नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
134078
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ स्पष्ट आहे (म्हणजे
In reply to परिस्थिती बिघडलेली होती असे by संदीप डांगे
चला, जास्त त्रासाची परिस्थिती
In reply to अर्थ स्पष्ट आहे (म्हणजे by हतोळकरांचा प्रसाद
परत तेच! तुम्ही तुम्हाला हवा
In reply to चला, जास्त त्रासाची परिस्थिती by संदीप डांगे
मला काहीही अर्थ काढायचे नाहीत
In reply to परत तेच! तुम्ही तुम्हाला हवा by हतोळकरांचा प्रसाद
हसण्याशिवाय काही करू शकत नाही
In reply to मला काहीही अर्थ काढायचे नाहीत by संदीप डांगे
हसण्यावारी नेल्याबद्दल
In reply to हसण्याशिवाय काही करू शकत नाही by हतोळकरांचा प्रसाद
त्याबाबतीत निश्चिन्त रहा हो
In reply to हसण्यावारी नेल्याबद्दल by संदीप डांगे
२ आठवड्या पूर्वी इंदापूरच्या
In reply to जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा by हतोळकरांचा प्रसाद
अहो इंदापूरच कशाला अजूनही
In reply to २ आठवड्या पूर्वी इंदापूरच्या by विशुमित
जनता मोदींच्या पाठी ५०
In reply to अहो इंदापूरच कशाला अजूनही by हतोळकरांचा प्रसाद
हो नक्की वाढवतो! काय करणार
In reply to जनता मोदींच्या पाठी ५० by विशुमित
अन जर त्यांना पैसे
In reply to सौरा जी, by विशुमित
गावच्या कट्ट्यावरील गप्पा तुन
In reply to अन जर त्यांना पैसे by अनुप ढेरे
ओ साहेब, इथे फक्त घरच्या
In reply to गावच्या कट्ट्यावरील गप्पा तुन by विशुमित
व्हिक्टीम कार्ड कि काय ते
In reply to ओ साहेब, इथे फक्त घरच्या by संदीप डांगे
कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ
दुखने काय आहे नक्की ?
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
=)) =))
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
जनतेला ठरवूद्या की.
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
जाऊंद्या साहेब. झोपी
In reply to जनतेला ठरवूद्या की. by lakhu risbud
नशीब भाजपाला यश मिळाले.
In reply to जाऊंद्या साहेब. झोपी by डॉ सुहास म्हात्रे
<<<<ज्यांना नुकत्याच
In reply to जाऊंद्या साहेब. झोपी by डॉ सुहास म्हात्रे
एक्झॅक्टली! खरतर भाजप परभूत
In reply to <<<<ज्यांना नुकत्याच by विशुमित
<<<खरतर भाजप परभूत झाला असता
In reply to एक्झॅक्टली! खरतर भाजप परभूत by हतोळकरांचा प्रसाद
>>
In reply to <<<खरतर भाजप परभूत झाला असता by विशुमित
खरतर भाजप परभूत झाला असता तर हेच समीकरण सरसकट लावलं असतं का हा कळीचा मुद्दा आहे! -- हो त्याला वाव होता कारण immediate इफेक्ट मानला गेला असता.आपण विश्लेषण चष्मा लावून करत असल्याचे खुल्या संस्थळावर स्पष्टपणे कबूल केल्याबद्दल अनेकानेक आभार ! (हल्ली असा प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा विरळ झाला आहे) :) ;)माझ्या डोळ्या चा नंबर अजून ही
In reply to >> by डॉ सुहास म्हात्रे
प्रतीसादांचे अर्धसहस्त्रक
राजकिय चर्चांचे कधी फलित निघत
In reply to प्रतीसादांचे अर्धसहस्त्रक by पुंबा
करेक्ट. कारण एखादी बाजू
In reply to राजकिय चर्चांचे कधी फलित निघत by संदीप डांगे
नोटाबंदीनंतर आता ५० दिवसांची
नोटाबंदीचा मूळ उद्येश
डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट
In reply to नोटाबंदीचा मूळ उद्येश by डॉ सुहास म्हात्रे
बघुया ! आता किती समजावले तरी
In reply to डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट by विशुमित
Rs 4 lakh crore of cash
नोटाबंदीविरोधात मोर्चा
In reply to Rs 4 lakh crore of cash by डॉ सुहास म्हात्रे
Central Statistics Office
<<<"नेहमीच्याच यशस्वी जागतिक
In reply to Central Statistics Office by डॉ सुहास म्हात्रे
भारताचे कल्याण झाले पाहिजे
In reply to <<<"नेहमीच्याच यशस्वी जागतिक by विशुमित
भारताचे कल्याण झाले पाहिजे कोणी करेल त्याला माझ्या लेखी महत्व आहे.याला +१००,००० ही विचारसरणी बहुसंख्य (बहुसंख्य, कारण सगळे तसे करणे शक्य नाही ही वस्तूस्थिती आहे, दुर्दैवाने) लोकांनी प्रामाणिकपणे कृतीत आणली तर भारताला खरेच उत्तम भवितव्य आहे, यात वाद नाही. (या वाक्यातला ठळक भाग कळीचा मुद्दा आहे.)"नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :)पर्वताएवढी नकारात्मक टीका करायला आपल्या राजकारण्यांना राई हाती येण्याची वाट पहायची गरज नसते. सत्याचा विपर्यास करून किंवा अगदी कल्पनेतूनही राई तयार करून तिचा पर्वत बनवण्याच्या कलेत ते तरबेज आहेत हे वारंवार दिसते. त्याचबरोबर, गैरसोईच्या मुद्द्यांचा डोळ्यासमोर असलेला पर्वत आस्तित्वातच नाही असे ठामपणे सांगून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही कला तर त्यांच्याकडे जन्मजात आहे असेच दिसते ! या पार्श्वभूमीचा विचार करून ते वाक्य लिहिलेले आहे.प्रामाणिकपणे कृतीत आणली तर
In reply to भारताचे कल्याण झाले पाहिजे by डॉ सुहास म्हात्रे
पोस्ट ट्रुथ इकॉनॉमिक्स
In reply to भारताचे कल्याण झाले पाहिजे by डॉ सुहास म्हात्रे
परत तीच टेप लावतो.
In reply to Central Statistics Office by डॉ सुहास म्हात्रे
जी उद्दिष्ट्ये मनात धरून
In reply to परत तीच टेप लावतो. by पुंबा
-२% जीडीपीच्या नाचवलेल्या
In reply to जी उद्दिष्ट्ये मनात धरून by मार्मिक गोडसे
घाई करताय
In reply to -२% जीडीपीच्या नाचवलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
डीमॉनेटायझनचे ५० दिवस
In reply to घाई करताय by मार्मिक गोडसे
काढायलासुचायला ?! =)) =)) =)) ते विनोद वाचायची नक्कीच घाई झाली आहे :)अति घाई कोठे नेई ???
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
साहेब, मूळ मुद्दाच तुमच्या
In reply to अति घाई कोठे नेई ??? by विशुमित
तुम्ही प्रतिसाद गोलगोल
In reply to साहेब, मूळ मुद्दाच तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य मुद्दे...
In reply to तुम्ही प्रतिसाद गोलगोल by विशुमित
मनमोहन सिंगांनी केलेला दावा
In reply to मुख्य मुद्दे... by डॉ सुहास म्हात्रे
हीच स्टँडर्ड पद्धत आहे.
In reply to मनमोहन सिंगांनी केलेला दावा by विशुमित
(मी फक्त "घाई" हा शब्द वापरला
In reply to मनमोहन सिंगांनी केलेला दावा by विशुमित
(मी फक्त "घाई" हा शब्द वापरला असताना " 'घिसाड'घाई " हा शब्द एवढे उतेजीत होऊन वापरण्याचे प्रयोजन नाही समजले. सिनियर लोकांना प्रश्न विचारलेले आणि एक ठराविक पक्षाप्रतीच्या प्रामाणिकपणा बद्दल शंका उपस्थित केल्याचे आवडत नसावे, बहुदा..!!)http://www.misalpav.com/comment/923175#comment-923175 इथे विशुमत या आयडीनेघिसाडघाईने कोणी अतिशयोक्त उदाहरणे आहेत, हे कळू शकेल का?हा मजकूर कोणी लिहिला ???!!! तो तुम्ही लिहिला नसल्यास समस्या आहे व आयडी हॅक झाल्याचे प्रशासनाला कळवावे. ;) (हघ्या) असो. मुळात घिसाडघाईने तुम्ही दावे केले असे मी कोठेच म्हटलेले नाही. तशी घिसाडघाई करणार्या तज्ज्ञ व तथाकथित तज्ञांना उद्येशून तो शब्द होता आणि त्याच्या पुराव्याखातर मी तुमच्या मागणीवरूनच दोन जागतिक किर्तीच्या अर्थज्ज्ञांनी ५० दिवसाची मुदत संपण्याच्या बर्याच आधी केलेले व केवळ कल्पनेवर आधारीत असलेले दावे दिले आहेत. ते घिसाडघाईने केलेले दावे अर्थकारणाने नव्हे तर राजकारणाने प्रेरीत होते हे मी आधिही म्हटले आहे आणि आजही माझे तेच मत आहे. हे पाहता, तुम्ही तो शब्द स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचे कारण समजले नाही ! मुख्य म्हणजे माझ्या कोणत्याच प्रतिसादातले कोणतेच वाक्य कोणत्याच एका मिपाकराला उद्येशून नाही... तो शब्द सर्वच भारतिय (व सद्या नोटबंदीचा विषय असल्याने विरोधी पक्षातील) राजकारण्यांसाठी सामायीकपणे लागू होतो आणि हे काही मीच पहिल्यांदा सांगत आहे असेही नाही. सर्वसामान्य नागरीकासाठीही ते गुपित नाही, याबद्दल तुम्ही सहमत असाल असा माझा अंदाज आहे. खाली एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, माझे मत असे आहे...वेळ घेऊन, तथ्ये तपासून, विचारपूर्वक मत देण्याची पद्धतिची तुम्ही पाठराखण करता आहात हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद ! माझेही तेच मत आहे. माझ्या मूळ प्रतिसादातला एक महत्वाचा मुद्दा, "विरोधकांकडून तसे पूर्वी झाले नव्हते व बर्याचदा होत नाही", असाच आहे :) फक्त आपल्याला सोईचे असेल तेव्हाच ते तत्व वापरावे, गैरसोईचे असले तर विसरावे, हे चुकीचे होईल, नाही का ?बाजू अंगावर आली की मुद्दा टाळणे हे भारतिय राजकारणात आश्चर्याचे नाही. तरीही, जर "पूर्ण माहिती घेऊन मगच विचारपूर्वक टीका करू" या विचाराने विरोधी पक्ष आता गप्प असले तर, जरी ते वागणे त्यांच्या भूतकाळाशी विसंगत असले तरीही, स्वागतार्हच आहे. त्या निमित्ताने भारतिय लोकशाही एक पाऊल पुढे गेली असे म्हणता येईल. आणि त्यामुळे मला आनंद व अभिमानच वाटेल. असो. गैरसमज सोडून इथेच थांबूया. यासंबंधी अजून काही नवीन आकडे-तथ्ये बाहेर आली तर परत चर्चा करूच. कसे ?ते थांबले नाही तर मी ही
In reply to मुख्य मुद्दे... by डॉ सुहास म्हात्रे
रिज़र्व बॆंकेच्या नोटा मोजून
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
In reply to रिज़र्व बॆंकेच्या नोटा मोजून by नितिन थत्ते
अजून किती महिने लागणार आहेत
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः
In reply to अजून किती महिने लागणार आहेत by मार्मिक गोडसे
...अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे.आणिआता मात्र त्यांच्यातही केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच सरकारी आकडेवारीत नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करणे, तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे, असंघटित क्षेत्राची आकडेवारी लपविणे असे आरोप राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय बॅंकिंक क्षेत्रातून केले जात आहेत, याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी. शेवटी हा सरकार आणि देशाच्याही विश्वासार्हततेचा प्रश्न आहे.१. असे मोघम आरोप करताना संबंधात काही सबळ पुरावे दिले असते तर त्या छोट्याशा लेखाला जरा तरी विश्वासार्हता आली असती. आता तरी तसे म्हणता येत नाही. २. "...केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते." अशी सुरुवात करून त्यानंतरच्या वाक्यात "याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी." असे म्हटले आहे. "सरकार घोळ करत आहे याची सरकारनेच नोंद घ्यावी" म्हणजे नक्की काय म्हणायचेय ?! :) त्याऐवजी, गैरप्रकार झाल्याचे पुरावे सादर करून ते थांबविण्याचा सरकारवर दबाव आणणे अपेक्षित होते. ३. वर उद्धृत केलेल्या आरोपांपैकी दुसर्या वचनामधिल "तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे" हा पुराव्याविना केलेला दावा/आरोप तर मी मूळ प्रतिसादात दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्राच्या संदर्भदुव्यातील मजकूरावरून धडधडीत असत्य दिसत आहे. त्या दुव्यात, "The Central Statistics Office (CSO) ने जीडीपी मोजताना... The growth rate was on a higher base after the CSO revised 2015-16 GDP growth rate to 7.9 per cent from the earlier provisional estimate of 7.6 per cent" असे स्पष्ट लिहिले आहे. म्हणजेच, जीडीपीचा वाढदर मोजताना सन २०१५-१६ चा अंदाजे (प्रोव्हिजनल) ७.६% हा दर न वापरता त्याऐवजी नवीन आकडे हाती आल्यानंतर वाढलेला ७.९% हा दर वापरलेला आहे. हे पाहिल्यावर तर मग बाकीच्या मोघम आरोपांचीही विश्वसनियता अजूनच कमी झाली आहे.अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही
In reply to त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः by डॉ सुहास म्हात्रे
अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे.मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे.मी माझ्या अल्पमतीप्रमाणे
In reply to अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही by मार्मिक गोडसे
मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे.सहमत. ही उत्तम पॉलिसी आहे. डिमॉनेटायनचे सर्व परिणाम प्रत्यक्षात दिसायला आणि त्यामुळे अर्थकारणावर झालेले तातपुरते नकारात्मक आणि दीर्घकालिन सकारात्मक बदल आकड्यांत दिसायला २ ते ४ तिमाह्या जातील असे तर अनेक समतोल विश्लेषक पहिल्यापासून बोलत आहेत. माध्यमे टीआरपी खेचण्यासाठी "भडक-आकर्षक" गोष्टी चढाओढीने प्रसिद्ध करत असतात. त्यामुळे, समतोल विश्लेषकांच्या शांत शैलीपेक्षा राजकिय गदारोळ नेहमीच नको तेवढा भाव खाऊन जातो. :) मात्र, आकड्यांनी सिद्ध केलेल्या जीडीपीसारख्या पुराव्यांचे महत्व त्यामुळे कमी होत नाही. यावेळेस जीडीपीत फार मोठी घट आली असती किंवा त्याच्या मोजणीत काही गडबड असल्याचा संशय घेण्याजोगी जागा असती तर विरोधी पक्ष तिकडे दुर्लक्ष न करता सरकारवर हिरीरीने तुटून पडले असते, हे सांगायला फार मोठा अर्थतज्ज्ञ किंवा राजकारणी विश्लेषक असण्याची गरज नाही, नाही का ? :)>>अर्थकारणावर झालेले तातपुरते
In reply to मी माझ्या अल्पमतीप्रमाणे by डॉ सुहास म्हात्रे
हा नेहमीप्रमाणे तुम्ही विनोदी
In reply to >>अर्थकारणावर झालेले तातपुरते by नितिन थत्ते
जीडीपी
In reply to हा नेहमीप्रमाणे तुम्ही विनोदी by डॉ सुहास म्हात्रे
प्री-एम्प्ट
In reply to जीडीपी by नितिन थत्ते
थत्तेकाका, तुम्ही तज्ज्ञ आहात
In reply to जीडीपी by नितिन थत्ते
म्हणजे काही स्पष्टीकरण नाही
In reply to थत्तेकाका, तुम्ही तज्ज्ञ आहात by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही नेहमी स्पष्टीकरणे देत
In reply to म्हणजे काही स्पष्टीकरण नाही by नितिन थत्ते
अन्यथा आलूची फॅक्टरी आहेच.. !
In reply to तुम्ही नेहमी स्पष्टीकरणे देत by मोदक
शहजादे साहेब नक्की "नारीयलका
In reply to अन्यथा आलूची फॅक्टरी आहेच.. ! by सचु कुळकर्णी
राहुल गांधी असे काहीही
In reply to शहजादे साहेब नक्की "नारीयलका by मोदक
चारसभांमधील मोदी मला
In reply to राहुल गांधी असे काहीही by हतोळकरांचा प्रसाद