Skip to main content

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs… कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 311129
प्रतिक्रिया 1112

प्रतिक्रिया

In reply to by अन्नू

_/\_ असो, फारच चुकलं बुवा सरकारचं. आधी सगळीकडे सगळ्या लोकांच्या घरी नेऊन 100, 50, 20 अशी बंडलं 9 नोव्हेम्बरच्या सकाळी उपलब्ध करायची सोय करून मगच हा निर्णय घ्यायला हवा होता.

In reply to by पिशी अबोली

खोचक बोलुन उपयोग नै हो. एक जबाबदार नागरिक म्हणून उपायही सांगा की आता... :) माझे पैसे मला बॅन्केत भरायला सांगताय ना, मग बॅन्केतच सुट्टेही उपलब्ध करुन द्या. उधार किंवा भीक नै मागत आहे. बाहेर कोण घेत नाही असे कागदाचे तुकडे घेऊन काय करायचे? अजुन दोन आठवडे थांबूया. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. =))

In reply to by संदीप डांगे

उपाय? 8 नोव्हेम्बरच्या रात्री मी प्रवास करत होते. माझ्याकडे फक्त 100 ची एक नोट आणि इतर काही चिल्लर सोडून बाकी सगळे पैसे 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये होते. पहाटे रिक्षाला वगैरे 100 संपले. 2 दिवस तसेच काढले. नंतर बँकेत जाऊन 1000 चे सुट्टे आणले. अनेक अर्जंट खर्च करून त्यातले 600 शिल्लक आहेत. आता या 5 दिवसांत मी 2 वेळा पिक्चर पाहिला थिएटरला जाऊन. जाणं-येणं उबर, तिकीट काढलेलं, पॉपकॉर्न कार्डने. हा माझा लक्झरी खर्च झाला. नेहमीचा खर्च थोडा कंट्रोल केला. वाणसामान होतं. भाजी आणि दूध आणायला पैसे पुरले. इतर 500-1000 च्या नोटा भरायला थांबेन काही दिवस. आणि हो, मी काही भयंकर पैसे कमवत नाही. विद्यार्थिनी आहे. घरात असते तर आई, बाबा, भाऊ यांच्याकडून थोडे थोडे सुट्टे जमवून एक आठवडा नक्की काढता आला असता. त्यामुळे मध्यमवर्गीय लोक इतका आकांत आल्यासारखं का करतायत हे काही मला समजत नाहीये. पहिले 2 दिवस मोठा गोंधळ होता. पण 5 दिवसांनंतरही अगदी एवढा आकांत येतो? असो, मी जे मार्ग काढले ते सांगितले. एखाद्या शहरात राहणाऱ्या व्यवस्थित कमावणाऱ्या व्यक्तीला यातलं काहीच शक्य नसेल तर तिने खुशाल शिव्या द्याव्यात सरकारला. माझं काही म्हणणं नाही.
अजुन दोन आठवडे थांबूया. दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. =))
याला सहमती.

In reply to by पिशी अबोली

तुमचा परिघ वेगळा आहे हे लक्षात आलं. लोक मूर्ख किंवा देशद्रोही आहेत म्हणून आकांत करत असावेत. किंवा आमच्यासारखे काही सरकारविरोधी-मोदीअंधविरोधक इत्यादी विनाकारण तणाव निर्माण करत असतिल असे असेल. =))

In reply to by संदीप डांगे

तुमचा हा एकच प्रतिसाद सहमत होण्यासारखा वाटला. मूर्ख बिर्ख सगळे एकदम करेक्ट.

In reply to by पद्माक्षी

बरोबर, सरकारी धोरणाविरुद्ध मत व्यक्त करणारे ते सर्व देशद्रोही हि नवी व्याख्या रुजू झाली आहे की, याचाच दुसरा भाग असाही कि नुसता विरोध करतात, काही विधायक बोलत नाहीत - मूळ अर्थ: आम्हाला रुचेल असेच बोला! ;) रच्याकने, भाजपनं या नोटाबदलीचा विरोध केला होता, आता जे होतंय तेच होईल असं बोलून, त्यावर काय मत?

In reply to by पिशी अबोली

आमचे केरळी अंकल सांगत होते, त्यांच्या गावात कोणीतरी माणूस जमिनीच्या व्यवहाराचे रजिस्ट्रेशन करायला गेला. त्याच्याकडे कसल्याच नोटा नव्हत्या, पण कुठच्यातरी देवळाच्या हुंडीतली नाणी त्याच्याकडे आलेली होती. कशी ते माहीत नाही. तर त्या पठ्ठ्याने रुपये ६५००० ची नाणी पोत्यात भरून नेऊन ऑफिसात भरली. ते लोक दोन दिवस मोजत बसले होते म्हणे! =))

In reply to by पैसा

पण पैसाताई, मी त्या केरळमधल्या गावात राहत नाही जिथे मला 65000 रुपये नाण्यांमध्ये मिळतील. ते काही नाही, 2000 चे सुट्टे मॉल मध्ये मिळाले नाहीत, सरकारचं चुकलं. मॉल शहरातच असतात असं मला वाटलं, पण मॉल गावांत असतात आणि तिकडे पेटीएम न चालून लोक उपाशी राहतायत हे मला कुठे माहित होतं? माझं तर गावात कुण्णी कुण्णी राहत नाही. मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते, आणि त्यामुळे माझा परीघच वेगळा आहे.

In reply to by पिशी अबोली

ते सगळं मी म्हणत नाही ग. मी इकॉनॉमिक्सचा बरीच वर्षे जो अभ्यास केला आणि बँकेत काम करून आलेले अनुभव यावर आधारित या धाग्यावर सुरुवातीला काही लिहिले होते. आता सगळेच हाताबाहेर गेले आहे. खरे सांगायचे तर मुविंच्या किंवा टवाळ कार्ट्याच्या धाग्याची कळा हळूहळू येत आहे इथेही. तेव्हा आताच ऐकलेला एक किस्सा सांगितला; की लोक आता अडचणीतही विनोदबुद्धी दाखवायला लागलेत. =))

In reply to by पैसा

हा हा, तेही खरं. पॉपकॉर्न बनवायला टाकते. जरा उशीरच झाला म्हणायचा..

In reply to by पिशी अबोली

मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते खुप मनाला लावून घेता तुंम्ही. व्यक्तीशः आपल्याला ज्या समस्या येतात त्यापेक्षा खुप जास्त समस्या वा मनस्ताप सामान्य, अतिसामान्य आणि गरीब, मजुर लोकांना होत आहे. ज्याचा आपण या सगळ्यात विचारच करत नाही आहोत. http://abpmajha.abplive.in/maharashtra/nandurbar-no-news-of-currency-ba… http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-people-yelling-for-banks-to-op… असो! आगे आगे देखेंगे होता है क्या-

In reply to by अन्नू

लोकांना किती त्रास होतोय आणि सरकारने कसे चुकीचे नियोजन केले हे सांगणाऱ्यांनी तुम्ही हे नियोजन कसं केलं असतं ते सांगा बघू. मात्र अटी पुढील प्रमाणे आहेत - १. हा निर्णय एका फटक्यात जाहीर झाला पाहिजे नाहीतर काळे पैसेवाले पैसे जिरवायचे विविध मार्ग शोधतील. २. संपूर्ण गुप्तता राहिली पाहिजे - म्हणजे - प्रचंड प्रमाणात १०० च्या नोटा छापल्या आणि वाटल्या जातायेत असं दिसायला नको - नवीन ५०० आणि २००० च्या नोटा आधी छपायच्या नाहीत कारण त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि मग ही बातमी कुठूनही लीक होऊ शकते - २००० च्या आणि कदाचित ५०० च्या पण नोटेचा कागद आणि आकार वेगळा करायला लागत आहे कारण खोट्या नोटा छापणाऱ्यांना नवीन नोटा सहज छापता येऊ नयेत - ATM मध्ये २००० च्या नोटेसाठी वेगळे सेटिंग करायला लागते पण ते आधी करता येणार नाही ३. नवीन नोटा छापणे आणि वितरीत करणे याला काही प्रमाणात तरी वेळ लागणार आहे. त्यात वरील मुद्दा २ मधील अटींमुळे खूप आधीपासून (म्हणजे काही महिने किंवा आठवडे आधी) नोटा छापणे सुरु करू शकत नाही. आता यावर तुमचा प्लॅन सांगा बघू. एकदम फुलप्रूफ प्लॅन पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही नोटा रद्द कराल त्यादिवशी किंवा फारतर दुसऱ्या दिवशीपर्यंत देशात सगळीकडे १००, ५०० (नवीन) आणि २००० च्या नोटा सगळ्यांना पुरतील तेवढ्या असायला पाहिजेत. कोण स्वीकारताय हे चॅलेंज?

