✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमचा आवडता भयपट कोणता ?

ग
गणपा यांनी
Sat, 10/16/2010 - 16:51  ·  लेख
लेख
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं. पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो. येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे. असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'. बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता. 'दी इव्हील डेड' त्या काळी बराच गाजला होता त्यामुळे निर्मात्याने वाहात्या गंगेत हात धुतल्या प्रमाणे लगोपाठ २ नव्हे ३ नव्हे तब्बल ४ सिक्वेल काढले. दर्जा त्या सिव्केलच्या आकड्या गणीक घसरत गेला. इतका की भाग ४ पहाताना मला चक्क हसु येत होत. त्यानंतर अनेक भयपट पाहिले. हिंदितला विराना पाहिला. नंतर त्या वाटे गेलो नाही. या रामसे-बंधुंनी या भारतीय भुतांची एवढी दयनीय अवस्था करुन ठेवली की त्यांना भयपटांपेक्षा विनोदी चित्रपट म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल. रामसे-बंधुंनी घातलेल्या या पायावर सध्या कळस चढवायच कार्य त्यांचा नाम-बंधु, वर्मांचा रामु करतोय. एकवेळ अशी आली की मी भयपट पाहाणेच सोडुन दिले. थेटरात जाऊन चित्रपट पाहाण्याची बोंब होती. मुळात इंग्रजी चित्रपट लागणारी थेटरे पार व्हिटी आणि चर्चगेटात. एवढ्या लांब कोण जातोय मरायला. पण मित्राच्या व्हीसीआरमुळे शालेय जीवनात बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले. ४-५ रुपयात चाड्याने कॅसेट मिळायची, मग १० मित्र गोळा केले की माणशी आठ आण्यात चित्रपट पदरात पडायचा. त्याच दरम्यान पाहिलेला दुसरे भयपट म्हणजे ग्रेगीपेगचा 'दि ओमेन'. आणि 'दी एक्सॉर्सिस्ट' नंतरही बरेच चित्रपट पाहिले पण उत्तरोत्तर ते भितीदायक वाटण्यापेक्षा किळसवाणेच जास्त वाटुलागले. आपल्या लक्ष्याचा तात्यावींचु फेम झपाटलेला पाहील्या नंतर त्याची मुळप्ररणा 'चाईल्ड्स प्ले' पहाण्यात आला. पुढे केबल मुळे बरेच इंग्रजी चित्रपट घरबसल्या पहाता येऊ लागले. "दी ब्लेअर वीच प्रोजेक्ट" "रोज(स)मेरीज बेबी" अलीकडे पाहिलेला 'वन मिस् कॉल" अणि 'शटर' बरेच उत्तमोत्तम चित्रपट टाकायचे राहुन गेले असतील. पण ती त्रुटी तुम्ही भरुन काढा. तुम्हाला आवडलेले भयपट कोणते?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33015 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

मस्त आढावा गणपाशेठ ह्या

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/16/2010 - 17:15 नवीन
मस्त आढावा गणपाशेठ :) ह्या यादीत :- द ग्रज १/२/३ Image removed. Image removed. द अनबॉर्न :- Image removed. मिरर्स :- Image removed. जिपर्स क्रिपर्स :- Image removed. कसे काय विसरलात ? ;)
  • Log in or register to post comments

अगदी

प्रिया देशपांडे
Sat, 10/16/2010 - 17:26 नवीन
राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा अक्षराशी सहमत. (भयपट पाहणारी) प्रिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा

इंटरनेटस्नेही
Sat, 10/16/2010 - 17:59 नवीन
राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा अक्षराशी सहमत. (भयपट पाहणारा) इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे

पराशी १००% सहमत त्याने

गणपा
Sat, 10/16/2010 - 19:39 नवीन
पराशी १००% सहमत. त्याने उद्बोधलेले चित्रपट ही पाहिलेत. पण हा लेख टाकताना जरा घाईत होतो. त्यामुळे राहुन गेल. सदर धाग्याच प्रयोजन म्हणजे काही चुकुन पहायचे राहुन गेलेल्या भयपटांची नावे गोळा करणे. @नायल्या चांगल्या भारीतल्या सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स ची नाव सुचवलीस तरी चालतील. हाणामारी वाले/थ्रीलर्स चित्रपटांचे आम्हीही शौकिन आहोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

मराठी भयपट

भडकमकर मास्तर
Sun, 10/17/2010 - 14:55 नवीन
Image removed. सरीवर सरी हा गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित सिनेमा पाहून आता मराठी सिनेमाचं कसं होणार अशी खूप खूप भीती वाटली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

माझ्या आवडीचा

प्रचेतस
Sat, 10/16/2010 - 17:24 नवीन
माझ्या अत्यंत आवडत्या भयपटांपैकी एक म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकचा -'सायको' खर्‍या अर्थाने भयपटांची(थ्रिलरपटांची) परंपरा 'सायको' पासून सुरु झाली हे आमचे मत. रूढार्थाने याला भयपट म्हणता येणार नाही. किंबहुना हा भूतपट नाहीच. पण यातील थरार भूतपटांपेक्षा किंचितही कमी नाही. अँथनी पर्किन्सचा सर्वोत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट मरियन क्रेनच्या (जेनेट लाय) शॉवर सीनच्या खुनाच्या दृश्याने एक अप्रतिम थरारक सीन पाहील्याचा आनंद देतो. चित्रपटाचा शेवट तर अविस्मरणीयच.
  • Log in or register to post comments

रिक

दिपक
Sat, 10/16/2010 - 17:27 नवीन
रिक आवडला होता.. Image removed. बाकीचे आठवतील तसे.
  • Log in or register to post comments

वावा!

प्रियाली
Sat, 10/16/2010 - 17:27 नवीन
मस्त धागा. सक्काळी सक्काळी बघून आनंद झाला. माझाही पहिला भयपट हा खेळ सावल्यांचा. हा चित्रपट आज बघितला तर अभिनय टुकार आहेत परंतु तरी स्थळ, माड आणि संगीत यामुळे भीती वाटते. कालच रात्री मी बॉबी देओलचा हेल्प असा टुक्कार भयपट पाहिला. बाकी बॉबी चित्रपटात असताना भुताची गरज काय हेच कळत नाही पण असो. माझे आवडते भयपट - रक्ताळलेले वेडसर चित्रपट सोडून बाकी सर्व. ;) पण सर्वात आवडता चित्रपट - Image removed. आणि त्यातला आय अ‍ॅम योर डॉटर! हा संवाद तर भारीच. भयपट कसे असावेत त्याचा उत्तम दाखला. रक्त नाही. भयंकर चेहरे नाहीत. किळस नाही. सुपर्ब!!!! द ब्लेअर विच प्रोजेक्ट आणि रोजमेरी'ज बेबी ही मस्त.
  • Log in or register to post comments

का रे ति चित्र का चिकटवली अहेस?

जाई अस्सल कोल्हापुरी
Sat, 10/16/2010 - 17:32 नवीन
मी तर साध आहट च> किंवा झी हॉरर शो चं music पण ऐकु शकत नाही. मी मध्ये ते राज मूव्ही आलं होतं ना त्यात्ला तो खिडकी वाला सीन चुकुन पाहिला होता तर ७-८ दिवस खिडकीत पहात नव्हते. .... आणि भूत मधला सीन पाहिला तर आरशात पहात नव्हते... (लेकिला सोबत घीउन जायचे साधा लाईट लावायला) म्हटलं तुझ्या धाग्यावर साधा reply टाकावा...तर मेली ही चित्र! फ फटके द्यायला हवेत तुला! <<<भयपट कसे असावेत त्याचा उत्तम दाखला. रक्त नाही. भयंकर चेहरे नाहीत. किळस नाही. सुपर्ब!<<<>>>> त्याचीच तर भिती वटते...जे न दिसता आपल काम करतं... चेहरे पाहुन तर मला भिती नहि वाटत पण music आणी कसलीतरी अज्ञात शक्ती...बाप रे....झाली आजपासुन ७-८ दिवस झोपेची काशी! गणप्या..... मेल्या...दुष्टा... !@#$@$%$%^$&$%&*%*%*%&* @$#%#$^$%^$%&%&*%*%*%&*(&( @$$^$#^#$%^$&$^^*
  • Log in or register to post comments

ऑर्फन !!

यशवंतकुलकर्णी
Sat, 10/16/2010 - 17:40 नवीन
ऑर्फन !! हा काही भूतपट नाही पण भयपट नक्कीच आहे. या काट्टीला काय झालंय ते सिनेमा संपेपर्यंत कळलंच नव्हतं. Image removed.
  • Log in or register to post comments

आम्हाला भयपट भय आणतच नाहीत.

Nile
Sat, 10/16/2010 - 17:48 नवीन
आम्हाला भयपट भय आणतच नाहीत. (मी भयपटात खदाखदा हसतो म्हणुन मित्र शिव्या घालतात) पण सर्वात पहिला बघितलेला सायको (तेव्हा ४-५ वीत होतो) मनात घर करुन बसला आहे. भुतं बीतांपेक्षा सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स आपले फेव्हरीट. -(जिवंत भुत) निळोबा.
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Sun, 10/17/2010 - 03:15 नवीन
>>आम्हाला भयपट भय आणतच नाहीत सहमत आहे... :) (लहानपणी सुद्धा कधी भुतांची भिती वाटली नाही) पण मी माझ्याच"डरना मना है" मधल्या प्रसंगात खरच घाबरलो होतो. >>भुतं बीतांपेक्षा सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स आपले फेव्हरीट. +१०० सहमत आहे. :) (अवांतरः सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स यांची पण यादी जमवावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आणि हा एक... शाळेत

यशवंतकुलकर्णी
Sat, 10/16/2010 - 18:11 नवीन
आणि हा एक... शाळेत मास्तरांचे "तात्याविंचू", "कुबड्या खविस," " बाबा चमत्कार" असे बारसे करायला कामी पडला होता. दिलीप प्रभावळकरांचा आवाज भार्री...रामदास पाध्येंच्या करामती त्याहून भारी.
  • Log in or register to post comments

अजून १क जबराट..................

स्पा
Sat, 10/16/2010 - 18:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

द रिंग

नीतु
Sat, 10/16/2010 - 18:50 नवीन
द रिंग Image removed.
  • Log in or register to post comments

भयपट असा काही प्रकार

रेवती
Sat, 10/16/2010 - 18:47 नवीन
भयपट असा काही प्रकार नाहीच्चे!;) काही दिवसांपूर्वी लेकिन नावाचा चित्रपट मी डोळे झाकून पाहिला. 'हा खेळ...' सिनेमा बघताना मी शेंबडी पोर असल्याने तो भयपट आहे हेच समजले नाही.;) नंतर उर्मिला मातोंडकरचे दोन सिनेमे (नावं माहित नाही) मान खाली घालून पाहिले. मी फक्त प्रेमळ सिनेमेच पाहते.;)
  • Log in or register to post comments

मान खाली घालुन? रेवती तुझ्या

स्पंदना
Mon, 10/18/2010 - 08:30 नवीन
मान खाली घालुन? रेवती तुझ्या धाडसी पणाला सलाम !! मी सिंदबादची सफर हा ईंग्लिश पिक्चर खुर्ची खाली बसुन बघितला होता. बाकिच सांगुन कशाला हसु करुन घ्यायच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी भयपट पहात नाही पण लहानपणी

पर्नल नेने मराठे
Sat, 10/16/2010 - 19:19 नवीन
मी भयपट पहात नाही पण लहानपणी श्वेतांबरा मालिका पहात असे. टाइटल सॉन्ग सुरु झाले की ति बाइ म्हणजेच श्वेतांबरा पान्ढर्या साडित झाडाखाली येउन उभी राहाते असा सिन असे. मला त्या टाइटल सॉन्गच्या म्युझिकची पण भिति वाटत असे. भयानक अगदी भयानक !!!
  • Log in or register to post comments

हाहाहा...

मस्त कलंदर
Sat, 10/16/2010 - 21:48 नवीन
मला तर लहानपणी 'आपण यांना पाहिलंत का' हा कार्यक्रम देखिल भयानक भीतीदायक वाटत असे. एकतर त्यातले फोटो जुने पुराणे, आणि ही व्यक्ती अमक्या कपड्यांत, ढमक्या ठिकाणाहून गायब झाली आहे असे ऐकले की आपणही हरवू असेच वाटायचे. डोळे गच्च मिटून आणि कानात बोटे घालून मी बसायचे तेव्हा. त्याला हेही कारण असेल, की लहानपणी एक माणूस मला पळवून नेत होता, आणि (माझ्या बहिणीच्या मते) दुर्दैवाने तो रंगेहाथ सापडला!!! त्यामुळे हरवले जाण्याची भीती मला पुष्कळ दिवस होती!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

दुर्दैवाने?? की सुदैवाने?

