Skip to main content

घडामोडी

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना! 

पाभे की बात १

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

झालमुडी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 04/05/2026 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,

शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.

 

कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?

जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?

 

तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,

शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!

 

"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,

पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.

 

जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,

‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.

दुत्त,दुत्त,दुत्त......

 

कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

लेखक तुषार काळभोर यांनी बुधवार, 30/08/2017 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत.

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय?

ताज्या घडामोडी - १

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 14/07/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.