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही हे नियोजन कसं केलं असतं ते सांगा बघू >>>>>> तुंम्ही निर्माण केलेले प्रश्न तुंम्हीच एकदा नीट वाचा ते प्रश्न किती बाळबोध आहेत ते तुमचंच तुंम्हाला समजेल. माझा पाचवितला भाचा ते यापेक्षा चांगलं नियोजन करतो! ;) (हघ्या) :))

In reply to by अन्नू

तुम्ही निर्माण केलेले प्रश्न तुंम्हीच एकदा नीट वाचा, ते प्रश्न किती बाळबोध आहेत ते तुमचंच तुंम्हाला समजेल.
मुळात मी एकाच प्रश्न विचारला. तुमच्या ५ वीतल्या भाच्याला तुमच्या आत्ताच्या या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ते विचारा तो बरोबर सांगेल (कृ ह घ्या) डांगेंजी - त्या कंडिशन्स आहेत. फारच कठीण वाटत आहेत बहुतेक. बरं सगळं जाऊद्या तुम्ही काळे पैसे बाहेर काढायचे मार्ग सांगा. जे काही तुमच्या मनात असेल ते सांगा. अगदी पक्का प्लॅन नसला तरी चालेल पण आमच्या ज्ञानात पण भर पडुदे जरा.

In reply to by ट्रेड मार्क

आपण खालील लोकाना विचारा....... मनमोहन सिंग अह्लूवालिया कपिल सिब्बल लालक्रिश्ण आडवानी सुषमा स्वराज चिदंबरम मायावती, लालू मुलायम सिंग उद्धव ठाकरे अशोक चव्हाण नारायण राणे सर्व व्यवहार रोखीत करणार्या बाजार समित्या. ममता बानर्जी आणि बरेच ...

In reply to by पिशी अबोली

मी किनई, फ्रेंच राणी आहे. मी राजवाड्यात राहते =)) =)) यावरून लोकांना काही फार त्रासबीस झालेला नाही, त्यांची विनोदबुद्धी केवळ शाबूत नसून तिला धुमारेही फुटत आहेत, असे जाहीर करण्यास आम्हाला आनंद होत आहे :) ;)

In reply to by पिशी अबोली

डेबिट कार्ड लाईटबिल भरण्यासाठी भाईंदरला नेलेलं आहे. घरात डाळी आणायच्या होत्या. भावालाही कुकींच्या प्रॅक्टीकलसाठी काही सामान घ्यायचं होतं. बिल झालं सातशे. पण तिथे कोणी हजार पाचशे घ्यायला मागेना. अन दोन हजार सुट्टे देईना! :(

In reply to by अन्नू

अशात दुसर्‍याची मदत कोण कशी करु शकणार?
हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा, व त्याची उत्तरं शोधुन ति वापरायची आपली तयारी हवी.

In reply to by अन्नू

अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद निदान दहा लाख वर्षात इतकी अतिशयोक्ती पहिली नव्हती तुंम्ही आता ज्यांची लग्न ऐन मोक्यावर थांबली आहेत त्यांना-- चेक ने पैसे देऊन कोणतेच काम होत नाही का? औषधाअभावी जे हॉस्पिटलमध्ये खितपत आहेत त्यांना-- रुग्णालयात औषधे देणे हे काम रुग्णालयाचे असते. तुम्ही त्यांना चेकने पैसे द्या की. जे घरी मुलांना "पैसे असूनही" खाणं उपलब्ध करु शकत नाहीत त्या पालकांना-- काहींच्या काही जे दुसर्‍याच्या भरवशावर आपली लहानगी ठेवून दिवस दिवस बँकेच्या लाईनीत घालवत आहेत त्यांना--दिवस दिवस बँकेच्या लाईनीत --परत काहींच्या काही -- कोणीही दोन तासाच्या वर रांगेत उभे राहिलेले नाही. पर्याय नसल्याने रोज कामाचे खडे करुन गर्दीत ताटकळत आहेत त्यांना-- आज खाडा करून पैसे काढले तर उद्यापासून रोज खाडा करायची काय गरज? एवढेच नाही तर पैसे नाहित म्हणून हॉस्पिटलमधून (आप्तांचे) प्रेतही घेऊन जाऊ शकत नाहीत त्यांना--कोणते रुग्णालय मृत व्यक्तीच्या प्रेतासाठी चेक घेत नाही हो? इतका टोकाचा द्वेष का हो? काही कारण आहे का इथे न सांगण्यासारखे?

In reply to by अर्धवटराव

ही बाब व युद्ध परिस्थीती व नैसर्गिक आपत्ती यात फरक आहे. भूकंप , सुनामी हे फार काळ टिकणारे नसतात. युद्ध विशिष्ट समूहात( तीन दले ) लढले जाते. इथे सर्व समाज काळ्या पैशाच्या पापात सामील आहे या ना त्या प्रमाणात. म्हणून एका बाजूला मोदींची स्तुति तर दुसर्‍या बाजूला संताप दिसतो आहे. माझ्या अंदाजाने फक्त २००० च्या नोटा दि ८ पूर्वी छापल्या असाव्यात .साधारण पणे मोठी नोट येणार अशी बातमी पसरल्यास लहान नोट रद्द होईल अशी अटकळ बांधली जात नाही. २००० ची नोट आणण्याचे हे कारण असू शकेल. ८ नंतर ५०० ची नोट छपून ती सर्व देशात वहातुकीने नेण्यास काही काळ लागेलच. तो पर्यंत लोकानी काटकसर व उधारी यांचा आधार घेतलाच पाहिजे. यातअनेक सापळे काही नियम करून सरकारने केलेले दिसत आहेत. त्यात मनी लॉन्डरिंगला साथ देणारे जनधन वालेही पकडले जाउ शकतात. मला तरी वाटते. यावेळी माध्यमाना चोरानी विकत घेतले आहे. सबब फक्त निगेटिव्ह बाबी दाखवत आहेत. एरवी ते निगेटिव्ह बाबीच दाखवीत असतात कारण नकारात्मक बाबीना सेन्सेशन व्हॅल्यू असते.

In reply to by चौकटराजा

कारण कुठलंही असो, जनतेवर आपत्ती ओढावल्यावर जनता स्वाभावीकपणे सरकारकडे मदतीची अपेक्षा करते, पण एक लोकांनी एकमेकांची काळजी घेणारी व्यवस्था देखील अत्यावष्यक आहे... येत्या काळात आपल्याला काय काय बघायला लागणार काय माहित.

In reply to by अर्धवटराव

तुम्ही हे संयमित आवाहन whatsapp वर कृपया पोस्ट कराल का, मला विश्वास आहे की हे सर्व समंजस नागरिकांना एक नवा विचार देईल, कदाचित प्रत्यक्षातही उतरेल अशी आशा आपण तरुणांकडून करू शकतो.ही पोस्ट अगदी नक्की व्हायरल होईल अशीच आहे.

In reply to by ज्योत्स्ना

माझ्याच कुटुंबातले बँकेत काम करणारे लोकं, आमचे नेहेमीचे किराणा माल व्यापारी वगैरे मंडळी थोडंफार सकारात्मक काम करताना मी बघतोच आहे. त्यातुन अगदी हातघाईच्या परिस्थितीतल्या काहि लोकांना २-३ आठवड्यांची उसंत मिळाल्याचं बघुन फार आनंद झाला. हेच काम एक समाज म्हणुन व्हायला लागलं तर परिस्थिती लवकर निवळेल असं वाटतं. माझं एडीटींग फार काहि बरं नाहि... कुणीतरी फिरवेलच असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज :)

In reply to by अर्धवटराव

बहुतांश जनता या निर्णयाचे स्वागत करत रांगेत शांतपणे उभे राहून सहकार्य करताना दिसत आहे. नंतरच्या मोठ्या फायद्यासाठी काही दिवस त्रास सहन करायला तयार आहे. विरोधी पक्षांतले बरेच नेते निर्णयाचा विरोध करून, "जनतेला त्रास अतिशय त्रास होतो आहे, अराजक होईल," इत्यादी दावे अराजक निर्माण करण्यासाठी चिथावणी देत आहेत असा संशय येण्याइतक्या कर्कश्यपणे करत आहेत. त्याचबरोबर त्यातील काही नेते, १-२ कोटीच्या गाडीत बसून जावून, पैसे बदलायला उभे असलेल्या लोकांच्या रांगात शिरून, लोकांचा त्रास समजावून घेण्याचा दावा करत, लोकांचा त्रास अजून वाढवत आहेत आणि टीव्ही फूटेज मिळवायचा प्रयत्न करत आहेत. सेल्फी काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. खरे समाजसेवक केवळ जनतेचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे अनेक प्रकारे मदत करत आहेत. जनता हुशार आहे. या सगळ्या वरच्या घटनांची नोंद तिच्या मनात होत असणारच ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाकी, "करोडो रुपयांचे काळे पैसे असलेले रांगेत उभे राहून ते बँकेत का भरत नाहीत ?" असे विचारणार्‍यांच्या हुशारीबद्दल काय बोलावे ? =)) =)) =))

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आपले एक माजी मुख्यमंत्रीही काळ असं म्हणाले. काय बोलणार?
या "आदर्श" माजी मुख्यमंत्र्यांच्या "आदर्श" मताला शून्य किंमत आहे.

काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी. 1. 'काळा पैसा कुठे सगळाच्या सगळा कॅशमध्ये असतो का' असं जे म्हणत आहेत, त्यांना 'या एकाच निर्णयाने सगळाच्या सगळा काळा पैसा बाहेर निघणार आहे, बाकी काही करायची गरज नाही' असं कुणी क्लेम केलेलं दिसलं? मोदींनी तसं क्लेम केलं का? अगदी भक्तांनी असं म्हटलं का? 2. अंबानी वगैरे लोक कुठे रांगेत नाही दिसले, दिसले ते फक्त सर्वसामान्य असं म्हणणाऱ्यांना अंबानी सदृश लोकांनी 4 हजार वगैरे बँकेतून बदलून घ्यावेत हे बघायची खरंच अपेक्षा आहे का? ते लोक खरंच आपले व्यवहार स्वतः बँकेत जाऊन करत असतील? 3. काळा पैसा प्रत्यक्ष असणारे लोक स्वस्थपणे त्याची विल्हेवाट लावतायत आणि त्यांच्यात काहीच अस्वस्थता नाही (आणि अर्थात, भरडले जाणारे सर्वसामान्य तेवढेच) असं म्हणणाऱ्यांना काळा पैसा जमा करून ठेवलेल्यांकडून नक्की काय गोंधळ होणं अपेक्षित आहे? माझ्या कॉमन सेन्स प्रमाणे माझ्याकडे अनधिकृतपणे कोट्यवधी रुपये असतील तरी मी त्यांची आत्ता या क्षणाला बोंबाबोंब करणार नाही. माझ्यावर अन्याय होतोय असं तर खाजगीतही बोलू शकणार नाही. त्यामुळे काळा पैसा असलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता नाही म्हणणाऱ्यांना त्यांच्याकडून नक्की कसली प्रतिक्रिया अपेक्षित आहे ते कळलेलं नाही. 4. माझ्या वर्षानुवर्षं असलेल्या मोलकरणीचा बँक अकाउंट नसेल, तर मी तिला खूप आधी अकाउंट उघडायला एक माझी सामाजिक जबाबदारी म्हणून मदत केलेली असली पाहिजे. ती जर मी केलेली नसेल, तर तिच्या पैशांचं आता काय? अशी चिंता व्यक्त करण्याचा मला नैतिक अधिकार काय राहतो?

In reply to by पिशी अबोली

आमच्याइथले वास्तव असे आहे की अनेक केसेसमध्ये बँक अकाउण्ट्स उघडली गेली आहेत पण ती बहुतांशी रिकामी असतात. कारण घरातले 'कर्ते' पुरुष दारुडे असतात. बँकेतले अकाउंट एकल नावाने नसते. त्यात मुलाचे, नवर्‍याचे, सासूचे, लग्न न झालेल्या नणंदेचे (यातल्या एकाचे किंवा अनेकांचे) नाव असते. आणि दारुड्या नवर्‍याला हाताशी धरून पैसे काढले जातात. प्रसंगी पैसे काढू न दिल्यास मारझोडही होते. शिवाय या बायकांमध्ये 'भिशी'मध्ये पैसे गुंतवण्याचे प्रमाण अधिक आहे. 'भिशी' लागलेली नसतानाही जास्त दराने कोणी गरजू उचलतो. हे अधिकचे व्याज सभासदांत वाटले जाते. आपापसात पैसे अधिक व्याजाने देण्याचे प्रमाणही खूप आहे. दरमहा दर शेकडा पाच सहा रुपये व्याज असते. त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्याचे प्रमाण कमी आहे.

काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी.
निर्णयापेक्षा ज्या पद्धतीने राबवला त्याबद्दल नाराजी आहे. चोर पळून जाउ नये म्हणून पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला विरोध आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला...... >>>> =)) =))

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कसा राबवायला हवा होता हेही ऐकायला आवडेल.
एका रात्रीत काळा पैसा कुठे गुंतवला गेला हे ध्यानात घेतले तर समजेल.

In reply to by मार्मिक गोडसे

तेच नाही कळत आहे, तुम्ही थोडं विस्कटून सांगाल काय?. तुम्ही "सोनं" ह्या गोष्टीकडे बोट दाखवत असाल तर त्याला काही आधार आहे का?

In reply to by सतिश गावडे

देशाच्या मोठ्या नोटांचा सर्व पैसा आता ९ नोव्हेंबर पूर्वी आणि तदनंतर असा विभागला गेला आहे. त्यामुळे कुणाकडेही ५०० आणि २,००० च्या भरमसाठ नोटा सापडल्या की त्याला स्पष्टीकरणाचे दोनच पर्याय उरले आहेत : १) त्या स्वतःच्या बँक अकाउंटमधून काढल्या आहेत. २) ९ तारखेपासून पकडले जाईपर्यंतच्या काळात वैध मार्गानं मिळवल्या आहेत. यापैकी काहीही डिसप्रूव झालं की तो पैसा काळा समजला जाऊन टॅक्स आणि दंड अशी दुहेरी कारवाई होईल. शिवाय निलंबन वगैरे आहेच !

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्या प्रतिसादातला "नोटा सापडल्या की" हा भाग अनेक शक्यतांना जन्म देतो.

In reply to by संदीप डांगे

लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी मनाचा अनादी कालापासूनचा रोग आहे आणि अनंत कालापर्यंत चालू राहील. नवीन नोटा वापरून असे गुन्हे झाल्यास त्यांचा तपास करताना "९ नोव्हेंबर" एक उत्तम प्लेसहोल्डर तयार झाल्याने तपास सुलभ होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम करणार नाही. प्रथम गुन्हा उकरून काढणे हे पण महत्वाचे आहेच.

In reply to by चौकटराजा

७० वर्षांची घाण साफ कराण्याला अजून बरेच टप्पे असतील हे नक्की. मात्र, यापुढच्या पायर्‍यांत सामान्य माणसाला नगण्य किंवा शून्य तोशीस असेल असे वाटते.

चला..., इतर लिखाण करायचे असल्यामुळे या धाग्यावरुन आता रजा घेतो. बर्‍याच गोष्टी समजल्या त्याबद्दल सर्वांचे आभार.

२००० च्य नोटेचा रंग जात आहे याच डेमो एक माणूस टीव्ही वर देत असता २ अधिक दोन बरोबर चार म्हणजे काय याचे ज्ञान नसलेल्या माझ्या मतिमंद ( सरकारी एम डी डो च्या हिशेबाने ७५ टक्के माननिक नुकसान ) मुलीने मला एक प्रश्न केला की " नोटेचा रंग घालवून बघायचाच कशाला ?" . मला वाटते आपल्याला बनावट नोट काढता येईल किंवा कसे या नादात हा उद्योग कोणातरी केलेला दिसतो. देवाची मूर्ति खरेच सोन्याची आहे का हे भक्त कधी ती मुर्त ठेचून पाहिल का ? बादवे मी वर म्हटल्याप्रमाणे ५०० ची नोट आज दिल्ली मधे जारी करण्यात आली आहे. सहकारी बॅन्कात सुद्धा या नोटा मंगळ॑वारी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून म्ह्टले सर्व ओके होईल.

In reply to by चौकटराजा

असे असू शकेल काय कि मुळातच हि नोट फार काळ टिकावी या उद्देशाने बनलीच नसेल, म्हणजे कि काही वर्षात हि नोट देखील चलनातून हद्दपार होऊ शकेल. किंवा सरकार डिफेक्टिव्ह नोटा बदलून घ्यायला लोकांना सांगेल. (खूप लेम जस्टीफिकेशन वाटू शकेल, जे वाटतंय ते लिहितोय)

मला वाटते की सरकारने ५०० व १००० अशा दोन्ही नोटा रद्द करण्याऐवजी फक्त ५०० च्या नोटा रद्द करायला पाहिजे होत्या. १००० च्या नोटा वैध राहिल्याने लोकांची कमी अडचण झाली असती. फक्त ५०० च्या नोटा बदलण्यासाठी तुलनेने कमी झुंबड उडाली असती. एटीम सुरू राहिली असती व त्यातून फक्त १००० च्या नोटा देता आल्या असत्या. काळाबाजारवाल्यांनी ५०० च्या नोटातील पैसे बदलून घेऊन १००० मध्ये ठेवण्याचा फारसा विचार केला नसता आणि सध्या हातात असलेल्या १००० च्या नोटा बदलण्याचा प्रयत्न केला असता कारण काही काळाने १००० च्या नोटाही रद्द होतील अशी शंका मनात डोकावत राहिली असती. नंतर काही महिन्यांनतर १००० च्या नोटाही रद्द करता आल्या असत्या.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे घोषणा झाली व पॅनिक झाले ते सांभाळतांना बिघडले. लोकांना वन-लायनर कळतात फक्त. "१०००-५०० च्या नोटा रद्द झाल्या, त्या बॅन्केत बदलून घ्या" एवढंच. बाकीचे डिटेल्स मुरायला वेळ जातो, ओवरनाईट होत नसतं. नेमकं काय होणार आहे, व प्लानिंग काय हे येता काळच सांगेल. आपण बसलोय कळफलक बडवत आणि अंदाज बांधत. :)

In reply to by श्रीगुरुजी

या प्रक्रियेने खोट्या नोटांच्या स्वरूपातल्या पैशाचे व काळ्या "१०० किंवा कमी रकमेच्या नोटांत" किंवा "इतर शोधायला कठीण (उदा.सोने, रियल इस्टेट, इ) गोष्टींत" रुपांतर करायला पुरेसा वेळ मिळेल. मग नोटा रद्द तरी कशाला करायच्या ? हेच पुर्वी दोनदा केले होते आणि काळा पैसेवाले खूष होते ! १. आता लोकसभेतली किंवा माध्यमातली चर्चा पाहिली तर (डावे व ममता सोडून) मुख्य आक्षेप "आम्हाला न सांगता अचानक का कारवाई केली (पक्षी : निदान आमचे पैसे तरी आम्हाला सुरक्षितपणे बदलू द्यायचे होते :) ). २. राजकारण्याचा अजून एक उघड-गुप्त सूर असा की "उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीपूर्वी हे करून सरकारने आमचा विश्वासघात केला आहे". ३. या कारवाईने अतिरेक्यांना मिळणारा खोटा पैसा (जवळ जवळ २ लाख कोटी प्रतीवर्ष) बंद झाला आणि त्याचे परिणाम (अ) दगडफेक पूर्ण थांबली आहे आणि (आ) चारपाच महिने शाळा बंद असून व ४०एक शाळा जाळल्यानंतरही सद्या काश्मीरमध्ये ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर्वात महत्वाचा मुद्दा... पूर्ण (१००%) गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता. बातमी थोडीशीही बाहेर फुटणे म्हणजे कारवाईला "फुसका बार" बनवणे झाले असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे लोकांना समजले तर सर्व विरोध थंड होईल ना, मग पुढे असलेल्या राज्य निवडणूक मध्ये याचे भांडवल असे केले जाईल.

घराजवळचे एक एटीएम सुरू झाल्याचे समजले. उद्या जाऊन बघतो. ५०० च्या नवीन ५० लाख नोटा वितरणासाठी आलेल्या आहेत असे वाचले. तसे असेल तर जास्तीत जास्त २-३ दिवसात बर्‍याच समस्या कमी होतील.

In reply to by श्रीगुरुजी

नव्या नोटांचा साईझ वेगळा असल्याने सगळी मशिन्स कॅलिब्रेट व्हायला हवीत. दोन हजाराचे नवे डिनॉमिनेशन असल्याने सॉफ्टवेअरही बदलावे लागेल. इथे एसबीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस आणि एचडीएफसी यानी शंभराच्या नोटा भरून एटीएम चालू केली आहेत. पण तिथे रांगा लावून लोक त्या नोटाही संपवत आहेत. इतर सरकारी बँकाना एसबीआयमधून शंभराच्या नोटांचा पुरवठा नसल्याने ते एटीएम चालू करू शकलेले नाहीत.

केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप च्या कार्य कर्त्या ची वक्त्यव्ये आणि ट्विटर वरच्या ट्विट्स) शिसारी आणणार्या आहेत. या लोकांबद्दलची सगळी सहानुभूती आधीच नष्ट झाली होती. आता त्याची जागा तिरस्कारानं घेतली आहे.

In reply to by संदीप डांगे

आधारभूत मुद्दा (reference पॉईंट) कोणता आहे ते सांगाल का? जर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक बद्दल म्हणत असाल तर सैनिक स्वतः: कोणतीही एक्शन करत नाहीत आणि राजकीय नेतृत्वांन त्याच क्रेडिट घेणं गैर काय?

In reply to by संदीप डांगे

परत तेच! मला सांगा - सरकारचा निर्णय झालाय. त्याने सध्या सार्वजनिक जीवन थोडं कोलमडून गेलंय. ते घाईघाईत निर्णय झालाय म्हणून तसं झालाय असं काही लोकांचं मत आहे तर निर्णय घाईघाईत घेणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच त्याची परिणामकता वाढणार होती असं बाकीच्यांचं. आता या परिस्थितीत काही लोक सैन्याची उदाहरणे देऊन किंवा आणखी बऱ्याच प्रकारे लोकांना संयम ठेवायला प्रवृत्त करत आहेत तर यात चुकीचे ते काय? खूप त्रास होतोय असा परत परत बिंबवून लोकांचा संयम कसा तुटेल असं बोलायला हवं का?

२००० च्या नोटेत चीप असल्याबद्दलचा व्हिडीओ टीव्ही ९ वर आत्ता दाखवला. रेडिओ सिग्नलला प्रतिसाद देते म्हणे. काय चाललेय समजत नाही.