Skip to main content

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 16/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

वाचने 74234
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

@संक्षीसर, अतिशय सुंदर चपखल प्रतिसाद आहे वैवाहिक जीवनाबद्दल. बरेचदा ओशो हे भाषणाच्या प्रवाहात वाहवत जाऊन भलतेच काही, त्यांच्या प्रशंसकांना सुद्धा न पटण्यासारखे सांगताना दिसतात. कधी कधी मुद्दाम धक्कादायक विधाने करण्याची खोड त्यांना होती की काय, असेही वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत.
आपल्या मताचा आदर आहे संक्षी सर ! मी आधीच म्हणालेलो कि जो तो ज्याच्या त्याच्या जागी आणि काळी योग्य असतो. ओशो ने जे अनुभवविश्व पाहिले त्यात ओशो योग्य होते , तुम्ही जे पाहिले आहे त्यात ते अयोग्य ठरु शकतात. इथे वादाचे काही कारण नाही !
हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ?
प्रेम ही खुपच वैयक्तिक बाब असते आणि तस्मात त्याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असतात . ओशो ची व्याख्या काय होती मला माहीत नाही आणि माझी व्याख्याही वैयक्तिक असणार सार्वजनीन नाही ! ( मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो. तुम्ही ये तेरा जिक्र है हे गाणे ऐकले आहे का गुझारिष चित्रपटातील तसे काहीसे ! किंव्वा तुम्ही धर्मवीर भारतींची कनुप्रिया वाचली आहे का ? एस्पिशली आम्रबौर के गीत की कविता ... तसे काहीसे , मी त्याला प्रेम म्हणतो ! आणि ही प्रेमाची व्याख्या जनरलाईझ करता येते , उदाहरणार्थ अशा कित्येक गोष्टी आहेत व्यक्ती नाहीत , वस्तु आहेत , जागा आहेत , आठवणी आहेत , अनुभव आहेत की त्यांच्या नुसत्या स्मरणाने ही आनंदाची अनुभुती येते . ह्या सार्‍यालच मी प्रेम म्हणतो ! आणि काही काही वेळा मग डोपामाईन सीक्रीट व्हायचे थांबु शकते , मग त्या व्यक्ती सोबत कितीही वेळ घालवा , त्यातुन कणमात्र आनंद होत नाही त्याला प्रेम संपणे म्हणतात. हे होतं , मी स्वतः अनुभवलंय , तुम्ही अनुभवलं नसेल तर तुम्ही नशीबवान आहात ! पण होतच नाही असे म्हणत असाल तर असो. ) प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की ! आणि ते रोज सकाळि उठुन चेक करायची गरज पडत नाही , ते झाल्या क्षणी तुमच्या लक्शात येते !
ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड !
हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही . लग्न न करताही हे सारे होतेच की ! मी आधी म्हणल्याप्रमाणे सध्यस्थीतीतल्या लग्न ह्या संकल्पनेतेत एक अडकलेपणा आहे. प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही . काही काही लोकांना प्रेम होतच नाही मग त्यांन्नी लग्न ह्या भानगडीत का पडावे ? ( माझ्या नात्यातली अगदी जवळची एक व्यक्ती आहे की जिने घरी स्पश्ट सांगितले आहे की मला हे प्रेम बिम काही जाणवत नाही , आणि जोवर जाणवत नाही तोवर 'केवळ वय निघुन चाललय' ह्या कारणास्तव लग्न करणार नाही !!) तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !
माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.
परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही. ओशोंनी विसंवादी जोडपी पाहिली असतील म्हणुन त्यांचे मत प्रतिकुल बनले असेल पण मी सुसंवादी जोडपीही पाहिली आहेत की ज्यांच्या कडे पाहुन एकच जाणवते की ह्यांनी लग्न केले नसते तरी काहीही फरक पडला नसता , लग्नाअधी लिव्ह इन मध्ये असताना ह्यांचे एकमेकांवर जितके जिवापाड प्रेम होते तितकेच आत्ताही आहे ! असो. प्रेम म्हणा किंव्वा लग्न हे सारे आयुष्याच्या अनेक पैलुंपैकी एक आहेत , प्रत्येकाच्या जडणघडणी नुसार , अनुभव विश्वानुसार त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन भिन्न भिन्न असु शकतो , रादर असणारच . आयुष्य बहुरंगी बहुढंगी आहे ! कोणाचाही ज्याच्या त्याच्या जागी योग्यच आहे ! पण " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी असे राहुन राहुन वाटते कारण आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात तरी असला एकांगीपणा कोठेही दिसत नाही ! I accept and appreciate the beauty of diversity of thoughts ! Life is colorful , Don't see it through someone's monochrome goggles! || जय हनुमान || जय श्रीराम || जय श्री कृष्ण ||

In reply to by प्रसाद गोडबोले

१) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! आनंदही स्वतःची स्वतःशी कनेक्टिविटी आहे. ज्या व्यक्तीच्या सहवासात तुमची ही कनेक्टिविटी हरवत नाही (आणि तिचीही कायम राहाते) तो सहवास दोघांना प्रिय वाटतो. शिवाय तुम्ही म्हणता तसा आनंदाचा संबंध स्मृतीशी असेल तर तो नेहेमी क्षणिक असेल कारण स्मृतींचा पट फार भराभर बदलत असतो. तस्मात डोपामाईन एकीकडे सिक्रेट होतंय आणि दुसरीकडे थांबलंय असा प्रकार निदान माझ्या अनुभवात तरी होत नाही कारण त्यावर सहवासाचं सुख अवलंबूनच नाही ! २) हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही सहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ? अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची ! ३) " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?

In reply to by संजय क्षीरसागर

लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत `डोपामाईन सिक्रेट होत नाही' असा साक्षात्कार झाला तर मुलांच्या डोपामाईनचं कुणी बघायचं ?

In reply to by संजय क्षीरसागर

पर्याय तर सांगा ना !
सध्याच्या फक्त एक आणि एकच प्रकारच्या प्रचलीत लग्न ह्या प्रकाराला अनेक पर्याय आहेत संक्षी सर ! १) लग्न न करता ब्रह्मचारी रहाणे २) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे ३) एकाशी लग्न करणे ४) एकीशी लग्न करणे ५) अनेकांशी लग्न करणे ६) अनेकांशी लग्न करणे ७) अनेकांशी आणि अनेकींशी लग्न करणे ८) मुक्त लग्न करणे ९) समुह लग्न करणे १०) लग्न किंव्वा सहवासही न करता एकामेकाच्या प्रेमात रहाणे !! ११)... १२).... खुप पर्याय आहेत सर पण ते मध्यपुर्वेतील विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना समजावणे अशक्य आहे p बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे , ह्या संकल्पनेने कित्येक निष्पाप लोकांचे आयुष्य जन्माला यायच्या आधीच उध्द्वस्त केले आहे ! ह्या असल्या खुळचट संकल्पना माणुस प्रजाती किती काळ गोंजारत रहाणार आहे देव जाणे ! माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! असो. अजुन चर्चा केली असती पण तुम्ही असे म्हण्त आहात की .... १) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! त्या मुळे इथेच थांबतो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो. हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का? दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे. "प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की" हे वाक्य असाच दृष्टिकोन दाखवते. आपल्या बायकोचे कुणाबरोबर तरी लफडे आहे या विचाराने अत्यंत क्षुब्ध झालेला माणसाला जेंव्हा हि धारणा/ कल्पना खोटी आहे म्हटल्यावर एकदम प्रेम कसे उफाळून येते? दोन मिनिटापूर्वी संपलं असं वाटलेलं प्रेम एकदम कसं तयार होतं? केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे. प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे. ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात. परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही. बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे , तुम्ही एखाद्या मित्राची जमीन कसायला घेतलीत. त्याने तुम्हाला सांगितले मला तुमचा पुण्याचा फ्लॅट दे आणि त्याबदल्यात हि जमीन तुझी. मग तुम्ही ७/१२ आणि इतर कागदपत्रे का करता? एखाद्या गोष्टीला legitimacy (औरसत्व) हे महत्त्वाचे आहे. हेच औरसत्व तुमच्या प्रेम संबंधाला देण्यासाठी चार माणसांच्या साक्षीने लग्न केले जाते. "लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी " हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते. आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता. तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. आपण उद्धृत केलेल्या लग्नसंस्थेच्या सर्व पर्यायात होणाऱ्या मुलांचा किंवा वृद्ध आईबापांचा विचार कुठेच दिसत नाही. वरिल सर्व पर्याय फक्त "farmyard morals" किंवा स्वैराचार दाखवतात एवढेच मी म्हणेन. केवळ मध्य पूर्वच नव्हे अति पूर्व अति पश्चिम अति उत्तर येथे असलेल्या संस्कृती मध्ये सुद्धा लग्नाला समर्थ पर्याय दिसत नाही. माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे. अफाट संपत्ती असलेल्या माणसाची गोष्ट वेगळी पण optimum utilization of resources च्या आधुनिक जमान्यात तिसऱ्याच माणसाचे मूल वाढवायला तितकी संपत्ती नसलेले पण बेफाट स्वैर विचार असणारे किती पुरुष तयार होतील? उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे एकदा https://en.wikipedia.org/wiki/Biological_basis_of_love हे वाचू पहा आणि त्यानंतर त्याचे संदर्भही वाचून पहा. ते समजले कि मलाही समजवा. कारण मला "प्रेम आणि त्याची उत्पत्ती" समजलेले नाही. त्याची अनुभूती येते एवढे मात्र सत्य.

In reply to by सुबोध खरे

नमस्कार सुबोध खरे सर ! हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का? दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे. तुम्ही ना डॉक्टर एकदम एका ऑऊटलायर वरुन अनुमान काढत आहात : चला अजुन एक उदाहरण देवुन बोलु : मी म्हणतोय की माझे आंब्यावर प्रेम आहे , त्याच्या नुसत्या स्मरणाने माझ्या डोक्यात डोपामाईन सीक्रीट होतं आणि मला आनंद होतो, आता एखाददुसरा आंबा मला आंबट लागलेला नाही काय ? लागलाय की , पण चांगले लागलेल्या आंब्याच्या आठवणी त्या आंबट लागलेल्या आंब्याच्या स्मरणावर ओव्हर राईड करतात आणि म्हणुनच माझे आंब्यावर प्रेम आहे . आता समजा मला पुढचे काही सीझन फक्त आंबटच आंबे मिळत राहिले तर ती स्मृती स्ट्राँग होईल आणि मग मला आंब्याच्या आठवणीने डोपामाईन सीक्रीट होणार नाही , आणि मग मला आंबा आवडणे कमी होईल , आणि कालांतराने बंदही होईल , तेव्हा माझे आंब्यावरचे प्रेम संपले असेल ! सो सिंपल ! एका भांडणाने एक क्षण डोपामाईन सीक्रीट होणार नाही पण हीच प्रक्रिया कायम चालु राहिली तर त्या व्यक्तीच्या आठवणीने डोपामाईन व्ह्यायचे थांबेल तेव्हा मग मी प्रेम संपले असे म्हणेन ! काहीही गल्लत नाही सर्ळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे ! ह्यात समजायला काय अवघड आहे हेच मला स्मजत नाहीये ! केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे. प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे. असेलही , पण त्याने डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !! ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात. हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते. हे आप ण उगाचच खुस्पट काढत आहात . मी किमान २-३ वेळा वर म्हणालोय की जो तो ज्याच्या त्याचा जागी आणि काळी योग्य असतो . ओशो ओशोंच्या जागी संक्षी संक्षींच्या जागी आणि मी माझ्या जागी ! ओशो कुठेच चुकले नाहीत , ओशो देव आहेत असे मी कुठेतरी म्हणालोय का ? आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता. ज्ञानेश्वरांचा संबंध लक्षात आला नाही . मी म्हणालोय की औरसत्व ही एक वाईट संकल्पना आहे , जितका सांब औरस आहे तितकाच सांब आहे , जितका सुतसोम औरस आहे तितकाच घटोत्कच , जितका शृतकीर्ती आणि अभिमन्यु तितकाच बब्रुवाहन ! औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! बाजीरावांच्या आणि मस्तानीची मुलाची रीतसर मुंज करुन घेतली असती तर कदाचित बाजीराव जास्त जगले असले ! तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे. तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल. माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे ! तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे ही दोन्हीही विधाने मला ad hominem वाटतात . वर चाललेल्या चर्चेत मी किंव्वा संक्शींनी कोठेही वैयक्तिक आरोप केलेले दिसत नाहीत. मी तर वारंवार म्हणालोय की मला संक्षींच्या मताचा आदर आहे , त्यांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर आहे ! तुम्ही मात्र पहिल्याच प्रतिसादात डायरेक्ट व्यक्तीगत टीकेवर उतरेला दिसता . असो , हा येवढा पार्ट सोडुन मला तुमच्या मताचा आणि विचारस्वातंत्र्याचा आदरच आहे ! आणि तुम्हाला तुमच्या विचारसरणी ने जय्गायला मी अडथळा करणार नाही. We hold these truths to be sacred & undeniable; that all men are created equal & independent, that from that equal creation they derive rights inherent & inalienable, among which are the preservation of life, & liberty, &

the pursuit of happiness;

. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)

लग्नसंस्था हि लोकशाही सारखी आहे. ती आदर्श नाही पण तिचे पर्याय भयानक आहेत. आणि सध्यातरी त्याला सशक्त असा पर्याय दृष्टी पथात नाही. हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली. बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे. सध्या मी एवढेच म्हणेन

In reply to by सुबोध खरे

हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली. बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे.
बँग ऑन डॉक. पुजा भट ला महेश भटने सल्ला दिला होता पाहीजे तितका स्वैराचार कर पण मुले होऊ देऊ नकोस म्हणुन असे वाचल्याचे आठवते आहे.

