प्रतिसादाचं सार असं आहे : प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही ! आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे : ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते ! हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ? कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत. विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही. माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.