✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307038 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

_/\_

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 19:27 नवीन
_/\_ असो, फारच चुकलं बुवा सरकारचं. आधी सगळीकडे सगळ्या लोकांच्या घरी नेऊन 100, 50, 20 अशी बंडलं 9 नोव्हेम्बरच्या सकाळी उपलब्ध करायची सोय करून मगच हा निर्णय घ्यायला हवा होता.
↩ प्रतिसाद: अन्नू

खोचक बोलुन उपयोग नै हो. एक

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 19:36 नवीन
खोचक बोलुन उपयोग नै हो. एक जबाबदार नागरिक म्हणून उपायही सांगा की आता... :) माझे पैसे मला बॅन्केत भरायला सांगताय ना, मग बॅन्केतच सुट्टेही उपलब्ध करुन द्या. उधार किंवा भीक नै मागत आहे. बाहेर कोण घेत नाही असे कागदाचे तुकडे घेऊन काय करायचे? अजुन दोन आठवडे थांबूया. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. =))
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

उपाय?

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 20:03 नवीन
उपाय? 8 नोव्हेम्बरच्या रात्री मी प्रवास करत होते. माझ्याकडे फक्त 100 ची एक नोट आणि इतर काही चिल्लर सोडून बाकी सगळे पैसे 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये होते. पहाटे रिक्षाला वगैरे 100 संपले. 2 दिवस तसेच काढले. नंतर बँकेत जाऊन 1000 चे सुट्टे आणले. अनेक अर्जंट खर्च करून त्यातले 600 शिल्लक आहेत. आता या 5 दिवसांत मी 2 वेळा पिक्चर पाहिला थिएटरला जाऊन. जाणं-येणं उबर, तिकीट काढलेलं, पॉपकॉर्न कार्डने. हा माझा लक्झरी खर्च झाला. नेहमीचा खर्च थोडा कंट्रोल केला. वाणसामान होतं. भाजी आणि दूध आणायला पैसे पुरले. इतर 500-1000 च्या नोटा भरायला थांबेन काही दिवस. आणि हो, मी काही भयंकर पैसे कमवत नाही. विद्यार्थिनी आहे. घरात असते तर आई, बाबा, भाऊ यांच्याकडून थोडे थोडे सुट्टे जमवून एक आठवडा नक्की काढता आला असता. त्यामुळे मध्यमवर्गीय लोक इतका आकांत आल्यासारखं का करतायत हे काही मला समजत नाहीये. पहिले 2 दिवस मोठा गोंधळ होता. पण 5 दिवसांनंतरही अगदी एवढा आकांत येतो? असो, मी जे मार्ग काढले ते सांगितले. एखाद्या शहरात राहणाऱ्या व्यवस्थित कमावणाऱ्या व्यक्तीला यातलं काहीच शक्य नसेल तर तिने खुशाल शिव्या द्याव्यात सरकारला. माझं काही म्हणणं नाही.
अजुन दोन आठवडे थांबूया. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. =))
याला सहमती.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुमचा परिघ वेगळा आहे हे

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 21:06 नवीन
तुमचा परिघ वेगळा आहे हे लक्षात आलं. लोक मूर्ख किंवा देशद्रोही आहेत म्हणून आकांत करत असावेत. किंवा आमच्यासारखे काही सरकारविरोधी-मोदीअंधविरोधक इत्यादी विनाकारण तणाव निर्माण करत असतिल असे असेल. =))
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

तुमच्या दोन्ही प्रतिसादांना

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 21:24 नवीन
तुमच्या दोन्ही प्रतिसादांना मिळून ब्वार्रर्रर्रर्र...
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

पद्माक्षी
Sun, 11/13/2016 - 23:11 नवीन
तुमचा हा एकच प्रतिसाद सहमत होण्यासारखा वाटला. मूर्ख बिर्ख सगळे एकदम करेक्ट.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरोबर, सरकारी धोरणाविरुद्ध मत

संदीप डांगे
Mon, 11/14/2016 - 11:40 नवीन
बरोबर, सरकारी धोरणाविरुद्ध मत व्यक्त करणारे ते सर्व देशद्रोही हि नवी व्याख्या रुजू झाली आहे की, याचाच दुसरा भाग असाही कि नुसता विरोध करतात, काही विधायक बोलत नाहीत - मूळ अर्थ: आम्हाला रुचेल असेच बोला! ;) रच्याकने, भाजपनं या नोटाबदलीचा विरोध केला होता, आता जे होतंय तेच होईल असं बोलून, त्यावर काय मत?
↩ प्रतिसाद: पद्माक्षी

एक किस्सा

पैसा
Sun, 11/13/2016 - 21:09 नवीन
आमचे केरळी अंकल सांगत होते, त्यांच्या गावात कोणीतरी माणूस जमिनीच्या व्यवहाराचे रजिस्ट्रेशन करायला गेला. त्याच्याकडे कसल्याच नोटा नव्हत्या, पण कुठच्यातरी देवळाच्या हुंडीतली नाणी त्याच्याकडे आलेली होती. कशी ते माहीत नाही. तर त्या पठ्ठ्याने रुपये ६५००० ची नाणी पोत्यात भरून नेऊन ऑफिसात भरली. ते लोक दोन दिवस मोजत बसले होते म्हणे! =))
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

पण पैसाताई, मी त्या

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 21:36 नवीन
पण पैसाताई, मी त्या केरळमधल्या गावात राहत नाही जिथे मला 65000 रुपये नाण्यांमध्ये मिळतील. ते काही नाही, 2000 चे सुट्टे मॉल मध्ये मिळाले नाहीत, सरकारचं चुकलं. मॉल शहरातच असतात असं मला वाटलं, पण मॉल गावांत असतात आणि तिकडे पेटीएम न चालून लोक उपाशी राहतायत हे मला कुठे माहित होतं? माझं तर गावात कुण्णी कुण्णी राहत नाही. मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते, आणि त्यामुळे माझा परीघच वेगळा आहे.
↩ प्रतिसाद: पैसा

:)

पैसा
Sun, 11/13/2016 - 21:41 नवीन
ते सगळं मी म्हणत नाही ग. मी इकॉनॉमिक्सचा बरीच वर्षे जो अभ्यास केला आणि बँकेत काम करून आलेले अनुभव यावर आधारित या धाग्यावर सुरुवातीला काही लिहिले होते. आता सगळेच हाताबाहेर गेले आहे. खरे सांगायचे तर मुविंच्या किंवा टवाळ कार्ट्याच्या धाग्याची कळा हळूहळू येत आहे इथेही. तेव्हा आताच ऐकलेला एक किस्सा सांगितला; की लोक आता अडचणीतही विनोदबुद्धी दाखवायला लागलेत. =))
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

हा हा, तेही खरं. पॉपकॉर्न

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 22:08 नवीन
हा हा, तेही खरं. पॉपकॉर्न बनवायला टाकते. जरा उशीरच झाला म्हणायचा..
↩ प्रतिसाद: पैसा

..

अन्नू
Sun, 11/13/2016 - 22:18 नवीन
मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते खुप मनाला लावून घेता तुंम्ही. व्यक्तीशः आपल्याला ज्या समस्या येतात त्यापेक्षा खुप जास्त समस्या वा मनस्ताप सामान्य, अतिसामान्य आणि गरीब, मजुर लोकांना होत आहे. ज्याचा आपण या सगळ्यात विचारच करत नाही आहोत. http://abpmajha.abplive.in/maharashtra/nandurbar-no-news-of-currency-ban-313979 http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-people-yelling-for-banks-to-open-313942 असो! आगे आगे देखेंगे होता है क्या-
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

