✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

न
निनाद यांनी
Mon, 09/19/2016 - 09:47  ·  लेख
लेख
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अ‍ॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी - https://www.arduino.cc/ https://en.wikipedia.org/wiki/Arduino http://playground.arduino.cc/Projects/Ideas या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम! ती माहिती संपादकांना सांगुन वर या भागात संकलित करता यावी. म्हणजे ते प्रश्न वाविप्र सारखे आपोआपच टळतील. तोवर ज्यांना अनेक छोटे प्रकल्प करायचे ज्यांनात्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. ज्यांनी प्रकल्प केले आहेत त्यांनी आपले अनुभव सांगायला प्रत्यवाय नाही. तर येऊ द्या जमेल तसे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
माहिती
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
27675 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

डेमो

उपयोजक
Fri, 09/30/2016 - 21:06 नवीन
डेमो का पुर्ण व्हर्जन अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वा!

उपयोजक
Tue, 09/27/2016 - 21:35 नवीन
सोप्या भाषेत छान माहिती.आवडेल येथे यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गावडे सर, धन्यवाद

मार्मिक गोडसे
Fri, 09/23/2016 - 13:02 नवीन
गावडे सर, धन्यवाद
  • Log in or register to post comments

इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार

अमितदादा
Sat, 09/24/2016 - 22:12 नवीन
इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार आहेत AC आणि DC हे आपण जाणताच. (उदारणार्थ घरात पाण्याची मोटार AC वर चालतात तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे DC वर चालतात.) आज आपण पाहतो कि AC करंट हा पॉवर transmission साठी वापरा जातो याची खूप फायदे आहेत म्हणून, एक तर रेसिस्टीव्ह लॉसेस कमी आहे DC पेक्षा जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे, तसेच व्होल्टेज स्टेप उप/स्टेप डाउन सहजरित्या करता येते. तसेच जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे flow होणारा करंट कमी होतो ज्यामुळे वायर चे diameter कमी असतात, हे एक कारण आहे की मोठ्या टॉवरच्या ओव्हरहेड वायर मधून जास्त व्होल्टेज असत. परंतु समुद्रातून जाणाऱ्या वायर मधून DC पॉवर transmission जास्त फायदेशीर होते (AC पॉवर transmission केबल सुद्दा आहेत), कारण हवेतून होणाऱ्या पॉवर transmission साठी inductive and capacitive losses कमी असतात त्यामुळे तिथे AC करंट फायदेशीर तर समुद्रातील केबल मध्ये inductive and capacitive losses जास्त असतात त्यामुळे तिथे DC करंट फायदेशीर. अता महत्वाची स्टोरी, 19 शतकाच्या शेवटी (1880-1890) अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी दोन महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे Edison Electric Light Company ( आपल्या बल्ब वाल्या थॉमस एडिसन ची कंपनी) आणि Westinghouse Electric Company ( जॉर्ज वोशिंग्टनहोऊस याची कंपनी). तर यातील एडिसन च्या कंपनीचं अस म्हणणं होत की DC करंट हा पॉवर transmission साठी उत्तम आणि उपयोगी आहे, तर AC करंट हा धोकादायक आणि निरूपयोगी तसेच खर्चिक आहे. मात्र याच्याविरोधी जॉर्ज आणि निकोला टेलसा (ज्याने मॉडर्न AC ट्रान्सफॉर्मर बनवला) ह्यांनी एडिसन ची मत खोडुन काढत होते तसेच AC पॉवर transmission मध्ये नवीन नवीन शोध लावून AC च महत्व पटवून सांगत होते. हि 10 वर्षे अमेरिकेचं वीज क्षेत्र ह्या giant लोकांच्या आरोप प्रत्यारोपात ढवळून निघाले ह्या गोष्टीला war of currents म्हंटल जात . अर्थात लवकरच जास्त अंतरावर पॉवर transmission करण्यासाठी AC ची उपयोगिता लक्ष्यात आली आणि जसा त्याचा वापर वाढला तसा एडिसन ची कंपनी तोट्यात जायला लागली याचा शेवट कंपनी विकण्यात झाला. अधिक माहिती खाली वाचा. तसेच काही कमी किंवा अपूर्ण असेल तर भर हि घाला. 1. http://www.history.com/news/ask-history/what-was-the-war-of-the-currents 2. http://www.scienceninjas.ca/war-history-electric-currents/ 3. https://en.m.wikipedia.org/wiki/War_of_Currents
  • Log in or register to post comments

ऑप्टिकल to 3.5MM jack

स्वप्क००७
Tue, 09/27/2016 - 10:01 नवीन
मला डिजिटल to अनालॉग ऑडिओ कन्वर्टर करायचा आहे (ऑप्टिकल to 3.5MM jack) कोणी मदत करू शकतो का? बाजारात 1000rs पर्यंत उपलब्ध आहे पण स्वतः बनवण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

कळलं नाही.....

नितिन थत्ते
Tue, 09/27/2016 - 13:26 नवीन
कळलं नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्क००७

विकत ghya

हेमन्त वाघे
Wed, 09/28/2016 - 06:26 नवीन
DAC मध्ये एक चिप असते आणि त्या चपच्या अवती भवती सर्किट असते . अनेक चिनी सर्कईट्स बघून हे लक्षात आले आहे हि तयार घेणे हे स्वस्त पडते .. तरीही तुम्हाला बहुदा किट मिळावीत हा एक प्रकार चांगला आहे http://www.ebay.com/itm/Digital-Optical-Coaxial-Toslink-Signal-to-Analog-Audio-Converter-Adapter-RCA-/201649812583?var=&hash=item2ef343f467:m:mrGI2BTDJs-qRDV7wTsmjMw तसेच हा डाक तुम्हाला का पाहिजे आहे ? LED TV ला लावायला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्क००७

हे बघा

स्वप्क००७
Tue, 09/27/2016 - 20:22 नवीन
http://www.amazon.in/FiiO-D03K-Optical-Stereo-Converter/dp/B009346RSS?tag=googinhydr18418-21&tag=googinkenshoo-21&ascsubtag=8d2fc9f3-0f66-48dd-a7ed-e0541d1dc6fe
  • Log in or register to post comments

होय

स्वप्क००७
Wed, 09/28/2016 - 17:28 नवीन
होय माझ्या LED TV चे ऑडिओ आउटपुट ऑप्टिकल आहे म्हणून हवंय. असो धन्यवाद आता विकत घेण्या शिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट

प्रफुल्ल
गुरुवार, 09/29/2016 - 23:49 नवीन
मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट कंट्रोल हॉबी कार आणि टॉय रिपेअर करण्या साठी माहिती हवी आहे. मी थोडा प्रयत्न केला पण सर्कीट बोर्ड जळाला चुकुन..
  • Log in or register to post comments

सिग्नल लेवल

उपयोजक
Fri, 03/24/2017 - 13:11 नवीन
रोधक अर्थात रेझिस्टरचा उपयोग सिग्नल लरवल अॅडजस्ट करण्यासाठी कसा केला जातो?
  • Log in or register to post comments

प्रश्न कळला नाही.

नितिन थत्ते
Fri, 03/24/2017 - 14:12 नवीन
प्रश्न कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

Application

उपयोजक
Fri, 03/24/2017 - 19:23 नवीन
इंजिनिअरींगच्या पुस्तकात रेझिस्टरचं एक कार्य दिलं आहे, To adjust the signal level याचा अर्थ काय? मुळात सिग्नलची लेवल म्हणजे काय? थोडं विस्तृतपणे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जुन्या न चालणाय्रा इले वस्तू

कंजूस
Fri, 03/24/2017 - 20:35 नवीन
जुन्या न चालणाय्रा इले वस्तू कुठे टाकायच्या हा प्रश्न अगोदर विचारला आहे. cnbc awaaj चानेलवर टेकगुरू कार्यक्रमात आज दाखवलय . उद्या सकाळी रिपीट 07.00-07.30 पहिल्या पाच मिनिटात आहे.
  • Log in or register to post comments

धन्स

उपयोजक
Sat, 03/25/2017 - 06:13 नवीन
फार छान माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

त्या कार्यक्रमात हे सांगितलंय.

उपयोजक
Sat, 03/25/2017 - 07:18 नवीन
http://www.ecocentric.co.in/ हे इ - कचर्‍याचं नियोजन करतात.त्याबद्दल इथे सांगितलंय.छान माहिती मिळाली. सिसिडी सोबत त्यांची अॉफरही आहे.किंडल जिंकण्याची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा