Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 84392
प्रतिक्रिया 480

प्रतिक्रिया

'संघे शक्ति कलौ युगे,' असं एक वचन आहे. त्याला अनुसरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. सांप्रत, संघाच्या विविध सेवाभावी संस्थांना जे यश आणि पाठिंबा मिळत आहे त्याच्या मागे हीच शक्ती (चमत्कार नाही)असावी.

In reply to by श्रीनिवास टिळक

सोंगे शक्ती कलीयुगे ... अशीही एखादी म्हण असावी... सोंग काढणे हीही एक शक्तीशाली कला कलियुगात विकसित झाली आहे.

In reply to by चंपाबाई

पुरूष असताना बाईचा आयडी असल्याचे सोंग घेणे किंवा अनेकवेळा हाकलून लावलेले असताना सुद्धा लोचटपणे पुन्हा पुन्हा इथे घोटाळणे ही कोडगेपणाची शक्तिशाली कला तुमच्यात चांगलीच विकसित झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ज्येष्ठ नागरिक असताना शेंबड्या पोराप्रमाणे ढगळ चड्डी घालून हवेत दंड फिरवीत काल्पनिक म्लेंच्छाची डोकी फोडणाऱ्या बाबत आपले काय मत आहे ? उत्तिष्ठ, उपविष करताना "चप्पल प्रमुख" सारख्या उच्च पदावर जबाबदारीचे सोंग आणणाऱ्या बाबत आपले काय मत आहे बरे ?

In reply to by साहना

अस काही वाचल की संघ अधिकाधिक बळकट होतोय, तसेच २०१९ साली मोदी परत निवडून येणार असे वाटायला लागते. :)) २०१४ साली संघ व मोदी विरोध असाच उफाळून आला होता व भाषा तर याहूनही खतरनाक होती. तुम्ही छुपे मोदी समर्थक तर नाही ना? ;-)

In reply to by शाम भागवत

साहेब , उघडा डोळे बघा नीट (किमान) गुजरतेतल्या बातम्या, अत्युच्च पातळीला पोचले की भल्याभल्या संस्कृतींचा ऱ्हास होतो. हे बीजेपी काँग्रेस आप वगैरे यःकिश्चित राजकीय पक्ष आहेत. (केवळ नियतीस इमानदार असलेला कुत्रा) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

:) तस काही नाही हो. राग व द्वेष यांची मात्रा जरा जास्त वाटली म्हणून अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा उपयोग केला.

साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली.
हिंदू धर्म उद्धारार्थ प्रकातलेल्या ह्या संघटनेला इफ्तार पार्टी का आयोजित करावी लागली बरे ?? रेफ- 2 जुलै 2016, दिल्ली

In reply to by श्रीगुरुजी

मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ यांच्यात काहीच सबंध नाही का ? आता टेक्निकल गोष्ट उभ्या करून , जसे की इफ्तार मुरामं ने आयोजित केलाय, संघाने नव्हे; धूळफेक होऊ लागलीय.

In reply to by पगला गजोधर

आप समज्या नहीं भाई जान जे काही चांगले आहे ते संघ, आक्षेप घेण्यासारखे आहे ते सगळे आऊट सोर्ज्ड आहे हो. रस्त्यात मारामारी करणारे, तोडफोड बजरंग दल. अपघात स्थळी मदत घेऊन पोचणारे संघ. भ्रष्टचार करून पैसे खाणारे भाजपवाले. रक्तदान करणारे संघ वाले. इफ्तार करणारे मुस्लिम मंच, दसऱ्याच्या दिवशी घोष वाजवणारे संघ. कम्युनिस्टां प्रमाणे बुरसटलेली आर्थिक नीती असणारा तो मजदूर संघ, गुरुपौर्णिमेला ध्वजवंदन करणारा फक्त संघ. थोडक्यांत काय तर संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते.

In reply to by श्रीगुरुजी

http://muslimrashtriyamanch.org/ हे चेकवा.
It was on December 24, 2002 a group of nationalist Muslims and functionaries of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) came together in Delhi. The occasion was Id Milan and the program was organized at the initiative of noted journalist, writer and ..
http://muslimrashtriyamanch.org/

In reply to by अनुप ढेरे

संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय विचार मंच यांच्यात काय संबंध दिसतो या लेखातून? एका कार्यक्रमात संघाचे नेते व काही मुस्लिम नेते एकत्र आले व नंतर त्या मुस्लिम नेत्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्यातील दरी मिटविण्यासाठी या मंचाची स्थापना केली. संपला संबंध. विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.
नॉन-स्टेट-ऍक्टर संघटना जसे की पाकिस्तानात, जमात-उल-दावा हिच्याशी पाकिस्तान सरकार, सैन्यदल, आय एस आय, पाकिस्तान पीपल्स पार्टी इत्यादींचा संबंध नाही ....