उपाय सांगा

ट्रेड मार्क
Mon, 11/14/2016 - 02:18 नवीन
लोकांना किती त्रास होतोय आणि सरकारने कसे चुकीचे नियोजन केले हे सांगणाऱ्यांनी तुम्ही हे नियोजन कसं केलं असतं ते सांगा बघू. मात्र अटी पुढील प्रमाणे आहेत - १. हा निर्णय एका फटक्यात जाहीर झाला पाहिजे नाहीतर काळे पैसेवाले पैसे जिरवायचे विविध मार्ग शोधतील. २. संपूर्ण गुप्तता राहिली पाहिजे - म्हणजे - प्रचंड प्रमाणात १०० च्या नोटा छापल्या आणि वाटल्या जातायेत असं दिसायला नको - नवीन ५०० आणि २००० च्या नोटा आधी छपायच्या नाहीत कारण त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि मग ही बातमी कुठूनही लीक होऊ शकते - २००० च्या आणि कदाचित ५०० च्या पण नोटेचा कागद आणि आकार वेगळा करायला लागत आहे कारण खोट्या नोटा छापणाऱ्यांना नवीन नोटा सहज छापता येऊ नयेत - ATM मध्ये २००० च्या नोटेसाठी वेगळे सेटिंग करायला लागते पण ते आधी करता येणार नाही ३. नवीन नोटा छापणे आणि वितरीत करणे याला काही प्रमाणात तरी वेळ लागणार आहे. त्यात वरील मुद्दा २ मधील अटींमुळे खूप आधीपासून (म्हणजे काही महिने किंवा आठवडे आधी) नोटा छापणे सुरु करू शकत नाही. आता यावर तुमचा प्लॅन सांगा बघू. एकदम फुलप्रूफ प्लॅन पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही नोटा रद्द कराल त्यादिवशी किंवा फारतर दुसऱ्या दिवशीपर्यंत देशात सगळीकडे १००, ५०० (नवीन) आणि २००० च्या नोटा सगळ्यांना पुरतील तेवढ्या असायला पाहिजेत. कोण स्वीकारताय हे चॅलेंज?
↩ प्रतिसाद: अन्नू

अरबाप्पो, लै डेंजर च्यलेंज हे

संदीप डांगे
Mon, 11/14/2016 - 02:32 नवीन
अरबाप्पो, लै डेंजर च्यलेंज हे, उत्तरपत्रिकेहून प्रश्नपत्रिका तयार करतात काय आजकाल?! ;)
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

=)) =))

अन्नू
Mon, 11/14/2016 - 09:21 नवीन
तुम्ही हे नियोजन कसं केलं असतं ते सांगा बघू >>>>>> तुंम्ही निर्माण केलेले प्रश्न तुंम्हीच एकदा नीट वाचा ते प्रश्न किती बाळबोध आहेत ते तुमचंच तुंम्हाला समजेल. माझा पाचवितला भाचा ते यापेक्षा चांगलं नियोजन करतो! ;) (हघ्या) :))
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

प्रश्न का बाळबोध आहे?

ट्रेड मार्क
Mon, 11/14/2016 - 22:20 नवीन
तुम्ही निर्माण केलेले प्रश्न तुंम्हीच एकदा नीट वाचा, ते प्रश्न किती बाळबोध आहेत ते तुमचंच तुंम्हाला समजेल.
मुळात मी एकाच प्रश्न विचारला. तुमच्या ५ वीतल्या भाच्याला तुमच्या आत्ताच्या या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ते विचारा तो बरोबर सांगेल (कृ ह घ्या) डांगेंजी - त्या कंडिशन्स आहेत. फारच कठीण वाटत आहेत बहुतेक. बरं सगळं जाऊद्या तुम्ही काळे पैसे बाहेर काढायचे मार्ग सांगा. जे काही तुमच्या मनात असेल ते सांगा. अगदी पक्का प्लॅन नसला तरी चालेल पण आमच्या ज्ञानात पण भर पडुदे जरा.
↩ प्रतिसाद: अन्नू

हा प्रश्न आपण

चौकटराजा
Mon, 11/14/2016 - 10:00 नवीन
आपण खालील लोकाना विचारा....... मनमोहन सिंग अह्लूवालिया कपिल सिब्बल लालक्रिश्ण आडवानी सुषमा स्वराज चिदंबरम मायावती, लालू मुलायम सिंग उद्धव ठाकरे अशोक चव्हाण नारायण राणे सर्व व्यवहार रोखीत करणार्या बाजार समित्या. ममता बानर्जी आणि बरेच ...
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 00:49 नवीन
मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते =)) =)) यावरून लोकांना काही फार त्रासबीस झालेला नाही, त्यांची विनोदबुद्धी केवळ शाबूत नसून तिला धुमारेही फुटत आहेत, असे जाहीर करण्यास आम्हाला आनंद होत आहे :) ;)
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

नक्कीच आहे. सुट्टे देणे

मृत्युन्जय
Mon, 11/14/2016 - 11:02 नवीन
नक्कीच आहे. सुट्टे देणे बंधनकारक नाही. अश्या परिस्थितीत दुकानदार सौदा नाकारु शकतो.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डेबिट कार्ड लाईटबिल

अन्नू
Sun, 11/13/2016 - 18:14 नवीन
डेबिट कार्ड लाईटबिल भरण्यासाठी भाईंदरला नेलेलं आहे. घरात डाळी आणायच्या होत्या. भावालाही कुकींच्या प्रॅक्टीकलसाठी काही सामान घ्यायचं होतं. बिल झालं सातशे. पण तिथे कोणी हजार पाचशे घ्यायला मागेना. अन दोन हजार सुट्टे देईना! :(
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

ओके, आय होप तुमची काहीतरी सोय

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 18:41 नवीन
ओके, आय होप तुमची काहीतरी सोय नंतर तरी झाली असेल.
↩ प्रतिसाद: अन्नू

यु आर प्रुव्हींग माय पॉइण्ट...

अर्धवटराव
Sun, 11/13/2016 - 23:31 नवीन
अशात दुसर्‍याची मदत कोण कशी करु शकणार?
हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा, व त्याची उत्तरं शोधुन ति वापरायची आपली तयारी हवी.
↩ प्रतिसाद: अन्नू

अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद

सुबोध खरे
Mon, 11/14/2016 - 12:06 नवीन
अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद निदान दहा लाख वर्षात इतकी अतिशयोक्ती पहिली नव्हती तुंम्ही आता ज्यांची लग्न ऐन मोक्यावर थांबली आहेत त्यांना-- चेक ने पैसे देऊन कोणतेच काम होत नाही का? औषधाअभावी जे हॉस्पिटलमध्ये खितपत आहेत त्यांना-- रुग्णालयात औषधे देणे हे काम रुग्णालयाचे असते. तुम्ही त्यांना चेकने पैसे द्या की. जे घरी मुलांना "पैसे असूनही" खाणं उपलब्ध करु शकत नाहीत त्या पालकांना-- काहींच्या काही जे दुसर्‍याच्या भरवशावर आपली लहानगी ठेवून दिवस दिवस बँकेच्या लाईनीत घालवत आहेत त्यांना--दिवस दिवस बँकेच्या लाईनीत --परत काहींच्या काही -- कोणीही दोन तासाच्या वर रांगेत उभे राहिलेले नाही. पर्याय नसल्याने रोज कामाचे खडे करुन गर्दीत ताटकळत आहेत त्यांना-- आज खाडा करून पैसे काढले तर उद्यापासून रोज खाडा करायची काय गरज? एवढेच नाही तर पैसे नाहित म्हणून हॉस्पिटलमधून (आप्तांचे) प्रेतही घेऊन जाऊ शकत नाहीत त्यांना--कोणते रुग्णालय मृत व्यक्तीच्या प्रेतासाठी चेक घेत नाही हो? इतका टोकाचा द्वेष का हो? काही कारण आहे का इथे न सांगण्यासारखे?
↩ प्रतिसाद: अन्नू

सर्व काही ठीक होईल.....

चौकटराजा
Sun, 11/13/2016 - 14:44 नवीन
ही बाब व युद्ध परिस्थीती व नैसर्गिक आपत्ती यात फरक आहे. भूकंप , सुनामी हे फार काळ टिकणारे नसतात. युद्ध विशिष्ट समूहात( तीन दले ) लढले जाते. इथे सर्व समाज काळ्या पैशाच्या पापात सामील आहे या ना त्या प्रमाणात. म्हणून एका बाजूला मोदींची स्तुति तर दुसर्‍या बाजूला संताप दिसतो आहे. माझ्या अंदाजाने फक्त २००० च्या नोटा दि ८ पूर्वी छापल्या असाव्यात .साधारण पणे मोठी नोट येणार अशी बातमी पसरल्यास लहान नोट रद्द होईल अशी अटकळ बांधली जात नाही. २००० ची नोट आणण्याचे हे कारण असू शकेल. ८ नंतर ५०० ची नोट छपून ती सर्व देशात वहातुकीने नेण्यास काही काळ लागेलच. तो पर्यंत लोकानी काटकसर व उधारी यांचा आधार घेतलाच पाहिजे. यातअनेक सापळे काही नियम करून सरकारने केलेले दिसत आहेत. त्यात मनी लॉन्डरिंगला साथ देणारे जनधन वालेही पकडले जाउ शकतात. मला तरी वाटते. यावेळी माध्यमाना चोरानी विकत घेतले आहे. सबब फक्त निगेटिव्ह बाबी दाखवत आहेत. एरवी ते निगेटिव्ह बाबीच दाखवीत असतात कारण नकारात्मक बाबीना सेन्सेशन व्हॅल्यू असते.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मुद्दा तो नाहि सर...

