चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता
वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता!
चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या
सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता!
मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती
पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता!
देह विझलेले जगाची वासना जाळीत होते
चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता!
हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती...
हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता!
—सत्यजित
वाचने
4913
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता प्रभावी झाली आहे.
धन्यवाद!
व्वा !
मारा तिच्यायला.....!
:)
In reply to मारा तिच्यायला.....! by अत्रुप्त आत्मा
व्वा !!! सुरेख कसं म्हणू :(
रचना चांगली आहे, पण....
धन्यवाद!
मस्त
पहिली दोन कडवी विशेष आवडली!!
कसं जमतं बुवा ..
धन्यवाद!
In reply to कसं जमतं बुवा .. by चौकटराजा
धन्यवाद!
गझल आवडली.
धन्यवाद!
In reply to गझल आवडली. by प्राची अश्विनी
ही वाचायची कशी राहिली कोणास