✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

न
निनाद यांनी
Mon, 09/19/2016 - 09:47  ·  लेख
लेख
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अ‍ॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी - https://www.arduino.cc/ https://en.wikipedia.org/wiki/Arduino http://playground.arduino.cc/Projects/Ideas या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम! ती माहिती संपादकांना सांगुन वर या भागात संकलित करता यावी. म्हणजे ते प्रश्न वाविप्र सारखे आपोआपच टळतील. तोवर ज्यांना अनेक छोटे प्रकल्प करायचे ज्यांनात्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. ज्यांनी प्रकल्प केले आहेत त्यांनी आपले अनुभव सांगायला प्रत्यवाय नाही. तर येऊ द्या जमेल तसे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
माहिती
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
27675 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

या शिवाय प्राथमिक कांपोनंटस

सतिश गावडे
Mon, 09/19/2016 - 10:09 नवीन
या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!
मी चार वर्षांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयरींगचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर गेल्या बारा वर्षात कुठेही या माहितीचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे.
मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच
आरडुइनो बोर्डचे प्रोजेक्ट त्याच्याशी संबंधीत फोरमवर वाचायला छान वाटतात. प्रचंड उत्साह आणि चिकाटी नसेल तर बोर्ड काही दिवसांत अडगळीत जातो. :)
  • Log in or register to post comments

वापर

निनाद
Mon, 09/19/2016 - 10:44 नवीन
त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे. शंका रास्त आहे. पण मागे एक अति लघु प्रकल्प केला होता. त्यात एक मिलिअँप करंट मिळवायचा होता. आणि त्यासाठी रझिस्टर शिवाय ट्रान्झिस्टरचा ही वापर केला होता. फक्त रझिस्टर वापरूनही काम झाले असते तेथे ट्रान्झिस्टरचा वापर का केला असावा हे मला समजले नाही. पण त्याचे कारण मला या क्षेत्राची नसलेली ओळख हे आहे. मिपावर शोधले पण काही आढळले नाही. मग असे प्रश्न विचारायला धागा असावा असे वाटले. संकलन करून ठेवले तर वाया तर नक्की जाणार नाही असे वाटते. या शिवाय ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्या त्या व्यक्तिवर अवलंबून आहे ना? तुमच्याकडे सारे ज्ञान आहे पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन नाही! पण याच वेळी कुणाला तरी एक बटाटेवडे तळून देणारे स्वस्त आणि मस्त मशिन हवे असेल. पण त्याला माहिती नसेल की हे सहज शक्य आहे. त्या मशिनचे रोबोटिक्स अ‍ॅड्रुनोचा वापर करून प्राथमिकरित्या बनवता येतील. वापरून पाहता येतील. मग प्रत्य्क्ष युनिट बनवता येईल. कल्पनाशक्तीला भरारी आणि स्टार्ट अप्स http://www.misalpav.com/node/37276 ची तांत्रिक बाजू सांभाळणे यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो ना गावडे साहेब? असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझा प्रश्न प्रामाणिक होता. :

सतिश गावडे
Mon, 09/19/2016 - 11:08 नवीन
माझा प्रश्न प्रामाणिक होता. :) तुम्ही या विषयाचा लघू उद्योगांसाठीच्या उपयोगीतेच्या दृष्टीकोनातून विचार करत असाल तर ती आनंदाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

क्षमस्व

निनाद
गुरुवार, 09/22/2016 - 03:56 नवीन
दुखावले असल्यास क्षमस्व गावडे साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही भौ :)

सतिश गावडे
गुरुवार, 09/22/2016 - 07:12 नवीन
नाही भौ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या

चेतनकुलकर्णी_85
Mon, 09/19/2016 - 15:46 नवीन
तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या संकल्पनांचा वापर होत नसेल तर दुसर्यांना पण होत नसेल हा विचार योग्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एफेमची रेंज घरात येत नाही

कंजूस
Mon, 09/19/2016 - 10:33 नवीन
एफेमची रेंज घरात येत नाही ,मोबाइलची रेंज येत नाही त्यासाठी कोणी उपाय शोधले आहेत का? कोकणात बय्राच लोकांनी कौले काढून पत्रे घातलेत.पण त्यामुळे या अडचणी वाढल्या आहेत.फ्लॅट सिस्टिमात खिडक्या,बॅल्कनीच्या अॅल्युमिनियम फ्रेमसही रेंज अडवतात.फक्त ब्लुटुथ युनिट मिळते का?त्याला जुने प्रकारचे टिव्ही,साधे आपल्याकडचे स्पिकर जोडता येतील.
  • Log in or register to post comments

अल्युमिनिअम च्या तारेचा

श्री गावसेना प्रमुख
Mon, 09/19/2016 - 11:08 नवीन
अल्युमिनिअम च्या तारेचा एन्टेना बनवुन तो घराबाहेर लावला तरी एफ एम व्यवस्थीत चालतो,तार नसेल तर तांब्याच्या ताराची वायर घराबाहेर काढली तरीही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ह्याचा काही उपयोग होत आहे का

स्वप्क००७
Mon, 09/19/2016 - 11:49 नवीन
ह्याचा काही उपयोग होत आहे का बघा. मी करून पहिला नाही आहे http://www.instructables.com/id/DIY-2G3G4G-Wireless-Cell-Phone-Signal-Booster/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कल्पना भारी आहे

निनाद
गुरुवार, 09/22/2016 - 04:00 नवीन
फक्त ब्लुटुथ युनिट (आणि एफ एम ट्रान्स्मिटर?) वापरून कोणतेही स्पिकर वापरात आणता येतील. मी ब्लुटुथ युनिट पाहिले होते, पण ते अ‍ॅड्रिनोला जोडण्यासाठी होते. मला खात्री आहे फ्री स्टँडिंग पण मोबाईल चार्जरवर चालेल असे पण मिळायला हवे. याच पद्धतीने ऑडियोजॅमर तर नाही पण ऑडियो मध्ये गोंधळ उत्पन्न करणारे युनिट बनवता येईल का? जेणेकरून मोठ्याने स्पिकर वाजवणे अवघड होईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

इलेक्ट्रिकच्या वस्तुंसाठीही

कंजूस
Mon, 09/19/2016 - 10:35 नवीन
इलेक्ट्रिकच्या वस्तुंसाठीही धागा असायला हवा असं वाटलं होतं परंतू इस्त्री,ट्युबलाइट्सचा वापरच कमी झालाय.
  • Log in or register to post comments

इ कचरा

कवितानागेश
Mon, 09/19/2016 - 10:44 नवीन
सगळ्या इ कचऱ्याचे काय करायचे हे पण कुणीतरी सांगा. कुठे जमा करून घेतात का?
  • Log in or register to post comments

पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन

पिशी अबोली
Tue, 09/20/2016 - 03:49 नवीन
पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन-आधार' नावाच्या एका संस्थेचं ऑफिस आहे. ते घेतात इ-कचरा. पण मोठ्या प्रमाणावर असेल तर काय करायचं माहीत नाही. त्यांच्याचमार्फत एक संस्था इ-कचरा गोळा करून घ्यायला येते असं काहीतरी अंधुक आठवतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सदाभारीत लय भारी

मारवा
Mon, 09/19/2016 - 11:00 नवीन
सदाहरीत प्रश्न धागा या रेग्युलर नावाला ईलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भातला "सदाभारीत" शब्द जो वापरला तो लयच भारी आहे. शब्दयोजना प्रचंड आवडण्यात आलेली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

निनाद
Mon, 09/19/2016 - 11:09 नवीन
आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

म्हणजे मी भारावुन गेलेलो आहे

मारवा
Mon, 09/19/2016 - 11:06 नवीन
"सदाभारीत" या भारी शब्दाने मी भारावुन गेलेलो आहे. असे "भारदस्त" नाव देउन आपण एक प्रकारे "ईलेक्ट्रॉनिक्स" क्षेत्राच्या प्रतिष्ठेला "हातभार" च लावत आहात. नाहीतर आजकाल नुसती "भारंभार" शब्दांची जंत्रीच बघायला मिळते. हल्ली जो तो उधार शब्दांचा "भारवाही" हमाल झालेला आहे. अशा युगात आपण केलेल्या कार्याचे जितके आ"भार" मानावे तितके कमीच. ईलेक्ट्रॉनिक्स जिंदाबाद !!! हा व वरील प्रतिसाद "भारावलेल्या" अवस्थेत दिलेला आहे.
  • Log in or register to post comments

आपल्या भारीतल्या

निनाद
Mon, 09/19/2016 - 11:11 नवीन
आपल्या 'भारी'तल्या प्रतिसादामुळे आमच्या एका जुन्या रचनेची आठवण झाली... चकती वाचे http://www.misalpav.com/node/33337 :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

छान सुरुवात निनाद. मी मला जशी

gogglya
Mon, 09/19/2016 - 16:44 नवीन
जमेल तशी माहीती देत जाईन. जरी मी यन्त्र अभियान्त्रीकीची पदवीका घेतली असली तरी मूळ ओढा "ईलेक्ट्रॉनिक्स" कडेच होता आणी आहे. [ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?] ऑफिस मध्ये ५ दिवसांचे [ रोज १ तास ] प्रशिक्षण घेऊन सहभागी जनांना स्वतः LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा बनवताना बघणे खुप रोमांचकारी असते.
  • Log in or register to post comments

वायरलेस पध्धतीचा डॉल्बी जॅमर

टवाळ कार्टा
Mon, 09/19/2016 - 17:18 नवीन
वायरलेस पध्धतीचा डॉल्बी जॅमर बनवता येईल का? बरेच मार्केट आहे त्याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

लौकर बनवा, आमची ऑर्डर आताच

संदीप डांगे
Mon, 09/19/2016 - 18:02 नवीन
लौकर बनवा, आमची ऑर्डर आताच बुक करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जॅमर नाही बनवता आला तरी

नाखु
Tue, 09/27/2016 - 15:11 नवीन
किमाण दोन तीन गाणी एक्दम आणि भराभर (जुन्या ६०-९० च्या तबकड्या जोरात पळवल्या की येतो तस्सा काहीसा प्रकार) वाजतील असा उपाय करणारे उपकरण बनवा (लोकाम्नी रागाने डॉल्बीच फोडली पाहिजे) ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मी त्याची ही आगावू नोंदणी करत आहे, डॉल्बी उपाय असुरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वा

निनाद
Tue, 09/20/2016 - 04:14 नवीन
ग्रेट! LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा हे कसे बनवायचे ते इथे ही द्या ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

LED उघडझाप करणारी अनेक सर्कीट आहेत

gogglya
गुरुवार, 09/22/2016 - 16:28 नवीन
त्यातील कार्यकारणभाव जाणून घेण्याची आवड असेल तर Flasher Circuits इथे भेट द्या. कोणाला स्वतः हे सर्कीट बनवायचे असेल तर मी स्वतः मदत करायला तयार आहे. हवे असेल तर तू-नळी वर पण शोधु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

[ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी

झुमकुला
गुरुवार, 09/22/2016 - 16:23 नवीन
[ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?]
अणुविद्युत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

हे चुकीचे वाटते

सतिश गावडे
गुरुवार, 09/22/2016 - 22:29 नवीन
atom = अणू electrons = ऋणभारीत कण??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमकुला

ऋणिकी

निनाद
Fri, 09/23/2016 - 03:30 नवीन
ऋणिकी असा शब्द electronic या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे. ऋणिकी म्हणजे इलेक्ट्रॉनीक्स इलेक्ट्रॉन. हे ऋणभारीत कण आहे म्हणून चपखल शब्द ऋणिकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझ्या माहितीप्रमाणे विद्युत

झुमकुला
Fri, 09/23/2016 - 12:44 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे विद्युत भारीत कणांचा( electrons ) अभ्यास म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मराठी मध्ये कण हे अणु म्हणून प्रचलित झाले असावे बहुधा. तसेच खूप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स साठी अणुविद्युत अभियांत्रिकी हाच शब्द पाहण्यात आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

इथेही

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 18:15 नवीन
या धाग्यावर तर याच पण इथेही या. http://www.misalpav.com/node/37402 Electric,Electronics,computer यांसंबंधी समस्या,शंका विचारा,माहिती सामायिक करा. एक दिवस पुर्ण व्हायच्या अातच १५ सदस्य झाले.
  • Log in or register to post comments

झोलो

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 21:11 नवीन
  • Log in or register to post comments

झोलो

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 21:11 नवीन
  • Log in or register to post comments

झोलो

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 21:11 नवीन
  • Log in or register to post comments

झोलो

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 21:12 नवीन
  • Log in or register to post comments

झोलो

उपयोजक
Mon, 09/19/2016 - 21:12 नवीन
  • Log in or register to post comments

उत्तम विषयावरती धागा या

अमितदादा
Mon, 09/19/2016 - 22:24 नवीन
उत्तम विषयावरती धागा या धाग्यात इलेक्ट्रिकल बद्दल हि माहिती हवी. या धाग्यातून बरीच नवीन माहिती मिळेल असे वाटतेय . बरेच दिवस झाले एक विषय डोक्यात होता , ज्याची चर्चा मी ऑफिस मध्ये मित्राबरोबर केली होती पण त्यावरती वाचन काही होत नव्हतं . हा धागा आला आणि वाचायचं ठरवलं. तो विषय म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटी , म्हणजे कंडक्टर चा वापर न करता विजेचं wi -fi प्रमाणे होणारे वहन . याची सोप्या भाषेत मांडणी म्हणजे एक अँटेना (व इतर सर्किट ) असेल जो विजेचे मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह मध्ये रूपांतर करेल , दुसरीकडं एक रिसिव्हर (व इतर सर्किट ) असेल जो हि मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह catch करेल आणि ज्याचं परत विजेत रूपांतर करेल. सध्या तरी हे तंत्रज्ञान बाल्य अवस्थेत आहे , सरळ बोलायचं झालं तर ह्या तंत्रांज्ञानांचे दोन प्रकार होतात १. Non-radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान छोट्या किंवा माध्यम अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फिल्ड हे माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. २. Radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान जास्त अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये लेसर, रेडिओ वेव्ह , मिक्रोवेव्ह इत्यादी माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. हे तंत्रज्ञान भविष्यात खूप उपयोगी होईल यात शंका नाही, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चार्जिंग, कार चार्जिंग, बायोमेडिकल डिव्हिसेस पासून सोलर उपग्रहापर्यंत याचा उपयोग आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक पहा https://en.wikipedia.org/wiki/Wireless_power_transfer http://edition.cnn.com/2014/03/14/tech/innovation/wireless-electricity/ अवांतर: मिपावरील बऱ्याच लोकांना हि माहिती असण्याची श्यक्यता असल्याने त्यातील तज्ञ् लोकांनी याबद्दल लेख लिहल्यास वाचाय आवडेल.
  • Log in or register to post comments

हे

निनाद
Tue, 09/20/2016 - 03:41 नवीन
माहिती आवडली. Radiative Wireless Electric Transfer हे व्यावसायिक स्तरावर जास्त अंतरासाठी का वापरले जात नाही? उर्जाव्यय परवडत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

लिन्क मध्ये दिलेलं आहे वाचा

अमितदादा
Tue, 09/20/2016 - 22:14 नवीन
लिन्क मध्ये दिलेलं आहे वाचा The range of these fields is short, and depends on the size and shape of the "antenna" devices, which are usually coils of wire. The fields, and thus the power transmitted, decrease exponentially with distance
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

nonradiative साठी वरच वाक्य

अमितदादा
Tue, 09/20/2016 - 22:16 नवीन
nonradiative साठी वरच वाक्य आहे बर का, प्रश्नात गफलत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

http://www.electronics

nikhil.nemade
Mon, 09/19/2016 - 22:50 नवीन
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)
  • Log in or register to post comments

http://www.electronics

nikhil.nemade
Mon, 09/19/2016 - 22:52 नवीन
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)
  • Log in or register to post comments

खुप

निनाद
Fri, 09/23/2016 - 03:33 नवीन
छान आहे दुवा! धन्यवाद... मराठी मध्ये असते तर अजून मजा आली असती.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nikhil.nemade

मला वाटतंय ह्या सारख्या

अमितदादा
Mon, 09/19/2016 - 23:05 नवीन
मला वाटतंय ह्या सारख्या धाग्यावर माहितीकम प्रतिक्रिया देताना त्या विषयाची चार वाक्यात summary लिहावी आणि त्यानंतर त्याच्या लिंक द्याव्यात. जेणेकरून मिपाकरांना पुढे वाचायचं कि नाही हे ठरवता येईल, तसेच ज्यांना कमी वेळात बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचाय त्यांना summary वरून कळेल. आणि summary सहज आणि सोप्या भाषेत असावी, काही वैज्ञानिक इंगर्जी शब्दांचे मराठीकरण टाळावे कारण सोयी पेक्षा गैरसोय होण्याची शक्यता जास्त. अर्थात ही सूचना आहे व्यवस्थीथपणा येण्यासाठी, लिहिणारे त्यांना जसे हवे तसे लिहू शकतात.
  • Log in or register to post comments

रेडीओ ट्रान्स्मीटर आणि रिसीव्हर

अनिकेत वैद्य
गुरुवार, 09/22/2016 - 09:43 नवीन
सद्ध्या एका रेडीओ रिसीव्हर सर्किटवर काम करतो आहे. हे झाल्यावर रेडीओ ट्रान्स्मीटर तयार करणारे. (टीपः मी HAM RADIO operator आहे. माझ्याकडे रेडीओ transmitting साठी अधिक्रुत लायसन्स आहे.)
  • Log in or register to post comments

भारीच. काही त्यात अ

अभ्या..
गुरुवार, 09/22/2016 - 09:47 नवीन
भारीच. काही त्यात अ‍ॅक्ट्व्हिटी केल्यास कृपया मिपावर सांगा. मला लै इंटरेस्ट आहे. (टिपः मी व्यावसायिक रेडिओ स्क्रीप्ट आणि आरजेचे काम केले/करतो आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य

अवांतरः एखादा चांगला MW

मराठी_माणूस
Fri, 09/23/2016 - 12:59 नवीन
अवांतरः एखादा चांगला MW रीसिव्हर सुचवु शकाल का . जे बाजारत उपलब्ध आहेत त्यांच्यात फार खर्खर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य

सदस्य

उपयोजक
गुरुवार, 09/22/2016 - 21:19 नवीन
http://www.misalpav.com/node/37402 सदस्य होऊ इच्छिणार्यांना विनंती. कृपया आपला व्हॉटस्अप क्रमांकही द्या.त्याशिवाय कसं सामील करणार? अजूनही कोणी राहिले असल्यास कृपया व्यनिवर कळवा.
  • Log in or register to post comments

धागा आवडला

पैसा
गुरुवार, 09/22/2016 - 22:34 नवीन
धागा आवडला
  • Log in or register to post comments

ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर

सतिश गावडे
Fri, 09/23/2016 - 08:43 नवीन
ईलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक छोटे छोटे भाग/पार्ट्स असतात. यांना तांत्रिक भाषेत मोड्युल म्हणतात. हे मोड्युल डायोड, ट्रान्सिस्टर, रेसिस्टर, कॅपॅसिटर, इण्डक्टर, इण्टीग्रेटेड सर्किटस (आयसी) आणि एसी/डीसी व्होल्टेज सोर्स अशा अनेक काम्पोनंटची विशिष्ट जोडणी करुन बनवलेले असतात. Image removed. या प्रत्येक काम्पोनंटचे काम करण्याचे स्वतःचे असे एक तत्व असते. उदा. डायोडमधून विद्यूत प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो; विरुद्ध दिशेने विद्युत प्रवाह सोडल्यास तो अडवला जातो. तसेच या काम्पोनंटची त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार ठराविक अशी विद्युत प्रवाह वाहून नेण्याची आणि विद्युत दाब सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. या सार्‍या बाबींचा एकत्रित विचार करुन काही उपयुक्त जोडणी (सर्किट) बनवता येईल यावर संशोधन होत असते. त्यासाठी सुरुवातीला गणिती पद्धतीचा वापर जोडणीच्या विविध काम्पोनंटमधून किती विद्युत प्रवाह जाईल, किती विद्युत दाब असेल, त्याचा विविध काम्पोनण्टवर काय परीणाम होईल, ते कसा प्रतिसाद देतील याचा कागदावर कच्चा लेखा जोगा घेतला जातो. आता वेळ आलेली असते हे "डीझाईन" खरंच आपल्या गणिताप्रमाणे काम करतंय का हे तपासण्याची. त्यासाठी सारे काम्पोनंट "ब्रेडबोर्ड" नावाच्या भोकांची रांग असणार्‍या बाहेरुन प्लास्टीक असणार्‍या परंतू आतून या भोकांच्या रांगा विशिष्ट पद्धतीने जोडलेल्या असलेल्या फळकुटावर ठेवून ते जोडले जातात. Image removed. Image removed. या जोडणीला डिझाईनप्रमाणे काही ठराविक अ‍ॅम्पियर आणि व्होल्टचा विद्युत पुरवठा केला जातो. आणि मग एक तर ती जोडणी अपेक्षेप्रमाणे चालते किंवा काही चुकले असल्यास धमाका होतो. पूर्वी हीच पद्धत इलेक्ट्रॉनिक्स शिकणार्‍या विद्यार्थ्यांना विविध सर्किट्स शिकवण्यासाठी वापरली जायची. अतिशय खर्चिक आणि काहीसा धोकादायक असा हा प्रकार होता. कारण हा वीजेचा खेळ होता. अगदी मोठा अपघात झाला नाही तरी काम्पोनंट सर्रास जळायचे. यावर उपाय शोधला गेला ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचा. ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर हे असे सॉफ्टवेअर असते जे आपले डिझाईन व्हर्च्युअली तपासू देते. यातील जोडणी प्रत्यक्ष जोडणीप्रमाणे विविध जोडांच्या ठिकाणी ठराविक विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब दाखवते. याचा फायदा असा की हे सारे व्हर्च्युअल असल्याने प्रत्यक्ष जोडणी तपासणी करताना वीज हाताळतानाचे धोके इथे नसतात. शिवाय प्रत्यक्ष काम्पोनंट वापरायचे नसल्याने तो खर्च वाचतो. एकच डिझाईन फेरफार करुन तपासता येते. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून वापरल्या जाणार्‍या "ईलेक्ट्रॉनिक वर्कबेंच" या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचे एक चित्र. Image removed.
  • Log in or register to post comments

अतिशय उपयुक्त माहीती.

प्रसाद_१९८२
Fri, 09/23/2016 - 13:33 नवीन
जालावर ह्या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर सॉफ्टवेयरचे डेमो/ट्रायल वर्जन उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

(No subject)

संजय पाटिल
Fri, 09/23/2016 - 16:00 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

हे र्‍हायल ...

संजय पाटिल
Fri, 09/23/2016 - 16:06 नवीन
http://www.tesla-institute.com/index.php/electrical-engineering-articles/247-ewb-electronic-simulation-software-free-download
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा