Skip to main content

तुमचा आवडता भयपट कोणता ?

लेखक गणपा यांनी शनिवार, 16/10/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं. पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो. येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे. असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'. बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता. 'दी इव्हील डेड' त्या काळी बराच गाजला होता त्यामुळे निर्मात्याने वाहात्या गंगेत हात धुतल्या प्रमाणे लगोपाठ २ नव्हे ३ नव्हे तब्बल ४ सिक्वेल काढले. दर्जा त्या सिव्केलच्या आकड्या गणीक घसरत गेला. इतका की भाग ४ पहाताना मला चक्क हसु येत होत. त्यानंतर अनेक भयपट पाहिले. हिंदितला विराना पाहिला. नंतर त्या वाटे गेलो नाही. या रामसे-बंधुंनी या भारतीय भुतांची एवढी दयनीय अवस्था करुन ठेवली की त्यांना भयपटांपेक्षा विनोदी चित्रपट म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल. रामसे-बंधुंनी घातलेल्या या पायावर सध्या कळस चढवायच कार्य त्यांचा नाम-बंधु, वर्मांचा रामु करतोय. एकवेळ अशी आली की मी भयपट पाहाणेच सोडुन दिले. थेटरात जाऊन चित्रपट पाहाण्याची बोंब होती. मुळात इंग्रजी चित्रपट लागणारी थेटरे पार व्हिटी आणि चर्चगेटात. एवढ्या लांब कोण जातोय मरायला. पण मित्राच्या व्हीसीआरमुळे शालेय जीवनात बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले. ४-५ रुपयात चाड्याने कॅसेट मिळायची, मग १० मित्र गोळा केले की माणशी आठ आण्यात चित्रपट पदरात पडायचा. त्याच दरम्यान पाहिलेला दुसरे भयपट म्हणजे ग्रेगीपेगचा 'दि ओमेन'. आणि 'दी एक्सॉर्सिस्ट' नंतरही बरेच चित्रपट पाहिले पण उत्तरोत्तर ते भितीदायक वाटण्यापेक्षा किळसवाणेच जास्त वाटुलागले. आपल्या लक्ष्याचा तात्यावींचु फेम झपाटलेला पाहील्या नंतर त्याची मुळप्ररणा 'चाईल्ड्स प्ले' पहाण्यात आला. पुढे केबल मुळे बरेच इंग्रजी चित्रपट घरबसल्या पहाता येऊ लागले. "दी ब्लेअर वीच प्रोजेक्ट" "रोज(स)मेरीज बेबी" अलीकडे पाहिलेला 'वन मिस् कॉल" अणि 'शटर' बरेच उत्तमोत्तम चित्रपट टाकायचे राहुन गेले असतील. पण ती त्रुटी तुम्ही भरुन काढा. तुम्हाला आवडलेले भयपट कोणते?

वाचने 33126
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

मंडळी आफ्टर डार्क हॉररफेस्ट मधल्या मुव्हीज पण बघा की.....मी एक दाेन बघीतल्या (ड्रेड, द ग्रेवडांसर्स, कील थेअरी इ.) पण 'लेक मुंगो' आवडला... संपुर्ण सीरीज उतरवण्याची इच्छा अपुरी राहुन गेलेला -सुंड्या

सायलेन्स आॅफ द लँब्ज हाही अप्रतिम. बाकी हिचकाॅकचाच बर्ड्स, थर्टीनाईन स्टेप्स, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट आणि व्हर्टिगो हे पण जबरदस्त आहेत. मायकेल केन आणि सर लाॅरेन्स आॅलिव्हिए यांचा स्ल्यूथ पण भारी. त्यावर आधारित कलम ३०२ हे मराठी नाटकपण अफाट होतं.

In reply to by बोका-ए-आझम

स्ल्यूथ माझा ऑल टाईम फेव्हरिट मूव्ही आहे. त्याचा रिमेक पण आला होता. मायकल केन ला लॉरेन्स ऑलिव्हीए चा रोल देऊन. पण जुन्या स्ल्यूथची मजाच और आहे. त्या मूव्हीची एक खासियत आहे. तो पाहिल्याशिवाय कळणार नाही. आणि दोघांनाही ऑस्कर नॉमिनेशन होते, तेही बेस्ट अ‍ॅक्टर इन्‌ लिडिंग रोलसाठी!

जुन्या कृष्ण धवल चित्रपटांत खूप चांगले भयपट येऊन गेले. त्यातील 'द बिस्ट विथ फाइव्ह फिंगर्स' हा जरुर बघण्यासारखा आहे. टोरेंट वरुन उतरवता येतो. प्रत्यक्षांत भूत नसूनही खिळवून ठेवणारा आहे.

चित्रपट नाही पण "अलवणी" नावाचं अनिकेत समुद्र ह्यांनी लिहिलेलं पुस्तक जरूर वाचून बघा, अतिशय मस्त भयकथा लिहिली आहे. ह्या कथेवर नक्कीच एखादा उत्तम भयपट बनू शकतो. पुस्तक जालावर पीडीफ स्वरूपात उपलब्ध आहे, फुकटात!

In reply to by मेघनाद

पिच्चर तर जास्त नाही पण कथा आवडतात, गानू आज्जींची अंगाई वाचून दरवाजा झालेला आमचा! बाहेर धोधो पाऊस सुरु असताना लाईन गेलेली असताना वाचत होतो, घरा बाहेर असलेली केळीची पाने जेव्हा वाऱ्याने खिडकीच्या तावदानावर घसपटली तेव्हा जीवाच्या आकांताने केकटलो होतो

कुणी काहीही म्हणा पण रामगोपाल वर्मा चा "रात" मस्त होता. Camera work अतिशय उत्कृष्ठ होतं. रेवतीची acting आणि ओमपुरीची नजर .......खल्लास

हॉरर चित्रपट मी मला कितीही भिती वाटली तरी बघतेच. (अगदी डोळे बंद करुन सुद्धा) 'हा खेळ सावल्यांचा' चित्रपट मी अगदी लहान अस्ताना पाहीला होता.... दुसरी-तिसरीत असताना.. त्यामुळे जास्त काही घाबरले नाही पण नारळच्या झाडाची भिती वाटायला लागली होती नंतर खुप दिवस. त्यानंतर 'तात्या विंचु' चा चित्रपट पाहुन बाहुल्यांनी खेळायचंच सोडुन दिलं होत मी. (असं वाटायचं हा बाहुला/बाहुली पण त्याच्यासारखचं चालायला लागली तर, मला पण तसच म्हणाली तर, "माझा आत्मा तुझ्यात, आणि तुझा आत्मा बाहेर... ओम फट्ट स्वाहा.. हा" त्यानंतर 'आहट', 'द झी हॉरर शो', मानो या ना मानो'(हिचं सुत्रसंचालन इरफान खान करायचा... इकदम खत्री होती हि मालिका पण) अप्पा जोगळेकरांनी उल्लेख केलेले 'राँग टर्न' आणि 'हिल हॅव आईज' चा पहिला भाग पाहिलाय आणि दुसरा भाग बघायची हिम्मतच नाही झाली. ( मला ही किळस वाट्ली हे चित्रपट बघताना... २ दिवस जेवलेच नाही, इतकं भयाण आनि भकास आणि त्यापेक्शा जास्त किळसवाणं दाखवलं आहे त्यात.) '१४०८' हा चित्रपट बघुन फारशी भिती नाही वाटली. "अलवणी" हि कथा मात्र जाम भारी आहे. अनिकेत यांच्या ब्लॉग वर वाचली आहे.

कोणी डेड-एन्ड हा मूव्ही पाहिला आहे का? Dead End (2003) Christmas Eve. On his way to his in-laws with his family, Frank Harrington decides to try a shortcut, for the first time in 20 years. It turns out to be the biggest mistake of his life. http://www.imdb.com/title/tt0308152/?ref_=fn_al_tt_1 आणि ’द अदर्स’ ची एक गावठी कॉपी बघण्यात आली होती. मनिषा कोईराला, संजय कपूर (’हा कोण?’ म्हणून विचारू नका ), आणि हेलन. बाकी काही बोलायलाच नको. टीम बर्टनचा ’बीटलज्यूस’ कोणी पाहिला आहे का? तो असल्या जॉनर मध्ये माहिर आहे. बाकी जॉन कारपेंटरचे भयपट पाहण्यासारखे असतात.

... हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो... हॉलिवुदचे भयपट आपण पहात असालच..साधारण साचा एकच असतो..भयानक चेहे-याची भुते..ड्राकुला..आदी अमानवी व्यक्तिरेखा.....भयाण हवेल्या त्यात नायक रहायला जाणे तिथे आधीच एक आत्मा असणे मग अशक्य घटनांची साखळी आदी.. या सर्वाना छेद देणारा एक "Midnight Cabaret" हा सिनेमा पहाण्यात आला.. एक नाटक कंपनी..त्यात एक कुमारीकेचे पात्र...तिचा वापर करुन एका "सैतान पुत्रास" जन्म देण्याचा प्ल्यान..असे साधारण कथानक आहे..नाटकातल्य घटना त्या मुलिच्या जीवनात घडु लागतात..खरे काय अन आभास काय यात तिचा उडालेला गोंधळ..असे साधारण कथानक आहे... २ तास सिनेमा तुम्हाला खिळवुन ठेवतो... हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो

अनफ्रेन्डेड, काही दिवसानपुर्विच हा सिनेमा पाहिला. सम्पुर्न सिनेमा स्काइप वर आहे. वेगळी सन्कल्पना होती.

अफलातून भितीदायक सिनेमाचा एक अनुभव म्हणजे हाऊस ऑफ वॅक्स! या सिनेमात जो व्हिलन आहे तो जिवंत माणसांवर उकळतं मेण ओतून त्यांचे पुतळे बनवत असतो! संपूर्ण सिनेमात एकदाच त्याचा चेहरा दिसतो पण तो झोप उडवून जातो! अवांतरः शाहरुख्/सलमान्/सैफ अली खानचा कोणताही सिनेमा (अपवादः स्वदेस आणि चक दे, ओमकारा) हे कोणत्याही भयपटाच्या तोडीसतोड नाहीत काय?

पुण्यातील राहुल थिएटर ला एक्झोरसिस्ट हा सिनेमा पहायला गेलो. त्यात एक पंधरा वर्षाच्या मुलीला भूत लागते. फादर ना बोलावणे जाते. फार " तू कोण आहेस..? असा प्रश्न भुताला करतात. मुलगी उत्तर देण्याच्या बदल्यात फादरच्या अंंगावर हिरवे काळे ओकते तेंव्हा अंधारातून एक प्रेक्षक जोरात ओरडला " अरे आळूची भाजी रे ..... !" त्याबरोबर भय पटाला आलेले सर्व प्रेक्षक हास्यरसात डूबून निघाले.

एव्हिल डेड १ बद्दल बोलावं तितकं कमी इतका भारी आई भयानक मूवी होता. भूत दिसणार असं वाटलं की पांघरूण ओढून घ्यावं लागतं होतं. नवीन काळात द कंजुरिंग १ पण सॉलिड भयानक आहे. बाकी व्ही सी आर ची गोष्ट इकडे पण लागू. फक्त भयपटासाठी नाही... पण इतर सिनेमांसाठी सुद्धा.. इतर म्हणजे बालक पालक मध्ये दाखवलं आहे ना.. सेम! ;)

काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट.. भयपट म्हणता नाही येणार पण गूढपट.. एकदम थरारक.. नक्की बघावा असा.

बाबाडूक पण चांगला चित्रपट आहे.. हॉरर पण थोडा मानसिक विश्लेषणाच्या अंगाने जाणारा इट फॉलोज पण चांगला आहे drag me to hell सुद्धा खुप मस्त आहे