Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नाखु on Mon, 10/24/2016 - 10:26
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?
  • Log in or register to post comments
  • 65050 views

प्रतिक्रिया

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/26/2016 - 15:33

In reply to होय, चूक केली तरी ती कबुल by श्रीगुरुजी

Permalink

म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक

म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा, उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/26/2016 - 23:23

In reply to म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

परत कैच्याकै interpretation!

परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा,
तसं असेल तर तुम्ही "संडास" हा शब्द तुमच्या संदर्भात उच्चारलेला नसताना सुद्धा कोणीतरी दुसर्‍या कोणाच्यातरी संदर्भात उच्चारलेला आहे अशी समजूत करून का बरे आक्षेप नोंदविला? वरील "सभ्य नियमानुसार" ज्या कोणाच्या संदर्भात हा शब्द लिहिला गेला असेल त्यानेच आक्षेप घ्यावा. इतरांनी त्यावर आक्षेप घ्यायचे या "सभ्य नियमा"विरूद्ध आहे.
उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.
त्याचा आणि माझा धर्म एकच आहे. मग त्याच्या धर्मावर काय तोंडसुख घेणार? असो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 10/26/2016 - 14:05

In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक

बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक विचारू का..? कोणत्या गोष्टीला / व्यक्तीला किती महत्व द्यायचे ते प्रत्येकजण ठरवत असतो, "७ लोककल्याण मार्ग" किंवा "वर्षा" ला किती सिक्यूरिटी द्यायची आणि एखाद्या बँकेच्या ATM ला किती द्यायची याचे पोलीसांचे आखाडे ठरलेले असतात. नीरक्षीरविवेक किंवा समानता म्हणून प्रत्येक ठिकाणची सिक्यूरिटी समानच असली पाहिजे हा आग्रह अवास्तव वाटतो. त्याच प्रमाणे, मी (किंवा अन्य कोणीही) सोन्याबापूंचे प्रतिसाद जितक्या गंभीरपणे घेतो* तितकेच सर्वांचे प्रतिसाद गंभीरपणे घ्यावेत किंवा "९०% फालतु प्रतिसाद असतात पण १०% चांगले असतात म्हणून ते गंभीरपणे घ्यावेत" वगैरे युक्तीवाद कितीही तर्कशुद्ध असतील तरी कुणाला किती महत्व द्यायचे याचेही प्रत्येकाचे आखाडे ठरलेले असतातच आणि ते ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले पाहिजेच. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेला नीरक्षीरविवेक, खुद्द तुम्ही किंवा फारतर तुम्ही कमावलेल्या आदरामुळे थोड्या प्रमाणात तुमचे मित्रवर्य (तेही लॉजीकल लिहिल्यास.!!) यांपर्यंत विस्तारू शकतो. त्यापुढे तो विस्तारावा ही तुमची अपेक्षा त्या त्या व्यक्तीने (स्वतः) कमावलेल्या मुल्यावर अवलंबून असणार नाही का..? नीरक्षीरविवेक सगळीकडे सारखा असलाच पाहिजे ही रामशास्त्री भूमीका कितीही बरोबर असली तरी आतंर्जालाच्या फॉरमॅटमध्ये किती प्रमाणात अंमलात आणता येईल..? (* याचे कारण तुमच्याकडून लॉजीकल उतरे येतात तसेच येथे तुमच्याशी चर्चा करण्याचे कारणही हेच आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 10/26/2016 - 14:09

In reply to बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक by मोदक

Permalink

(बाद्वे, आत्ताच गुरूजींचा

(बाद्वे, आत्ताच गुरूजींचा प्रतिसाद बघितला. आपण दोघे नंतर सावकाश बोलूया का..?)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 10/25/2016 - 13:56

In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापू,

मी कोणाच्या तरी नावावरून विनोद केल्यावर मला बॅन करण्यात आलं होतं. आणि इथे तुम्ही आक्षेप घेतलेला प्रतिसाद जसाच्या तसा आहे, आयडीही बॅन झालेला नाही. तरीही तुम्ही All men are equal and some are more equal असं म्हणताय? कोण more equal आहे ते उघड दिसतंय इथे, तरीही? रच्याकने डांगे अण्णांनी श्रीगुरुजींना वैयक्तिक प्रतिसाद दिल्यावर तुम्हीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो तुमचा हक्क जर इतरांनी मान्य केलाय, तर सुज्ञ यांच्या प्रतिसादावर बाकीच्यांचा प्रतिसाद न देण्याचा हक्क तुम्ही अमान्य करत कामा नये. माझ्याबद्दल बोलायचं तर एकदा तुम्हालाच मी सरळसरळ म्हणालो होतो (मुविंनी चंपाबाईंच्या विरोधात काढलेल्या धाग्यावर) की मी biased आहे आणि हे मी उघडपणे मान्य करतो. बाकी तुम्ही माझ्या चुका दाखवून दिल्यावर मान्य केल्या नसतील तर बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 10/25/2016 - 17:52

In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष

इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय हे वाक्य लिहिले नसते तर असा श्लेष झाला आहे हे तुलनेने कमी लोकांना लक्षात आले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 10/26/2016 - 17:34

In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

पहिली गोष्ट जो प्रतिसाद

पहिली गोष्ट जो प्रतिसाद वाचला जातो तिथेच फक्त प्रतिवाद केला जातो. मिपावरचे १००% प्रतिसाद मी वाचत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिसादाला प्रतिवाद करणे अर्थात जमत नाही. त्यामुळे माझ्या नीरक्षीर विवेकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. आपलाही नीरेक्षीर विवेक अनेक प्रकरणांमध्ये दिसला नाही. मी काही प्रत्येक वेळेस आक्षेप घेतलेला नाही. जिथे तुम्हाला दाखवुन दिले तिथे देखील तुम्ही वैचारिक मतभेदांच्या नावाखाली वेगळी भूमिका घेतली होती. दुसरी गोष्ट आपल्या मित्राची चूक झाली आहे आणि ते तसे स्पष्टपणे दाखवुन दिले आहे. त्याची चूक झाल्याबद्दल तुम्ही त्याला समज दिलीत का? कदाचित व्यनिवरुन दिली असेल. इथे दिसत नाही. इतरांवर कंपुबाजीचे आरोप करताना आपण उघड उघड कंपुबाजी करता आहात हे स्पष्टपणे नमूद करतो. इतःपर राग मानुन घेउ नये. तिसरी गोष्ट संडास म्हणजे संदीप डांगे हे उमजलेच नाही प्रतिसाद वाचल्यावर द्देखील. पुढचे प्रतिसाद वाचुन तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले. पण प्रतिसाद कर्त्याने ते त्या अर्थाने वापरल्याचे दिसत नाही. "संडास ने मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्ह्टले" असे काही लिहिल्याचे दिसत नाही. संडास झाली आहे म्हणजे घाण केली आहे या अर्थाने वापरलेला हा शब्द दिसतो. इथे संडास हा शब्द थोडा ग्राम्य नक्की वाटतो. पण तो व्य्कतिविषयक टिप्पणी म्हणुन येत नाही असे सकृतदर्शनी प्रतीत होते. त्यामुळे मी प्रतिस्स्साद वाचला असता तरी अशी काही टिप्पणी केली नसती. इतःप्पर जर ही टीप्पणी त्याच अनुषंगाने असेल तर मी स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो. चौथी गोष्ट म्हणजे डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटले म्हणुन हा संदर्भ लावला गेला आहे असे तुम्ही म्हणत असाल तर मुळात डांग्यांनी मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले देखील मला कुठे दिसले नाही. नाहितर मी नक्कीच त्या प्रतिसादावरही स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त केला असता. जर ते तसे म्हणाले असतील तर मी इथेच स्पष्ट शब्दात त्याचा निषेध करतो आणि प्रतिसादाची पातळी खालावण्यास ते देखील जबाबदार आहेत असे नमूद करु इच्छितो ( जर श्री सूज्ञ यांनी मुळात संदीप डांगे यांचा संडास असा उल्लेख केला असेल). पाचवी गोष्ट "इथे भाजपाचे दलाल नकोत "असे म्हणुन मग डांगे वरती "मी श्री गुरुजींना दलाल म्हणालो" हे आधी सिद्ध करा अश्या अर्थाची मखलाशी करतात. या पर्श्वभूमीवर सोज्ञ यांच्या संडास शब्दाचा आणी संदीप डांगे यांचा फारच लांबचा संबंध आहे. त्यांनी तर तो प्रतिसाद डांगे यांना उद्देशून लिहिलेला देखील दिसत नाही (अर्थात वरती म्हटल्याप्रमाणे डांगे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून "हरामखोर "हा आक्षेपार्ह शब्द वापरला असेल तर ओढुन ताणुन संबंध लावता येइल). असे असताना त्यांनी असे म्हटले असेल असे गॄहीत धरुन सूज्ञ यांचा निषेध करणे म्हणजे पराचा कावळा करणे होइल. सहावी गोष्ट पुर्वी मिपावर तुम्हाला कोण काय म्हणाले होते हे अर्थात माझ्या लक्षात रहायचे कारणच नाही, कारण बहुसंख्य मिपाकर एक सैनिक म्हणुन आपला आदर करतात. मी देखील त्याला अपवाद नाही. या आधी बरेचदा खरडवहीत आणी धाग्यांवर जाहीरपणे मी तसे बोलुन दाखवले आहे. त्यामुळे कुठल्या डू आयडी ने तुमच्याबद्दल कुठे काय घाण केली आहे हे माझ्या लक्षात असण्याचे कारण नाही. खासकरुन तो आयडी आधीच बॅन झाला असेल तर ते प्रतिसाद देखील बहुधा आधीच उडले असतील (जर बॅन त्या अनुषंगाने असेल तर) त्यामुळे ते प्रतिसाद मी वाचले असण्याची शक्यता नाही. वाचले असतील तरी त्याच्याशी सहमती दर्शवली असण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे कुठल्या डु आयडीने तुम्हाला कधीतरी त्रास दिला त्याचा संदर्भ इथे लावण्याची काहीच गरज नाही. (आपण त्या प्रतिसादात केवळ बोकाभाउंचा उल्लेख केलेला दिसतो पण मूळ प्रतिसादत माझा उल्लेख आहे त्यामुळे त्या अनुषंगाने हे सर्व चालले असल्याने हे सगळे लिहितो आहे). तस्मात तुमचे वैयक्तिक स्कोर सेटलिंग करताना माझ्यावर आगपाखड करण्याची गरज कळली नाही. शिवाय एखाद्या डु आयडीच्या विक्षिप्तपणावर मिपाचे नियम ठरत नसतात. तसे असले असते तर मोगाखानच्या शेकडो आयडींच्या मर्ज्जीनुसार हे संस्थळ चालले नसते? थोडक्यात वड्याचे तेल वांग्यावर ओतु नये. इथे लोक आपले कामधंदे सांभाळुन मौजमजेसाठी येतात. संदीप डांगे अथवा सोन्याबापुंचे प्रतिस्साद किंवा त्यांचा उल्लेख किंवा ओढुन ताणून आणलेला संदर्भ दिसला रे दिसला की प्रतिसाद द्यायचाच या इर्ष्येने इथे यायला मलातरी वेळ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on गुरुवार, 10/27/2016 - 00:05

In reply to पहिली गोष्ट जो प्रतिसाद by मृत्युन्जय

Permalink

प्रतिक्रिया

सरकार एकदा प्रतिक्रिया वाचून घ्या ..
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on गुरुवार, 10/27/2016 - 00:08

In reply to प्रतिक्रिया by सुज्ञ

Permalink

....

इथे आहे वाचा काँग्रेस ची आधी निंदा करून मग आडून शिरसंधान :) खो खो खो
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 10/27/2016 - 14:47

In reply to .... by सुज्ञ

Permalink

वरील प्रतिसादातील लिंकमधून --

वरील प्रतिसादातील लिंकमधून ---
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हरामखोर आहेत, लोकशाहीचे हत्यारे आणि दलाल (इंग्रजीतील pimp ह्या अर्थाने) आहेत तसेच 'या विशिष्ट बाबतीत' भाजपची बाजू सांभाळू पाहणारे भाजपप्रेमीही कोणत्याही प्रकारे त्या दोघांपेक्षा तसूभर कमी आहेत हे जाणवत नाहीये!
एकंदरीत "दलाल" हा शब्द यांचा खूप लाडका दिसतो. परंतु हरामखोर व दलाल हे शब्द वापरण्याचे प्रयोजन समजले नाही कारण या सभ्य नियमानुसार जर आपल्याला कोणी हरामखोर व दलाल म्हटले असेल तरच आपण त्या व्यक्तीला हरामखोर व दलाल म्हणून परतफेड करायची असते. परंतु राज व फडणविस यांनी इथे कोणाला हरामखोर किंवा दलाल म्हटल्याचे पाहण्यात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 10/27/2016 - 20:05

In reply to वरील प्रतिसादातील लिंकमधून -- by श्रीगुरुजी

Permalink

अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी

अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी आहे. भाजपाचा एवढा पराकोटीचा द्वेष खरंच उबग आणणारा आहे. पण काय करणार? मिपावर काही लोकांना इम्युनिटी दिसते आहे. चालायचेच. पण ही असली भाषा फडणवीसांबद्दल वापरणे किळसवाणे आहे. अर्थात सदर सदस्याच्या समर्थकांना यात काही आक्षेप वाटेलसे दिसत नाही. "काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे हे महत्वाचे आहे असे दिसते "असे इतरांना बोलुन लब्धप्रतिष्ठित सदस्य स्वतःच अशी वागणुक करताना दिसतात. असो. असोच...
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 11:54

Permalink

..

प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 12:11

Permalink

बापूराव

मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 10/25/2016 - 12:42

Permalink

म्हणे विश्वास दाखवा

पैसाताई,
महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.
म्हणे विश्वास दाखवा! काहीही हं पैसाताई! विश्वास कोण आणि कोणावर दाखवणार? महिला पोलिसांची अब्रू मुंबईत दिवसाढवळ्या लुटली जात होती तेव्हा कोण पोलिसांच्या बाजूने उभं राहिलं होतं? राज ठाकरे की आजून कोणी? कोणाच्यात हिम्मत होती? पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याची नुसती बातमी पण छापायची नाही. कुठे गेलं होतं अभिव्यक्तीस्वातंत्र्य? दंगलींच्या नंतर साधा मोर्चा काढायला परवानगी नाकारली गेली. मग पोलिसांना आधार कोणी द्यायचा? राज ठाकरे म्हणाले मी नाही ऐकत. मी मोर्चा काढणारच. तसा तो काढला. चव्हाण सरकारला झक मारंत परवानगी द्यावी लागली. न देऊन चालतंय का! आज राज ठाकऱ्यांच्या नावाने घटनाबाह्य म्हणून शिमगा केला जातो. मग २०१२ च्या दंगली काय घटनात्मक होत्या का? उगीच काहीतरी पोकळ बुडबुडे सोडायचे. काय तर म्हणे तर खंडणी! अरे, हाड! इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत आणि विचारवंतांना शाब्दिक कसरती सुचताहेत. सुदैवाने फडणविसांना या परिस्थितीची जाण आहे. म्हणून बैठक बोलावली. हे जर मिपावरील विचारवंतांना कळंत नसेल तर त्यांनी आपापल्या अकला चुलीत घालून पाहाव्या. देवजाणे कदाचित उपयोग होईलही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 10/25/2016 - 12:46

In reply to म्हणे विश्वास दाखवा by गामा पैलवान

Permalink

कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये.

पैसाताई, वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशून दिला असला तरी कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 10/25/2016 - 12:48

In reply to कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. by गामा पैलवान

Permalink

गेऊ च्या जागी घेऊ म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

‌
  • Log in or register to post comments

Submitted by भक्त प्रल्हाद on Tue, 10/25/2016 - 12:57

Permalink

इथे पोलिसांचे जीव धोक्यात

इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत
कोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/25/2016 - 13:37

In reply to इथे पोलिसांचे जीव धोक्यात by भक्त प्रल्हाद

Permalink

हौ ना!

हे म्हणजे पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत म्हणून त्यांची दहशत सहन करून त्यांच्याशी बोलणी करा याच धर्तीवर बोलणे झाले. अजून दुसरी उपमा देते. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्‍याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 16:49

In reply to हौ ना! by पैसा

Permalink

दुसऱ्या उपमेबद्दल माझे

दुसऱ्या उपमेबद्दल माझे टंकनश्रमवाचवले त्याबद्दल धन्स. अगदी हेच म्हणणार होतो,
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 10/25/2016 - 14:11

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/25/2016 - 14:40

In reply to (No subject) by अनुप ढेरे

Permalink

बॉडी प्रपोर्शन चुकलेय.

बॉडी प्रपोर्शन चुकलेय. तोंड मोठे झालेय शरीरापेक्षा. (तसे आहेच म्हणा वाच्यार्थाने)
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 14:57

Permalink

सांगा पाहू पट पट..

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या कायद्यानुसार त्यांना चर्चेस बोलावले असे विचारणाऱ्यांसाठी . १. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही राजकीय पार्टीशी , नेत्याशी , फिल्मस्टार्स शी काही वाद असल्यास चर्चा करू नये असा कोणता कायदा नियम आहे २. असा कायदा असल्यास त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ? ३. मुख्यमंत्र्यांनी सिनेमात दंगा करणाऱ्यास संरक्षण देणार नाही असे कधी म्हटले आहे का ? ४. चर्चा करून होणारे संभाव्य वाद मिटवले याला मांडवली म्हणतात ? ५. पाच कोटी द्या वगैरे ठाकर्यांचा स्वतःचा प्रश्न आहे आणि ते चुकीचेच आहे ( अर्थात त्यांच्या खळ्ळ खत्याक संस्कृती ला ते धरून आहे ) . मुख्यमंत्र्यांनी त्यास कधी समर्थन दिले ? ६. आपण सर्व गोष्टीकडे मांडवली ,वसुली ,खंडणी वगैरे सोडून सारासार विचार करायला कधी शिकणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 10/25/2016 - 15:12

In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ

Permalink

पट पट नाही साद्यांत उत्तर

पट पट नाही साद्यांत उत्तर देतो थोडी सवड मिळाली की.
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 15:43

In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ

Permalink

*नसल्यास

२. असा कायदा असल्यास* त्यांनी केले ते नियमबाह्य कसे ? चर्चेतून मार्ग काढणे याला नियमबाह्य म्हणतात का ? *नसल्यास असे वाचावे
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Tue, 10/25/2016 - 16:37

In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ

Permalink

तुम्ही सांगा पाहू...

तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 15:13

Permalink

माझे काही प्रश्न:

माझे काही प्रश्न: 1. दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर? आधी याचे उत्तर मिळू देत, बाकी प्रश्न नंतर...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 15:29

In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे

Permalink

हे बेकायदेशीरच आहे.

हे बेकायदेशीरच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 15:35

In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे

Permalink

दन्गे

दंगा करण्याची धमकी देऊन जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कि बेकायदेशीर? हे बेकायदेशीरच आहे. दंगे करणाऱ्यांविरुद्ध पोलीस बळ वापरणार नाही असे कोणीही कुठेही म्हटले नाही. पण उगाच दंगे घडू नयेत ( कोणी बेकायदेशीर कृत्य करू नये ) यासाठी उपाययोजना केली राज ठाकरे यांच्या पक्षाच्या संस्कृती अथवा विचारांशी इथे कोणीही सहमत नाही. साध्य प्रश्नाचे चर्चा करून मार्ग मिळाला .आता त्यात राज ठाकर्यांना थोडे राजकीय महत्व मिळाले पण नंतर ५ कोटी वगैरे नाटक करून ते त्यांनी घालवले.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 15:34

Permalink

2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल

2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल भारतीय कायद्याने काय करावे असे सुचवले आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ on Tue, 10/25/2016 - 15:38

In reply to 2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल by संदीप डांगे

Permalink

धमकी

२. अशी धमकी देणाऱ्याबद्दल भारतीय कायद्याने काय करावे असे सुचवले आहे? ज्याला धमकी मिळाली तो कोर्टात जाऊ शकतो . तो कोर्टात का गेला नाही हे तुम्ही त्यांना विचारा. पोलीस संरक्षण त्यांना दिलेले होते व ते असणार
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 16:15

In reply to धमकी by सुज्ञ

Permalink

धमकी राज्यशासनाला आहे, कारण

धमकी राज्यशासनाला आहे, कारण ते होऊ न देणे, झाल्यास निस्तरने, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे सरकारचे काम, धमक्यांना भिणे नव्हे!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 17:38

In reply to धमकी राज्यशासनाला आहे, कारण by संदीप डांगे

Permalink

धमकी चित्रपट theaters ना होती

धमकी चित्रपट theaters ना होती. त्यांना राज्य सरकार संरक्षण देणार होतेच. घाबरण्याचा प्रश्नच नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 17:40

In reply to धमकी चित्रपट theaters ना होती by श्रीगुरुजी

Permalink

मग वाटाघाटी केल्यातच कशाला?

मग वाटाघाटी केल्यातच कशाला?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 17:45

In reply to मग वाटाघाटी केल्यातच कशाला? by संदीप डांगे

Permalink

तोडफोड व अशांतता टाळायला

तोडफोड व अशांतता टाळायला
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 17:49

In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी

Permalink

म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती

म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती होती ना? पण त्यासाठी पोलिसदल, फारच झालं तर सैन्य आहे की! आणि बघा तुम्ही म्हणता प्रतिवाद करा... श्या! आपलीच विधानं बाईजवर एकामागे एक लिहा आणि लॉजिक शोधा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 18:00

In reply to म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती by संदीप डांगे

Permalink

ती भीति नसते हो. नुकसान,

ती भीति नसते हो. नुकसान, अशांतता इ. टाळण्यासाठी सरकारला प्रयत्न करावेच लागतात. पोलिस किंवा सैन्य हा अंतिम उपाय असतो. त्याआधी बोलणी, जमावबंदी, धरपकड, लाठीमार, अश्रूधूर आणि सर्वात शेवटी गोळीबार असा क्रम असतो. एकदम शेवटचे पाउल कधीही उचलले जात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 18:17

In reply to ती भीति नसते हो. नुकसान, by श्रीगुरुजी

Permalink

शिक्षक मोर्चावर पोलिसांनी

शिक्षक मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा नेमकं कोणतं पाऊल कोणत्या क्रमवारीने होतं ते बघायला लागेल!
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Wed, 10/26/2016 - 10:24

In reply to शिक्षक मोर्चावर पोलिसांनी by संदीप डांगे

Permalink

खरंच बघा! सुरळीत चालू

खरंच बघा! सुरळीत चालू असलेल्या मोर्चात अचानक गोंधळ/हिंसा (जी सरकारच्या मते शिक्षकांनी नव्हे तर भाडोत्री गुंडानी केली) झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. इथे आधीच हिंसात्मक आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे चर्चेचाच मार्ग पहिला असणं स्वाभाविक आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि इथेही आधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडून दंडुकाप्रसाद द्यायला हवा होता म्हणजे मग सरकार निर्भीड आहे असं सिद्ध झालं असतं?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 10/25/2016 - 17:52

In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी

Permalink

तोडफोड तोडायची म्हणून ही

तोडफोड तोडायची म्हणून ही मांडवली? ही आपल्या फेल्युअरची कबूली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/25/2016 - 18:00

In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी

Permalink

का ब्वा?

आपल्याच पोलीस आणि न्यायसंस्थेवर अविश्वास का?
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Tue, 10/25/2016 - 16:12

Permalink

मुख्यमंत्र्यांनी चूकीचा पायंडा पाडला आहे...

उदया कुणीही पाठीराख्यांच्या बळावर राज्याला/शहराला वेठीस धरेल . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/25/2016 - 16:59

Permalink

घरचा आहेर

हा घ्या घरचा आहेर. मुख्यमंत्री कसे बरोबर सांगणार्‍यांनी आता पर्रीकरांना पण द्या शिव्या. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/army-donation-voluntary-no-catching-anyones-neck-says-manohar-parrikar/articleshow/55047386.cms
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 17:30

In reply to घरचा आहेर by पैसा

Permalink

हरीदासाची कथा मूळपदावर!

हरीदासाची कथा मूळपदावर! अनेकदा सांगितले आहे. वाटाघाटी किती कोटी द्यायचे यासाठी नव्हत्याच.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 17:49

In reply to हरीदासाची कथा मूळपदावर! by श्रीगुरुजी

Permalink

http://m.rediff.com/news

http://m.rediff.com/news/report/if-we-can-talk-to-naxals-hurriyat-why-not-with-mns-fadnavis-on-adhm-row/20161025.htm
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 17:54

In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी

Permalink

सरळ आहे, स्वार्थी राजकारण

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 18:03

In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे

Permalink

तेच तेच लिहायचा आता कंटाळा

तेच तेच लिहायचा आता कंटाळा आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/25/2016 - 18:13

In reply to तेच तेच लिहायचा आता कंटाळा by श्रीगुरुजी

Permalink

अपेक्षित प्रतिसाद!

अपेक्षित प्रतिसाद! म्हणे प्रतिवाद करा.... लोल!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 10/25/2016 - 22:55

In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे

Permalink

सरळ आहे, स्वार्थी राजकारण

सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!
बलाचा प्रयोग करण्याआधी वाटाघाटी, चर्चा इ. च्या माध्यमातून वादावर तोडगा काढणे हे लोकशाहीचा मुडदा पाडणे नसून लोकशाहीला धरूनच आहे. त्याबद्दल खंत वाटण्याचे कारणच नाही. उलट शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/26/2016 - 12:09

In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by श्रीगुरुजी

Permalink

शत्रूंना इथे बोलावून त्यांचे

शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी. ^^^ केंद्रात आणि राज्यात भाजप आहेच, पाकी कलाकारांवर बंदी घालू शकतात, कोणालाच कोणती खंत राहणार नाही की कोलांट्या उड्या मारायची गरजही! तुमचे विधान तर असे आहे की अजूनही भाजप दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे ह्यावर तुमचाच विश्वास बसलेला नाहीये, लोल!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/26/2016 - 13:16

In reply to शत्रूंना इथे बोलावून त्यांचे by संदीप डांगे

Permalink

बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा

बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा येईलच. पण मग बंदी नाही म्हणून आम्ही घेत बसणार म्हणजे तुमच्या घराला कुलुप नाही म्हणूण आम्ही चोरी करणार आणि चोरी होऊन द्यायची नसेल तर कुलुप लावा असे चोरीचे समर्थन केल्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीची सक्तीच करावी लागली तर आम्ही काय खायचे, काय ल्यायचे हे सरकार ठरविणार या टीकेप्रमाणे आम्ही चित्रपटात कोणाला घ्यायचे, कोणती भूमिका द्यायची हेसुद्धा सरकारच ठरवायला लागले अशी टीका सुरू होईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com