या क्षणी मी Camarón de la Islaच्या गाण्यांची तबकडी ऐकत होतो. इथे एक उदाहरण :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
स्पेनमध्ये मात्र रोमा स्थायिक झालेत. युरोपाच्या बाकी भागांत मात्र कथा वेगळी आहे. गेला शंभर-दीडशे वर्षांत देशांच्या सरहद्दी कडक झाल्यात आणि पारपत्रे आवश्यक होऊ लागली, तोवर रोमा लोक एका देशातून दुसर्या देशात ये-जा करत.
पूर्वीच्या काळापासून त्यांच्यावर "चोरीवर जगणारी जमात" आणि "पोरे पळवणारी जमात" म्हणून आळ घेतला जाई; आणि त्यांचा फार छळ झाला. नात्झी काळात त्यांचा वंशनाश करण्याचा प्रयत्न झाला.
(जमात म्हणून रोमा अनेक कुळाचार हिंदूंप्रमाणे पाळत असले, तरी बहुतेक रोमा लोक आपला धर्म ख्रिस्ती म्हणूनच सांगतात.)
आपल्या खास संगीताने (मला हे ठाऊक, कितीतरी आणखी योगदान असेल) जगाला समृद्ध केलेल्या या भटक्या जुलूम झालेल्या जमातीची माहिती दिल्याबद्दल भास्कर केन्डे यांचे आभार.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
गाण्यातले गिटार (किवा इतर कुठलेतरी तंतू वाद्य) ऐकून मला मार्को सॅल्यु आणि सुलतानखाँ यांच्या ऍस्ट्रल फिजनची आठवण झाली.
-- लिखाळ.
पारधी किंवा कारवान लोक.. यांच्या सारखीच वाटली ही रोमा.
गोव्यामध्ये जे जिप्सी किंवा हिप्पी दिसतात ते हेच का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
काय योगायोग
लेख आणि
+१
भारतात
गोव्यातले हिप्पी वेगळे