Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 84392
प्रतिक्रिया 480

प्रतिक्रिया

In reply to by रविकिरण फडके

१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा? बाकी श्रद्धेचं बाजारीकरण हे आत्ता नाही, फार पूर्वीपासून होतंय. मी शाळेत असताना (१९८० च्या दशकात) हे विषय निबंधाला यायचे म्हणजे बघा. स्वतःची ताकद आणि उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी लोक धार्मिक उत्सवांचा आश्रय घेताहेत हे वाईट नक्कीच आहे पण हे करण्यात बाकीचे राजकीय पक्ष किंवा संघटना पुढे नाहीत असं आहे का? तुम्ही संघावर खुशाल आरोप करा पण जरा वस्तुस्थितीला धरून करा. अस्मितेचं राजकारण या देशात पूर्वीपासून होत आलेलं आहे आणि सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी जबाबदार आहेत. एका संघटनेकडे बोट दाखवून बाकीच्यांविषयी चकार शब्दही न काढणं हे करुन संघविरोधक स्वतःची विश्वासार्हता कमी करुन घेत आहेत, बाकी काही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अहो बाकीच्या संघटना चमत्कार असल्याचे धागे कधी येतात का? लष्कर ए तोयबा एक चमत्कार, किंवा मनसे एक चमत्कार. असे? चमत्काराची भाषा करणाऱ्यांबाबत त्या धाग्यावर त्या संघटनेबाबततच विस्ताराने चर्चा होणार.

In reply to by आजानुकर्ण

त्यांना उत्तर देऊ दे ना. तुम्हाला जे विचारलंय त्यावर बोला की. संघविरोधाने माणूस आंधळा झाला की basic manners पण विसरायला होतात हे माहित नव्हतं!

In reply to by बोका-ए-आझम

बेसिक मॅनर्स असे आहेत की चर्चाप्रस्ताव ओपन फोरमवर टाकल्यावर त्यावर सर्वांचे प्रतिसाद येणार. तुम्हाला वैयक्तिक एकाच व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर मालकांनी खरडवही आणि व्यक्तिगत निरोप असे दोन पर्याय दमड्या खर्च करुन उपलब्ध करुन दिले आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्ही काय पर्याय वापरावेत हे मी सुचवलं नाही. संवादाचे काय पर्याय उपलब्ध आहेत आणि ते कसे वापरले जातात हे सांगितलंय. ओपन फोरमवर चर्चा टाकल्यावर तिथं कुणीही प्रतिसाद देऊ शकतं. तिथं तुम्ही प्रश्न फडकेसाहेबांना विचारलाय पण मी प्रतिसाद दिल्यावर मला बेसिक मॅनर्स नाहीत, हे तुम्ही सांगताय. यावरुन तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे हे मला सांगायचं होतं. खुला फोरम आहे तिथं कुणीही प्रतिसाद देऊ शकतं. तिथं अमुकतमुक माणसानेच प्रतिसाद द्यावा आणि इतरांनी प्रतिसाद देऊ नये असं सुचवणं हा शुद्ध अडाणीपणा आहे. याउलट केवळ अमुकतमुक माणसानेच आपल्याशी संवाद साधावा अशी अपेक्षा असल्यास त्यासाठी इतर पर्याय मालकांनी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांना खरडवही (ओपन-वैयक्तिक संवाद) आणि व्यनि (खाजगी वैयक्तिक संवाद) असे म्हटले जाते. खुली चर्चा, खरडवही आणि व्यनि यांची कार्यपद्धती व उपयोग हे असे आहेत. आशा आहे तुम्हाला आता समजलं असेल. बाकी उठसूट दुसऱ्याला बेसिक मॅनर्स नाहीत, वैचारिक कावीळ झाली आहे, भाद्रपदामुळे उत्साह आलाय असं सांगणं हे संघाच्या शाखेत शिकवले जाणारे मॅनर्स आहेत की काय?

In reply to by आजानुकर्ण

बाकी बेसिकमध्ये लोचा, शुद्ध अडाणीपणा वगैरे वैयक्तिक प्रतिसाद चालतात वाटतं. ज्यांनी तुम्हाला संघविरोध शिकवला (स्वतःची मतं तुम्हाला आहेत असं दिसत नाही) त्यांनी हेच शिकवलेलं दिसतंय. काय करणार? मुद्दे नसले की माणूस वैयक्तिक होतोच. या आजारपणातून आधी बरे व्हा. मग चर्चा करु. ता.क. - कावीळ असा शब्द मी माझ्या कुठल्याही प्रतिसादात वापरलेला नसताना तुम्हाला तो दिसला. त्यावरून केस अगदीच हाताबाहेर जायच्या मार्गावर आहे हे दिसतंय. काळजी घ्या. काही झालं तर संघ येणार नाहीये उपचार करायला! ;)

In reply to by बोका-ए-आझम

अहो तुम्ही दुसऱ्यांचं रोगनिदान कायम करत असता त्यावरुन तो प्रतिसाद दिला होता. इथं वाचाः http://misalpav.com/comment/760207#comment-760207
गयी भैंस पानी में! बोका-ए-आझम - Fri, 23/10/2015 - 12:43 शरीरात असलेल्या काविळीवर उपाय असतो पण अशा वैचारिक काविळीवर काय उपाय असणार आहे?
इतकं परफेक्ट डायग्नॉसिस असल्यामुळे ते लक्षात राहिलं इतकंच. इथंही तुम्ही मुद्दे संपल्यावर लगेच दुसऱ्याचे मॅनर्स, किंवा भाद्रपद महिना काढायच्या भानगडीत आधी पडलात. मुद्दे नसला की माणूस वैयक्तिक होतो हे सगळ्याच चर्चांमध्ये दिसलं आहे. आता जशास तसे उत्तर देण्याची आमची जन्मजात खोड असल्याने तुमचा अडाणीपणा उघड केला यात वैयक्तिक काही नाही.

In reply to by आजानुकर्ण

मी आधी मांडलेल्या मुद्द्यांवर काहीही प्रतिसाद नाहीये तुमचा. आणि असेल अशी अपेक्षाही नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. नुसतं ९ वर्षे मिपावर आहात पण शिकला काहीच नाहीत आणि वर परत मला अडाणी म्हणताय. त्याने तुमचं अज्ञान सिद्ध होतंय. मला काहीही फरक पडत नाही, संघाला तर त्याहून पडत नाही. मला एवढं महत्त्व दिल्याबद्दल धन्यवाद! संघ नसतात तर तुमच्यासारख्या लोकांनी काय केलं असतं हा प्रश्न नेहमीच पडतो आणि मग संघाची आवश्यकता समजते. रच्याकने जशास तसे ही तुमची खोड आहे असं तुम्ही म्हटलंय. म्हणजे स्वतःच स्कोअर सेटलिंग करताय हे उघड केलंय. चालू द्या! अजून काही भरकटलेले मुद्दे असतील तर आणा. तेवढीच करमणूक!

In reply to by बोका-ए-आझम

संघ नसतात तर तुमच्यासारख्या लोकांनी काय केलं असतं हा प्रश्न नेहमीच पडतो आणि मग संघाची आवश्यकता समजते.>>>>> संघाच्या विचारांपासून दूर राहिल्यामुळे आमचं खूप बरं चाललंय. नाहीतर "ठेविले अनंत तैशेची राहावे" हे इतके मनामध्ये घट्ट बनवले होते की "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" हे लग्न ठरल्यावर लक्ष्यात आले. (तीळ टीप : वारकरी संप्रदायात संघ प्रणित कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांचे फक्त एकांगीच विचार अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पसरवले. बाकी वारकरी संप्रदाय बद्दल लिहण्याचा माझा प्रयास आहे, नक्कीच मिपा वर प्रकाशित करेल.)

In reply to by बोका-ए-आझम

कोणीही बोलू शकतो, पाठिंबा देऊ शकतो, विरोधही करू शकतो. बोलण्याचा आणि न बोलण्याचा अधिकार प्रतिसादकर्त्याकडेच राहाणार. तुम्ही कितीही 'बोला, बोला' म्हणून म्हटले तरी न बोलण्याचा अधिकार आणि तुम्ही आग्रह नाही केला तरी बोलण्याचा अधिकार. दोन्ही.

In reply to by रविकिरण फडके

संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे हा अधिक मोठा सल आहे
अधोगतीस? तो कसा काय? जरा स्पष्ट करून सांगा की संघामुळे समाजाची अधोगती कशी झाली ते.
माझ्या मनात. सन 1993 पासून आपल्या शहरांत (निदान मुंबईत तरी नक्कीच) तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले आणि मोठ्या प्रमाणात उत्सवांना सुरुवात झाली. गणपती तर आधीपासूनच गोंगाटमय होते. त्यात दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, अशांची भर पडली. उदा. ह्या वर्षी प्रथमच आमच्या भागात माघी गणपतीला गणपती बसवला गेला आणि त्यासाठी स्टेशनकडे जाण्यासाठी जेमतेम दोन फूट सोडून बाकी सर्व जागेत स्टेज उभारले गेले. मग मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम हे सगळे आलेच. ह्यास आळा घातला गेला नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. आळा कोण घालणार म्हणा? चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रद्धेचे बाजारीकरण होतेय, हिंदू धर्मापासून लोक दूर जाण्याचा धोका आहे, हिंदू धर्माबद्दल आणि हिंदूंबद्दल एक नेगेटिव्ह इमेज निर्माण होते आहे, परिणामी, ज्या हिंदू धर्माबद्दल संघ इतका भरभरून बोलतो त्या हिंदू धर्माचेच नुकसान होणार आहे, ह्याचे भान जर संघाच्या मान्यवरांना नसेल तर पुढे काही बोलण्याजोगे नाही. आणि जर असेल तर ते इतके हतबल आहेत का हे गैरप्रकार रोखण्यास? तसे असेल तर माझा मुद्दा आपोआप सिद्ध होतो.
हे सर्व उत्सव संघाने सुरू केलेले नाहीत. संघ फक्त २ उत्सव सार्वजनिक रूपात साजरे करतो. ते म्हणजे गुढीपाडवा व दसरा. या दोन दिवशी संघ स्वयंसेवक संचलन करून हा उत्सव साजरा करतात. गणेशोत्सव हा संघ जन्मायच्या किमान ४० वर्षे आधी सुरू झाला. वाढत्या लोकसंख्येनुसार हा उत्सव साजरा करणार्‍यांची संख्याही वाढली. मुंबई, पुणे इ. शहरातून जशीजशी परप्रांतियांची संख्या वाढली त्यानुसार त्या त्या लोकांनी दुर्गापूजा, छटपूजा इ. आपले स्थानिक सण सुरू केले. हे सण सुद्धा संघाने सुरू केलेले नाहीत. दहीहंडी, गणेशोत्सव, दुर्गापूजा इ. सणांना बाजारी स्वरूप स्थानिक पुढार्‍यांमुळे आले आहे. संघाचा यात दोष नाही. मोठमोठे मंडप, स्पीकर्सच्या काळ्या भिंती, वर्गणीची दादागिरी, रस्ते अडविणे इ. साठी संघाला कसे जबाबदार धरता येईल?
पण असो. संघ काही फालतू माणसांनी केलेल्या शंकांना उत्तर देणार नाही. दिलेच तर ते 'संघ विचारांची पुस्तके वाचा नाहीतर शाखेवर जा' असे काहीतरी असेल. त्यामुळे माझ्या शंका अनुत्तरीतच राहणार!
साखरेची गोडी समजून घ्यायची असेल तर साखर खायला हवी. तद्वत संघ समजायचा असेल तर संघ अनुभवणे हेच करावे लागेल. नाहीतर सार्वजनिक सणांच्या बाजारीकरणाला सुद्धा संघाला जबाबदार धरण्याची चूक केली जाईल.

आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद पूर्ण पटले. बाकी भाद्रपद चालू आहे वगैरे कॉमेंटा टाकणार्‍यांनी असभ्य भाषेची तक्रार करावी हे मात्र रोचक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

बोकशेठ, भाद्रपदाचा धागाविषयाशी, चालू चर्चेशी असलेला संबंध संदर्भ स्पष्ट कराल काय? समजला नाही म्हणून विचारतोय!

In reply to by संदीप डांगे

आज तिथी भाद्रपद शुद्ध त्रयोदशी आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०१६. मी ती प्रतिक्रिया टाकली तेव्हा १४ सप्टेंबर तारीख होती. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. आता लोकांना गैरसमज करुन घ्यायचा असेल तर मी काय करु शकतो? बरं, धाग्यावर असलेले सगळे प्रतिसाद धाग्याशी संबंधित असावेत असा नियम असल्यास दाखवावा.

In reply to by बोका-ए-आझम

फक्त 'भाद्रपद'हा प्रतिसाद असभ्य असून धाग्याशी संबंधित नाही. बाकी 'चड्डी पिवळी', 'अस्वलाची विष्ठा', 'माकड' इ. भारदस्त प्रतिसाद धाग्याशीच संबंधित आहेत.

In reply to by संदीप डांगे

भाद्रपद प्रतिसाद असभ्य व विषयाशी असंबधित वाटला. पण पिवळी चड्डी, माकड, अस्वलाची विष्ठा इ. प्रतिसादांवर सोयिस्कर मौन! चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

काहीही?? पिवळी चड्डी, अस्वल, माकड इत्यादी थेट संघी लोकांना उद्देशून आहे, तर पिसाळलेत इत्यादी थेट मिपाकरांना उद्देशून दिसतात, संघी लोकांना थेट अपशब्द वापरल्याची जबाबदारी त्या आयडीने घेतली आहेच, तुम्ही आणि बोकशेठ यांनी मात्र इथे चर्चा करणाऱ्या काही मिपाकरांना उद्देशून अभद्र भाषा वापरत आहात व त्याची जबाबदारी टाळत आहात असे दिसले. वर भाद्रपद चे स्पष्टीकरण विचारले कारण बोकशेठ यांच्या मते ते अभद्र नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीही हेच शब्द कुणी वापरले त्यांची हरकत नसावी. संघसमर्थक, मोदीसमर्थक, भाजपासमर्थक ह्यांना अपशब्द वापरले गेले तर तडक येऊन 'अरेरे, चू चू, वाईट झालं, दर्जा घसरला, मिपाकर म्हणून शरम वाटली' इत्यादी प्रतिसाद देणारे काही सदस्य, उलट झाले की गपचिप, सोयीस्कर मौन पाळतात हे हि तुमच्या लक्षात आले असेल. चंपाबाईने कुणाही मिपाकराला अभद्र शब्द वापरल्याचे दिसले नाही पण त्यांच्याविरुद्ध जे शब्द वापरले गेले त्याबद्दल कोणालाही आक्षेप असल्याचे दिसले नाही, उलट काही लोक तर मजेने आनंद घेताना दिसतात. बाकी चर्चेत मला काही रस नाही, मिपाकरांना ते कोणत्या बाजूने आहेत हे बघून सन्मान दिला जातो का हा प्रश्न पडला म्हणून आलो.

In reply to by संदीप डांगे

साहेब, कोणाच्या अध्यामध्यात नसणार्‍या 'चित्रगुप्त' काकांना खवट म्हातारा म्हणणारे तुम्हीच ना ? तुम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे का ?

In reply to by संदीप डांगे

पिवळी चड्डी, अस्वल, माकड इत्यादी थेट संघी लोकांना उद्देशून आहे, तर पिसाळलेत इत्यादी थेट मिपाकरांना उद्देशून दिसतात,
पिसाळलेत हा शब्द तमाम मिपाकरांना उद्देशून आहे हा गैरसमज का करून घेतलात? ज्या लोकांना वैचारिक प्रतिवाद करता येत नाही, संघ काय चुकीचे करतो हे सांगताच येत नाही व निव्वळ संघद्वेषातून पिवळी चड्डी, अस्वल, माकड असे शब्द वापरून अर्वाच्य व असभ्य प्रतिसाद देतात, केवळ त्यांच्यासाठी हा प्रतिसाद होता कारण संघाविषयी कोणी काही बरं बोललं की अशांचं डोकं फिरून ते पिसाळल्यासारखे घाण प्रतिसाद द्यायला लागतात. इतर मिपाकरांबद्दल हे लिहिलेले नाही.
संघी लोकांना थेट अपशब्द वापरल्याची जबाबदारी त्या आयडीने घेतली आहेच, तुम्ही आणि बोकशेठ यांनी मात्र इथे चर्चा करणाऱ्या काही मिपाकरांना उद्देशून अभद्र भाषा वापरत आहात व त्याची जबाबदारी टाळत आहात असे दिसले.
वर स्पष्टीकरण दिले आहे.
वर भाद्रपद चे स्पष्टीकरण विचारले कारण बोकशेठ यांच्या मते ते अभद्र नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीही हेच शब्द कुणी वापरले त्यांची हरकत नसावी.
ते बोकाशेठ ठरवतील.
संघसमर्थक, मोदीसमर्थक, भाजपासमर्थक ह्यांना अपशब्द वापरले गेले तर तडक येऊन 'अरेरे, चू चू, वाईट झालं, दर्जा घसरला, मिपाकर म्हणून शरम वाटली' इत्यादी प्रतिसाद देणारे काही सदस्य, उलट झाले की गपचिप, सोयीस्कर मौन पाळतात हे हि तुमच्या लक्षात आले असेल.
पिवळी चड्डी, अस्वल, माकड इ. शब्द असणारे अत्यंत असभ्य व अर्वाच्य प्रतिसाद तुम्हाला खटकले नाहीत, त्यामुळे तुम्ही सोयिस्कर मौन पाळलेत. विशेषतः आपण शिक्षणक्षेत्रात आहोत असा दावा करणार्‍या व्यक्तीकडून इतकी खालची पातळी गाठली जावी हे जास्त खेदकारक आहे. परंतु भाद्रपद शब्द मात्र तुम्हाला खटकला. हेच मी दाखवून दिले होते.
चंपाबाईने कुणाही मिपाकराला अभद्र शब्द वापरल्याचे दिसले नाही पण त्यांच्याविरुद्ध जे शब्द वापरले गेले त्याबद्दल कोणालाही आक्षेप असल्याचे दिसले नाही, उलट काही लोक तर मजेने आनंद घेताना दिसतात.
अत्यंत असभ्य व घाण प्रतिसाद दिल्यामुळे या आयडीचे आजतगायत किमान २५-३० आयडी डीलिट झाले आहेत. या धाग्यावर सुद्धा या आयडीचे सर्व प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा म्हणजे त्यातील अभद्रपणा लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, 'कारण संघाविषयी कोणी काही बरं बोललं की अशांचं डोकं फिरून ते पिसाळल्यासारखे घाण प्रतिसाद द्यायला लागतात. इतर मिपाकरांबद्दल हे लिहिलेले नाही' >>> संबंधित सदस्य असभ्य भाषेत बोलला म्हणून तुम्हीही तशीच भाषा वापरली व ते योग्यच आहे असे आपले समर्थन आहे का? तुम्ही म्हणता इतर मिपाकरांसाठी नाही म्हणजेच बाजू बघून सदस्यांचा आदर-अनादर केला तर चालतो असे आपले मत दिसते, मीही तेच म्हटले. माझा मुद्दा फक्त एका मिपासदस्याने दुसऱ्या मिपाकाराबद्दल बोलतांना कसे सभ्यपणे बोलावे ह्याचे येताजाता जे ज्ञानामृत दिले जाते त्याबद्दल आहे. साहना ह्यांनी कोणत्या मिपासदस्यबद्दल उपरोक्त उद्गार काढले आहेत का? आता केजरीवाल म्हटले की तुम्हालाही बरेच काही होते तेव्हा असे शब्द थेट तुमच्याबद्दल वापरले तर योग्य असेल काय? कि भाजप/संघाला शिव्या दिल्या कि पिसाळलेले, गरळ ओकणारे पण केजरीवालला/काँग्रेसला शिव्या दिल्या कि ते पवित्र सुसंस्कृत विचार असे दोन दृष्टिकोन असावेत? बाकी, कुणाचा अभद्रपणा हा अभद्रपणा ठरतो हे त्याची कोणती बाजू आहे त्यावर अवलंबून आहे असेच वाटत आहे. मला तर दोन्ही बाजूंचे अपशब्द तितकेच आक्षेपार्ह वाटत आहेत, पण माझा मुद्दा वेगळा होता त्याचा संघाशी नाही तर मिपाशी व इथल्या चर्चेच्या दर्जाशी संबंध आहे.

In reply to by संदीप डांगे

माझा मुद्दा फक्त एका मिपासदस्याने दुसऱ्या मिपाकाराबद्दल बोलतांना कसे सभ्यपणे बोलावे ह्याचे येताजाता जे ज्ञानामृत दिले जाते त्याबद्दल आहे. साहना ह्यांनी कोणत्या मिपासदस्यबद्दल उपरोक्त उद्गार काढले आहेत का?
म्हणजे फक्त मिपासदस्यांबद्दल अयोग्य उद्गार काढले तर ते निषेधार्ह. पण मिपासदस्याने इतर कोणाबद्दलही म्हणजे एखाद्या संघटनेबद्दल, त्या संघटनेच्या सदस्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल असभ्य उद्गार काढले तर मात्र ते तुमच्या दृष्टीने अयोग्य नाही.
मला तर दोन्ही बाजूंचे अपशब्द तितकेच आक्षेपार्ह वाटत आहेत, पण माझा मुद्दा वेगळा होता त्याचा संघाशी नाही तर मिपाशी व इथल्या चर्चेच्या दर्जाशी संबंध आहे.
तुम्ही फक्त भाद्रपद या शब्दाबद्दलच निषेध नोंदविला. त्यापूर्वी अनेक प्रतिसादातून जी असभ्य भाषा वापरली गेली त्याबद्दल अजूनही तुमचे मौन आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मिपासदस्याने इतर कोणाबद्दलही म्हणजे एखाद्या संघटनेबद्दल, त्या संघटनेच्या सदस्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल असभ्य उद्गार काढले तर मात्र ते तुमच्या दृष्टीने अयोग्य नाही.
ठिक आहे, म्हणजे ते तुमच्या दृष्टीने अयोग्य आहे. बरोबर? मग मिपासदस्याने केजरिवाल ह्या व्यक्तिलाच एक शिवी आहे असे म्हणणे हे योग्य नाही असेच तुमच्या ह्या आताच्या वरच्या मतावरुन दिसते. पण ते तुम्ही पाळले का? (मला केजरिवाल किंवा आपबद्दल फार प्रेम आहे म्हणून तेच उदाहरण देतोय असे समजू नये, केजरीवालचे उदाहरण तुमच्याच भूमिकेचे पांगळेपण दाखवण्यासाठी आहे, जे तुम्हीच निर्माण करुन ठेवलेले आहे)
तुम्ही फक्त भाद्रपद या शब्दाबद्दलच निषेध नोंदविला.
वरच्या माझ्या कोणत्या प्रतिसादातुन भाद्रपद या शब्दाबद्दल मी 'निषेध नोंदवला' आहे ते आपल्याला दिसले ते मलाही दाखवा. बोकाशेठना भाद्रपद चा फक्त संदर्भ विचारला आहे, बाकी निषेध म्हणाल तर त्या वरच्या वाक्यात सर्वच पातळी सोडून असलेल्या प्रतिसादांचा आहे, त्यात संघसमर्थक वा विरोधक असे कोणतेही वर्गिकरण मी करत नाही. तुम्हाला तुमच्या सोयीने गोष्टी मांडायच्या असतील तर तो तुमचा विषय. माझी काहीच हरकत नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

> पिवळी चड्डी, अस्वल, माकड इ. शब्द असणारे अत्यंत असभ्य व अर्वाच्य प्रतिसाद तुम्हाला खटकले नाहीत अलंकारिक भाषेला आपण असभ्य म्हणू शकत नाही. माकड किंवा अस्वले इत्यादी शब्दप्रयोग metaphorical दृष्टीने केले होते आणि अतिशय प्रचलित इंग्रजी वकक्प्रचारांचे ते अनुवाद आहेत. ह्या उलट कानफटात वाजवणे, तुमची कीव येत आदी आदी पर्सनल हल्ले असून फार खालच्या पातळीचे आहेत.

In reply to by संदीप डांगे

भाद्रपद महिना चालू आहे आत्ता हे म्हणणं चुकीचं आहे का? त्याचा कोणीही काहीही अर्थ काढेल. तो अश्लीलही असेल. ज्यांच्या डोक्यात अश्लीलता आहे त्यांना काहीही अश्लील वाटू शकतं. तुम्ही त्यातले असाल असं वाटलं नव्हतं. हे पाहून सखेद आश्चर्य वाटलेलं आहे. असो. गैरसमज करुन घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

ओह! भाद्रपद चा संदर्भहीन उल्लेख बघता प्रचलित अर्थानुसार जो असतो तोच घेतला जाईल ह्याबद्दल तुम्हाला शंका आली नाही ह्याचं मला आत्ता खरंच आश्चर्य वाटत आहे.. असो, आम्ही पापी मनाचे आहोत हे तुम्ही 'वाटून' घेतलं त्याबद्दल तक्रार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

ज्यांच्या डोक्यात अश्लीलता आहे त्यांना काहीही अश्लील वाटू शकतं. तुम्ही त्यातले असाल असं वाटलं नव्हतं. हे पाहून सखेद आश्चर्य वाटलेलं आहे ^^^ हे आपलेच शब्द आहेत, तेव्हा "आमच्या डोक्यात अश्लीलता आहे हे आपण 'वाटून' घेतलं ह्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही" असा बदल करून घेतो,

In reply to by संदीप डांगे

संडांस चालू।। संदीप डांगे सर चालू असा याचा फुल फॉर्म असून कोणीही विकृत विचार करू नये।।

In reply to by क्षमस्व

नक्कीच! ज्याच्या त्याच्या प्रतिसादावरून त्याची त्याची पातळी कळते, हे आधीच म्हटले आहे, त्व तुम्हालाही लागू आहेच! रच्याकने, संपादक मंडळ लक्ष देण्यास समर्थ आहेतच! ;)

साहना, १.
समजा १० हजार गरीब हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखाली संघाला ते चालेल काय ?
तुम्ही पराभूतवादी जन्महिंदू आहात म्हणून तुम्हाला अशा उफराट्या कल्पना सुचतात. मोठ्या आवेशात विचारात होतात ना की हिंदुत्वाची व्याख्या काय म्हणून? ती व्याख्या कशासाठी करायची असते याचा थांगपत्ता तरी आहे का तुम्हाला! तुमचंच उदाहरण उलटवून देतो. समजा १० हजार गरीब ख्रिस्ती हिंदू धर्मात परततांना आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखालीच त्यांची घरवापसी करावी लागेल. कळलं आता हिंदुत्वाची व्याख्या कशाशी खातात ते? २.
सदर फरक तुम्हाला ठाऊक नाही ह्यात आपला गोंधळ दिसून येतो.
त्याची तुम्ही चिंता करू नये. भारतातला ख्रिस्ती माणूस रोमकडे नजर न लावता येशुभक्त हिंदू बनला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या थोडीफार (= रोमकडे नजर न लावता) बदलायला लागली तरी चालेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> तुमचंच उदाहरण उलटवून देतो. समजा १० हजार गरीब ख्रिस्ती हिंदू धर्मात परततांना आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखालीच त्यांची घरवापसी करावी लागेल. कळलं आता हिंदुत्वाची व्याख्या कशाशी खातात ते? घरवापसी ? पण ते हिंदूच आहेत तर घरवापसी आणि कसली ? वापस कशामध्ये ? > येशुभक्त हिंदू बनला पाहिजे येशूभक्त हिंदू असू शकत नाही. ख्रिस्ती असण्यासाठी एकेश्वरवादि असणे आवश्यक आहे. एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म kompetibal नाही. उगाच माझ्या हिंदू धर्माचे हे विकृतीकरण करू नका.

In reply to by साहना

१.
घरवापसी ? पण ते हिंदूच आहेत तर घरवापसी आणि कसली ? वापस कशामध्ये ?
वेड पांघरून पेडगावांस जाताय? घरवापसी केल्याने पोप आणि मुल्लांचे कळप घटतील. जिथे हे कळप फोफावले ते भाग भारतापासून तुटले हे माहितीये ना? २.
येशूभक्त हिंदू असू शकत नाही. ख्रिस्ती असण्यासाठी एकेश्वरवादि असणे आवश्यक आहे. एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म kompetibal नाही.
येशुभक्त हिंदू आहेत. पंडिता रमाबाई यांची मुलगी मनोरमा स्वत:स येशुभक्त आणि हिंदू दोन्ही मानंत असे. फार काय वसईचे सामवेदी ख्रिश्चन सर्रास दत्ताची भक्ती करतात. हिंदूंप्रमाणे उपासही करतात. अशांना पोपचा मार्ग फोल आहे हे पटवून देणे म्हणजे घरवापसी. येशू आणि पोप मधला फरक तुम्हाला माहित नाही का? ३.
उगाच माझ्या हिंदू धर्माचे हे विकृतीकरण करू नका.
हिंदू धर्म काळाप्रमाणे बदलत आला आहे. म्हणूनच तो टिकून आहे. पूर्वी हिंदू धर्मात घरवापसी नव्हती. पण सिंध प्रांतात मुस्लिमांचा जोर वाढल्यानंतर देवलस्मृती लिहिली गेली. तीत घरवापसीची कृती दिली आहे. असेच धोरण आजही राबवावे लागेल. तुम्हाला ते हिंदू धर्माचं विकृतीकरण वाटलं तर दोष तुमच्या मेकॉलेछाप शिक्षणाचा आहे. संघाचा नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by साहना

एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म काँपॅटिबल नाही? कृपया या विषयावर स्पष्टीकरणासाठी एक वेगळा धागा काढावा ही विनंती.

संघ आज फोफावत असताना त्याला पोटदुखे विरोधक निर्माण होणं साहजिक आहे पण आपण विरोध का करतो हे मात्र नेमकेपणाने सांगता येऊ नये हीच खरी गोची आहे स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या संस्थांचं कुठे चुकलं हे सांगता येऊ नये म्हणूनच तर हा चमत्कार आहे

In reply to by नर्मदेतला गोटा

स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या संस्थांचं कुठे चुकलं हे सांगता येऊ नये म्हणूनच तर हा चमत्कार आहे
चला, झालं ना सिध्द? ओके. आज या टिकानी मी आलेल्या श्रोत्यांचे, भांडणार्‍या श्रोत्यांचे, वक्त्यांचे, प्रवक्त्यांचे अन त्यांच्या युक्त्याप्रयुक्त्यांचे आभार मानतो. या टिकानी त्यांचा हार आनि पुच्छगुच्छ देऊन सत्कार करण्यात येईल. रांगेने यावे. तोपर्यंत चला रे उचला सतरंज्या, काढा स्पीकर अन मांडव. लै झालेय भाडे.

In reply to by नर्मदेतला गोटा

मोघम बिघम नाही गोट्याराव, अभ्यास वगैरे होतच राहतो. मला राहून राहून एक प्रश्न पडतो "सेवा दलासारख्या संघटनेतून घडलेले कडवे कार्यकर्ते हीच कुठल्याही संघटनेची, आन्दोलनाची ताकद असते" हि विचारसरणी असणार्‍या माणसाची "संघ: कलियुगातील चमत्कार" अशी वाटचाल कशी झाली? एकूणच सानेगुरुजी अन सेवादलाविषयीचे आपले ममत्व ५ वर्षात कसे लोपले? अर्थात त्यांच्याविषयी ममत्व दाखवायला ते जागेवर पाहिजेत हा मुद्दा नाहीच. पण बाटग्याची बांग ह्या न्यायाने तुम्ही मला संघाच्या अधिक अभ्यासाची सूचना न करता, शांतपणे संघाच्याच पध्दतीने काम केलेत तर अधिक बरे होईल. धन्यवाद

In reply to by अभ्या..

प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध तुम्हीच करताय आणि उत्तरेही तुमची तुम्हालाच मिळत आहेत चांगली गोष्ट आहे.

In reply to by नर्मदेतला गोटा

प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध तुम्हीच करताय आणि उत्तरेही तुमची तुम्हालाच मिळत आहेत चांगली गोष्ट आहे.
ह्याला मोघमपणा म्हणतात. मला काहीच सिध्द करायचे नाहीये. फक्त जाणून घ्यायचेय की अशी कशी झाली वाटचाल? ते तर तुम्हीच सांगणार ना.

आतापर्यंतची चर्चा आणि प्रतिसाद वाचले , बहुतेक प्रतिसादातून एक दिसून आले कि लोकांना एकतर संघ चांगला वाटतो किंवा वाईट वाटतो. संघाची चांगली आणि वाईट बाजू मांडणारे प्रतिसाद काही वाचले नाहीत . यावरून मिपावर एकतर टोकाचे संघ समर्थक किंवा टोकाचे संघ विरोधक आहेत . हिंदू धर्मातील चुकीचा चालीरीतींना विरोध झालाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे पण बाहेर च्या जगात काही लोक फक्त हिंदू धर्माबाबतीत सत्यवादी बनतात आणि इतर धर्माबाबत मूग गिळून गॅप बसतात यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो . माझ्या मतानुसार संघाची काही काम चांगली आहेत तर काही वाईट आहेत म्हणून संघाचं विश्लेषण करताना दोन्ही गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत . माझ्या मतानुसार संघाचे दोन चेहरे आहेत. एक म्हणजे सामाजिक चेहरा ज्यात संघाची समाजउपयोगी कामे येतात उदारणार्थ आदिवासी कल्याण , ईशान्य भारतात सामाजिक काम , शाळा आणि इतर सामाजिक संस्थांची बांधणी , विविध भागातील आणि जातीतील हिंदूंचे एकीकरण इत्यादी यांचा समावेश होतो . थोडक्यात काय तर संघाचा सामाजिक चेहरा उजळलेला दिसतो . मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो . संघ, राजकीय चेहरा तलवार म्हणून वापरतो तर सामाजिक चेहरा धाल मानून वापरतो . म्हणजे वार राजकीय चेहऱ्याने करायचा मात्र हल्ला झाल्यास सामाजिक चेहरा पुढं करायचा. असो सांगायचं एव्हडच आहे कि संघाचं विश्लेषन त्याच्या दोन्ही बाजू विचारात घेऊन व्हावे . असो भरपूर मुद्दे चर्चिले गेल्याने काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता, अशी अपेक्षा करतो. अवांतर: लोकसत्ताने मदर तेरेसा वरती लिहलेला अग्रलेख मागे घेऊन माफी मागितली होती काय बर कारण असावं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राच्या ह्या भूमिकेमागे ? (अर्थात माझा मदर तेरेसांना कोणताही विरोध नाही )

In reply to by अमितदादा

काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता, अहो असं कसं ५०० आकडा पार व्हायचाय ना एवढ्यात जन गण मन कसं वाजवताय?

In reply to by अमितदादा

माझा विरोध आहे कारण 1) केवळ लोकांना ख्रिस्ती करायचे म्हणून समाजसेवा हा गर्हणीय उद्योग झाला. 2) कोलकात्याची व भारताची तिने बदनामी केली - किंवा ती कारणीभूत झाली त्यासाठी. 3) तिला संत वगैरे घोषित करण्याची व पर्यायाने एक ख्रिस्ती पूजास्थान भारतात तयार करण्याची पोपला संधी मिळाली. 4) तिला नोबेल मिळाले त्यामुळे काही वावदूक लोकांचे फावले. तिच्याहून खूप जास्त लायक माणसे होती नोबेलसाठी. तिच्याबद्दल इंटरनेटवर बरेच काही उपलब्ध आहे. राजीव मल्होत्रा ह्याचे ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक पाश्चिमात्य संस्थांच्या आणि सरकारांच्या कारवायांवर चांगला प्रकाश टाकते. थेरेसाचा उदो उदो हा त्या षड्यंत्राचाच एक भाग आहे.

In reply to by रविकिरण फडके

बर्र्र्र्र .. लेप्रसी आता गेला. आता टीबी व एड्सचा धुमाकूळ सुरु आहे.. तुम्हीही टीबी एड्सचे आश्रम काढून समाजसेवा व धर्मप्रसार असे दोन्ही करून दाखवा. २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवून काम करा. सोबत संघ, विहिंप, शंकराचार्य पीठ इ इ सामील करुन घ्या. तुम्हालाही नक्की मिळेल. शुभेच्छा. जगात रोग व रोगी दोन्हींची कमतरता नाही.. मदरला शिव्याशाप देण्यापेक्षा एखादा रोग तुम्हीही धरा व तुम्हीही माऊली मुक्ताई होऊन दाखवा. कुणी अडवले आहे का?

In reply to by चंपाबाई

तुम्ही आहात ना एड्स्च्या प्रांतात तुम्ही व्हा मदर तेरेसा, सुट्पण करेल तुम्हाला. बाई-माणसाला जास्त सहानुभुती मिळते. फक्त चेहर्यावर जरा कोमल भाव असु द्या. आणी साडी कोणती काळी का बिनाकाठा पदराची ??????

In reply to by इरसाल

आम्ही आहोतच हो .... पण संघ, विहिंप ज॑र कुठे एड्स टीबी आश्रम जवळपास काढेल तर त्याना आम्ही ऑनररी म्हणून सेवा जरुर देऊ. आमच्या हस्पिटलाच्या एरियात एक लेप्रेअसी मिशन होते.. लेप्रसी कमी झाल्यावर ते मिशनरी लोकानी एड्स टीबीत कन्वर्ट केले. आमचे बरेच पेशंट कधीकधी किरकोळ आजाराना तिथे अ‍ॅडमिट होतात.

In reply to by चंपाबाई

मदर तेरेसा यांचा संधर्भ देण्यामागे हे कारण होत कि एरवी लोकसत्ताचे अग्रलेख हिंदू धर्म, चालीरीती आणि संस्था यावर तीव्र ताशेरे ओढते. काही मुद्दे पटतात काही मुद्दे पटत नाहीत परंतु व्यक्तिस्वातंत्र आणि माध्यमस्वतंत्र याचा विचार करता वृत्तपत्रांना असे बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत . ज्यांना मुद्दे पटत नाहीत ते वाचक नंतर पत्रे पाठवून आपआपली मते नोंदवत असत . परंतु मदर तेरेसा यांचावर लिहलेला लेख मागे घेऊन माफी मागितली जाते हे आश्चर्य वाटत . त्या अग्रलेखात भाषा आणि मुद्दे मलाही खटकले होते, तसेच बऱ्याच वाचकांनी पत्रे लिहून मुद्दे खोडून काढले होते त्यामुळे हा विषय इथेच थांबाय हवा होता. परंतु माफी मागण्याचा सौज्यन्य फक्त ख्रिस्ती धर्मासाठीच का , त्यावेळी कुठं गेलेलं व्यक्तिस्वातंत्र आणि माध्यमस्वतंत्र ? असो ह्या विषयावर आणखी चर्चा नको नाहीतर धाग्याचा विषय भरकटवल्याचा आरोप व्हायचा . दुसरी गोष्ट, चंपाबाई तुम्ही हिंदू धर्माविषयी तसेच संघाविषयी मांडलेली काही मते नक्कीच पटतात . परंतु तुम्ही असे विचार इस्लाम विषय मांडलेली पाहण्यात आलेलं नाही. तसेच तुमची सगळी मते विचारात घेता असे दिसून येते कि तुमचा हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध नाही तर हिंदू धर्मालाच विरोध आहे. आज इस्लाम दहशतवादाने जगापुढं गंभीर समस्या निर्माण केली, इस्लाम धर्मियातील इतर वंशीय लोकांवर अन्याय होतो , महिलांचं दमण होत , इस्लाम धर्मातले काही विचार अत्यंत खोडसाळ, मूर्ख आणि कालबाह्य आहेत . यावरती येऊद्या कि मत आपलं . तसेच ह्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना परत एकदा हिंदू धर्मातील वाईट गोष्टी सांगू नका , कारण त्यावरती भरपूर धागे प्रतिसाद मिपावर सापडतील. तसेच ह्या धाग्यावर आपलं म्हणणं नाही मांडलं तरी चालेल नवीन धागा घेऊन या, आणि फक्त वाईट गोष्टीच नाही तर इस्लाम धर्मियांमधील चांगल्या गोष्टी विषयी हि सांगा , म्हणजे आमचे काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. धाग्याचा विषय थोडा भरकटला तर क्षमस्व , पण ह्या आयडी च्या बोलण्यातून हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टी जाऊन चांगल्या गोष्टी याव्यात असा हेतू नसून फक्त टीका करणे आणि स्वतःच्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचं हि समर्थन करणे हा असतो.

In reply to by चंपाबाई

लेप्रसी आता गेला.
म्हणजे? देवीप्रमाणे समूळ उच्चाटन?

In reply to by बोका-ए-आझम

कुष्टरोगी दाखवा, कैतरी इनाम मिळवा अशा जुन्या सर्कारी जाहीराती लहानपणी वाचल्याचे स्मरते. म्हणजे बहुतेक उच्चाटन झाले असावे.

In reply to by बोका-ए-आझम

अजुन आहे. पण प्रमाण अगदी अगदी कमी आहे.

In reply to by अमितदादा

"लोकसत्ताने मदर तेरेसा वरती लिहलेला अग्रलेख मागे घेऊन माफी मागितली होती काय बर कारण असावं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राच्या ह्या भूमिकेमागे ?" मला समजलेले कारण असे कि एक्सप्रेस ग्रुपचा अगदी सर्वात वरचा बॉस कॅथॉलिक ख्रिस्ती आहे त्याने संपादकाला व्यक्तिगत माफीसकट तो लेख मागे घे नाहीतर परिणामांना समोर जा (म्हणजे डिसमिस!) असा ultimatum दिला. खरे खोटे देव जाणे. हे खरे असेल तर पहा ख्रिस्ती लोक किती जागरूक असतात ते त्यांच्या धर्माच्या प्रतिमेबद्दल!

In reply to by रविकिरण फडके

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं. किंवा कदाचित लेख मागे घेतला कारण तो लेख खोडसाळपणा होता असेच मानावे लागेल, नै का? बाकी, लोकसत्तातील लेख, लोकसत्ताचे केतकर म्ह्णजे सुमार केतकर इ इ बोलणारा हिंदुत्वीय ग्रूप या एका लेखाबाबत मात्र लोकसत्तेशी प्रेम दाखवतो, हाही एक योगायोगच नै का ?

In reply to by चंपाबाई

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं. चम्पाबै ते वर्तमानपत्र म्हणजे काही सरकारी कचेरी नव्हे बॉस ला न घाबरायला,खाजगी आहे तिथे तुम्हीही असा वेडपट पणा केला तर तुम्हाला दुसरा आय डी सुद्धा मिळणार नाही.

In reply to by चंपाबाई

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं. चम्पाबै ते वर्तमानपत्र म्हणजे काही सरकारी कचेरी नव्हे बॉस ला न घाबरायला,खाजगी आहे तिथे तुम्हीही असा वेडपट पणा केला तर तुम्हाला दुसरा आय डी सुद्धा मिळणार नाही.