मागे तुम्हीच का कोणीतरी धागा काढला होता नं हो सातारकर ? की केळवण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नाव, "केळ्याची वन वन , या कार्यक्रमानंतर थांबते", म्हणून पडले असावे, अश्या अर्थाचा ...... चू भू दे घे

खरे डॉक्टर,
पण तिचे पर्याय भयानक आहेत.
किंचित असहमत. विवाहसंस्थेस पर्याय नाही! असलाच तर त्यास चामडीबाजार म्हणतात. तसं बघायला गेलं तरी लग्न हाही एक बाजारच म्हंटला जातो. पण त्यात निदान स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते, जी चामडीबाजारात शून्य असते. आ.न., -गा.पै.

In reply to by आदूबाळ

स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते बऱ्यापैकी सुरक्षितता सुद्धा लाभते. साधे गळ्यात मंगळसूत्र असेल तरी इतर पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अगदी मध्यमवर्गात राहणाऱ्या बायका याचसाठी वैधव्य आले तरी कुंकू मंगळसूत्र काढत नाही. दारुडा आणि अगदीच बिनकामाचा(नुसताच कुंकवाचा धनी) नवरा असेल तरी झोपडीत राहणारी बाई त्याला सहन करीत असते कारण कपाळाचे कुंकू पाहून झोपडित राहणारे इतर "लांडगे" तिच्यापासून लांब असतात. न जाणे दारुड्या नवऱ्याने चाकू मारला तर काय घ्या.

मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माफकरा पण - गावठी या शब्दाला तुच्छ, निम्न या अर्थाने वापरणे हा शुध्द मुर्ख पणा आहे असे वाटते.

पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.

ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?

मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

रामराज्य येईल तेव्हा येईल हो. पण मंगळसुत्राच्या निमित्ताने आया बहिणींना सुरक्षितता मिळत असेल तर त्यात वाईट काय आहे. तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?

In reply to by सतिश गावडे

तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?
या सरकारच्या आधीचे सरकार असतानासुद्धा असेच वाटायचे का असे विचारा सर ;)

In reply to by सतिश गावडे

अहो साहेब, पोरी बारा तेरा वर्षाच्या असताना वयात येतात ,बुबुक्षीत नजरेच्या पुरुषांची तेव्हापासुनच त्यांना न्याहळण्याची सुरवात होते. मग काय म्हणता????? बाराव्या वर्षी बार उडवायचा??????

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ट फि साहेब बुभुक्षित माणसांची नजर तर ७० वर्षाच्या बाईकडे पण असते. पण मुलीचे वडील आणि विशेषतः आई अशा कोवळ्या मुलीकडे तिची वाढ होईपर्यंत लक्ष ठेवून असतात. शिवाय मुलगी पण कुणाला फशी पडू शकते. आणि याच कारणासाठी गरिबांकडे लवकर लग्न करण्याकडे कल असतो. लग्नातुन सुरक्षितता दोन्ही तर्हेची असते. एक म्हणजे शरीरसुख सहज मिळू लागल्याने मुलगी तारुण्याच्या उन्मादात वाहावण्याची शक्यता नाहीशी होते.आणि भावनिक दृष्ट्या मुलगी गुंतल्याने तिचं पण "लक्ष" बाहेर जाण्याची शक्यता कमी होते. मुलीचे लग्न झाले आहे हे समजले कि तिच्यावर " लक्ष" ठेवणाऱ्या तरुणांची संख्या पण लक्षणीय रित्या कमी होते. शिवाय छेडछाड केल्यास गरम डोक्याच्या नवऱ्याशी भांडण होण्याची शक्यता असल्यामुळे बुभुक्षित लोकहि जरा मर्यादेत राहतात.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गावठी हा शब्द वापरणे हासुद्धा तथाकथित 'गावठी' पणा आहे. गावाकडचे म्हणजे फालतू अशी काहीशी मानसिकता यातून दिसते. त्यापेक्षा मागास हा शब्द वापरावा.


साधी गोष्ट आहे. परस्परात दीर्घकाल शारीरिक संबंध ठेवण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, लग्न किंवा लिव-इन. खरा प्रश्न, संबंधित व्यक्तींचा फोकस केवळ शरीरसंबंधावर आहे की कुटुंब निर्माण करण्यावर आहे, असा आहे. ज्यांना केवळ विविधता उपभोगायची आहे ते लिव-इनसारखा पर्याय निवडणार आणि त्या प्रकारच्या संबंधातून लग्न केलं तरी त्यांना कायम वैविध्याच आकर्षण राहाणारच. याची दोन कारणं आहेत. स्त्रीला विवाहपूर्व अनुभव कमालीचा आणि पुरुषाला त्यानं खटपट केली तेवढा असणार, त्यामुळे दोघंही एकमेकांबद्दल कायम साशंक (पण बोलायची चोरी :) )! शिवाय एकदा नाद लागला की तो सुटायची मुश्कील त्यामुळे शक्यतो अपत्यप्राप्ती नकोच वाटणार. तस्मात, लिव-इनवाले कितीही ठरवू देत त्यांचा एकमेकांप्रती अनुबंध निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे लिव-इनमधून एक सुखासिन घर निर्माण होण्याची शक्यता दुर्लभ. लग्न करणारे कुटुंब निर्माण करायला तयार असतात पण ही मानसिकता दोन्हीकडून हवी. थोडक्यात, दोघात मिळून एकच आयुष्य जगायची मॅच्युरिटी हवी. एकदा हा ठराव पास झाला की करीयर, पैसा, अपत्य जन्म, संगोपन, स्वयंपाक, इतर प्रापंचिक कामं, तिचं माहेर, तुमचे नातेवाईक, अधेमधे हॉस्पिटलायजेशन्स, झाल्यास इकडचे किंवा तिकडचे मृत्यू ........आणि कायकाय, असा भेद उरत नाही. दोघं मिळून जो काय प्रसंग आहे तो एकमेकांच्या साथीनं निभावतात किंवा साजरा करतात. दोघात मिळून जगायला एक वाइड स्पेक्ट्रम उपलब्ध होतो आणि संभोग हा अर्थात महत्त्वाचा असला तरी तो एकमेकांशी आनंदाचं शेअरींग होतो. लग्न हा जगण्याचा सर्वस्वी वेगळा पर्याय आहे. एकमेकांच्या साथीनं, जे काय आहे ते शेअर करत, दोघांनी मिळून जगायचं एक अयुष्य असा तो गेम प्लान आहे. यामधे एकमेकांप्रती अनुबंध आणि कृतज्ञता निर्माण झाली की संभोग ही आनंद (घेण्यापेक्षा) देण्याची प्रोसेस होते, मग सर्व दृष्टीकोनच बदलतो. जसं दोघं मिळून एकच आयुष्य जगतात तसा दोघं मिळून संभोगाचा आनंद शेअर करतात. अर्थात, जेवढा एकमेकांप्रती खुलेपणा जास्त तेवढा आनंद जास्त. याला तीन कारणं आहेत : १) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं. शिवाय लग्नानंतर जी कुटुंबव्यवस्था निर्माण होते ती दांपत्य, अपत्य आणि दोन्ही कडच्या फॅमिलीज या सर्वांना अनेक दृष्टीनं हिताची ठरु शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. ==> वाह क्या बात है संक्षी जी..!!

In reply to by विशुमित

संक्षिंशी मिपाच्या इतिहासात इतकं सहमत झालं नसेल कोणी. तुम्ही संक्षींचे डुआयडी आहात असा संशय येईल लोकांना.

In reply to by अनुप ढेरे

अच्छा म्हणजे सहमत असले की डू आयडी असते हे माहित नव्हते मला. कंपू गिरी का काय तरी म्हणतात ते. बाप जन्मी आपल्याला असली कंपू गिरी जमली नाही आणि जमणार नाही. चालू द्यात.

In reply to by पैसा

कश्याच्या जीवावर ? आणि काय लॉजिक आहे त्या विधानामागे ?

In reply to by संजय क्षीरसागर

हा माज उतरवायला त्या विद्वानांनी नक्की काय उपाय योजना सुचवली आहे ?

In reply to by अनुप ढेरे

ही बघा ती चर्चा. अशा काहीतरी गंभीर चर्चा करा. हवाबाणांचा आता लै कट्टाळा आलाय. लग्न करायचं तर करा, नायतर नका करू. पण चर्चा आवरा.

In reply to by पैसा

आणि राघांचा त्यावर सल्ला ! तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील. क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ? इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.

लग्न हे फक्त दोन व्यक्तिंमधील संबंध जुळवणे नसून दोन कुटुंबे आणि तदानुषंगिक अनेक कुटुंबे यांचा संबंध जुळून येणे असते, याचा आपल्या संस्कृतीतही विसर पडत चालला आहे की काय ? वृद्ध पालकांची/आजी-आजोबांची काळजी घेणे या अत्यंत महत्वाच्या कार्यासाठीही प्रेम/लग्न टिकून रहाणे आणि संततीचे औरसत्व महत्वाचे आहे.

१) लग्नाला पर्याय म्हणून तुम्ही जे १० पर्याय सुचवलेत त्यातला पहिला पर्याय बाद आहे कारण मुद्दा शारीरिक संबंधाचा आहे. पर्याय क्रमांक ३,५ आणि ७ समलिंगींसाठी आहेत ते चर्चाविषयाशी संबधित नाहीत. पर्याय क्रमांक ६, ९ आणि १० केवळ काल्पनिक आहेत. सो वी आर लेफ्ट विथ २ अँड ४ (कारण ८ आणि ४ एकच आहेत), आणि ते असे आहेत : (२) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे (४) एकीशी लग्न करणे थोडक्यात, तुमच्याकडे कोणतही सुसंगत उत्तर नाही. २) बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही. ३) माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ? ४) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !

In reply to by संजय क्षीरसागर

१) डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !! तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ? २) औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे ! उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचं चाललय संक्षी की तुम्ही म्हणताय हापुस आंब्याला पर्यायच नाही , मी म्हणतोय की बाबा हे बघ पायरी आहे , रायवळ आहे , लंगराआहे , केसरिया आहे , दशहरी आहे , तर तुम्ही म्हण्ताय की हे आंबेच नाहीत आणि आंबा म्हणजे फक्त हापुसच ! आणि वर म्हणताय की माझ्याकडे सुसंगत उत्तर नाही !! आता बाकीचेही आंबेच आहेत हे तुम्हाला कोण पटवुन देनार ? असो तुम्ही समलिंगी लग्नांना , मुक्त लग्नांना लग्न मानत नसाल तर ती तुमची विचारसरणी झाली , खुश राव्हा . मी सर्वांनाच साहचर्याचे पर्याय म्हणुन समान समजतो आणि सर्वांना समान मानतो ! आणि अनाथालय वगैरे मुद्दा चर्चेत येचुच कसा शकतो देव जाणे कारण मी तर स्प्ष्ट म्हणालोय कि अपत्याची जबाबदारी पित्याची असते , ज्याला पिता आहे तो अनाथ कसा ? उगाच्च काहीतरी तुम्हचं ! `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे हेच मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !! आणि आता हे महत्वाचे : वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. संक्षी , यु टू ! तुम्हीही वैयक्तिक टिप्पणीवर उतरलात ? ! माझी वैचारिक किंव्वा अध्यात्मिक बैठक किती खोल किंव्वा किती उथळ आहे ह्याचे मला सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही , तुमच्याकडुन किंव्वा मिपाकडुन तर मुळ्ळीच नाही ! तुम्ही , तुमचे खोल विचार आणि अतिखोल आध्यात्मिक बैठक वगैरे सुखी राव्हा . तुमच्या विचारांचा आदर आहेच , पट्त नसले जुळत नसले तरीही एक वेगळा विचार म्हणुन मी त्यांचा आदर करु शकतोच ! मी माझ्या जागी , माझ्या खोल की उथळ अध्यात्मिक बैठकीत सुखी रहातो . माझे विचार तुम्हाला कळावेत किंव्वा पटावेत असा माझा मुळ्ळीच हट्ट नाही . सुखी रहा :)

(संपादित)


In reply to by प्रसाद गोडबोले

तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत , वाटलंच मला. अजून पर प्रगो यावर घसरले कसे नाहीत. बेफाट वक्तव्य करायची. मग मुद्दे संपले कि "वैयक्तिक टिप्पणी केली म्हणून रडारड करायची अजून ते "स्वमतांध दांभिकता" कसं काय बुवा आलं नाही. वादात हारायला लागलं कि असे सारे फाटे फुटतात. मी, ओशो आणि प्रवचन हेच सत्य, बाकी सर्व भंपक असू द्या असू द्या.

In reply to by सुबोध खरे

व्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे http://www.misalpav.com/comment/939909#comment-939909 ही विधाने तुमची आहेत . वैयक्तित टिप्पण्णीला स्युरुवात तुम्ही केली आहे खरे मी नाही . आणि मुद्दे संपायचा प्रश्नच नाही , मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे , ती तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही पहिल्यांदा वैयक्तिक टिप्प्णीला सुरुवात केली आही मी नाही . मी वादात जिंकणे हरणे असले काही मानत नाही तुमची मते तुम्हाला लखलाभ माझी मला ! कळ्ळं ??? आणि हो आता संपादकांना विचारतो अशी एकांगी कारवाई का ? आणि त्यांचे उत्तर येत नाही तो वर तुम्ही तुमच्या बोटीवर खुष् रहा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला चर्चेमधे रस आहे की विषयाला फाटे मारण्यात हे नक्की करा. आणि मुद्याला धरुन लिहा म्हणजे चर्चा लाईनवर राहील. आता चर्चाविषय पुन्हा एकदा वाचा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? १) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांना एकत्र जगण्याचा विवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ? २) मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !! तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा : (औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ? ३) वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात ! आता तरी नीट वाचा : "कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही." आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या : ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही. तर प्रश्न असा आहे : तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ---- आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? नो . नॉट ओके . चर्चेचा विषय लग्नाचा हेतु काय ? आणि मी स्पष्टपणे म्हाणालोय की सध्य स्थितीतील लग्न संस्था निरर्थक आहे , मी दुसरा कोणताच मुद्दा मांडलेला नाही. साहचर्याचे अनेक पर्याय आहेत जे की तुम्हाला पटत नसले तरीही पर्याय आहेतच आणि अल्पप्रमाणात का होईना जगात अस्तित्वात आहेतच !
तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?
मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो ! विषय संपला !

In reply to by प्रसाद गोडबोले

१७ तारखेला तुमचं विधान आहे : "ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो !" आणि आज तुम्ही म्हणतायः `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो ! म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळ संप्रेरकांवर अवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे. आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ? अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?

In reply to by संजय क्षीरसागर

लोल. तुम्हाला थंबरुल ह्या शब्दाचा अर्थ कळतो का ? आणि व्हाईस व्हर्सा ह्या शब्दाचा ? किंव्वा तुम्हाला म्युचुअल अ‍ॅग्रीमेन्ट ही गोष्ट माहीत आहे ? किव्वा सिंगल पॅरेंट ही संकल्पना ? किंव्वा वेगवेगळ्या देशात कायदा वेगवेगळा असु शकतो ही संकल्पना माहीत आहे का ? किंव्वा डायवोर्स नंतरही अनेक मुलांचे संगोपन करणारे बाप तुम्हाला माहीत नाही का ? तुम्हाला एलॉन मस्क माहीत आहे का जो त्याच्या डायव्होर्स नंतर त्याचा सहा मुलांचा सांभाळ करत आहे ? तुमचं कसं झालय की तुम्ही लग्नाला दुसरा पर्याय असुच शकत नाही असे गृहीत धरुन चाललाय . ते मी वर आंब्याचे उदाहरण दिले तसे काहीसे चालल्य तुमचं . हापुस एक्के हापुस ! बाकीचे आंबेच नाहेत ! आता पायरी, रायवळ , केसरीया , लंगरा हे आंबेच असतात हे मी तुम्हाला पटवुन नाही देवु शकत .

मार्कस ऑरेलियस, १.
प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही .
प्रेम म्हणजे काय हा मोठा गहन प्रश्न आहे. तुमच्या उपरोक्त विधानातलं जे प्रेम आहे ते स्त्रीपुरुषांमधील प्रेम आहे. प्रत्यक्षात आपण फक्त स्वत:वरंच प्रेम करीत असतो. तेही डोपामाईनशिवाय! पुरुषास त्याच्या स्वत:वरच्या प्रेमात जी स्त्री साथ देईल तिच्यावर त्याचं प्रेम बसतं. त्याचप्रमाणे जिला तिच्या स्वत:वरच्या प्रेमाची आश्वस्ती ज्या पुरूषाकडून मिळेत त्याच्यावर तिचं प्रेम बसेल. डोपामाईनास फारतर प्रेमाचं प्रतिबिंब म्हणता येईल. २.
तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !
एकदम बरोबर. हिंदू समाजात पूर्वापार सर्रास घटस्फोट होत असंत. मात्र त्यांना घटस्फोट अशी संज्ञा नसे. त्यास वानप्रस्थ म्हणायचे. एकदा का स्वत:वरच्या प्रेमात जोडीदाराची साथ मिळेनाशी झाली की प्रेम आटलं असं आपण समजतो. मग दुसरा जोडीदार शोधावा का? की स्वप्रेमचिंतनार्थ सरळ वानप्रस्थ स्वीकारावा? आ.न., -गा.पै.

मार्कस ऑरेलियस, तुम्ही विचारी आहात म्हणून एक उलेख करतो. समाजात मुक्त लैंगिक संबंध फैलावले तर काय होतं याचा शास्त्रशुद्ध अभ्यास जोसेफ ड्यानियल अन्विन या संशोधकाने केला आहे. दुवा : https://en.wikipedia.org/wiki/J._D._Unwin वरील दुव्यावर जाऊन चार छोटे परिच्छेद आहेत ते वाचाच म्हणून सुचवेन. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या समाजात मुक्त लैंगिक संबंध फोफावतात तो शेवटी मानवसमूह न राहता पशूंचा कळप होतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बास प्रदीर्घ प्रतिसाद टंकायचा कंटाळा आलाय ... एकच विचारतो: असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ? तुम्ही हिंदुधर्माचे बर्‍याचदा समथन करताना दिसता म्हणुन एक प्रश्न विचारतो की : की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ??? आ.न. मा.ऑ.अ‍ॅ.ऑ

मार्कस ऑरेलियस, १.
असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ?
दुवे वाचून बघेन. मात्र LGBT हे समाजातले अपवाद आहेत आणि ते रोग म्हणून धरण्यात यावेत. या नैसर्गिक स्थिती नव्हेत. यांचं स्पष्टीकरण ग्राह्य असलं तरी समर्थन मात्र मला ठार अमान्य आहे. २.
की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ???
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे. तसं पाहायला गेलं तर वाळवंटी पंथांशी सदर चर्चेचा काडीमात्र संबंध नाही. किंबहुना विवाह आणि साहचर्याचा उपासनापंथाशी कसलाच थेट संबंध नाही. भले धर्मग्रंथांत विवाहाविषयी आदेश वा सुचवणी असोत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे.
reality is a matter of perception ! तुम्ही भारतात जन्माला आलात म्हणुन तुमच्यासाठी जे आसपास दिसले ते वास्त्व झाले . हेच सौदी किंव्वा अन्य इस्लामिक देशात जन्मला असता तर बहुपत्नीत्व तुम्हाला वास्तव वाटले असते , कॅलिफोर्नियात असता तर समलैंगिक लोकांचे साहचर्य तुम्हाला नॉर्मल वाटले असते :) भिन्नलिंगी आणि एकपत्नित्व ही जी सध्याच्या जगातील लग्नाची पध्दती आहे ती साहचर्याचा केवळ एक पर्याय आहे त्याला अनेक पर्याय उपलब्ध्द आहे . त्या सगळ्यांविषयी , पटत नसले तरीही , आपण आदर ठेवुन लोकांचे विचार स्वातंत्र्य मान्य करायला हरकत नसावी इतकेच मी म्हणत आहे !! ( बाकी : मी मध्यपुर्वेतील विचारसरणीचा संदर्भ दिलेला , त्या वृत्तीचा संबंध दिलेला . ह्या विचारसरणीची लोकं केवळ स्वतःच्या एकाच मताला कवटाळुन बसतात , अन्य पर्याय उपलब्ध असु शकतात हे ते मान्यच करत नाहीत . )

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्कस ऑरेलियस,
reality is a matter of perception !
असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको. आ.न., -गा.पै.

In reply to by अभ्या..

अजुन चर्चा? बापरे प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)

In reply to by संजय क्षीरसागर

`बाकी काहीही असो पण
प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील
आपण माझे रीतसर लग्न लाऊन द्यायचा इतका गंभीरपणे विचार करता हे पाहुन डोळे पाणावले ! म्हणुनच म्हणतो , कितीही मतभेद असले तरीही मतभेद मतभेदांच्या जागी , इरव्ही आपल्याला तुमच्या विषयी जाम आदर आहे :)

In reply to by गामा पैलवान

असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको.
एक गणित हा विषय सोडला तर सुस्थापित तथ्य असे काही नसते हो , आणि ईथे तर चर्चा चाललीय ती फिलॉसॉफी , मॉरल्स , इथिक्स वगैरे विषयांवर , त्यात तर सुस्थापित तथ्य कालही नव्हते आजही नाही आणि भविष्यात असे काही असण्याचा संभवही नाही . प्रत्येक गोष्ट ही दृष्टीकोनावरच थरते . तुम्ही भारतात काळ घालवल्याने तुम्हाला इथली मॉरल्स , इथली लग्न संकल्पना योग्य वाटत असेल , मी भारत सौदी अमेरिका अशा अनेक ठिकाणी काळ घालवल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांच्या संकल्पना धारणा भिन्न भिन्न असु शकतात , असतातच हे मला कळुन चुकले आहे . भविष्यात पुर्व युरोप , जपान कोरिया चायना , अफ्रिकेत फिरण्याच्या मानस साहे , तिथले मॉरल्स आणि लग्न विषयक संकल्पना ह्या आपल्या भारतीय धारणां पेक्षा भिन्न असणार हे मला कळुन चुकले आहे . आणि म्हणुनच मी सर्वांच्या मताचा आदर करायला शिकलो आहे :) असो. आता चर्चा होणे नाही , वर जे वैयक्तिक टिप्पण्णीवर एकांगी संपादन झाले आहे त्या विषयी संपादक मंडळाला विचारपुस केली आहे , आणि आयडी संपादित करण्या विषयी विनंती केली आहे . असो. :) इत्यलम !

मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन संपवू या का विषय??? उगाच शंभर फाटे झाले आहेत, तेवढेच धागे झाले असते तर किमान लेखकाला टीआरपी भेटला असता, काय म्हणता?

In reply to by दशानन

देणारे लाख देतील हो पण घेणार्याने घेतले पायजे न ? कारण इथे बरेच जण मान्जीच इस्टमन कलरची (ईशाल भौचे आवडते वाक्य :) ) असा धोशा लावत बसलेत. साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही :P