Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 84392
प्रतिक्रिया 480

प्रतिक्रिया

In reply to by श्री गावसेना प्रमुख

त्याच्या बॉसने फोन केला म्हणून त्याने लेख मागे घेतला, याला पुरावा काय आहे म्हणे? फोन टॅप ? की बॉसने लेखी मेमो दिला होता म्हणे? आणि नंतर त्या बॉसने इथल्या सन्माननीय सदस्याना स्वप्नात दॄष्टांत दिला का की मी त्याला धमकी दिली म्हणून त्याने लेख मागे घेतला?

In reply to by अमितदादा

माझ्या मतानुसार संघाची काही काम चांगली आहेत तर काही वाईट आहेत म्हणून संघाचं विश्लेषण करताना दोन्ही गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत .
संघाची कोणती कामे वाईट आहेत ते सांगता का जरा? इथल्या संघविरोधकांना संघ नक्की का वाईट आहे, संघाच्या विचारसरणीत काय चुकीचे आहे याविषयी एकही मुद्दा सांगता आला नाही. त्यामुळेच संघ कार्यकर्त्यांची चड्डी पिवळी होते, संघ माकड आहे, संघ आपत्ती निवारण कार्यात सहभागी होतो त्यात विशेष ते काय अशी पातळी गाठली गेली. तुम्हाला संघाच्या ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्या सांगा.
मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो . संघ, राजकीय चेहरा तलवार म्हणून वापरतो तर सामाजिक चेहरा धाल मानून वापरतो . म्हणजे वार राजकीय चेहऱ्याने करायचा मात्र हल्ला झाल्यास सामाजिक चेहरा पुढं करायचा. असो सांगायचं एव्हडच आहे कि संघाचं विश्लेषन त्याच्या दोन्ही बाजू विचारात घेऊन व्हावे . असो भरपूर मुद्दे चर्चिले गेल्याने काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता, अशी अपेक्षा करतो.
ज्यात राम मंदिराचे राजकारण - या प्रश्नाबाबत सुरवातीपासूनच म्हणजे संघ त्यात नव्हता तेव्हापासूनच राजकारण सुरू आहे. सर्वच पक्ष व संघटनांनी त्यात राजकारण आहे. संघाने सुरवातीपासूनच मंदीर व्हावे अशीच भूमिका घेतलेली असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन - कोणत्या परंपरा? उदाहरणे देता येतील का? मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष - उदाहरणार्थ? बादवे, मुस्लिमांचा जगभर द्वेष केला जातो याची कल्पना असेलच आणि याला कारणीभूत तेच आहेत. दलिताबाबतीत संशयी भूमिका - म्हणजे काय? उदाहरणे द्या. गो रक्षा - या मुद्द्यामुळे चेहरा काळवंडला कसा जाईल?

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना. २) हिंदू असल्याचा मला आनंद वाटतो. (अभिमान/ गर्व नाही; मी हिंदू आहे ह्यात माझे कर्तृत्व काही नाही.) ह्या धर्माने जे वैचारिक स्वातंत्र्य मला दिले आहे ते इसाई किंवा इस्लाम देत नाही. मग भले ती अनेक विचारांची खिचडी असेल पण म्हणूनच तीत प्रत्येकाला स्थान आहे. (बौद्ध, जैन, शीख धर्मांबद्दल मला काही माहिती नाही पण ते fanatic नक्कीच नाहीत.) ३) मी संघविरोधक नाही. संघाने केलेले हिंदुजागरणाचे काम स्पृहणीयच आहे. परंतु, ४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही. असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. बाकी, संघ चमत्काराच्या ह्या धाग्याने मला मनातील प्रश्न उपस्थित करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारच आहेत. बस्स, एवढेच.

In reply to by रविकिरण फडके

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना.
या सर्वांना संघ जबाबदार आहे का?
४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही.
हिंदुजागरणाची अजूनही गरज आहे. भारतात अजूनही पाकिस्तान, दहशतवादी इ. विषयी ते केवळ मुस्लिम धर्माचे असल्याने सहानुभूती असणारे निधर्मांध आहेत. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना सरकारी नोकर्‍या कमी मिळतात इ. गोष्टींवर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात असा अजूनही प्रचार होतो. आपल्या अवस्थेसाठी मुस्लिम स्वतःच जबाबदार आहेत हे उघड सांगण्याची हिंमत यांच्यात नाही. बुरखा, तलाक इ. अन्यायकारक गोष्टींचे समर्थन करणारे व या गोष्टींना विरोध करणार्‍यांवर हिंदुत्ववादी म्हणून टीका करणारे अजूनही मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच हिंदुजागरणाची गरज आजही आहे.
असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.
यासाठी संघ कसा काय जबाबदार?

In reply to by रविकिरण फडके

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना.
या सर्वांना संघ जबाबदार आहे का?
४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही.
हिंदुजागरणाची अजूनही गरज आहे. भारतात अजूनही पाकिस्तान, दहशतवादी इ. विषयी ते केवळ मुस्लिम धर्माचे असल्याने सहानुभूती असणारे निधर्मांध आहेत. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना सरकारी नोकर्‍या कमी मिळतात इ. गोष्टींवर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात असा अजूनही प्रचार होतो. आपल्या अवस्थेसाठी मुस्लिम स्वतःच जबाबदार आहेत हे उघड सांगण्याची हिंमत यांच्यात नाही. बुरखा, तलाक इ. अन्यायकारक गोष्टींचे समर्थन करणारे व या गोष्टींना विरोध करणार्‍यांवर हिंदुत्ववादी म्हणून टीका करणारे अजूनही मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच हिंदुजागरणाची गरज आजही आहे.
असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.
यासाठी संघ कसा काय जबाबदार?

In reply to by सतीश कुडतरकर

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

या चर्चेत मत देण्याइतका अभ्यास नाही. एक जाणुन घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे. ईशान्य राज्यात संघाने काय काम केलेले आहे ? त्याचे स्वरुप काय आहे ? व लोकप्रभा या साप्ताहीकात एका कार्यकर्त्यांच सदर येत असे त्यांचे नाव व थोडी माहीती कृपया द्यावी ही विनंती. ईशान्य भारतीयांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी एक फार चांगल काम संघ स्वयंसेवकाने केलेल आहे इतकच माहीत आहे. फार दिवसांपुर्वी वाचलेल असल्याने आता आठवत नाही म्हणून विचारतोय तो संदर्भ कृपया द्यावा. आणि हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबादचे आणि चिखली अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक व देवगिरी बँक या दोन संघानेच चालवलेल्या संस्था आहेत का ? असल्यात त्या फार उत्तम रीतीने शिस्तीने चालवल्या जातात असे प्राथमिक मत आहे.

जवळपास ४०० प्रतिसादातून काही गोष्टी पुन्हा एकदा दॄग्गोचर झाल्या. संघ विरोधकांना कधीही संघाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करता आला नाही. संघाची विचारसरणी व तत्वज्ञान त्यांना कधीही वैचारिक युक्तीवाद करून खोडता आले नाही. संघाचे विचार चुकीचे आहेत हे कधीही त्यांना व योग्य विचार कोणता हे त्यांना कधीही वैचारिक पातळीवर करता आलेले नाही. संघाचे कोणते विचार चुकीचे आहेत हेही सांगता आलेले नाही. संघावर निव्वळ बेलगाम आरोप करताना आरोपांना पुष्टी देणारा एकही पुरावा देता आला नाही किंवा जे आरोप केले ते सिद्ध करणारे एकही उदाहरण देता आले नाही. हे सर्व जमत नसल्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चड्डी, विष्ठा इ. शब्द वापरून प्रतिसाद दिले गेले. संघाच्या आपत्तीनिवारण मदतकार्याचा उल्लेख केल्यावर ते कार्य नाकारता येत नसल्याने 'मग त्यात काय विशेष केले' अशी हेटाळणी केली गेली. जो कोणी वैचारिक प्रतिवाद भूमिका मांडत असतात त्याविरोधात वैचारिक पातळीवरून विरोध करणे शक्य नसल्याने अभद्र भाषेचा वापर करणे म्हणजे त्या वैचारिक भूमिकेचा आम्ही किंचितही प्रतिवाद करू शकत नाही इतकी ती भूमिका तर्कशुद्ध आणि सशक्त आहे याची ती अप्रत्यक्ष कबुलीच असते. यांना फक्त संघाचा द्वेष करता आला. त्यामुळेच संघावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे एवढेच त्यांना जमते.

In reply to by श्रीगुरुजी

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

In reply to by श्रीगुरुजी

श्री गुरुजी आपण संघाचे आग्रही समर्थक दिसता. म्हणून आपल्याला दोन बाबतीत स्पष्टीकरण विचारतो. मला प्रांमाणिकपणे दोन बाबतीत स्पष्टीकरण कृपया द्य्वावे. समता ऐवजी समरसता अशी भुमिका संघ जेव्हा घेतो तेव्हा संघ हा प्रामाणिकपणे सामाजिक समता न मानता विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे दुसर्‍या विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा कमी किंवा जास्त उच्च किंवा नीच्च असे मानतो वा प्रतिपादतो असे म्हटल्यास ते चुक आहे का ? नसल्यास समरसता हा समतेचा पर्याय होउ शकतो का ? समरसता एक स्वतंत्र सुंदर मुल्य असु शकते पण समते ला पर्याय म्हणून जेव्हा त्याचे प्रतिपादन आग्रहाने केले जाते तेव्हा ते मुळ समता या समरसतेहुन कैकपट अधिक महत्वाच्या मुलभुत मानवी मुल्याला तुडवण्याचे काम करते असे आपणास वाटत नाही का ? संघाची या विषयी नेमकी काय भुमिका आहे ? एक राजाराम एक रॉजर एक रहेमान हे समान पातळीवर संघ बघतो की एक कोणी श्रेष्ठ आहे व इतरांशी समरस होण्याचे औदार्य केवळ दाखवले इतपतच त्याचे नैतिक कर्तव्य आहे. हे जे केले हेच फार मोठे काम झाले समरसतेचे असे संघ मानतो. यात स्पष्टपणे हिंदु हा मुसलमान वा ख्रिश्चन वा शिख पेक्षा बेसीक ह्युमन डिग्नीटीच्या आणि राइट्स स्केल वर संघ समान मानतो की खाली किंवा वर व समान बेसीक ह्युमन डिग्नीटीच्या आणि राइट्स आधारे जर मानतो तर त्याला "समान" का मानत नाही केवळ "समरसता" या रीप्लेसमेंट वर का समाधान मानतो. मग संघ अल्पसंतुष्ट आहे असे समजावे का ?

In reply to by मारवा

समता ऐवजी समरसता अशी भुमिका संघ जेव्हा घेतो तेव्हा संघ हा प्रामाणिकपणे सामाजिक समता न मानता विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे दुसर्‍या विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा कमी किंवा जास्त उच्च किंवा नीच्च असे मानतो वा प्रतिपादतो असे म्हटल्यास ते चुक आहे का ?
होय. हे प्रतिपादन चूक आहे. संघ विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे दुसर्‍या विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा कमी किंवा जास्त उच्च किंवा नीच्च आहे असे मानत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ज्यांना संघाच्या चुका सांगायच्या आहेत त्यांनी त्या जरुर सांगाव्यात. पण कुत्सितपणे शेरेबाजी करुन हेटाळणी करणे आणि टीका करणे यात फरक आहे असं जर त्यांना वाटत नसेल आणि संघाचे समर्थन करणारे अशा हेटाळणीला उत्तर देणार नाहीत असं जर त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. अजूनही संघाने दलितविरोधी असल्याचा एकही पुरावा सादर केला गेलेला नाही, पण संघ दलितविरोधी असल्याचा आरोप मात्र केला गेलेला आहे. यावरून काय ते कळतंच.

In reply to by बोका-ए-आझम

पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे. मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.
सात्यकी सावरकर यांनी संघाची आरोप करुन बदनामी केली ? का हा एक पुरावा मानावा, आमच्या सर्ख्या सामान्य माणसान्नी ? जरा समजाउन सान्गा. (क्रु त्रागा न करुन घेता, वैयक्तिक न घेता समजवा प्लिज)

In reply to by पगला गजोधर

फाशी देण्यात आलं. मृत्यूपूर्वी दिलेल्या statement मध्ये संघ स्वयंसेवक असल्याचा उल्लेख त्याने केलेला नाही. निदान तसा पुरावा कुठेही नाहीये. गोडसे संघाचा स्वयंसेवक असेल/नसेल पण तो अखिल भारतीय हिंदू महासभेचा सदस्य होता. महासभेने चालू केलेल्या अग्रणी या दैनिकाचा तो संपादक होता. नंतर या दैनिकाचं नाव हिंदू राष्ट्र असं ठेवण्यात आलं. अनेक जणांना संघ, जो १९२५ मध्ये स्थापन झाला, तो १९०७ मध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेचा भाग वाटतो. पण यालाही काही पुरावा नाही. हिंदू महासभेचे एक नेते डाॅ.बाळकृष्ण मुंजे यांनी संघाचे संस्थापक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पण संघ आणि महासभा यांचा संबंध दोघांचीही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडली तर असल्याचा पुरावा नाही. गांधीजींची हत्या झाल्यावर झालेल्या खटल्यात हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन अटकही केली होती आणि गोडसे आणि नारायण आपटे यांच्याबरोबर आरोपीही बनवण्यात आलं होतं. पण सरकारने त्यांना निर्दोष सोडलं. एक प्रकारे हिंदू महासभा या राजकीय पक्षाचा गांधीजींच्या हत्येशी काहीही संबंध नसल्याची आणि गोडसेने ही हत्या स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेने केली याची ही कबुली होती. त्याचवेळी संघावरही बंदी घालण्यात आली होती, पण संघाच्या एकाही नेत्याला अटक वगैरे झालेली नव्हती. सात्यकी सावरकर यांच्याकडे नथुराम आणि गोपाळ गोडसे संघ स्वयंसेवक असल्याचा पुरावा असल्यास इतकी वर्षे हा पुरावा कुठे होता हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जर गोडसे संघाचा कार्यवाह होता (हे महत्वाचे पद आहे) तर त्याची आणि त्याने घेतलेल्या निर्णयांची नोंद असायला हवी होती. संघावर बंदी असताना नागपूरच्या संघकार्यालयावर पोलिस पहारा होता आणि तिथल्या कागदपत्रांची तपासणी चालू होती. गोडसे जर संघात होता आणि कार्यवाह पदापर्यंत पोचला होता तर त्याचा काहीतरी पुरावा इथे असायला हवा होता. मला वाटतं सात्यकी सावरकरांनी हा जो पुरावा आहे तो आता मांडावाच. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागून जाईल.

In reply to by बोका-ए-आझम

विधर्भाशी तुमची नाळ जेडली आहे असे समजुन तुमच्याकडुन उत्तर आपेक्शु का ?
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

In reply to by पगला गजोधर

मोठे मोठे विषय असतील तर भाष्य वगैरे करतो. असल्या छोट्या छोट्या विष्यांवर संघाने भाष्य केलेलं आठवत नै.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर महाराष्ट्राची दोन नाही, तर चार राज्ये व्हावीत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली असून त्यावरून नवं वादळ उठण्याची शक्यता आहे. वैद्य यांनी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ही मागणी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याचं अनेकदा समर्थन करणारे श्रीहरी अणे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र राज्य व्हावं, असं विधान करून गोत्यात आले. यावरून सरकारची कोंडी झाल्याने अणे यांना राजीनामा द्यावा लागला. हा वाद अद्यापि निवळलेला नसतानाच वैद्य यांनी या निमित्ताने आरएसएसचा अजेंडा पुढे करून मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्राची दोन नव्हेत, चार राज्ये करायला हवीत. संघाच्या परिभाषेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा-खान्देशचा समावेश असलेला देवगिरी, अशी चार राज्ये आहेत. आंदोलनातून या राज्यांची निर्मिती न होता सरकारने त्यासाठी नवीन राज्य पुनर्रचना आयोग नेमावा आणि त्या आयोगाने ही राज्यं वेगळी करावीत, असे मत मा. गो. वैद्य यांनी मांडलं. अणे यांच्या राजीनाम्याचं मात्र त्यांनी समर्थन केलं.

In reply to by पगला गजोधर

या गोष्टीला पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांचा विरोध होता. संघाने यावर नेहरू आणि पटेल यांची बाजू घेतली होती. पण पोट्टी श्रीरामुलू यांच्या उपोषण आणि आत्मसमर्पणामुळे तत्कालीन मद्रास इलाख्यातून तेलुगूभाषिक आंध्र प्रदेश निर्माण करण्यात आला आणि भाषावार प्रांतरचना अनिवार्य झाली. यासाठी नेमलेल्या आयोगाने मुंबई ही राजधानी असलेलं गुजरात आणि महाराष्ट्र यांचं द्विभाषिक राज्य आणि हैदराबाद संस्थानाचा मराठीभाषिक भाग (आजचा मराठवाडा) आणि बेरार प्रांताचा मराठीभाषिक भाग (आजचा विदर्भ) यांचं मराठीभाषिक राज्य ही शिफारस केली होती. ती अर्थातच मान्य झाली नाही आणि कालांतराने संयुक्त महाराष्ट्राची आणि गुजरातची निर्मिती झाली. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनवण्याचा आणि तिथे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय बहुतेक वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना घेतला गेला. भाजपने आणि पर्यायाने संघपरिवाराने छोट्या राज्यांना पाठिंबा दिला आहे. २००० मध्ये भाजपची केंद्रात सत्ता होती आणि मध्यप्रदेशपासून छत्तीसगड, बिहारपासून झारखंड आणि उत्तर प्रदेशापासून उत्तराखंड ही राज्यं कुठलाही हिंसाचार वगैरे न होता विभाजित झाली होती. महाराष्ट्रात सध्या तरी वेगळ्या विदर्भावर भाजपने मौन बाळगलेलं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

भा ज प ची भूमिका नको, संघाची भूमिका माहिती करून घ्यायची होती, तुमच्याकडून. कारण नंतर कोणी समर्थक असा मुद्दा सांगू शकतो, भा ज प ही संघाची भ्रातृ संघटना आहे, संघाचे स्वतःचे व्हिजन आहे वै वै त्यामुळे भा ज प च्या भूमिकेशी /वक्तव्याचा संघाशी संबंध जोडून कांगावा होत आहे . वै वै

In reply to by पगला गजोधर

भाजप हा संघपरिवारातला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्याची भूमिका महत्त्वाची आहे, कारण जर राज्य विभाजनाचा निर्णय घ्यायचा झाला तर तो संघ घेणार नाहीये, भाजप घेणार आहे - त्यावेळी सत्तेत असला तर. त्यामुळे भाजपचं नाव घेतलंय. बाकी भ्रातृसंघटना वगैरे राहू दे.

In reply to by बोका-ए-आझम

ओके (क्षमस्व पण) ३७० कलम रद्द करणे / न करणे, सामान नागरी कायदा करणे / न करणे,हे सुद्धा भाजप च्या अखत्यारीत येतंय ना ? पूर्वी गाठजोड सरकार होती भाजपाची, पण आता तर लोकसभेत एकहाती सत्ता आहे, मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा, असा आग्रह संघ करताना दिसत नाही (जेव्हा नॉन भाजप सरकार लोकसभेत होते, तेव्हा संघ जेव्हडा पुरजोरपणे आग्रह ठेवायचा त्यामानाने... )

In reply to by पगला गजोधर

चुना(वी) जुमला. Hindu organisation Akhil Bharatiya Hindu Mahasabha (ABHM) has accused Vishwa Hindu Parishad (VHP) and its associate units of pocketing more than Rs 1,400 crore in cash and “quintals of gold bricks”, which were collected from across the world as donations for construction of Ram temple in Ayodhya. http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahi… चौदा वर्षे वनवास भोगलेल्या देवाच्या नावानं १४०० कोटी गिळंकृत?? व्ही एच पी अँड असोसिएट्स असोसिएट्स म्हणजे नेमके कोण कोण ? ही बातमी मोदी सरकारच्या काळातील आहे. काँग्रेसच्या काळात अशी बातमी आली असती तर एव्हाना भगव्या परिवाराने काँग्रेस, गांधी, नेहरु , मनमोहन , आयसिस, ओवेसी, पाकिस्तान, ख्रिस्ती मिशनरीज , पोप ..... कुणाकुणाच्या नावानं शिमगा केला असता ते प्रभू रामालाच ठाऊक !

In reply to by चंपाबाई

मागे कोणीतरी या धाग्यावर संघ दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. पुरावा द्या म्हटल्यावर गायब झाले. आरोप करायला काही लागत नाही.

In reply to by पगला गजोधर

(क्षमस्व पण) ३७० कलम रद्द करणे / न करणे, सामान नागरी कायदा करणे / न करणे,हे सुद्धा भाजप च्या अखत्यारीत येतंय ना ? पूर्वी गाठजोड सरकार होती भाजपाची, पण आता तर लोकसभेत एकहाती सत्ता आहे, मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा, असा आग्रह संघ करताना दिसत नाही (जेव्हा नॉन भाजप सरकार लोकसभेत होते, तेव्हा संघ जेव्हडा पुरजोरपणे आग्रह ठेवायचा त्यामानाने... )
घटनादुरूस्तीसाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत असावे लागते. सध्या भाजपकडे लोकसभेत साधे बहुमत आहे तर राज्यसभेत भाजपकडे जेमतेम २०% खासदार आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही घटनादुरूस्ती फक्त भाजपच्या मतांवर मंजूर होणे अशक्य आहे. ३७० वे कलम किंवा समान नागरी कायदा या घटनादुरूस्तीला भाजप व शिवसेना वगळता इतर बहुसंख्य पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत ही विधेयके मंजूर होणार नाहीत. समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हळूहळू पावले पडू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक या विषयावर केंद्र सरकारचे मत मागविले आहे. या मतानंतर न्यायालय पुढील पावले टाकेल. जर न्यायालयाने तोंडी तलाक बेकायदेशीर आहे असा निर्णय दिला तर त्याच्याबरोबरीने तलाकपिडीत मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या अधिकारात सुद्धा सकारात्मक बदल होऊ शकतो. वास्तविक न्यायालयाने या दृष्टीने १९८६ मध्येच शहाबानो खटल्यात योग्य तो निर्णय दिला होता. परंतु तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लिम धर्मांधांसमोर लोटांगण घालून न्यायालयाचा निर्णय डावलून पोटगीचा नवीन कायदा आणून मुस्लिम महिलांना अंधारात ढकलून दिले होते. यावेळी तसे होणार नाही अशी आशा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणूनच गुरुजी,
मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा,
असे म्हटले, फक्त प्रस्ताव तर ठेवावा (त्यासाठी तुम्ही म्हणता तशी दोनीकडे बहुमताची गरज नाही, फक्त प्रस्ताव मांडण्यासाठी) प्रस्ताव ठेवल्याने (बीजेपी कडून), व त्यांना तसे करण्यास बाध्य केल्यामुळे (संघाकडून), लोकांपुढे संघाला, आपण आपल्या वचननाम्याला / विचार / व्हिजन शी एकनिष्ठ होतो, व आपल्यापरीने आपण पूर्ण प्रयत्न केले, असा मेसेज कृती द्वारे देता येईल. हार जीत ही फलनिष्पत्ती डोळ्यापुढे ठेवून, संघाने सिन्सिअर एफर्ट घेतलेच नाही, ही विरोधकांची भावी आरोप फैरी, निष्फळ करता येईल की ....

In reply to by पगला गजोधर

१९८४ ते १९८९ या काळात काँग्रेसला लोकसभेत आणि राज्यसभेत असं दोन्ही ठिकाणी पाशवी बहुमत होतं. शाह बानो खटल्याच्या निमित्ताने तलाकची अनिष्ट प्रथा कायमची मिटवून टाकणे आणि समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करणे हे काँग्रेसला सहज शक्य होतं. अरिफ मोहम्मद खान यांनी ते साध्य करत आणलंही होतं पण खुर्शीद आलम खान आणि सय्यद शहाबुद्दीन यांच्यासारख्या पुराणमतवादी नेत्यांना अवास्तव महत्व देऊन काँग्रेसने हे पाशवी बहुमत शाह बानो केसमधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करणारा कायदा करायला वापरलं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती लपवता येणार नाही. त्यानंतर ३० वर्षांनी लोकसभेत बहुमत असलेलं एकेकाळच्या विरोधी पक्षाचं सरकार आहे आणि राज्यसभेत ' नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं समजणाऱ्या काँग्रेसकडे बहुमत आहे. समान नागरी कायदा हा त्यामुळेच एक न सुटणारा तिढा बनला आहे. पाशवी बहुमत असताना ज्या पक्षाने vote bank politics साठी हा कायदा आणू दिला नाही, ते अात्ता त्याच्याबाबतीत सकारात्मक होतील अशी अपेक्षा करणं मूर्खपणा आहे आणि लोकशाही असल्यामुळे विरोधी पक्षाला डावलून इतका महत्वाचा निर्णय घेणं शक्य आणि बरोबर, दोन्हीही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप सरकार, यावेळी, (मागील नॉन भाजप सरकारांनी दुर्लक्षित केलेले ) प्रथम सरसंघचालक डॉ हेडगेवार यांचे भारतातील स्वातंत्र चळवळीतील योगदान लक्षात घेऊन, त्यांना भारत-रत्न पुरस्कार साठी विचार करतील काय ? किती सुयोग्य परिस्थिती पहा, एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान, व डॉ कार्य ज्या महाराष्ट्रात झाले, त्याचे मुखमंत्री पण स्वयंसेवक... होईल का विचार भारतरत्नासाठी ?

In reply to by पगला गजोधर

का त्यांचा अपमान करताय ? वरती कुणीतरी लिहिले आहे ना की मदर टेरेसापेक्षा जास्त लायक नावं नोबेल पुरस्कारासाठी उपलब्ध आहेत म्हणून .... त्याना डायरेक्ट नोबेल द्यायला हवं...

In reply to by पगला गजोधर

लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप सरकार, यावेळी, (मागील नॉन भाजप सरकारांनी दुर्लक्षित केलेले ) प्रथम सरसंघचालक डॉ हेडगेवार यांचे भारतातील स्वातंत्र चळवळीतील योगदान लक्षात घेऊन, त्यांना भारत-रत्न पुरस्कार साठी विचार करतील काय ? किती सुयोग्य परिस्थिती पहा, एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान, व डॉ कार्य ज्या महाराष्ट्रात झाले, त्याचे मुखमंत्री पण स्वयंसेवक... होईल का विचार भारतरत्नासाठी ?
याबद्दल माहिती नाही. परंतु डॉ. हेडगेवार हे भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत याविषयी अजिबात शंका नाही.

In reply to by श्रीगुरुजी

याबद्दल माहिती नाही. परंतु डॉ. हेडगेवार हे भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत याविषयी अजिबात शंका नाही.
तुमच्या मनांत शंका नाही हे आम्ही जाणतो. परंतु (अवांतरा बाबत क्षमस्व) जसे, शिवाजी राजे हे आपले महाराज / मायबाप आहेत, याबाबत स्वराज्याच्या रयतेच्या मनात अजिबात शंका नव्हती, तरीही राजांनी राज्याभिषेकाची फॉर्मॅलिटी केली (कारण जाहीर पणे पूर्ण जगाला फॉर्मली दखल घ्यायला लावणे, हा सुद्धा पोलिटिकल मास्टरस्ट्रोक होता) असाच पोलिटिकल मास्टरस्ट्रोक संघाने आपल्या राजकीय विंग कडून मारून घ्यावा.

In reply to by श्रीगुरुजी

भारतरत्न हा पुरस्कार जे लोक १९४७ नंतर काही काळ तरी हयात होते व ज्यानी अतुलनीय कार्य केले त्यानाच मिळते. हेगडेवार १९४० ला गेले. अशी अट आवश्यक आहे. नाहीतर भ्हूतकाळातील टीळक , तानाजी , अकबर अशी करत यादी सम्राट अशोक , वसिष्ठमुनी , प्रभू रामचंद्र , प्रल्हाद , दधिचीमुनी .... अशी उणे अनंताकडे निघून जाईल.

In reply to by चंपाबाई

प्रभू रामचंद्रांना पुरस्कार भेटेल कि नाही हे कठीण आहे कारण ते विष्णूचा अवतार होते ना ? विष्णूंना १० वेळां तोच पुरस्कार देणे मुश्किल आहे.

400+ प्रतिसादांबद्दल नर्मदेतील गोटा यांचे गोदावरीतील गोटा देवून अभिनंदन!

लोकं किती फ्रॅक्चर्ड मेंटलिटीचे असतात हे ह्या धाग्यावर उत्तम समजते, वाखु साठवतोय, किमान ह्यापुढे असल्या वांझ धाग्यांवर चर्चा करायची इच्छा झाल्यास शांत बसायची शिकवण देणारा धागा म्हणून तरी वाखु साठवायलाच हवी. असल्या विषयांवर कितीही डोंबल आपटलं तरी आउटपुट काहीच नसते अंधसमर्थक आपल्याच तर्कांत असलेल्या फटी पाहायला तयार नसतात अन पुरोगामी म्हणवणारे लोक्स संघाने पिढीजात घबाड लुटून नेल्यागत संघावर तुटून पडत असतात , दोघांचे ब्रेनवॉशिंग पक्के असते काय हशील असल्या "चर्चेत", काही दिवस अगोदर माझाच तोल ढळतोय का काय असली परिस्थिती आली होती, सुदैवाने मोदक अन अतिवास ताईंसारख्या माझ्या काही मित्रांनी मला सावरले, तदनंतर बराच विचार केला अन असल्या चर्चात काहीच हशील नाही ह्या उत्तराशी पोचलो, असो. चालू देत धुळवड! :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अशा धाग्यांचे मनोरंजन मूल्य उत्कृष्ट आहे असे म्हणावे तर आपली चॉईस लय खालच्या पातळीची आहे असे वाटेल... तर ते हि म्हणवत नाही.

In reply to by संदीप डांगे

इतका धागा झाल्यावर नक्कीच किमान काही नविन तपशील एखाद दोन तरी गवसतातच. ते इतके कमी असले तरी कधी कधी वर्थ टु चेक असतात. म्हणजे अगदी मोठ्या उपशानंतर फारच कमी असले तरी नेहमीच्या विषयाकडे नविन दॄष्टीने बघण्यास भाग पाडतात. अर्थात अगोदरच फार खोलात गेलेलो असु तर मग नविन मिळण्याची शक्यता मंदावते हे खरे. मला तरी काही अगदी नविन बाबी माहीत झाल्या संघाविषयीच्या या धाग्यातुन ज्या अगोदर माहीत नव्हत्या.

संघ ह्या विषयावरील आमची वैयक्तीक मते काहीही असली आणि कितीही टोकाची असली तरी आणि एकमेकांची आम्ही कितीही थट्टा मस्करी आणि कदाचित मैत्रीपूर्ण अपमान जरी केले तरी मिपाकर म्हणून मी सर्वांचाच आदर करते हे इथे लिहू इच्छिते. इथे होणारे वाद निरर्थक आहेत, भाषा शिवराळ आहे आणखी खूप काही बोलले गेले आहे पण सुलतान सारखा रद्दड चित्रपट पैसे देऊन ३ तास पाहण्यापेक्षा दिवसातील २० मिनिटे मी कधीही असल्या चर्चेत खर्च करेन. आणखी काही निष्पन्न झाले नाही तरी Sarcasm, टोमणे, सध्या कुठला महिना चालू आहे इत्यादी विषयांवर बुद्धी खर्च होते आणि त्यातून आपला फायदाच आहे. ४chan, ९gag सारख्या ठिकाणी वाद घालण्याची मला सवय आहे आणि त्या तुलनेत इथली तथाकथीत असभ्य भाषा म्हणजे ४ वर्षीय बालकांचे बोबडे बोल आहेत असे वाटते. संघाच्या चांगल्या गोष्टी नाहीत असेही नाही. लहानपणापासून कधीही दलित किंवा तथाकथित खालच्या जातीच्या लोकां बरोबर विशेष संबंध काडीचाही आला नव्हता. किंवा दुर्गम भागातील लोकांचे आयुष्य वगैरे कसे असते ह्याची काहीही माहिती नव्हती. संघाच्या प्रचारकांशी ओळख झाली आणि अश्या लोकां बरोबर ओळख आणि त्यांच्या समस्यांची जाणीव सुद्धा झाली. छत्तीसगड मधील आदिवासी मुलगा असो व ईशान्य भारत मधील विद्यार्थी ह्यांचे आमच्या घरी येणे जाणे झाले आणि त्यांच्या शिक्षणात वगैरे मदत करण्याचे भाग्य लाभले. त्यांना मदत करणे हि पुढील पायरी होती. "संघटन" ह्या विषयावर संघाचे काम अद्वितीय आहे आणि कदाचित फक्त आर्मी त्या बाबतीत त्यांना मात देऊ शकते. संघ दलित विरोधी आहे असे काही जण म्हणतात पण माझ्या लिमिटेड अनुभवांत अगदी उलटे लक्षांत आले. सर्व जात धर्माचे लोक सर्व भेदभाव विसरून अश्या प्रकारे एक येताना चुकून दिसतात. त्या दृष्टिकोनातून संघ अतिशय reformative आहे ह्यांत शंका नाही. भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम का असेना पण काँग्रेस ला पर्याय निर्माण करण्यात संघाचे योगदान आहे. भाजपाला पुन्हा ट्रेक वर आणून हिंदू हिट जपण्याचे काम सर्वच हिंदू मतदार करू शकतात. हिंदू समाजापुढे फार मोठ्या समस्या आहेत. ह्यांतील बहुतेक समस्याचे निर्मूलन करणे संघाच्या आवाक्या बाहेरचे आहे आणि सामान्य हिंदूने बाह्य सरसावून/पदर खेचुन/जीन्स थोडी लूज करून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. ह्यांतील बहुतेक समस्या संघाच्या रडार वर सुद्धा नाहीत. ह्या उलट पुराण कालीन इतिहास, गाय रक्षण, आणि अनेक निरर्थक आणि शून्य महत्वाच्या गोष्टीवर संघ आपली शक्ती वाया घालवत आहे. असल्या विषयांनी हिंदू समाजाची दिशाभूल होते प्रायोरिटी बदलतात आणि जिथे आपण लढायला पाहिजे होते तिथे शरणागती पत्करली जाते. त्या शिवाय संघ वटवृक्षा प्रमाणे आहे आणि त्याच्या सावलीतून इतर झाडांना वाढणे मुश्किल आहे. संघाच्या कामाचा नेट impact positive तेंव्हाच असेल जेंव्हा हिंदू समाज म्हणून आमच्या हितरक्षणासाठी अनेक संस्था आणि संघटना विविध स्तरावर काम करतील. सुदैवाने सु स्वामि, राजीव मल्होत्रा, वामसी झालुरी, कोएनराड एलस्ट, अरुण शौरी, शाश्वती सरकार, रविणार इत्यादी अनेक विभूती हे काम छान पणे करत आहेत आणि सोशल मीडिया वगैरे द्वारे त्यांना जास्त शक्ती सुद्धा मिळत आहे. ह्या प्रकारच्या लोकांना एकत्रित करून संघाला पर्याय निर्माण करणे आणि केवळ intellectual पातळीवर काम करणारे लोक निर्माण करणे फार महत्वाचे आहे आणि त्या दृष्टीने माझे काम सुरु आहे.

In reply to by साहना

उजव्या बाजूला संघापेक्षा चांगला कोणीतरी ऑप्शन हवा आहे. राईट, लिबरल. जे गौ माता, गो मुत्र, वैदिक विमाने, GM विरोध असल्या प्रकारात पडणार नाही. RTE सारख्या धोकादायक कायद्यांविरुद्ध प्लॅट्फॉर्म देईल. तो ऑप्शन सनातन सारखे लोक नकोत फक्त.

In reply to by अनुप ढेरे

सनातनचा विषय न काढलेलाच बरा. पण हिंदू विरुद्ध अन्याय होतो आहे आणि संघ/भाजप बोटचेपे धोरण अवलंबत आहेत ह्या मुले सनातन किंवा रामसेने सारखया संघटना टोकाची भूमिका घेत आहेत. राजकीय स्तरावर हिंदू हित न्याय्यपणे साधले गेले नाही तरी रामसेने किंवा सनातन सारख्या संस्था जास्त ह्यांत शंका नाही. आम्ही कॅलिफोर्निया मध्ये ग्लोबल धर्म फौंडेशन चालवतो (अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्र) . राजीव मल्होत्रा ह्यांनी भारतांत इन्फिनिटी फौंडेशन (संशोधन आणि प्रकाशन) सुरु केले आहे. संदीप ह्यांचे इंडियाफक्टस (मीडिया), प्रसन्ना ह्यांचे स्वराज्य (मीडिया) क्षेत्रांत फार चांगले काम सुरु आहे. ह्यांना आपण मदत करू शकता. मी स्वतः Bookstruck.in द्वारे भारतीय साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे. माझ्या मते संघ सारखी वेगळी प्रचंड संघटना हिंदू साठी गरजेची नाही एका छोट्या मुद्द्याला पकडून शेकडो लोकल संस्था असल्या तरी चालतील. अश्या संस्था गरजेप्रमाणे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ न्यायाने चालू शकतात. गोव्यांत भाभासुम हे कार्य करते त्याच प्रकारचे कार्य लोकल संघटना संघ पेक्षा जास्त चांगल्या करू शकतात. संघात राहून वेलिंगकर साराख्यान सुद्धा ते काम करायला शक्य झाले नाही. बहुतेक वेळा संघटनेची व्याप्ती आणि संघटनेचा focus ह्यांत ट्रेडऑफ असतात. ह्यामुळे संघटना जितकी मोठी तितक्या तडजोडी जास्त.

या धाग्यावर संघावर केले गेलेले बिनबुडाचे आरोप (आरोप करणार्‍यांनी अजूनपर्यंत आरोपांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा दिलेला नाही.) - - संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि भारतीय संविधान मानत नव्हता. - खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच. - १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते. - बाबासाहेब पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून प्रचार केला - संघाने इफ्तार पार्टी आयोजित केली. - संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते. - थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी. - संघ कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणतो - संघ खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवतो व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करतो - जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात. - संघाचे सोंग म्हणजे "वृद्ध नरी पतिवृता" ह्या प्रकारचे आहे. चार मुंडकी आहेत म्हणून सांगताना आहे पण त्यांत आणि झोंबी मध्ये फरक काही नाही म्हणून तीच भर कम्युनिस्त ह्यांना भारी पडतात. - मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल. - हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात - कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. - संघाचे वैचारिक पातळीवर अस्तित्वच नाही मुळी. - माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका घेतला आहे अश्या प्रकारे संघ वागतो आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो - मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते. - दलितांवर केलेल्या अत्याचाराचे कुठलेही पुरावे दिले तरी त्यात संघाचा काही सहभाग नाही असे म्हणण्याची सोय अर्थातच उपलब्ध आहे. - संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे - दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम वगैरेंमध्ये अनेकदा संघिष्ठ आणि त्यांच्या समविचारी संघटनाच अग्रेसर असतात. - मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो .

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी , त्यातील एक विधान माझे आहे... त्याचे स्पष्टीकरण देत आहे... १९४२ ... http://www.frontline.in/static/html/fl1503/15031150.htm http://scroll.in/article/697147/what-exactly-was-vajpayees-role-in-the-… संघवाले असं घडलंच नाही , असे म्हणत होते... पण फ्रंटलाइन्चे इन्वेस्टिगेशन व स्वतः युगपुरुषांचा त्याला दिलेला दुजोरा सत्य सांगतो.

In reply to by श्रीगुरुजी

ह्यातील बहुतेक विधाने माझी आहेत. "ख्रिस्ती म्हणजे हिंदू, भारत देशावर प्रेम असलेला प्रत्यके जण हिंदू पण ख्रिस्ती लोकांची घरवापसी करायला पाहिजे कारण हे ख्रिस्ती म्हणजे हे हिंदू पोपला मानतात आणि ह्या असल्या ख्रिस्ती हिंदूंची लोकसंख्या वाढली कि देशाला धोका उत्पन्न होतो" अश्या प्रकारच्या दैवी महातर्काचा बिमोड करण्याची बौद्धिक कुवत माझ्या कडे नाही. ख्रिस्ती लोक पण हिंदू पण काही कारणास्तव ह्या हिंदूंचा देशाला धोका आहे हे सगळे समजण्यासाठी मला कदाचित पंचगव्य इत्यादी दैवी शक्तींनी युक्त असलेले दिव्य द्रव्य प्यावे लागेल. संघवाल्यानी खुशाल "आम्ही विजयी झालो" अश्या घोषणा देत विरुद्ध दिशेने संचलन करावे. > मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते. सादर दिव्यवचन मी माजी सरसंघचालक पपू सुदर्शनजी ह्यांच्याच मुखातून स्व-कानांनी ऐकले होते आणि त्या दिवसापासून संघाच्या कुठल्याही कार्यक्रमा पासून दोन हात दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

मजेदार धागा व चर्चा. विटेकरसाहेबांनी मला केलेली एक खरड टाकतो, समजदार को इशारा काफी: मी विचारले: आपण संघात मोठ्या पदावर काम करता असे समजते. पण इथल्या चर्चांमधे भाग घेत नाही. असे का?
विटेकर Wed, 30/03/2016 - 12:18 .........पण इथल्या चर्चांमधे भाग घेत नाही. असे का? इथल्या चर्चाना फारसा अर्थ असतो असे मला वाटत नाही , कोणाला करायचे काहीच नाही , नुसत्याच वंझोट्या चर्चा ! यापेक्षा अधिक आनंददायी करण्यासारखे पुष्कळ आहे, असे माझे अनुभवांती मत बनले आहे. तसा वेळ सत्कारणी लागतो , इथेच मिपावर अन्य वाचणेबल पुष्कळ आहे / असते, त्यातच वाचन मात्र राहातो , वाट्ल्यास प्रतिसाद देतो ही , पण फार हिरीरीने काही लिहू गेल्यास त्यातून मनोभेद होत राहतो , साध्य काहीच नाही ! आणि तसे ही माझी व्यक्तिगत धारणा ही आता बदलण्याच्या पार पल्याड गेली आहे. Its like sacred cow. विनोदनासाठी काय करावे याबाबत ही माझी धारणा पक्की आहे, I do not enjoy it anymore. संघ विचारांच्याबाबतीत काही वैचारिक प्रतिवाद करावा असेही काही आता राहिले नाही, कृतीने ते अधिक व्यवस्थित मांडले जाते , माणसे प्रेमाने जिंकता येतात, आपल्या कामाने जिंकता येतात. ज्यांना केवळ शाब्दिक बुडबुडे करायचे आहेत , त्यांच्यासाठी आपण वृथा का शिणावे ?
संघाच्या बाबतीत मी आता विटेकर सरांच्या विचारानुसार वागायचं ठरवलं आहे. इथे तावातावाने भांडणारे संघसमर्थक विटेकर सरांच्या विचारानुरुप कधी वागतील ते त्यांचे ते ठरवू देत, आपण का वृथा शिणावे?

छत्रपतींना ज्यांनी अवतारी पुरूष जाहीर केले ती संघटना म्हणजे एक चमत्कार च आहे. संघाचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे वेगळे.

हिन्दूत्वासाठी मरायला मावळे व चरायला कावळे. त्याचे नाव हिन्दूत्व.

साहना, १.
अश्या प्रकारच्या दैवी महातर्काचा बिमोड करण्याची बौद्धिक कुवत माझ्या कडे नाही.
अगदी बरोबर बोललात. मात्र यात तुमचा दोष नाही. मेकॉलेछाप शिक्षणापासून सुटायचा मार्ग खडतर आहे. २.
सादर दिव्यवचन मी माजी सरसंघचालक पपू सुदर्शनजी ह्यांच्याच मुखातून स्व-कानांनी ऐकले होते
मेकॉलेछाप शिक्षणाच्या पगड्यापासून मुक्त होण्याची गरज सुदर्शन यांनाही आहे/होती. आ.न., -गा.पै.

साहना, विषय निघालाच आहे तर विचारतो, सनातन संस्थेचा इतका दुस्वास का? की तिचा विषयही नको काढायला? कारण जाणून घ्यायचं कुतूहल आहे म्हणून विचारतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वेगळा विषय आहे ! पपू आठवले साहेब (हल्ली काय विशेषणे वापरतात ठाऊक नाही) ह्यांची ओळख फार फार वर्षांपूर्वी मी लहान होते तेंव्हा एका बिल्डिंगच्या सचिवांनी (त्यांच्या मागे) करून दिली होती त्यांनी काय विशेषणे लावली होती हे मी इथे लिहू शकत नाही. मी त्या विषयावर बोलणे म्हणजे शेणात दगड फेकणे होईल. सनातनची माझी टीका फार वेगळ्या पातळीवरची आहे.

You said साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे It's a contrast statement. because a hungry stomach makes short prayer.

In reply to by सचु कुळकर्णी

म्हणजे गरीब लोकांना पुस्तके देऊ नये का ? उद्या कोणी गरीब लोकांसाठी शाळा काढीत असेल तर तो मूर्ख आहे का ?

लहानपणापासून कधीही दलित किंवा तथाकथित खालच्या जातीच्या लोकां बरोबर विशेष संबंध काडीचाही आला नव्हता. किंवा दुर्गम भागातील लोकांचे आयुष्य वगैरे कसे असते ह्याची काहीही माहिती नव्हती. Lol ;). Sahana ji Punyachya aahat ka ? Mag barobar aahe Pune to California. Kharya American lokana suddha America baheril jagach Afaat knowledge asta ;)