In reply to by श्रीगुरुजी

पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे. मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.

In reply to by पगला गजोधर

काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे.
सात्यकी सावरकर यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही लेखन त्यांच्याकडे आहे, ते त्यांनी सार्वजनिक करून, पूर्ण चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?

In reply to by पगला गजोधर

खरे आहे.. या संघटनांपैकी बर्‍याच संघटना पूर्वाश्रमींच्या संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या दिसतात. श्रीराम सेना माहीत नाही, पण बजरंग दल वगैरे परिवाराशी नाते सांगतात यात संदेह नसावा. किंबहुना सध्या जो घोळ चालू आहे ते मराठी भाषा आंदोलन पण यातच येते.

In reply to by आनन्दा

संघाशी संबंधित संस्थांचे २-३ प्रकार आहेत. १) संघाने स्वतः सुरू केलेल्या उपसंस्था (यात विहिंप, अभाविप, भामंसं, वनवासी संघ, राष्ट्र सेविका समिती इ. चा समावेश होतो). या संस्था संघाने स्वतःहून सुरू केलेल्या असून संघाचे यांच्यावर नियंत्रण आहे. २) संघ स्वयंसेवकांनी स्वतःहून सुरू केलेल्या संस्था (यात ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण संस्था, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, बजरंग दल इ. चा समावेश होतो). या संस्था जरी संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केल्या असल्या तरी संघाशी यांचा तसा संबंध नाही व संघाचे यांच्यावर नियंत्रण नसते. ३) संघापासून स्फूर्ती घेऊन सुरू झालेल्या संस्था (उदा. मुस्लिम राष्ट्रीय मंच). अशा संस्थांवरही संघाचे नियंत्रण नसते व अशा संस्थांशी संघाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणताच संबंध नसतो ४) यात अजून एक प्रकार आहे. तो म्हणजे संघाच्या हिंदुत्व, राष्ट्रवाद इ. काही तत्वांशी काहीशी जवळीक असणार्‍या संस्था. यात पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, वंदेमातरम संघटना, हिंदू मुन्नेन मुन्नानी, शिवसेना, सनातन संस्था, हिंदू जागृती मंच, श्रीराम सेने इ. चा समावेश होतो. संघाचा या संस्थांशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणता संबंध नाही. संघाचे या संस्थांवर कोणतेही नियंत्रण नाही किंवा संघ यांना मार्गदर्शनही करीत नाही. परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.

In reply to by श्रीगुरुजी

परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.
'असे कांगावा करणारे' यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही पूर्ण सत्य चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?

In reply to by पगला गजोधर

मुळात संघ आणि संघाचं हिंदुत्व यांवर निदान बेसिक वाचन चालु करावं ही विनंती. एकदा बेस कळाला कि बरेचसे प्रश्न पडणार नाहीत. पहिलं मुळं पक्कं करा. विनंती.. आ.न. अनिरुद्ध

In reply to by साहना

हिंदु नक्की कोणाला म्हणावं? जी व्यक्ती अखंड हिंदुस्तान वा आपला भारत यांवर अत्यंत मनापासून, प्रेम करते मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरीही ती हिंदूच.... संघ हे प्रमाण मानतो.. स्वा. सावरकरांची हिंदुत्त्वाची व्याख्या जी संघ मानतो ती अशी आहे. परिपूर्ण, व्यापक, पण निश्चित. ..........."आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका........... पितृभूपुण्यभूश्चैव........... स वै हिंदुरीतिस्मृतः" जो सिंधुनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या ह्या विशाल खंडप्राय देशाला, आपल्या वाडवडीलांची, पूर्वजांची भूमी मानतो, तसेच पवित्रभूमी मानतो, तो हिंदू.

In reply to by अनिरुद्ध प्रभू

व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही. "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? " आपली हिंदू धर्माची व्याख्या सुद्धा गोंधळ उडवणारी आहे. १. आपण दिलेली व्याख्या आणि सावरकर ह्यांची व्याख्या ह्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या दोन्ही सामान नाही आहेत. २. मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात. ३. जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ? ४. आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ अ-हिंदू मानतो काय ? बाली किंवा कंबोडिया मधील हिंदू संघाच्या मते अ-हिंदू आहेत का ? ५. ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे भारतावर प्रेम आहे ? तथाकथित संत तेरेसा ह्यांचे भारतावर प्रेम आहे म्हणून त्यांना आम्ही हिंदू मानायचे का ? मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही आहे काय ? थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.

In reply to by साहना

प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी देउ शकतो पण एवढ सगळं टाईप करायचा कंटाळा आणि तेवढा नसलेला वेळ पाहता आपली भेट घेण्यास उत्सुक आहे... बाकी आपल्या कोर्टात चेंडु...आपण ठरवावे...मी आहेच!!

In reply to by साहना

"थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही" तुमचा नेमका राग स्वयंसेवकांवर का चड्डिवर का तो तुमचा वैचारिक गोंधळ ?

In reply to by साहना

Anyone who is the national of this country, irrespective of being a Shaiva, Shakta, Vaishnava, Sikh, Jain, Muslim, Christian, Parsi, Buddist or Jew by way of his creed or mode of worship, is a Hindu. http://www.archivesofrss.org/why-hindu-rashtra.aspx When a Muslim Swayamsevak of RSS was questioned about Sangh's definition of 'Hindu' and 'Hindu Rashtra', he said that a Hindu is a person who has been born and brought up in Hindustan, and 'Hindu' is not a religion, it's a way of life. The idea of unity in diversity has been path of the Indian culture since ancient times and Indian cultural identity is defined by Hindutva, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat said on Sunday. http://www.thehindu.com/news/national/hindutva-is-indias-identity-rss-c…

रविकिरण फडके,
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत.
अहो, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही संघाची जबाबदारी नाही. ही कामं संघाने केली तर पोलीस काय करणार मग? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी खालील प्रकारे आहे. सदर कामे करायला आणखीन कुणालाही वेळ नसल्याने हि पुण्याची कामे संघ करतो. "रेप इंडियात होतात भारतात होत नाहीत" अशी थोर वचने निर्माण करणे, स्वतः अविवाहित असून स्त्री मंडळींना त्यांच्या वस्त्रां बद्दल अनाहूत सल्ले देणे गो मूत्र आणि गो विष्ठा ह्यांचे विविध उपयोग लोकांना सांगणे हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी लोक (ख्रिस्ती, मुस्लिम सुद्धा) "हिंदू" आहेत असे सांगून अमेरिकन भारतीय हिंदू कडून हिंदू स्वयंसेवक संघाच्या नावाने देणग्या घेणे. हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी ख्रिस्ती सुद्धा (म्हणे) हिंदू असले तरी सुद्धा धर्मांतराच्या नावाने बोंब मारणे. बौद्धिकामध्ये चाचा नेहरूंना शिव्या देणे आणि मीडिया मध्ये नेहरूंनी संघाची कशी स्तुती केली होती असे कंठ दाटून सांगणे फोटोशॉप मध्ये स्वदेशी किती चांगली आहे असे ग्राफिक्स करून फेसबुक वर टाकणे संघ कसा व्यक्तिपूजक नाही हे गुरुजी आणि डॉक्टर ह्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्या तसबिरी समोर सांगणे भारद्वाज ऋषी ह्यांचे विमान शास्त्र वाचून विना इंधन चालणारे विमान गुप्त पणे निर्माण करणे. (टेस्ला वाले एलोन मूषक ह्यांनी ह्या प्रकल्पाचा फार मोठा धसका घेतल्याचे ऐकिवात आले) कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणणे RTE , हिंदू देवळे ह्या वरील सरकारी बळजबरी, इत्यादी महत्वाच्या हिंदू विषयावर मूग गिळून गप्प बसणे सर्व चांगल्या स्वतंत्र हिंदू विचारवंतांना वाळीत टाकणे आणि PN Oak किंवा कल्याणरामन सारख्या भोंदू विचारवंताचे लेखन प्रमोट करणे.

In reply to by साहना

१. खाजगीत गांधीजीना शिव्या घालणे व सार्वजनिक ठिकाणी ते संघास प्रातःस्मरणीय आहेत असा जयघोष लावणे. २. खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवणे व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करणे.

In reply to by साहना

साहना, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी संघाची नाही. यावर अचूक बोट ठेवल्याने तुम्हाला राग आलेला दिसतोय. चालायचंच! टालरन्स कमी झालाय खरा भारतातला! आ.न., -गा.पै.

एकंदरीत संघ हे एक वेगळं रसायन आहेच. संघाचे नाव खराब करण्यात काही अघोषित (अन अंतःकरणापासून जातीयवादी) भाट लोक पुढे असतात, दुर्दैवाने खुद्द संघातही असली माणसे कमी नाहीत ह्याचे एक कार्यकर्ता म्हणून वैषम्य वाटते

परीट मेला त्या दिवशी त्याची खरी ऐपत कळते कारण इतर दिवशी तो लोकांचे छान छान कपडे घालून फिरत असतो. मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल. संघाचे अनेक चांगले गुण आहेत. पण हे लोक आर्थिक अफरातफर करत नाहीत म्हणणे खोटे ठरेल. अफ़रातफ़रीच्या गोष्टी ते उघड बोलवून दाखवत नाहीत. कोर्टात सिद्ध होईल असे पुरावे नसल्याने मी माझे प्रथम दर्शनी अनुभव देणार नाही. शिक्षण क्षेत्रांत असे काय बरे दिवे लावले आहेत संघाने ? ह्यांच्या नाकाखाली काँग्रेस सरकारने RTE, ९३वि घटनादुरुस्ती इत्यादी हिंदू विरोधी गोष्टी पास केल्या. ह्यांची एकल विद्यालये ह्या खाली सध्या बेकायदेशीर ठरतील. मनोहर पर्रीकर ह्या खंद्या स्वयंसेवकाने गोव्यात कसला कायदा केला बरे ? तर म्हणे ख्रिस्ती शाळांना १००% सरकारी अनुदान आणि हिंदू शाळांना शून्य. काल हेडगेवार शाळेंत शाखा घेतली म्हणून कारवाईचा हुकूम दुसऱ्या स्वयंसेवकाने (पार्सेकर) दिला आहे. अखंड भारताच्या घोषणा देता देता गोव्यांत संघाचीच फाळणी झाली आहे. जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात. ९० वर्षे झाली तरी नाव घेण्यासारखे एक तरी पुस्तक ह्यांच्या बौद्धिका मधून आले आहे काय ? "आमच्या भारद्वाज ऋषींनी आधीच विमानाचा शोध लावला होता" आणि "शेण लावल्याने कॅन्सर बरा होतो" असली थोतांड ५ वर्षांच्या पोरांना सांगणे हि ह्यांची बौद्धिक कुवत. राम स्वरूप, सीता रॅम गोयल, अरुण शॉरी ह्यांची १० पुस्तके एका बाजूला आणि ९० वर्षांचे संपूर्ण संघ साहित्य दुसऱ्या बाजूला. गोव्यांत संघ वाले Inquisition म्हणून ओरडतात पण एक तरी पुस्तक ह्यांनी त्या विषयावर अभ्यास करून लिहिले आहे का ? त्या विषयावरचे पुस्तक प्रियोळकर ह्या स्वतंत्र विचारवंताने लिहिले आहे. ते तरी पुन्हा प्रकाशित करावे असा घोषा मी लावला होता पण ह्यांची हिम्मत नाही. संघाचे सोंग म्हणजे "वृद्ध नरी पतिवृता" ह्या प्रकारचे आहे. चार मुंडकी आहेत म्हणून सांगताना आहे पण त्यांत आणि झोंबी मध्ये फरक काही नाही म्हणून तीच भर कम्युनिस्त ह्यांना भारी पडतात.

In reply to by साहना

बंगाल मध्ये चालणार्या कम्युनिस्टांच्या अत्याचारांबद्दल आपले काय म्हणणे आहे हें सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by महासंग्राम

अत्याचार हे साम्यवादाचे व्यवच्छेदक कि काय म्हणतात ते लक्षण आहे. बंगाल असो वर केरळ सापाचा धर्म विष उत्पन्न करणे आहे.

In reply to by साहना

अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो. संघाबद्दल असलेल्या गैरसमजुतींबद्दल पूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे. पुन्हा तेचतेच सांगण्याचा कंटाळा आलाय.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी अतिशय धन्यवाद. संघाचा आणि संघाच्या कार्याचा व्यवस्थित अभ्यास होईल ह्या साठी ५ पुस्तके तुम्ही सुचवू शकता काय ? RTE ह्या विषयावर संघाची काय भूमिका आहे आणि ती त्यांनी कोठे मांडली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आपण मार्गदर्शन केले तर आपली आभारी राहीन.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी एकदा एक स्वतंत्र लेख लिहाच.. आम्हाला पण रेफरन्सला उपयोग होईल.. फक्त खालील गोष्टी टाळाव्यात. १. संघभक्तीपर लिखाण. संघाची बाजू मांडा, पण आंधळी भक्ती नको. २. संघाच्या कार्याचा लेखाखोजा देखील मांडा अशी विनंती.

In reply to by साहना

मनोहर पर्रीकर ह्या खंद्या स्वयंसेवकाने गोव्यात कसला कायदा केला बरे ? तर म्हणे ख्रिस्ती शाळांना १००% सरकारी अनुदान आणि हिंदू शाळांना शून्य.
माझे वरचे प्रतिसाद आणि तुम्हीच दिलेल सर्क्युलर पुन्हा वाचून समजून घ्या. गुरुजींनी वर ट्रान्सलेट केलयं ते वाचल तरी चालतय:)

In reply to by प्रीत-मोहर

+ १ गोवा सरकारच्या त्या परिपत्रकात अत्यंत सोप्या शब्दात ६ मुद्दे लिहिले आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी सोपा आहे व त्यात कोणतीही संदिग्धता नाही. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरुच राहील, नवीन शाळांना प्रोत्साहन देऊन अनुदान दिले जाईल व ज्या अनुदानित शाळा जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम स्वीकारले आहे अशा शाळांना सुद्धा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनुदान कायम राहील हे मुद्दे अत्यंत सोप्या शब्दात लिहिले आहेत. ख्रिस्ती शाळा, हिंदू शाळा असे त्या परिपत्रकात शब्दच नाहीत. कोणत्याही शाळांचे अनुदान काढून घेतलेले नाही. परंतु त्या परिपत्रकात काय लिहिलंय ते अजिबात न वाचता किंवा वाचले असल्यास अजिबात अर्थ न समजता खालच्या पातळीवर जाऊन, पर्रीकरांनी हिंदू शाळांचे अनुदान काढून घेतले व ख्रिस्ती शाळांना १००% अनुदान दिले असे धडघडीत खोटे आरोप पर्रीकरांवर आणि पर्यायाने संघावर करून व त्यांच्यावर टीकेचा भडीमार करून ते मोकळे झाले.

In reply to by साहना

परीट मेला त्या दिवशी त्याची खरी ऐपत कळते कारण इतर दिवशी तो लोकांचे छान छान कपडे घालून फिरत असतो. मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल.
नरसिंहरावांच्या काळात एक नवीन कायदा करण्याचा प्रयत्न सुरू होता. जे पक्ष धर्मावर अन्याय वगैरे प्रचारसभेत बोलतात त्या पक्षांची मान्यता रद्द करून त्यांना निवडणुक लढण्यास बंदी घालावी असा कायदा करण्यासाठी अर्जुनसिंग जोरदार प्रयत्न करीत होते. या कायद्याचे निमित्त करून भाजप व शिवसेनेवर बंदी घालावी असा त्यांचा हेतू होता. परंतु भाजपने या विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे हा प्रयत्न बारगळला. युपीएने आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये Communal Violence Bill या नावाने नवीन कायदा आणण्याचा जोरदार प्रयत्न अगदी ऑक्टोबर २०१३ पर्यंत केला होता. देशातील जातीय दंगलींसाठी त्या भागातील बहुसंख्य असणार्‍या धर्माला (म्हणजे हिंदूंना) जबाबदार धरण्यात यावे अशा तर्‍हेची तरतूद त्या विधेयकात होती. भाजपने या विधेयकाला सुद्धा जोरदार विरोध केल्यामुळे तो बारगळला.
जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात.
संघ इफ्तार पार्ट्या देण्यासारख्या फालतू गोष्टी करीत नाही. आजवर असे संघाने कधीच केलेले नाही. मोदींनी सुद्धा आजतगायत गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा एकसुद्धा इफ्तार पार्टी आयोजित केलेली नाही. एकंदरीत या सदस्याचा वरील प्रतिसाद व या धाग्यावरील इतर प्रतिसाद शून्य अभ्यास व संघाविषयीचा ओतप्रोत द्वेष दर्शवितात.

RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच संघाचा आणि भाजपाचा. आता सत्तेत असूनदेखील या महत्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा देखील करावीशी वाटत नाही. RTEआधीच्या घटनांबद्दल हा लेख वाचा. http://swarajyamag.com/economy/how-congress-enshrined-sectarianism-in-i…

साहना, तुमचे इथले प्रश्न वाचले. मी स्वत: संघाचा स्वयंसेवक नाही. तरीही प्रश्नांची उत्तरं देतो. कारण प्रश्न हिंदुत्वाशी संबंधित आहेत. १. >> व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही. हे शब्दांचा कीस पाडणे आहे. २. >> "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? >> हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? " संघाच्या कुठल्या पुस्तकात काय आहे ते माहित नाही. पण मला हाच प्रश्न कोणी दहा वर्षाच्या मुलाने केला तर मी सांगतो की एक सत्य आणि अनेक रूपं हे हिंदू धर्माचं सार आहे. एको सत्य विप्रा: बहुधा वदन्ति. ३. >> मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये >> प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात. ख्रिस्ती वा मुस्लिमांस हिंदू मानायला काय अडचण आहे? ज्याप्रमाणे काबा, जेरुसालेम वगैरे पवित्र स्थानं आहेत त्याचप्रमाणे भारतभूदेखील पवित्र माना की. प्रश्न मिटला. किंबहुना दोन भूम्या पवित्र मानणारी एक जात भारतात इतरांसोबत गुण्यागोविन्द्याने नांदत आली आहेत. कोकणातले शनवारतेली म्हणजे बेणे इस्रायली लोकं जेरुसलेमप्रमाणे भारतालाही पवित्र मानतात. कारण की ज्याप्रमाणे अब्राहमला जेरुसलेम मध्ये देवाचं दर्शन झालं, अगदी तस्संच दर्शन खंडाळा (रायगड जिल्हा) येथे काही शनवारतेल्यांना झालं होतं. त्यांच्या मते भारत जेरुसालेम इतकाच पवित्र आहे. अब्राहम व शनवारतेली वगळता इतर कोण्याही यहुद्यांस देवदर्शन झालं नाही. जर शनवारतेल्यांना भारत आपला वाटतो तर ख्रिस्ती आणि मुस्लिमांना का वाटू नये? ४. >> जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? >> धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ? भारताचे जे भाग धर्मांतरित झाले ते भारताहून तुटले. म्हणून धर्मांतर वाईट. ५. >> आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ >> अ-हिंदू मानतो काय ? माहीत नाही. पण मानत नसावा. ६. >> ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू >> स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे >> भारतावर प्रेम आहे ? भारतावर प्रेम करणारे लोकं मूर्त्या फोडणे, हिंदूंवर अत्याचार करणे, इत्यादी कामे करत नाहीत. ७. >> मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि >> वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही >> आहे काय ? ही वैचारिक दिवाळखोरी नाही. हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही. याअर्थी त्यांना हिंदू म्हंटले आहे. मात्र बेणे इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे उर्वरित हिंदूंचा द्वेष करीत नाहीत त्याप्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिमांनी वागावं. बस इतकंच. ८. >> थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. माझा तरी आजिबात गोंधळ उडाला नाही. ९. >> "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. माझ्यासारखा थोर विद्वानास विचारायचे प्रश्न कोण्या चड्डीधारी स्वयंसेवकास विचारणे हे आपणांस अल्पबुद्धीचे लक्षण वाटंत नाही का? १०. >> हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. राष्ट्र आणि दहशतवाद या शब्दांच्या व्याख्या करतांना युनोची भंबेरी उडते. ११. >> हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. मग उसनवारीवर काय नाहीये ते जरा सांगणार का? ३९५ कलमं असलेली भारताची राज्यघटनाही उसनवारीवर घेतलेली म्हणायची का? १२. >> ती सुद्धा समजली अर्धवट. ही संघाची समस्या नव्हे. १३. >> गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. काय झालं मग? चांगले ते घ्यावे. अवघे मिळमिळीत टाकावे. हे रामदासस्वामींनी सांगितलंय. १४. >> आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी. हे मात्र बरोबर बोललात. संघाच्या जबाबदार लोकांत देखील भारताच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल औदासिन्य दिसून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही. हे विधान मूर्खपणाचे आहे. इस्लाम, ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म हे पूर्णपणे विरोधी आहेत. "आपला तो एकाच देव आणि मूर्तिपूजक म्हणजे heathens" असली भावना असणाऱ्या भोंदू धर्माला हिंदू म्हणणे म्हणजे अष्टमीला बीफ कबाबचा नेवैद्य दाखवणे आहे. त्या शिवाय धर्मांतर झाले कि देशाची फाळणी होते पण ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहेत हे जरा डोक्यात नाही गेले. at this rate उद्या कुणी "जय श्री कृष्ण" म्हणजे "थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी" असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by साहना

अस ऐकल आहे की अरबस्तानात जर एखादा भारतीय मुस्लीम गेला तर त्याला हिंदू मुस्लिम म्हणतात. हाहाहा कित्ती तो वेडेपणा अरब लोकांचा ह.घ्या. :-)

In reply to by साहना

साहना, भारतातले ख्रिस्ती आणि मुस्लिम पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत या विधानात मूर्खपणा कसला? उद्या हिंदूंच्या भावना तुडवणं बंद केलं तर ख्रिस्ती/मुस्लिम आणि हिंदूंमध्ये फरक तो काय उरला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समजा १० हजार गरीब हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखाली संघाला ते चालेल काय ? ---- सदर फरक तुम्हाला ठाऊक नाही ह्यात आपला गोंधळ दिसून येतो. कळावी वेंकट ह्या स्वतंत्र हिंदू अभ्यासकांचे हे पुस्तक जरूर वाचावे किमान त्याचा रिव्यू तरी वाचावा https://pothi.com/pothi/book/kalavai-venkat-what-every-hindu-should-kno… रेव्हिएव: http://koenraadelst.blogspot.com/2014/05/a-hindu-argues-circles-around… मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म समजण्यासाठी त्याचे धर्म ग्रंथ खोलांत वाचणे आणि प्रत्यक्षांत त्या धर्माचे पालन कसे केले जाते हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणजे अनेकेश्वरवादि, मूर्तीपूजक, निसर्गपूजक धर्म आहे. ह्या सर्व गोष्टींना एकेश्वरवादी धर्म "जनावरापेक्षाही खाली" मानतात. कुराण बायबलची शिकवणच तशी आहे. उदा मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे. आपण एक तर मुस्लिम असू शकता नाही तर गणेशपूजक. कारण खुनाला अल्लाह माफ करतो, मूर्तीपूजेला नाही. ख्रिस्ती देव Jealus God आहे. बलात्काराला माफी करेल पण दुसऱ्या देवाच्या पूजेला नाही. हिंदू धर्म आणि ख्रिस्ती/मुस्लिम धर्म ह्यांच्यात काहीही सामान्य नसून फक्त विरोध आहे. हे धर्म Exclusive आहेत. बौद्ध, जैन किंवा शीख हिंदू असू शकतात, अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन लोक सुद्धा कदाचित हिंदू धर्माच्या छत्री खाली राहू शकतात पण ख्रिस्ती, मुस्लिम , जु, पारसी ह्यांना त्या छत्रीत (त्यांचा धर्म सोडल्या शिवाय) प्रवेश नाही. आपल्याही धर्माचा अभ्यास नाही , दुसऱ्यांच्या धर्माचाही खोल अभ्यास नाही आणि त्यावर "ख्रिस्ती हिंदू सगळे सेम" असले विचार. हे विचार मूर्खपणाचेच आहेत असे नाही तर अतिशय घटक सुद्धा आहेत. --- एका मित्राने सांगितलेली सत्य घटना. दिवाळीच्या दिवशी एक मुस्लिम फकीर घरी बक्षीस मागणीसाठी हजार झाला. परंपरे प्रमाणे आम्ही त्याला गूळ आणि पाणी दिले. त्याने पैसे दान म्हणून मागितले. आई पैसे द्यायला तयार झाली इतक्यांत आजीने. मुस्लिम फकिराने आम्ही पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. "सभी एकही अल्लाह के बंदे है बीबीजी, आपला भगवान भी हमारे लिये अल्लाह है" म्हणून आपला हेका सोडला नाही. आजी एकदम खमकी होती. "ठीक आहे, ये है आमची तुळस, इस्को हम भगवान मानके हम पाया पडता है तुम अल्लाह मानके तुम्हारा नमस्कार करो और पैसे दान में लेके जाओ". ह्या तिच्या वाचनावर फकिराला राग आला आणि "हम बूट कि इबादत नाही करता" असे बोलून तो चालत झाला.

In reply to by साहना

मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे. संदर्भ मिळेल का ?

In reply to by सुबोध खरे

आणि "तुमच्या" बामियान येथील बुद्धाच्या प्राचीन मूर्ती फोडणारे कोण संघवाले होते का? कि सर्वात शुद्ध आणि पवित्र म्हणवणारे महंमदाच्या वाटेने चालणारे (सुन्नी) तालिबान होते?

हे माझे संघाबाबतचे मत आहे. ;)

संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे जुने पूर्वग्रह उफाळून वर आलेले आहेत. संघ या विषयावर यापूर्वी असंख्य वेळा चर्चा झालेली आहे. पुन्हापुन्हा तेचतेच उगाळायचा कंटाळा आला आहे. संघविरोधकांना संघाला विरोध करताना वैचारिक किंवा तात्विक पातळीवरून चर्चा करता येत नाही व त्यामुळे संघावर टीका करताना ते एकदम खालची पातळी गाठतात हे काही प्रतिसादांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्याप्रमाणे हजार पानांचा प्रबंध वाचण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली तर लगेच साखरेची गोडी कळते, तद्वत संघ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ग्रंथ वाचण्यापेक्षा काही काळ संघात काढला तर संघ लगेच समजेल. निव्वळ पुस्तके वाचून संघ म्हणजे काय याविषयी मत बनविण्यापेक्षा प्रत्यक्ष संघात काही काळ व्यतीत केल्यास संघ जास्त चांगल्या तर्‍हेने समजेल. तरीसुद्धा जिज्ञासूंसाठी खालील पुस्तके सुचवित आहे. ही पुस्तके वाचून नंतर काही काळ संघात व्यतीत केल्यास संघाविषयीच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील. Secrets of RSS - Demystifying the Sangh (लेखक - डॉ. जयप्रकाश नारायण, रतन शारदा, डॉ. अशोक मोडक) Know the RSS: Based on Rashtriya Swayamsevak Sangh Documents (लेखक - शमसुल इस्लाम) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: काल, आज आणि उद्या (लेखक - गंगाधर इंदूरकर) _________________________________________________________ संघाबद्दल फारशी माहिती नसलेली एक वेगळ्या प्रकारची माहिती खाली देत आहे. संघ म्हणजे निव्वळ शाखा, कवायती किंवा संचलन नव्हे. संघ टीकेकडे दुर्लक्ष करून, अनेकदा टीकाकारांना अनुल्लेखाने मारून, टीकेने निरूत्साही न होता, अनेक क्षेत्रात गाजावाजा न करता संरक्षण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण इ. वेगवेगळ्या विषयांवर विचार व संशोधन करण्यासाठी संघाने अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. १) विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्था (http://www.vifindia.org/) - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, नीति आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत, नृपेंद्र मिश्रा इ. नामवंत या संस्थेचे सदस्य आहे. भारतातील सामाजिक, सुरक्षा व आर्थिक आव्हानांवर ही संस्था काम करीत आहे. २) इंडिया फाऊंडेशन (http://netleondev.com/indiafoundation/) - India Foundation is an independent research centre focussed on the issues, challenges and opportunities of the Indian polity. The Foundation believes in understanding contemporary India and its global context through a civilizational lens of a society on the forward move. Based on the principles of independence, objectivity and academic rigour, the Foundation aims at increasing awareness and advocating its views on issues of both national and international importance. It seeks to articulate Indian nationalistic perspective on issues. India Foundation’s vision is to be a premier think tank that can help understand the Indian civilizational influence on our contemporary society. ३) Forum for Integrated National Security - भारताची राष्ट्रीय सुरक्षा, त्या दृष्टीने शेजारी देशांशी असलेले संबंध, आण्विक धोरण इ. विषयांवर ही संस्था अभ्यास व संशोधन करते. Established in 2004, FINS describes itself as an 'apolitical think tank' that believes 'a secured nationhood can provide peace and prosperity to citizens', 'keeping national security at its core'. ४) India Policy Foundation - Established in 2008, IPF describes itself as a not-for-profit think-tank engaged in "high quality research, influential thought leadership, educated debates and policy recommendations to issues of national importance for India". It also "aims to strengthen democracy and egalitarianism", with "utmost adherence to national interest". ५) Forum for Strategic and Security Studies - Set up in 2010, FSSS claims to be an "independent, non-profit making, non-political institution" that provides "a platform for research, analysis, option formulation and evaluation of national security policies of, and security relationships between, states, particularly those in South Asia and the Asia Pacific region". The institute's areas of "special research" include Nuclear Proliferation Review - Ripple Effect on Global Nuclear Strategies and Arms Control, Missile Defence, South Asian Security Environment, Global War on Terrorism, India's Security Matrix, Conundrum in Afghanistan, Indo-Bangladesh Relations and Climate Change and Environmental Security. ६) Public Policy Research Centre - Established in 2011 and fully launched in October 2013, PPRC addresses "the emerging challenges of 21st century". ७) Centre for Policy Studies - The centre was established in 1990. It claims to be "an institute for research and study aimed at comprehending and cherishing the essential civilisational genius of India, and to help formulate a polity that would allow the Indian genius to flourish and assert itself in the present day world".

In reply to by श्रीगुरुजी

ह्या सर्व संघटनांच्या प्रयत्नाने भारतात कुठलाही पॉलिसी बदल घडून आला काय ? पुढील २० वर्षांत एखाद्या क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचीटाकत त्यांच्यात आहे काय आणि त्या दृष्टीने काही पावले उचलली गेली आहेत का कि निव्वळ संघ प्रमाणे उभा विटेवरी अशी परिस्थतीती आहे ? VIF ला मी RTE वर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून इमेल पाठवले अजून तरी त्यांना वेळ मिळाला असेल असे वाटत नाही. त्यांच्या ह्या लेखांत मायनॉरिटी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही http://www.vifindia.org/article/2012/may/16/the-right-to-education आणि ९० वर्षांत हीच का ती उपलब्धी ? कुणीही वाचत नाही आणि काहीही इम्पॅक्ट नाही अश्या प्रकारचे लेख लिहिणाऱ्या ३-४ संस्था ? सोनिया गांधी पासून धडा घ्या. १० वर्षांत NAC बनवून त्यांनी ४ वेळा घटना दुरुस्ती केली किमान ३ मोठे कायदे पास केले ज्याची फळे आम्हाला भोगावी लागतील. आणि पुढील १० वर्षांत काय कायदे पस करायचे ह्याचा आराखडा सुद्धा आधीच तयार. संघाच्या कॅम्प मध्ये काय खिचडी शिजत आहे ?

In reply to by साहना

मी हे उपरोधाने विचार नाही आहे मनापासून प्रश्न आहे. आपणाला जर माहिती असेल तर जरूर सांगा कि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर ह्या विचार टांकीनी काही बदल घडवून आणला काय ?