लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
वाचने
74234
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
तर,मायबोलीकरांना याविषयी काय
तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???
एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)मायबोलीकरांना याविषयी काय
तर,मायबोलीकरांना याविषयी काय
काय राव, तिकडचे पार्सल इकडे
काय राव टफी
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी
@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी
भारत सरकारनं नेमलंय का तुम्हाला
ईगल गँग, बिच्छू गँगची गोष्ट माहिती आहे का???
In reply to भारत सरकारनं नेमलंय का तुम्हाला by माम्लेदारचा पन्खा
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-Pधागा टफिंचा आहे की कुणाचा हा प्रश्न नाही
मुक्त लैंगिक संबंधात
In reply to धागा टफिंचा आहे की कुणाचा हा प्रश्न नाही by संजय क्षीरसागर
मुक्त लैंगिक संबंधात
In reply to मुक्त लैंगिक संबंधात by सूड
अरेरे, सरांच्या ज्ञानाचे कण
In reply to मुक्त लैंगिक संबंधात by सतिश गावडे
टर्बोचार्जड फिलॉसॉफर पकडे गये देखो .......
सिंथेटिक जिनियस
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर पकडे गये देखो ....... by दीपक११७७
पहावे लागेल...........
In reply to सिंथेटिक जिनियस by mayu4u
हा फार मोठा आणि गहन विषय आहे.
छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं
In reply to हा फार मोठा आणि गहन विषय आहे. by सुबोध खरे
तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे !
In reply to छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं.२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?अतृप्त कामेच्छा !३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते.लग्न ही अपत्य जन्म, त्याचं
In reply to तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ! by संजय क्षीरसागर
त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार.
In reply to लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by डॉ सुहास म्हात्रे
देवाला, गुरूला, आईला आणि
In reply to त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार. by सतिश गावडे
त्यांनी फक्त यादी दिली आहे.
In reply to लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by डॉ सुहास म्हात्रे
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं
In reply to तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ! by संजय क्षीरसागर
होतो शब्द'छळ' त्यांच्याकडून
In reply to "लग्न ही अपत्य जन्म, त्याचं by कुटस्थ
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
काय चुकलं त्यात,मिपावर चार
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
त्या चार जणांना व्यनि करायचा.
In reply to काय चुकलं त्यात,मिपावर चार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
जेवत असलेल्या ताटाबद्दल /
In reply to काय चुकलं त्यात,मिपावर चार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
कल्लुळाचं पाणी....
In reply to जेवत असलेल्या ताटाबद्दल / by दशानन
नागाच्या पिलाला का गं खवळिलं
In reply to कल्लुळाचं पाणी.... by अभ्या..
ते कमरेला लटकलं आहे ते
In reply to नागाच्या पिलाला का गं खवळिलं by कपिलमुनी
उत्तर मिळाल्यावर त्या
In reply to ते कमरेला लटकलं आहे ते by सतिश गावडे
अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले
In reply to उत्तर मिळाल्यावर त्या by टवाळ कार्टा
कसे? तुमच्याकडे नाग आहे की
In reply to अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले by सतिश गावडे
विषय चित्रातील बाईच्या
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
ते चित्र नव्हे तर
In reply to विषय चित्रातील बाईच्या by सतिश गावडे
ते चित्र नव्हे तर
In reply to विषय चित्रातील बाईच्या by सतिश गावडे
तुमच्याकडे नाग आहे की नागाचे
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
आवरा
In reply to तुमच्याकडे नाग आहे की नागाचे by सूड
काहीही नको...सर नर्तकी ऐवजी
In reply to तुमच्याकडे नाग आहे की नागाचे by सूड
ज्याची त्याची आवड..
In reply to काहीही नको...सर नर्तकी ऐवजी by टवाळ कार्टा
तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?
In reply to कसे? तुमच्याकडे नाग आहे की by टवाळ कार्टा
वा सिंजि वा!
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
(No subject)
In reply to टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
ती कडुन ईकडे
माझ्या प्रतिसादावर आलेल्या सर्व प्रतिसादांना एकावेळी उत्तर देतो
"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे."यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ? प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ? आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?शब्द'छळ' परत परत तेच
In reply to माझ्या प्रतिसादावर आलेल्या सर्व प्रतिसादांना एकावेळी उत्तर देतो by संजय क्षीरसागर
प्रयत्न चांगला होता तुमचा..
In reply to शब्द'छळ' परत परत तेच by दशानन
संमं हे दशानन कोण आहेत ?
In reply to शब्द'छळ' परत परत तेच by दशानन
परत निरर्थक प्रतिसाद!
In reply to संमं हे दशानन कोण आहेत ? by संजय क्षीरसागर
क्षणभर मला इथे "मी मराठी "
In reply to परत निरर्थक प्रतिसाद! by दशानन
@ अभ्या,
In reply to क्षणभर मला इथे "मी मराठी " by अभ्या..
क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to परत निरर्थक प्रतिसाद! by दशानन
गोदे !
In reply to संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर by दीपक११७७
हा हा हा
In reply to गोदे ! by संजय क्षीरसागर
ते फार इंटरेस्टींग आहे !
In reply to हा हा हा by दीपक११७७
लग्न हा एक अतिषय निरर्थक
+1.. मी पण हीच लिंक डकवणार
In reply to लग्न हा एक अतिषय निरर्थक by प्रसाद गोडबोले
प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत
In reply to लग्न हा एक अतिषय निरर्थक by प्रसाद गोडबोले
ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहेओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य हीधारणारहित चित्तदशा आहेआणि विवाह ही केवळमान्यताआहे. कोणतीही`मान्यता'(ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. २)ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो.दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही. ३)ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल !ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही. माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.माझा प्रतिवाद करु शकत नाहीत
In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
ते तर मी प्रतिसादताच म्हटलंय नीट बघा !
In reply to माझा प्रतिवाद करु शकत नाहीत by अद्द्या
बरं
In reply to ते तर मी प्रतिसादताच म्हटलंय नीट बघा ! by संजय क्षीरसागर
<<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी
In reply to माझा प्रतिवाद करु शकत नाहीत by अद्द्या
विमि,
In reply to <<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी by विशुमित
सर असंच ज्ञान द्देत रहा सर!!
In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
नमस्कार संक्षी सर !
In reply to प्रगो, ओशो मला गुरुस्थानी आहेत by संजय क्षीरसागर
धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद !
In reply to नमस्कार संक्षी सर ! by प्रसाद गोडबोले
प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही !आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे :ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते !हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ? कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत. विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही. माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.+१
In reply to धाग्यावरचा पहिला सुसंबद्ध प्रतिसाद, धन्यवाद ! by संजय क्षीरसागर