अर्धवटराव
Sun, 11/13/2016 - 15:17 नवीन
कारण कुठलंही असो, जनतेवर आपत्ती ओढावल्यावर जनता स्वाभावीकपणे सरकारकडे मदतीची अपेक्षा करते, पण एक लोकांनी एकमेकांची काळजी घेणारी व्यवस्था देखील अत्यावष्यक आहे... येत्या काळात आपल्याला काय काय बघायला लागणार काय माहित.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अगदी बरोबर

ज्योत्स्ना
Sun, 11/13/2016 - 15:39 नवीन
तुम्ही हे संयमित आवाहन whatsapp वर कृपया पोस्ट कराल का, मला विश्वास आहे की हे सर्व समंजस नागरिकांना एक नवा विचार देईल, कदाचित प्रत्यक्षातही उतरेल अशी आशा आपण तरुणांकडून करू शकतो.ही पोस्ट अगदी नक्की व्हायरल होईल अशीच आहे.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वैयक्तीक पातळीवर लोकं एकमेकांना मदत करताना मी बघतोय

अर्धवटराव
Sun, 11/13/2016 - 16:07 नवीन
माझ्याच कुटुंबातले बँकेत काम करणारे लोकं, आमचे नेहेमीचे किराणा माल व्यापारी वगैरे मंडळी थोडंफार सकारात्मक काम करताना मी बघतोच आहे. त्यातुन अगदी हातघाईच्या परिस्थितीतल्या काहि लोकांना २-३ आठवड्यांची उसंत मिळाल्याचं बघुन फार आनंद झाला. हेच काम एक समाज म्हणुन व्हायला लागलं तर परिस्थिती लवकर निवळेल असं वाटतं. माझं एडीटींग फार काहि बरं नाहि... कुणीतरी फिरवेलच असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज :)
↩ प्रतिसाद: ज्योत्स्ना

बहुतांश जनता या निर्णयाचे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 18:51 नवीन
बहुतांश जनता या निर्णयाचे स्वागत करत रांगेत शांतपणे उभे राहून सहकार्य करताना दिसत आहे. नंतरच्या मोठ्या फायद्यासाठी काही दिवस त्रास सहन करायला तयार आहे. विरोधी पक्षांतले बरेच नेते निर्णयाचा विरोध करून, "जनतेला त्रास अतिशय त्रास होतो आहे, अराजक होईल," इत्यादी दावे अराजक निर्माण करण्यासाठी चिथावणी देत आहेत असा संशय येण्याइतक्या कर्कश्यपणे करत आहेत. त्याचबरोबर त्यातील काही नेते, १-२ कोटीच्या गाडीत बसून जावून, पैसे बदलायला उभे असलेल्या लोकांच्या रांगात शिरून, लोकांचा त्रास समजावून घेण्याचा दावा करत, लोकांचा त्रास अजून वाढवत आहेत आणि टीव्ही फूटेज मिळवायचा प्रयत्न करत आहेत. सेल्फी काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. खरे समाजसेवक केवळ जनतेचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे अनेक प्रकारे मदत करत आहेत. जनता हुशार आहे. या सगळ्या वरच्या घटनांची नोंद तिच्या मनात होत असणारच ! :)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बाकी,

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 18:53 नवीन
बाकी, "करोडो रुपयांचे काळे पैसे असलेले रांगेत उभे राहून ते बँकेत का भरत नाहीत ?" असे विचारणार्‍यांच्या हुशारीबद्दल काय बोलावे ? =)) =)) =))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगदी अगदी

चाणक्य
Sun, 11/13/2016 - 22:29 नवीन
.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आपले एक माजी मुख्यमंत्रीही

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 11/14/2016 - 11:47 नवीन
आपले एक माजी मुख्यमंत्रीही काळ असं म्हणाले. काय बोलणार?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

*काल

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 11/14/2016 - 11:47 नवीन
*काल
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

आपले एक माजी मुख्यमंत्रीही

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 15:49 नवीन
आपले एक माजी मुख्यमंत्रीही काळ असं म्हणाले. काय बोलणार?
या "आदर्श" माजी मुख्यमंत्र्यांच्या "आदर्श" मताला शून्य किंमत आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

काही बाळबोध प्रश्न- या

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 16:30 नवीन
काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी. 1. 'काळा पैसा कुठे सगळाच्या सगळा कॅशमध्ये असतो का' असं जे म्हणत आहेत, त्यांना 'या एकाच निर्णयाने सगळाच्या सगळा काळा पैसा बाहेर निघणार आहे, बाकी काही करायची गरज नाही' असं कुणी क्लेम केलेलं दिसलं? मोदींनी तसं क्लेम केलं का? अगदी भक्तांनी असं म्हटलं का? 2. अंबानी वगैरे लोक कुठे रांगेत नाही दिसले, दिसले ते फक्त सर्वसामान्य असं म्हणणाऱ्यांना अंबानी सदृश लोकांनी 4 हजार वगैरे बँकेतून बदलून घ्यावेत हे बघायची खरंच अपेक्षा आहे का? ते लोक खरंच आपले व्यवहार स्वतः बँकेत जाऊन करत असतील? 3. काळा पैसा प्रत्यक्ष असणारे लोक स्वस्थपणे त्याची विल्हेवाट लावतायत आणि त्यांच्यात काहीच अस्वस्थता नाही (आणि अर्थात, भरडले जाणारे सर्वसामान्य तेवढेच) असं म्हणणाऱ्यांना काळा पैसा जमा करून ठेवलेल्यांकडून नक्की काय गोंधळ होणं अपेक्षित आहे? माझ्या कॉमन सेन्स प्रमाणे माझ्याकडे अनधिकृतपणे कोट्यवधी रुपये असतील तरी मी त्यांची आत्ता या क्षणाला बोंबाबोंब करणार नाही. माझ्यावर अन्याय होतोय असं तर खाजगीतही बोलू शकणार नाही. त्यामुळे काळा पैसा असलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता नाही म्हणणाऱ्यांना त्यांच्याकडून नक्की कसली प्रतिक्रिया अपेक्षित आहे ते कळलेलं नाही. 4. माझ्या वर्षानुवर्षं असलेल्या मोलकरणीचा बँक अकाउंट नसेल, तर मी तिला खूप आधी अकाउंट उघडायला एक माझी सामाजिक जबाबदारी म्हणून मदत केलेली असली पाहिजे. ती जर मी केलेली नसेल, तर तिच्या पैशांचं आता काय? अशी चिंता व्यक्त करण्याचा मला नैतिक अधिकार काय राहतो?

मुद्दा क्र. ४

राही
Sun, 11/13/2016 - 18:41 नवीन
आमच्याइथले वास्तव असे आहे की अनेक केसेसमध्ये बँक अकाउण्ट्स उघडली गेली आहेत पण ती बहुतांशी रिकामी असतात. कारण घरातले 'कर्ते' पुरुष दारुडे असतात. बँकेतले अकाउंट एकल नावाने नसते. त्यात मुलाचे, नवर्‍याचे, सासूचे, लग्न न झालेल्या नणंदेचे (यातल्या एकाचे किंवा अनेकांचे) नाव असते. आणि दारुड्या नवर्‍याला हाताशी धरून पैसे काढले जातात. प्रसंगी पैसे काढू न दिल्यास मारझोडही होते. शिवाय या बायकांमध्ये 'भिशी'मध्ये पैसे गुंतवण्याचे प्रमाण अधिक आहे. 'भिशी' लागलेली नसतानाही जास्त दराने कोणी गरजू उचलतो. हे अधिकचे व्याज सभासदांत वाटले जाते. आपापसात पैसे अधिक व्याजाने देण्याचे प्रमाणही खूप आहे. दरमहा दर शेकडा पाच सहा रुपये व्याज असते. त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्याचे प्रमाण कमी आहे.
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

हे अगदी मान्य.

पिशी अबोली
Sun, 11/13/2016 - 20:08 नवीन
हे अगदी मान्य.
↩ प्रतिसाद: राही

काही बाळबोध प्रश्न- या

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 16:38 नवीन
काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी.
निर्णयापेक्षा ज्या पद्धतीने राबवला त्याबद्दल नाराजी आहे. चोर पळून जाउ नये म्हणून पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला विरोध आहे.

..

अन्नू
Sun, 11/13/2016 - 17:06 नवीन
पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला...... >>>> =)) =))
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

कसा राबवायला हवा होता हेही

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 17:29 नवीन
कसा राबवायला हवा होता हेही ऐकायला आवडेल.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

कसा राबवायला हवा होता हेही

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 19:13 नवीन
कसा राबवायला हवा होता हेही ऐकायला आवडेल.
एका रात्रीत काळा पैसा कुठे गुंतवला गेला हे ध्यानात घेतले तर समजेल.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

तेच नाही कळत आहे, तुम्ही थोडं

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 22:28 नवीन
तेच नाही कळत आहे, तुम्ही थोडं विस्कटून सांगाल काय?. तुम्ही "सोनं" ह्या गोष्टीकडे बोट दाखवत असाल तर त्याला काही आधार आहे का?
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी

सतिश गावडे
Sun, 11/13/2016 - 17:44 नवीन
नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी पहिल्यांदा वापरण्याचा मान कोल्हापूरला मिळाला आहे.

डिमनीटायजेशननी काळापैसावाल्यांची मोठी गोची होणार आहे

संजय क्षीरसागर
Sun, 11/13/2016 - 18:28 नवीन
देशाच्या मोठ्या नोटांचा सर्व पैसा आता ९ नोव्हेंबर पूर्वी आणि तदनंतर असा विभागला गेला आहे. त्यामुळे कुणाकडेही ५०० आणि २,००० च्या भरमसाठ नोटा सापडल्या की त्याला स्पष्टीकरणाचे दोनच पर्याय उरले आहेत : १) त्या स्वतःच्या बँक अकाउंटमधून काढल्या आहेत. २) ९ तारखेपासून पकडले जाईपर्यंतच्या काळात वैध मार्गानं मिळवल्या आहेत. यापैकी काहीही डिसप्रूव झालं की तो पैसा काळा समजला जाऊन टॅक्स आणि दंड अशी दुहेरी कारवाई होईल. शिवाय निलंबन वगैरे आहेच !
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आपल्या प्रतिसादातला "नोटा

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 18:37 नवीन
आपल्या प्रतिसादातला "नोटा सापडल्या की" हा भाग अनेक शक्यतांना जन्म देतो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अर्थात,

संजय क्षीरसागर
Sun, 11/13/2016 - 18:43 नवीन
संबंधित बातमीत व्यक्तीकडे नोटा सापडल्या आहेत म्हणून तर प्रतिसाद दिलायं.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मी बातमीबद्दल किंवा तुमच्या

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 19:03 नवीन
मी बातमीबद्दल किंवा तुमच्या प्रतिसादाबद्दल नाही, शक्यतांबद्दल बोलत आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 19:02 नवीन
लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी मनाचा अनादी कालापासूनचा रोग आहे आणि अनंत कालापर्यंत चालू राहील. नवीन नोटा वापरून असे गुन्हे झाल्यास त्यांचा तपास करताना "९ नोव्हेंबर" एक उत्तम प्लेसहोल्डर तयार झाल्याने तपास सुलभ होईल.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 19:05 नवीन
अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम करणार नाही. प्रथम गुन्हा उकरून काढणे हे पण महत्वाचे आहेच.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पुढचा टप्पा...

चौकटराजा
Sun, 11/13/2016 - 20:36 नवीन
पुढचा टप्पा मालमत्ता शोधाचा असणार आहे.......मोदी.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

७० वर्षांची घाण साफ कराण्याला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 00:59 नवीन
७० वर्षांची घाण साफ कराण्याला अजून बरेच टप्पे असतील हे नक्की. मात्र, यापुढच्या पायर्‍यांत सामान्य माणसाला नगण्य किंवा शून्य तोशीस असेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: चौकटराजा
  • «
  • ‹
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा