विद्युत उपकरणे

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
18 Sep 2016 - 7:50 pm

'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु करायचा आहे.

एसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल.

त्याचबरोबर अभियांत्रिकी तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिवाय या विषयाचा छंद असणार्यांना विद्युतविषयक शंका तसेच प्रोजेक्टस् बनवताना येणार्या विद्युतविषयक समस्या,शंका याबद्दलही येथे विचारता येईल.

सदस्य होणार्या सर्वांनाच या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही.पण या विषयाची आवड,उत्सुकता,कुतुहल असणार्या सर्वांसाठी हा समुह खुला आहे.

मराठी भाषेत या विषयावर फारशी चर्चा होत नाही.सर्वांनाच इंग्लिशमधून लिहिलेल्या संकल्पना व्यवस्थित समजतील असे नाही. या विषयावर आपल्या 'सुगम' अशा मराठीतून संवाद व्हावा असे वाटते.

मिपावरील बरेचजण या क्षेत्रातील तज्ञ, माहितगार आहेत.त्यांच्याकडून यथायोग्य प्रतिसाद,मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.

समुहात सामील होण्यासाठी व्यक्तिगत निरोप पाठवावा.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 8:01 pm | संदीप डांगे

चांगला धागा!

उपयोजक's picture

18 Sep 2016 - 8:27 pm | उपयोजक

धन्यवाद

नितिन थत्ते's picture

18 Sep 2016 - 8:33 pm | नितिन थत्ते

कल्पना चांगली आहे.
मला त्यात सहभागी होऊन योगदान द्यायला आवडेल.

पण ज्या व्यक्ती/आयडीबद्दल काहीच माहिती नाही, त्याला व्यक्तिगत निरोप पाठवून आपला मोबाइल नंबर शेअर करण्याविषयी साशंक आहे.

उपयोजक's picture

18 Sep 2016 - 9:32 pm | उपयोजक

मी मिपावर फारसं लिहित नाही.पण तीन वर्षे वाचक आहे.
ज्योतिष विषयाचा समुह सुरु करताना अशाच शंका उपस्थित झाल्या होत्या.आज त्याचे 74 सभासद आहेत.मी सुध्दा सदस्य आणि admin आहे.बरेच जण एकमेकांना व्यक्तिगतरित्या ओळखत नाहीत;तरीही समुह व्यवस्थित सुरु आहे.कारण विश्वास;
आणि त्या विषयाची आवड.
ज्योतिष समुहावर बरेचसे मिपाकरही आहेत.

नाही पटलं तर समुह सोडण्याचा पर्याय आहेच की!

आपण आलात तर आनंदच आहे.

अगोदर जो ज्योतिषचा वाटसपग्रुप काढलेला तो समजू शकतो पण विद्दुत उपकरणाच्या धाग्यावर कोणी ट्रोलिंग करेल असं मला वाटत नाही.शिवाय ती माहिती कायमच उपलब्ध होईल सर्वांना.बाकी तुमची मर्जी.

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 8:45 pm | संदीप डांगे

सहमत आहे

nikhil.nemade's picture

19 Sep 2016 - 11:11 pm | nikhil.nemade

सहभागी कसे व्हावे.??

उपयोजक's picture

19 Sep 2016 - 11:50 pm | उपयोजक

उजव्या बाजूस अावागमनमध्ये संदेश पर्याय वापरुन संदेश व फोन क्र.पाठवा

वरुण मोहिते's picture

20 Sep 2016 - 3:33 pm | वरुण मोहिते

उत्सुकता आहे नवीन माहितीची

ग्रुपमध्ये सामील व्हायला आवडेल .

उपयोजक's picture

21 Sep 2016 - 11:23 pm | उपयोजक

आपला WhatsApp no.व्यनि करा की!

उपयोजक's picture

22 Sep 2016 - 9:24 pm | उपयोजक

http://www.misalpav.com/node/37402
सदस्य होऊ इच्छिणार्यांना विनंती. कृपया आपला व्हॉटस्अप क्रमांकही द्या.त्याशिवाय कसं सामील करणार?
अजूनही कोणी राहिले असल्यास कृपया व्यनिवर कळवा.

हे सर्व लिहायला व्हाॅट्स अॅप ग्रुप का हवा? इथेच यावर चर्चा होऊ शकत नाही का?

पैसा's picture

23 Sep 2016 - 12:01 am | पैसा

धर्म किंवा ज्योतिष या विषयांबाबत समजू शकते. मिपावर या विषयांवर कोणाला हवी असेल तरी कधीच गंभीरपणे चर्चा होऊ शकणार नाही. धाग्यावर मारामार्‍या होऊन संपादकांच्या नावे आरडाओरड सुरू होईल. पण विजेच्या उपकरणांबाबत का ट्रोलिंग होईल? उलट जे व्हॉट्स अ‍ॅपवर नसतील पण त्याना काही माहिती हवी असेल तर इथे धाग्यात अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल की!

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वाल्याना दोन्ही कर जोडोन विनंती की त्यानी ओळखीच्या सदस्यांना व्यनि करून किंवा मिपाच्या फेसबुक ग्रुपवरून संपर्क साधावा.

उपयोजक's picture

23 Sep 2016 - 12:06 am | उपयोजक

वेगवान संपर्क,पटकन फोटो,व्हिडिओ uploading या गोष्टी इथे शक्य नाहीत.इतरही मर्यादा आहेत.

जास्तीतजास्त २५६ लोकांचा समुह त्यापुढे नाही.एवढी एकच मर्यादा whatsapp ची.

पैसा's picture

23 Sep 2016 - 8:26 am | पैसा

अजया, सोन्याबापू, कंजूस, त्रिवेणी, स्पा अशी बरीच मंडळी मिपावर फोटो असलेले धागे मोबाईल वर type करून अपलोड करतात. wa मेसेज बघ असे व्यनि आणि खरडी मला लोक करतात!

व्हॉट्स अँपला 200 सदस्यांची मर्यादा असेल तर मिपाला कोणतीच मर्यादा नाही.

सं मं ला विनंती कि हे सगळे wa वाले धागे एका धाग्यात टाकून द्या म्हणजे मागच्या पानावर उगीच गेलेले धागे परत पुढे येतील. अशा धाग्यांबद्दल काहीतरी धोरण ठरवायची वेळ आता आली आहे.

मिपा तुमच्या अभिव्यक्तीसाठी आहे. बाह्य लिंक देऊन मिपावर चर्चा करणे योग्य आहे पण इकडे जा तिकडे जा अशा जाहिराती please तुमच्या फेसबुक खात्यातून करा.

सतिश गावडे's picture

23 Sep 2016 - 7:48 am | सतिश गावडे

भेटली का गिर्हाईकं?

उपयोजक's picture

23 Sep 2016 - 11:18 am | उपयोजक

तुम्ही येताय?

इरसाल's picture

23 Sep 2016 - 5:49 pm | इरसाल

गैरसमज दुर करायचा प्रयत्न करतो.
ट्रोलिंग नाय होत म्हणे.......

मोदींनी मेक ईन इंडिया सुरु केले, त्या अंतर्गत, लयच फाल्तु छोट्या छोट्या कंपन्यांनी बकवास विद्युत उपकरणे बनवायला सुरुवात करुन देशाला देशोधडीला लावायला सुरुवात केलेली आहेच.

औरंगजेब's picture

29 Nov 2016 - 6:15 pm | औरंगजेब

रेल्वेच्या खांबांवर AC UP / DC Down / Neutal section ahed असे लिहिले असते त्याचा अर्थ कोणी सांगु शकेल का?

माझा नम्बर ९४२२७३९७४३

इन्द्र's picture

11 Jan 2017 - 10:00 pm | इन्द्र

pl include me for electrical WA group
my no. 8889744418..thnx