Skip to main content

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?

वाचने 65668
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

अरेच्या! असा वेळ देतात होय! पूर्वानुभवावरून तरी तसे वाटले नव्हते, डांगेंच्याच एका प्रतिसादाला आम्ही ५ मिनिटात रिप्लाय दिला नाही म्हणून आम्हाला मानसिक क्लेश होऊस्तोवर शेलकी विशेषणे बहाल केली गेली होती, ह्याच मिपावर, खास त्या कामाकरता एक डू आयडी डेप्युट करून, त्यावरून आमचा ग्रह झाला की बोवा हीच जनरीत असेल, असो तशी जनरीत नसल्यास आम्ही समस्तांची जाहीर माफी मागतो अन "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" इतकेच म्हणतो, वरती आमचे लेखन दैवत बोक्याभाऊ , किंवा इतर भद्रजन "आम्ही इतर पक्षीय भक्त सहन करतो वगैरे" बोलले आहेत तेव्हा "तुम्ही सरळ ऐसी अक्षरेवर जा" वगैरे कोण कोणाला बोलले होते त्याचा गोंधळ उडतो बघा बाकी काही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, नक्की मुद्दा काय आहे..? मी माझ्यापुरते बोलतो. मी जसा डांगेंचा विरोध केला आहे तसाच गुरूजींचाही विरोध केला आहे. आणि असा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध करावा अशी अपेक्षा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यासाठी "डुआयडींची पिलावळ किंवा नैतीकतेचा कंपास हरवून खुशाल आरोप करणारे" आणि "डांगे व श्रीगुरूजी" यांना एकाच रांगेत बसवावे लागेल. बाकी प्रतिसादाबद्दल "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" हे इथे कसे लागू आहे सांगा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.

In reply to by मोदक

डिस्क्लेमर :- डांगेंची माझी मैत्री जुळणे, किंवा मी त्यांच्यावतीने प्रतिवाद करणे, आम्ही एकाच गावचे (नियतीच्या कृपेने) असणे ह्याचा कोणी अर्थाअर्थी संबंध जोडत असल्यास खाली लिहिलेले सगळेच तुम्हाला आवडेल असे नाही, आपापल्या जबाबदारीवर वाचा बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? हे सुस्पष्ट नाहीये का? असला घाण श्लेष केल्याबद्दलच मागे एक डु आयडी बॅन झाल्याचे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुज्ञ यांनी मान्य केले असेल तर ठीक अन्यथा "संडास" हा शब्द संदीप डांगेंच्य नावावरचा श्लेष आहे हे पटणे थोडे अवघड आहे. नीरक्षीरविवेकाची गाडी जर विखारी डुआयडी या स्टेशनाला लागत असेल तर माझा पास. कितीही लॉजीकल लिहून वाद घातला तरी एका क्षणानंतर ती पिलावळ मूळपदावर येते असा स्वानुभव असल्याने अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. असे मी माझ्यापुरते ठरवले आहे. मोगाखान आणि डांगे ही तुलना पटली नाही. डांगे बहुतेकदा लॉजीकल लिहिण्यचा प्रयत्न करतात असे मी येथेच एक दोन ठिकाणी लिहिलेले सापडेल. मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील. मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा बापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही
मुद्द्याला मुद्द्द्याने प्रतिवाद करावा असे आपले वरील वाक्य वाचून अंमळ आश्चर्य वाटले. मला भाजपकडून पैसे मिळतात अशा अर्थाचे आरोप तुम्हीच माझ्यावर दोन वेळा केले आहेत. पहिल्या आरोपाला मी काहीच उत्तर न देता फक्त "अवघड आहे" एवढाच प्रतिसाद दिल्यानंतर, "सॉरी. गंमत केली." अशा अर्थाचे लिहून तुम्ही तो विषय संपविला होता. या धाग्यात पुन्हा एकदा तोच आरोप आहे. मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करण्याचे हे उदाहरण समजावे का? याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. वरील उदाहरणात आपण पातळी सोडली नाही का? याच मोगाने आपल्या एका पूर्वातरात स्वतःच एक धागा काढून आपली बायको अनेक वर्षे आपल्याला सोडून माहेरी रहात होती असे लिहिले होते. आपले सासूसासरे, मेव्ह्णे, मेव्हणी यांच्याविषयी त्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती. "आपले स्वतःचे स्पर्म संपले म्हणून सासरा मला पोरं काढायला सांगतोय" अशा अर्थाची वाक्ये त्यात होती. इतका गलिच्छ धागा संपादकांनी लगेच उडवून टाकला होता. याच मोगाने आपल्या असंख्य अवतारांपैकी अनेक अवतारांमध्ये मोदी व त्यांची बायको, वाजपेयींचे ब्रह्मचर्य यावर अत्यंत असभ्य प्रतिसाद दिले आहेत. "मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो," असे आपण आज तावातावाने सांगत आहात. परंतु मोगाचे मागील असंख्य असभ्य प्रतिसाद आपण सोयिस्कररित्या विसरलेला दिसता. आता नीलकांतभाऊंना सांगून आपण आपला आयडी सरेंडर करणार का? मी मोगाच्या जवळपास सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. अगदी क्वचितच त्याच्या प्रतिसादाला मला उत्तर द्यावे लागते. मी मोगावर जी काँमेट केली ती नक्की कोणत्या धाग्यात केली हे आता आठवत नाही. परंतु त्या काँमेंटमागे काहीतरी असभ्य संदर्भ होता व तो कोणता होता ते आठवत नाही. मोगाच्या १०% प्रतिसादांवर विचार करणे म्हणजे तुमच्या लेखी नीरक्षीरविवेक असेल. तुम्हाला त्याच्या १०% प्रतिसादांचे कौतुक असेल, पण मोगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा माझ्या लेखी नीरक्षीरविवेक आहे. असो. असभ्य, वैयक्तिक प्रतिसादांचं म्हणाल तर माझ्याबाबतीत अनेकांनी, अनेकवेळा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत (तुमच्यासहीत). एका ऋषीतुल्य सदस्याने लागोपाठ १०-१२ प्रतिसादात माझा "खोटारडे" असा उल्लेख करून मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे शोध लावले होते. एका उंदीरमामांनी तर मी ऑफिसमधील नेट फुकट वापरतो व मिपावर मी लिहिलेल्या प्रत्येक प्रतिसादाला, प्रतिसादातील प्रत्येक परिच्छेदाला, परिच्छेदातील प्रत्येक वाक्याला व वाक्यातील प्रत्येक शब्दाला मला भाजपकडून पैसे मिळतात असे बिनदिक्क्त ठोकून दिले होते. ऑफिसमधील नेट फुकट वापरून मी भाजपची भलामण करून पैसे कमावतो असा त्यांचा शोध होता. मी कोण आहे, मी काय करतो इ. ची कणभरदेखील माहिती नसताना बिनदिक्कतपणे असा शोध लावणे कौतुकास्पद होते. अजून एका भटजीबुवांनी तर अनेक प्रतिसादातून माझा एकेरी उल्लेख करून माझी भ्याड, कपटी, पाताळयंत्री, खोटारडा, टनाटनी असे शब्द वापरून माझी संभावना केली होती. एका अभ्यासू समजल्या जाणार्‍या सदस्याने एका प्रतिसादात "मला भरपूर रिकामा वेळ असतो, म्हणून मी वेगवेगळ्या लिंका देतो" असा शोध लावला होता. एनीवे, सवयीने मी अशा वैयक्तिक हल्ल्यांना फार गांभिर्याने न घेता त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला नाही मोदकभाऊला होता, तरी तुमचा उल्लेख असल्यामुळे तुम्ही बोललात हे रास्तच आहे. याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा, मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वरील तीनचार प्रतिसाद अतिशय अवांतर आणि विषयाला सोडून/वैयक्तिक आहेत असं वाटत नाहीये का? संदिपजी, सोन्याबापू, श्रीगुरुजी, मोदकभाऊ घ्या सांभाळून झालं!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे
तुमची दानत, तुमचा दम तुम्हालाच लखलाभ होवो. मला तुमची दानत, दम दाखविण्याची गरज नाही.
दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय
म्हणजे तुम्हाला भ्रम झालेला नसून तुमची माझ्याबद्दल खात्री झालेली दिसतेय. माझ्याबद्दल कणभरही माहिती नसताना आपले भ्रम हेच अंतिम सत्य आहे अशा समजूत करून घेण्यात व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यात नक्कीच "दम" असावा लागतो.
तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा,
तुम्ही राहिलात किंवा गेलात मला शष्प फरक पडत नाही. तुम्ही असल्याचे आनंद किंवा दु:ख मला नसल्याने तुम्ही गेल्याने मला दु:ख किंवा आनंद होण्याची सुतराम शक्यता नाही. मी नीलकांतभाऊंना सांगून आयडी सरेंडर करेन हे तुमचेच शब्द होते.
मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. आपण एकदा तोल जाऊन बोललो असे काहीतरी स्वतःचे समर्थन करताय. दुसर्‍या एकाने लिहिलेल्या "संडास" या शब्दाचा संबंध तुम्ही संदीप डांगेंशी जोडून राग व्यक्त केला तो कशासाठी? तो आयडी काही तुमच्याबद्दल बोलत नव्हता. आणि आपण स्वतःच चंपाबाई या आयडीचा "चंपी" असा एकेरी उल्लेख केला होता याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. माझ्याविरूद्ध एकदा सोडून दोन वेळा वैयक्तिक कामेंट केलीत. काही दिवसांपूर्वीच अजून एका सदस्याला आपण धमकीवजा इशारा दिलेला आहे. तुमचा तोल गेल्याची बघताबघता ४ उदाहरणे सापडली. थोडी खोदाखोद केली अजून बरीच उदाहरणे निघतील. आणि याला तुम्ही फक्त एकदा तोल जाऊन बोललो असे म्हणून समर्थन करता! बाकी कायद्याचं म्हणाल तर तुम्ही ज्या कायद्याने मोगाला किंवा मला किंवा इतरांना झोडपता तोच कायदा मी वापरतो असे म्हणता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा, उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा,
तसं असेल तर तुम्ही "संडास" हा शब्द तुमच्या संदर्भात उच्चारलेला नसताना सुद्धा कोणीतरी दुसर्‍या कोणाच्यातरी संदर्भात उच्चारलेला आहे अशी समजूत करून का बरे आक्षेप नोंदविला? वरील "सभ्य नियमानुसार" ज्या कोणाच्या संदर्भात हा शब्द लिहिला गेला असेल त्यानेच आक्षेप घ्यावा. इतरांनी त्यावर आक्षेप घ्यायचे या "सभ्य नियमा"विरूद्ध आहे.
उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.
त्याचा आणि माझा धर्म एकच आहे. मग त्याच्या धर्मावर काय तोंडसुख घेणार? असो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक विचारू का..? कोणत्या गोष्टीला / व्यक्तीला किती महत्व द्यायचे ते प्रत्येकजण ठरवत असतो, "७ लोककल्याण मार्ग" किंवा "वर्षा" ला किती सिक्यूरिटी द्यायची आणि एखाद्या बँकेच्या ATM ला किती द्यायची याचे पोलीसांचे आखाडे ठरलेले असतात. नीरक्षीरविवेक किंवा समानता म्हणून प्रत्येक ठिकाणची सिक्यूरिटी समानच असली पाहिजे हा आग्रह अवास्तव वाटतो. त्याच प्रमाणे, मी (किंवा अन्य कोणीही) सोन्याबापूंचे प्रतिसाद जितक्या गंभीरपणे घेतो* तितकेच सर्वांचे प्रतिसाद गंभीरपणे घ्यावेत किंवा "९०% फालतु प्रतिसाद असतात पण १०% चांगले असतात म्हणून ते गंभीरपणे घ्यावेत" वगैरे युक्तीवाद कितीही तर्कशुद्ध असतील तरी कुणाला किती महत्व द्यायचे याचेही प्रत्येकाचे आखाडे ठरलेले असतातच आणि ते ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले पाहिजेच. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेला नीरक्षीरविवेक, खुद्द तुम्ही किंवा फारतर तुम्ही कमावलेल्या आदरामुळे थोड्या प्रमाणात तुमचे मित्रवर्य (तेही लॉजीकल लिहिल्यास.!!) यांपर्यंत विस्तारू शकतो. त्यापुढे तो विस्तारावा ही तुमची अपेक्षा त्या त्या व्यक्तीने (स्वतः) कमावलेल्या मुल्यावर अवलंबून असणार नाही का..? नीरक्षीरविवेक सगळीकडे सारखा असलाच पाहिजे ही रामशास्त्री भूमीका कितीही बरोबर असली तरी आतंर्जालाच्या फॉरमॅटमध्ये किती प्रमाणात अंमलात आणता येईल..? (* याचे कारण तुमच्याकडून लॉजीकल उतरे येतात तसेच येथे तुमच्याशी चर्चा करण्याचे कारणही हेच आहे.)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी कोणाच्या तरी नावावरून विनोद केल्यावर मला बॅन करण्यात आलं होतं. आणि इथे तुम्ही आक्षेप घेतलेला प्रतिसाद जसाच्या तसा आहे, आयडीही बॅन झालेला नाही. तरीही तुम्ही All men are equal and some are more equal असं म्हणताय? कोण more equal आहे ते उघड दिसतंय इथे, तरीही? रच्याकने डांगे अण्णांनी श्रीगुरुजींना वैयक्तिक प्रतिसाद दिल्यावर तुम्हीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो तुमचा हक्क जर इतरांनी मान्य केलाय, तर सुज्ञ यांच्या प्रतिसादावर बाकीच्यांचा प्रतिसाद न देण्याचा हक्क तुम्ही अमान्य करत कामा नये. माझ्याबद्दल बोलायचं तर एकदा तुम्हालाच मी सरळसरळ म्हणालो होतो (मुविंनी चंपाबाईंच्या विरोधात काढलेल्या धाग्यावर) की मी biased आहे आणि हे मी उघडपणे मान्य करतो. बाकी तुम्ही माझ्या चुका दाखवून दिल्यावर मान्य केल्या नसतील तर बोला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय हे वाक्य लिहिले नसते तर असा श्लेष झाला आहे हे तुलनेने कमी लोकांना लक्षात आले असते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पहिली गोष्ट जो प्रतिसाद वाचला जातो तिथेच फक्त प्रतिवाद केला जातो. मिपावरचे १००% प्रतिसाद मी वाचत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिसादाला प्रतिवाद करणे अर्थात जमत नाही. त्यामुळे माझ्या नीरक्षीर विवेकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. आपलाही नीरेक्षीर विवेक अनेक प्रकरणांमध्ये दिसला नाही. मी काही प्रत्येक वेळेस आक्षेप घेतलेला नाही. जिथे तुम्हाला दाखवुन दिले तिथे देखील तुम्ही वैचारिक मतभेदांच्या नावाखाली वेगळी भूमिका घेतली होती. दुसरी गोष्ट आपल्या मित्राची चूक झाली आहे आणि ते तसे स्पष्टपणे दाखवुन दिले आहे. त्याची चूक झाल्याबद्दल तुम्ही त्याला समज दिलीत का? कदाचित व्यनिवरुन दिली असेल. इथे दिसत नाही. इतरांवर कंपुबाजीचे आरोप करताना आपण उघड उघड कंपुबाजी करता आहात हे स्पष्टपणे नमूद करतो. इतःपर राग मानुन घेउ नये. तिसरी गोष्ट संडास म्हणजे संदीप डांगे हे उमजलेच नाही प्रतिसाद वाचल्यावर द्देखील. पुढचे प्रतिसाद वाचुन तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले. पण प्रतिसाद कर्त्याने ते त्या अर्थाने वापरल्याचे दिसत नाही. "संडास ने मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्ह्टले" असे काही लिहिल्याचे दिसत नाही. संडास झाली आहे म्हणजे घाण केली आहे या अर्थाने वापरलेला हा शब्द दिसतो. इथे संडास हा शब्द थोडा ग्राम्य नक्की वाटतो. पण तो व्य्कतिविषयक टिप्पणी म्हणुन येत नाही असे सकृतदर्शनी प्रतीत होते. त्यामुळे मी प्रतिस्स्साद वाचला असता तरी अशी काही टिप्पणी केली नसती. इतःप्पर जर ही टीप्पणी त्याच अनुषंगाने असेल तर मी स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो. चौथी गोष्ट म्हणजे डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटले म्हणुन हा संदर्भ लावला गेला आहे असे तुम्ही म्हणत असाल तर मुळात डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले देखील मला कुठे दिसले नाही. नाहितर मी नक्कीच त्या प्रतिसादावरही स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त केला असता. जर ते तसे म्हणाले असतील तर मी इथेच स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो आणि प्रतिसादाची पातळी खालावण्यास ते देखील जबाबदार आहेत असे नमूद करु इच्छितो ( जर श्री सूज्ञ यांनी मुळात संदीप डांगे यांचा संडास असा उल्लेख केला असेल). पाचवी गोष्ट "इथे भाजपाचे दलाल नकोत "असे म्हणुन मग डांगे वरती "मी श्री गुरुजींना दलाल म्हणालो" हे आधी सिद्ध करा अश्या अर्थाची मखलाशी करतात. या पर्श्वभूमीवर सोज्ञ यांच्या संडास शब्दाचा आणी संदीप डांगे यांचा फारच लांबचा संबंध आहे. त्यांनी तर तो प्रतिसाद डांगे यांना उद्देशून लिहिलेला देखील दिसत नाही (अर्थात वरती म्हटल्याप्रमाणे डांगे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून "हरामखोर "हा आक्षेपार्ह शब्द वापरला असेल तर ओढुन ताणुन संबंध लावता येइल). असे असताना त्यांनी असे म्हटले असेल असे गॄहीत धरुन सूज्ञ यांचा निषेध करणे म्हणजे पराचा कावळा करणे होइल. सहावी गोष्ट पुर्वी मिपावर तुम्हाला कोण काय म्हणाले होते हे अर्थात माझ्या लक्षात रहायचे कारणच नाही, कारण बहुसंख्य मिपाकर एक सैनिक म्हणुन आपला आदर करतात. मी देखील त्याला अपवाद नाही. या आधी बरेचदा खरडवहीत आणी धाग्यांवर जाहीरपणे मी तसे बोलुन दाखवले आहे. त्यामुळे कुठल्या डू आयडी ने तुमच्याबद्दल कुठे काय घाण केली आहे हे माझ्या लक्षात असण्याचे कारण नाही. खासकरुन तो आयडी आधीच बॅन झाला असेल तर ते प्रतिसाद देखील बहुधा आधीच उडले असतील (जर बॅन त्या अनुषंगाने असेल तर) त्यामुळे ते प्रतिसाद मी वाचले असण्याची शक्यता नाही. वाचले असतील तरी त्याच्याशी सहमती दर्शवली असण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे कुठल्या डु आयडीने तुम्हाला कधीतरी त्रास दिला त्याचा संदर्भ इथे लावण्याची काहीच गरज नाही. (आपण त्या प्रतिसादात केवळ बोकाभाउंचा उल्लेख केलेला दिसतो पण मूळ प्रतिसादत माझा उल्लेख आहे त्यामुळे त्या अनुषंगाने हे सर्व चालले असल्याने हे सगळे लिहितो आहे). तस्मात तुमचे वैयक्तिक स्कोर सेटलिंग करताना माझ्यावर आगपाखड करण्याची गरज कळली नाही. शिवाय एखाद्या डु आयडीच्या विक्षिप्तपणावर मिपाचे नियम ठरत नसतात. तसे असले असते तर मोगाखानच्या शेकडो आयडींच्या मर्ज्जीनुसार हे संस्थळ चालले नसते? थोडक्यात वड्याचे तेल वांग्यावर ओतु नये. इथे लोक आपले कामधंदे सांभाळुन मौजमजेसाठी येतात. संदीप डांगे अथवा सोन्याबापुंचे प्रतिस्साद किंवा त्यांचा उल्लेख किंवा ओढुन ताणून आणलेला संदर्भ दिसला रे दिसला की प्रतिसाद द्यायचाच या इर्ष्येने इथे यायला मलातरी वेळ नाही.

In reply to by सुज्ञ

वरील प्रतिसादातील लिंकमधून ---
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हरामखोर आहेत, लोकशाहीचे हत्यारे आणि दलाल (इंग्रजीतील pimp ह्या अर्थाने) आहेत तसेच 'या विशिष्ट बाबतीत' भाजपची बाजू सांभाळू पाहणारे भाजपप्रेमीही कोणत्याही प्रकारे त्या दोघांपेक्षा तसूभर कमी आहेत हे जाणवत नाहीये!
एकंदरीत "दलाल" हा शब्द यांचा खूप लाडका दिसतो. परंतु हरामखोर व दलाल हे शब्द वापरण्याचे प्रयोजन समजले नाही कारण या सभ्य नियमानुसार जर आपल्याला कोणी हरामखोर व दलाल म्हटले असेल तरच आपण त्या व्यक्तीला हरामखोर व दलाल म्हणून परतफेड करायची असते. परंतु राज व फडणविस यांनी इथे कोणाला हरामखोर किंवा दलाल म्हटल्याचे पाहण्यात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी आहे. भाजपाचा एवढा पराकोटीचा द्वेष खरंच उबग आणणारा आहे. पण काय करणार? मिपावर काही लोकांना इम्युनिटी दिसते आहे. चालायचेच. पण ही असली भाषा फडणवीसांबद्दल वापरणे किळसवाणे आहे. अर्थात सदर सदस्याच्या समर्थकांना यात काही आक्षेप वाटेलसे दिसत नाही. "काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे महत्वाचे आहे असे दिसते "असे इतरांना बोलुन लब्धप्रतिष्ठित सदस्य स्वतःच अशी वागणुक करताना दिसतात. असो. असोच...

मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.

पैसाताई,
महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.
म्हणे विश्वास दाखवा! काहीही हं पैसाताई! विश्वास कोण आणि कोणावर दाखवणार? महिला पोलिसांची अब्रू मुंबईत दिवसाढवळ्या लुटली जात होती तेव्हा कोण पोलिसांच्या बाजूने उभं राहिलं होतं? राज ठाकरे की आजून कोणी? कोणाच्यात हिम्मत होती? पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याची नुसती बातमी पण छापायची नाही. कुठे गेलं होतं अभिव्यक्तीस्वातंत्र्य? दंगलींच्या नंतर साधा मोर्चा काढायला परवानगी नाकारली गेली. मग पोलिसांना आधार कोणी द्यायचा? राज ठाकरे म्हणाले मी नाही ऐकत. मी मोर्चा काढणारच. तसा तो काढला. चव्हाण सरकारला झक मारंत परवानगी द्यावी लागली. न देऊन चालतंय का! आज राज ठाकऱ्यांच्या नावाने घटनाबाह्य म्हणून शिमगा केला जातो. मग २०१२ च्या दंगली काय घटनात्मक होत्या का? उगीच काहीतरी पोकळ बुडबुडे सोडायचे. काय तर म्हणे तर खंडणी! अरे, हाड! इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत आणि विचारवंतांना शाब्दिक कसरती सुचताहेत. सुदैवाने फडणविसांना या परिस्थितीची जाण आहे. म्हणून बैठक बोलावली. हे जर मिपावरील विचारवंतांना कळंत नसेल तर त्यांनी आपापल्या अकला चुलीत घालून पाहाव्या. देवजाणे कदाचित उपयोग होईलही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पैसाताई, वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशून दिला असला तरी कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. धन्यवाद. आ.न., -गा.पै.

इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत
कोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?

In reply to by भक्त प्रल्हाद

हे म्हणजे पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत म्हणून त्यांची दहशत सहन करून त्यांच्याशी बोलणी करा याच धर्तीवर बोलणे झाले. अजून दुसरी उपमा देते. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्‍याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या कायद्यानुसार त्यांना चर्चेस बोलावले असे विचारणाऱ्यांसाठी . १. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय पार्टीशी , नेत्याशी , फिल्मस्टार्स शी काही वाद असल्यास चर्चा करू नये असा कोणता कायदा नियम आहे २. असा कायदा असल्यास त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ? ३. मुख्यमंत्र्यांनी सिनेमात दंगा करणाऱ्यास संरक्षण देणार नाही असे कधी म्हटले आहे का ? ४. चर्चा करून होणारे संभाव्य वाद मिटवले याला मांडवली म्हणतात ? ५. पाच कोटी द्या वगैरे ठाकर्यांचा स्वतःचा प्रश्न आहे आणि ते चुकीचेच आहे ( अर्थात त्यांच्या खळ्ळ खत्याक संस्कृती ला ते धरून आहे ) . मुख्यमंत्र्यांनी त्यास कधी समर्थन दिले ? ६. आपण सर्व गोष्टीकडे मांडवली ,वसुली ,खंडणी वगैरे सोडून सारासार विचार करायला कधी शिकणार ?

In reply to by सुज्ञ

२. असा कायदा असल्यास* त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ? *नसल्यास असे वाचावे

In reply to by सुज्ञ

तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते...

माझे काही प्रश्न: 1. दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर? आधी याचे उत्तर मिळू देत, बाकी प्रश्न नंतर...

In reply to by संदीप डांगे

दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर? हे बेकायदेशीरच आहे. दंगे करणाऱ्यांविरुद्ध पोलीस बळ वापरणार नाही असे कोणीही कुठेही म्हटले नाही. पण उगाच दंगे घडू नयेत ( कोणी बेकायदेशीर कृत्य करू नये ) यासाठी उपाययोजना केली राज ठाकरे यांच्या पक्षाच्या संस्कृती अथवा विचारांशी इथे कोणीही सहमत नाही. साध्य प्रश्नाचे चर्चा करून मार्ग मिळाला .आता त्यात राज ठाकर्यांना थोडे राजकीय महत्व मिळाले पण नंतर ५ कोटी वगैरे नाटक करून ते त्यांनी घालवले.

In reply to by संदीप डांगे

२. अशी धमकी देणाऱ्याबद्दल भारतीय कायद्याने काय करावे असे सुचवले आहे? ज्याला धमकी मिळाली तो कोर्टात जाऊ शकतो . तो कोर्टात का गेला नाही हे तुम्ही त्यांना विचारा. पोलीस संरक्षण त्यांना दिलेले होते व ते असणार

In reply to by सुज्ञ

धमकी राज्यशासनाला आहे, कारण ते होऊ न देणे, झाल्यास निस्तरने, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे सरकारचे काम, धमक्यांना भिणे नव्हे!

In reply to by संदीप डांगे

धमकी चित्रपट theaters ना होती. त्यांना राज्य सरकार संरक्षण देणार होतेच. घाबरण्याचा प्रश्नच नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती होती ना? पण त्यासाठी पोलिसदल, फारच झालं तर सैन्य आहे की! आणि बघा तुम्ही म्हणता प्रतिवाद करा... श्या! आपलीच विधानं बाईजवर एकामागे एक लिहा आणि लॉजिक शोधा

In reply to by संदीप डांगे

ती भीति नसते हो. नुकसान, अशांतता इ. टाळण्यासाठी सरकारला प्रयत्न करावेच लागतात. पोलिस किंवा सैन्य हा अंतिम उपाय असतो. त्याआधी बोलणी, जमावबंदी, धरपकड, लाठीमार, अश्रूधूर आणि सर्वात शेवटी गोळीबार असा क्रम असतो. एकदम शेवटचे पाउल कधीही उचलले जात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शिक्षक मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा नेमकं कोणतं पाऊल कोणत्या क्रमवारीने होतं ते बघायला लागेल!

In reply to by संदीप डांगे

खरंच बघा! सुरळीत चालू असलेल्या मोर्चात अचानक गोंधळ/हिंसा (जी सरकारच्या मते शिक्षकांनी नव्हे तर भाडोत्री गुंडानी केली) झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. इथे आधीच हिंसात्मक आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे चर्चेचाच मार्ग पहिला असणं स्वाभाविक आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि इथेही आधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडून दंडुकाप्रसाद द्यायला हवा होता म्हणजे मग सरकार निर्भीड आहे असं सिद्ध झालं असतं?

In reply to by श्रीगुरुजी

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!

In reply to by संदीप डांगे

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!
बलाचा प्रयोग करण्याआधी वाटाघाटी, चर्चा इ. च्या माध्यमातून वादावर तोडगा काढणे हे लोकशाहीचा मुडदा पाडणे नसून लोकशाहीला धरूनच आहे. त्याबद्दल खंत वाटण्याचे कारणच नाही. उलट शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी.

In reply to by श्रीगुरुजी

शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी. ^^^ केंद्रात आणि राज्यात भाजप आहेच, पाकी कलाकारांवर बंदी घालू शकतात, कोणालाच कोणती खंत राहणार नाही की कोलांट्या उड्या मारायची गरजही! तुमचे विधान तर असे आहे की अजूनही भाजप दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे ह्यावर तुमचाच विश्वास बसलेला नाहीये, लोल!

In reply to by संदीप डांगे

बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा येईलच. पण मग बंदी नाही म्हणून आम्ही घेत बसणार म्हणजे तुमच्या घराला कुलुप नाही म्हणूण आम्ही चोरी करणार आणि चोरी होऊन द्यायची नसेल तर कुलुप लावा असे चोरीचे समर्थन केल्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीची सक्तीच करावी लागली तर आम्ही काय खायचे, काय ल्यायचे हे सरकार ठरविणार या टीकेप्रमाणे आम्ही चित्रपटात कोणाला घ्यायचे, कोणती भूमिका द्यायची हेसुद्धा सरकारच ठरवायला लागले अशी टीका सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

=)) =)) आताही कोणी काय बघायचे हे कोणीतरी दुसरंच ठरवत आहे !!! जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!

In reply to by संदीप डांगे

जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!
हा युक्तीवाद वरवर पाहता लॉजिकल वाटू शकेल, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीत असे करता येईलच असे नाही. पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अ‍ॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल. जो देश भारताचा शत्रू आहे, ज्या देशातील नागरिक भारताचे शत्रु आहेत, जो देश सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करून इथल्या नागरिकांचे प्राण घेऊन, इथली मालमत्ता उद्ध्वस्त करून भारत नष्ट करण्याचा अथक प्रयत्न करीत आहे अशा देशातील नागरिकांना इथे येण्यास अधिकृत बंदी नसल्याने इथे बोलावून त्यांचे खिसे भरणे याला विरोध करणे योग्यच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सेन्सॉर आहे! पण तो मुद्दा नाहीये! देशभक्ती दाखवायची जबरदस्ती किंवा देशभक्ती दिसणार नाही याची भीती किंवा हे दोन्ही... ;)

In reply to by श्रीगुरुजी

पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अ‍ॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल.
भारीचं आयडिया कि एकदम. मोठ्या पडद्यावर निळे चित्रपट लागलेच्च पाहिजेत असा कुणी तरी युक्तिवाद (यशस्वी) केला पाहिजे खरा.

In reply to by संदीप डांगे

ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस लोकशाहीला सन्मानाने पालखीत घेऊन मिरवलाच जातं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

क्लासच!!!!!! बहुतेक वेळा मिरवले गेले नाही म्हणून आम्हीही मिरवणार नाही असं म्हणणं आहे का प्रसाद भाऊ??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अजिबात नाही बापु! जरूर नाचावं कि पण सोयीस्करपणे नाही! उगाच पराचा कावळा करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा वगैरे जरा जास्त वाटतं!

In reply to by श्रीगुरुजी

ती मोठी अचिव्हमेंट असल्यासारखे सैन्याला चार पैशे मिळाले तर बरे अशी आधी कशाला झैरात करत होते? सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी का सांगितले नाही की आपला खंडणीला विरोध आहे? (आता पर्रीकर बोलल्यामुळे हा शब्द मी अधिकृतरित्या वापरत आहे.) ते समजले मारे तडजोड घडवून आणली म्हणून आपले कौतुक होईल. आता चारी बाजूनी फटके बसले, पर्रीकारांनी तर मस्त पूजा केली असणार खाजगीत. आता तो मी नव्हेच का!

In reply to by श्रीगुरुजी

http://www.misalpav.com/comment/892286#comment-892286 http://www.misalpav.com/comment/892316#comment-892316 http://www.misalpav.com/comment/892293#comment-892293 हे सगळे तुमचेच प्रतिसाद एकदा नीट वाचून बघा बघू! त्यात मुख्यमंत्र्यानी सगळा तोडगा काढला असे तुम्ही म्हणालात ना!