स्वानन्द
Sun, 10/17/2010 - 11:25 नवीन
दुर्दैवाने?? की सुदैवाने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

दोन्हीही. मकीच्या बहिणीच्या

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:05 नवीन
दोन्हीही. मकीच्या बहिणीच्या दुर्दैवाने आणि त्या अपहरणकर्त्याच्या सुदैवाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

अजुन

सहज
Sat, 10/16/2010 - 20:45 नवीन
एम नाईट शामलनचा सिक्थ सेन्स कसा काय कोणी लिहला नाही. Image removed. वर भयालीतैंनी लिहलेला द अदर्स पण भारी आहे!
  • Log in or register to post comments

सिक्थ सेन्स ची थिम मस्त होती,

गणपा
Sat, 10/16/2010 - 20:55 नवीन
सिक्थ सेन्स ची थिम मस्त होती, पण मला तो खुप भितीदायक नाही वाटला ३-४ प्रसंग सोडले तर. शेवट धक्का दायक होता हे मात्र खरं :)
  • Log in or register to post comments

सिक्स्थ सेन्स आणि मिस्ड कॉल

मस्त कलंदर
Sat, 10/16/2010 - 21:43 नवीन
सिक्स्थ सेन्स आणि मिस्ड कॉल आवडते चित्रपट. बाकी, त्या ब्लेअर विच प्रोजेक्ट बद्दल लै ऐकले होते, म्हणून आधीच घाबरायची भरपूर मानसिक तयारी करून आणि एकटी घाबरेन म्हणून सोबतीची पण सेटिंग करून पाहायला बसले. पण आता घाबरेन, मग घाबरेन असे करत पिक्चरच संपला!!!! :( कदाचित घरी लॅपटॉपवर पाहिल्याने असे झाले असावे. पण अशी तयारी केली की मोठ्या पडद्यावरही मी घाबरत नाही. 'भूत' बघताना असेच झाले होते. पण मला व्यक्तिशः विनाकारण ओंगळ भुते दाखवणार्‍या मालिका आणि मूव्हीजचा भयंकर तिटकारा आहे.. अजून मला आहट मधली भुते डोळ्यासमोर बर्‍याचदा दिसतात. आणि खदखदा हसणारा प्लेटमध्ये ठेवलेला अर्चना पूरणसिंगचा चेहरापण!!!! :(
  • Log in or register to post comments

>> अजून मला आहट मधली भुते

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 10/16/2010 - 21:59 नवीन
>> अजून मला आहट मधली भुते डोळ्यासमोर बर्‍याचदा दिसतात. आणि खदखदा हसणारा प्लेटमध्ये ठेवलेला अर्चना पूरणसिंगचा चेहरापण मला कॉमेडी सर्कस बघतानाचा अर्चना पूरणसिंगचा खदखदा हसणारा चेहरा आठवला की अंगावर शहारे येतात. (तो चेहरा प्लेटमध्ये नसून तिच्या स्वतःच्या अंगावर असतानापण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

LOL

nanaba
Wed, 07/13/2016 - 14:10 नवीन
LOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तेजायला वरचे सगळे विंग्लिश

नितिन थत्ते
Sat, 10/16/2010 - 21:56 नवीन
तेजायला वरचे सगळे विंग्लिश शिनेमे आहेत. ते कळणारच नाहीत त्यामुळे भीतीच वाटणार नाही. मला आवडलेला भयपट म्हणजे "डरना मना है". गहराई हा अरुणा-विकास यांचा लागू, पद्मिनी कोल्हापुरे चा एक साउथी पिक्चर येऊन गेला. त्यात काही सीनमध्ये भीती वाटायची. पण माझी सर्वात जास्त टरकली होती Jaws मधला इंटरवलपूर्वी अचानक दिसलेला जबडा पाहून. (अवांतर : एन्टिटी हा चित्रपट भयपट म्हणून पाहिलाच नव्हता).
  • Log in or register to post comments

(अवांतर : एन्टिटी हा चित्रपट

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:07 नवीन
(अवांतर : एन्टिटी हा चित्रपट भयपट म्हणून पाहिलाच नव्हता). एन्टिटी भयपट म्हणुन फार थोड्या जणांनी बघितला. ;) . गहराइचे देखील तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

'रिन्ग' पण चान्गला होता.

आनन्दा
Sat, 10/16/2010 - 23:10 नवीन
माझा एक मित्र रिन्ग पाहत असताना क्लायमॅक्स च्या वेळी अचानक घरातले लाइट गेले... नन्तर जाम मजा आली
  • Log in or register to post comments

स्लिपी हॉलो नावाचा चित्रपट

नभा
Sat, 10/16/2010 - 23:16 नवीन
स्लिपी हॉलो नावाचा चित्रपट पाहिला होता मागे..... जाम भीती वाटली होती बघताना
  • Log in or register to post comments

भयपट??

मी-सौरभ
Sat, 10/16/2010 - 23:41 नवीन
येड्पट लोकांनी बनवलेले टुकार चित्रपट (बॉलीवूड) म्हंजे भयपट असे मी मानतो. तवा म्या फकस्त वॅक्शन अन कामेडी पिच्चर बगतो :)
  • Log in or register to post comments

मुलहॉलंड ड्राईव्ह फारच मस्त

शुचि
Sun, 10/17/2010 - 00:26 नवीन
मुलहॉलंड ड्राईव्ह फारच मस्त आहे.
  • Log in or register to post comments

भयपट पाहून किंवा इतर कशाची

Pain
Sun, 10/17/2010 - 02:19 नवीन
भयपट पाहून किंवा इतर कशाची भीती वाटत नाही. अचानक मोठा आवाज, नजीक झालेली हालचाल किंवा एखादे भीषण दृष्य पाहून दचकायला होते पण ती शरीराची मूलभूत प्रतिक्रिया झाली. केवळ भीतीच नव्हे तर इतर भावनाही फारशा जाणवत नाहीत.
  • Log in or register to post comments

इतर भावनाही

चतुरंग
Sun, 10/17/2010 - 05:18 नवीन
फारशा जाणवत नाहीत - हे मात्र जरा सीरीअस वाटते बॉ! :( (भावनाप्रधान)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर

शहराजाद
Sun, 10/17/2010 - 07:04 नवीन
मी भयपट फारसे बघत नाहीत. बर्‍याच चित्रपटांतला अमानवी भाग ओंगळ आणि हिडीस दाखवलेला असतो ते आवडत नाही. वर उल्लेखलेला सायको आवडला होता. मी पाहिलेल्यांत त्यासारखे हिडीसपणा न दाखवताही आत्यंतिक भय/ ताण यांचा अनुभव देणारे चित्रपट फार थोडे. इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर मात्र आवडला. खरं तर तसा तो फारसा भयप्रदही नाही. माणूसपणाचे अंश शिल्लक असलेल्या व्हॅम्पायरची कथा, टीपीकल व्हॅम्पायर स्टाइल शिकारी, व्हॅम्पायरच्या चित्रपटांत असते तसे सेन्शुअल हॉरर आणि ते करायला तीन देखणे व्हॅम्पायर. ब्रॅड पिट, टॉम क्रुअ, अँटोनिओ बॅन्डेरास- आणखी काय पाहिजे?
  • Log in or register to post comments

आम्हाला कशाचेच भय वाटत नाही.

गांधीवादी
Sun, 10/17/2010 - 12:46 नवीन
आम्हाला कशाचेच भय वाटत नाही. त्यामुळे कोणताही चित्रपट हा आमच्यासाठी भयपट नसतो. त्यातल्या त्यात जर एखादे भयपट दृश्य बघायचे असेल तर आम्ही INDIA TV बघतो.
  • Log in or register to post comments

सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स

इन्द्र्राज पवार
Sun, 10/17/2010 - 13:55 नवीन
धागाकर्ते श्री.गणपा यांनी त्यांच्या यादीतील १. ओमेन व २. रोझमेरी'ज बेबी ये दोन चित्रपट भयपटांच्या Sophisticated Genre या प्रकारात येतात. मात्र अशी काही मोजकी उदाहरणे सोडल्यास हॉलीवूडने बर्‍याच वेळा हॉरर मीन्स हाय पिच अग्लीनेस अशी काहीशी ढोबळ व्याख्या करून हिंसेचा असा काही भडीमार (इव्हिल डेडच्या यशानंतर) केला की प्रेक्षकांच्या डोक्यावर ट्रकभरून रक्तमांसाचा चिखल ओतला नाही तर तो थिएटरकडे येणारच नाही अशीच निर्मात्यांनी कल्पना करून घेतली की काय असे वाटू लागले आहे. 'Saws' सीरीजमधील एखादीही आठवण तर तुम्हास जेवणाच्या ताटावरून उठवेल. तीच गोष्ट Final Destination Part-1 to 4 ची. चांगले कथानक पण परत तीच अट्टाहासाने घातली जाणारी रक्ताची आंघोळ. एफ.डी. पार्ट-२ मधला रोड अ‍ॅक्सिडेंट तर पूर्णपणे कोणत्याही चॅनेलवर दाखविला जात नाही असे त्याचे भयावह चित्रण केले आहे. पण असे असले तरीही Sophisticated Horror Movies चे महत्व अजूनही ओसरलेले नाही...आणि ते दिसून येते ते Silence of The Lambs या ऑस्कर विजेत्या चित्रपटात. मला वाटते अखंड हॉरर मूव्हीज निर्मितीमधील हा एकमेव चित्रपट असा आहे की ज्याच्या अभिनेत्याला (अँथोनी हॉपकिन्स) आणि अभिनेत्रीला (ज्योडी फोस्टर) 'बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' ची ऑस्कर्स मिळाली. Image removed. हॉपकिन्स यांनी साकारलेला डॉ.हॅनिबल लेक्टर एक मनोविकारी पण गुन्हा करताना गुन्हेगाराची मेंदू नेमके कोणते कार्य करीत असतो हे अचूक जाणणारा... तर ज्योडीने साकारलेली एफबीआय एजंट क्लॅरिस ही तितक्याच ताकदीची व्यक्तीरेखा जी एका 'सीरियल किलर' ला पकडण्यासाठी खास तुरुंगात कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या डॉ.लेक्टरचाच सल्ला घेत असते. Image removed. संपूर्ण चित्रपट भीतीचे जबरदस्त वातावरण निर्माण करतोच पण सर्वच पात्रांचा अभिनय दाद देण्यासारखा. प्रमुख भूमिकेतील वरील दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी खिळवून ठेवते. Image removed. All time Greats मध्ये ही 'सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चा सातत्याने उल्लेख असतो. जरूर पाहावा असाच आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

गणपाभौ ने विचारलं इतर चित्रपट

Nile
Sun, 10/17/2010 - 14:15 नवीन
गणपाभौ ने विचारलं इतर चित्रपट टाका, त्यात पहिले ह्याचेच नाव टंकणार होतो. (इतका आवडला म्हणुन मग हॅनिबल पाहिला पण त्याने निराशा केली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

डॉ.हॅनिबाल लेक्टर....

इन्द्र्राज पवार
Sun, 10/17/2010 - 14:47 नवीन
Nile, your sure about your views on "Hannibal? तुम्ही हा चित्रपट एकांतात (....म्हणजे तुम्ही एकटे असता त्यावेळी....उगा गैरसमज नको...) असाल त्यावेळी, त्यातही रात्रीच्या वेळी आणि मोबाईल हडळीची वाचा बंद करून...पाहा, हा दुसरा भाग 'हॅनिबाल', मला "सायलेन्स...."च्याच तोडीचा वाटला तो. फार सोफिस्टिकेटेड आहे एकूणच या दुसर्‍या भागाची धाटणी (जरी त्या डुक्कर कोंड्वाड्यातील एक प्रसंग आणि मेंदू कोरणे असे अंगावर शहारे आणणारे एकदोन प्रसंग असले तरी...). अँथोनी हॉपकिन्स तर बापमाणूसच आहे...पण ज्युलियाना मूर हिनेही ज्योडीची उणीव भासू दिलेली नाही. मला खात्री आहे नक्की तुमचे मतपरिवर्तन होईल.... (न झाले तर समजावून सांगायला डॉ.हॅनिबाल लेक्टर यांना पाठवू का तुमच्याकडे?) इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

सहज
Sun, 10/17/2010 - 14:56 नवीन
सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज आणी हॅनीबल मला पण आवडले. मला 'रेड ड्रॅगन' ज्यात सुरवातीला हॅनीबल पकडला जातो तो सिनेमा पण आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

तुम्ही हानिबाल रायझिंग बद्दल

अप्पा जोगळेकर
Mon, 10/18/2010 - 11:30 नवीन
तुम्ही हानिबाल रायझिंग बद्दल तर बोलत नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

हॅनिबल सायलेंस इतका फ्लोईंग

Nile
Mon, 10/18/2010 - 11:45 नवीन
हॅनिबल सायलेंस इतका फ्लोईंग नाही असे मला वाटते. मूरलाही फोस्टरची सर येत नाही. व्हिलन वर्जरचे चित्रणही मला प्रभावी वाटले नाही. स्टोरी दमदार आहे, पण चित्रण-डिरेक्शन सायलेंस इतकं भावलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

एफ.डी. पार्ट-२ मधला रोड अ‍ॅक्सिडेंट!!!

मस्त कलंदर
Sun, 10/17/2010 - 15:15 नवीन
एकदा एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपी मध्ये गेले तर नेमका हाच सीन लागला होता. आता अ‍ॅक्सिडेंट संपला वाटेवाटेपर्यंत त्यात परत काहीतरी होतच होते.. जाम जीवघेणा होता तो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

रक्तरंजीत आनंद

इन्द्र्राज पवार
Mon, 10/18/2010 - 10:00 नवीन
".....एकदा एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपी मध्ये गेले तर नेमका हाच सीन लागला होता...." ~ म.क. >> तू तर रेग्युलर शॉपीमध्ये म्हणतेस; इथे कोल्हापुरात 'सकाळ वर्धापन दिन फेस्टिव्हल' भरले होते, एका मोठ्या मैदानात आणि अन्य विविध स्टॉल्ससमवेत एक कोपरा 'इलेक्ट्रॉनिक्स गुड्स' ने व्यापला होता. तिथेही विविध टी.व्ही. कंपन्यांचे स्टॉल्स होते. पैकी फक्त तीन वर स्पोर्टसचे कार्यक्रम तर जवळजवळ पाच-सहा स्टॉल्सवर डीव्हीडीवरून एफ.डी.२ मधील हेच 'जीवघेणे' दृश्य झळकत होते....आणि सर्व थरातील लोक अगदी मिटक्या मारत तो 'रक्तरंजीत थरार आनंद' लुटत होते. याबद्दल सकाळच्या तिथल्या फेस्टिव्हल प्रमुखांकडे याबाबत लेखी निषेध आम्ही तीनचार मित्रांनी नोंदविला... पण तुला माहित असेलच की अशा सूचनांची वरच्या पातळीवर कशी वाट लागते ते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज, हॅनीबल आणि दि रिंग

केशवसुमार
Mon, 10/18/2010 - 12:58 नवीन
हे मला आवडलेले भयपट.. सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज आणी हॅनीबल बाघितल्यापासूण अँथोनी हॉपकिन्स कुठल्याही सिनेमात दिसलातरी तो अता कोणाला तरी खाणार असेच वाटते.. रिंग चित्रपटातल्या पर्श्वसंगीता मुळे जास्त मजा आली असे वाटते.. अजून एक ..आय नो वॉट यू डीड लास्ट समर.. हा खेळ सावल्यांचा मी ५ वीत असताना पाहिला होता त्यानंतर किती तरी दिवस नारळाच्या झाड दिसल की नरसूच भूत आठवायचे.. (घाबरट)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

कॅनिबल होलोकास्ट... अग्गा

सविता
Sun, 10/17/2010 - 14:36 नवीन
कॅनिबल होलोकास्ट... अग्गा बाबो..... Image removed. मी तर हा पाहिला पण नाही...फक्त विकीपिडियावर माहिती वाचूनच घाबरले......
  • Log in or register to post comments

क्रौर्याची परिसीमा असलेले

अप्पा जोगळेकर
Mon, 10/18/2010 - 11:28 नवीन
क्रौर्याची परिसीमा असलेले रोंग टर्न-१ आणि २ पाहिले आहेत. पहिला पार्ट तर इतका क्रूर आहे की तो चित्रपट पाहणार्‍या माणसाच्या मनाची संवेदनशीलताच नष्ट होते. मला हे दोन चित्रपट पाहिल्यावर कोणत्याही थराचे हिडीस दॄश्य पाहायला काहीच वाटत नाही. कारण या चित्रपटांमुळे नजरच मरुन गेली आहे. मनाची संवेदनशीलताच नष्ट करणारे असे चित्रपट कोणीही पाहू नयेत असे वाटते. माझा एक मित्र हा चित्रपट पाहताना ओकला होता. (घरी कोणी नाही म्हणून हौसेने ही सीडी घेउन आला आणि नंतर स्वतःवरच वैतागला.) चित्रपटाच्या सुरुवातीलाच फरस वापरुन एका बाईच्या दोन उभ्या चिरफाळ्या करतानाचे दॄश्य आहे.तिच्या शरीराचे दोन तुकडे होताना पोटातली आतडी बाहेर येउन जमिनीवर लोळण घेतात आणि रक्ताचे थारोळे जमिनीवर जमा होते. त्या चिरफाळ्या जमिनीवरुन फरफटत घेउन जाउन मग त्या बाईला खाल्ले जाते. भोसकाभोसकी आणि पोटातून बाहेर लोंबकळणारी आतडी, रक्ताचे थारोळे, डोळे फोडणे, नरमांस खाणे, शरीराचे अवयव कापणे या सगळ्या गोष्टींचा चित्रपटात भडिमार आहे. भाजी कापणे आणि माणूस कापणे यात दिग्दर्शकाला काहीही फरक वाटत नसावा. सगळ्यात शेवटी तर एका तान्ह्या बाळाला माणसाचे कापलेले बोट भरवतानाचे दॄश्य आहे. 'हिल हॅव आईज', 'सॉ', हॉस्टेल हीदेखील अशीच काही नावे होत. हा चित्रपट लिहिणारे, दिग्दर्शित करणारे लोक विकॄत मनोवॄत्तीचे मनोरुग्ण असणार असे मत आहे. हिंदीत असे चित्रपट नसतात हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे.
  • Log in or register to post comments

हे विधान मल्टीपल लेव्हल वर चिंतनीय आहे.

मारवा
Wed, 07/13/2016 - 13:05 नवीन
हिल हॅव आईज', 'सॉ', हॉस्टेल हीदेखील अशीच काही नावे होत. हा चित्रपट लिहिणारे, दिग्दर्शित करणारे लोक विकॄत मनोवॄत्तीचे मनोरुग्ण असणार असे मत आहे.
हे विधान अनेक पातळींवरुन तपासण्यायोग्य आहे. यात "बघणारे" चा समावेश केल्यास अजुन काँम्प्लीकेटेड बाब होते. "सालो" या चित्रपटात शेवटी क्लायमॅक्स्ला कौर्याची परीसीमा गाठली जाते. चार व्हीलन/नायक जे कोणी ते टॉर्चर सुरु करतात व एक एक जण दुर घरातुन दुर्बिणीतुन पाहतो. त्यात दिग्दर्शक पासोलीनी एक ट्रीक करतो. पुर्ण पडदाभर एका दृश्यात फक्त दुर्बिणीचे दोन गोल दाखवतो. तो एक प्रकारे म्हणतोय की तुम्ही म्हणजे (आपण प्रेक्षक) सुद्धा त्याच चित्रपटातील पात्राप्रमाणे सॅडिस्ट आहोत. आपणही तो आनंद घेत आहोत. फार प्रभावी रीतीने ते दर्शवलेले आहे. अगदी एका क्षणासाठी पण हादरवुन टाकणारा अनुभव तो देतो. हे दिग्दर्शक प्रेक्षकाला पॅसीव्हली एंटरटेनमेंट घेऊ देत नाहीत. काही कलाकृती प्रेक्षकाला ओढुन खेळात घेतात व फरफटत नेतात जसे नो एक्झीट नाटक मजा आहे असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

'१४०८' हा एक सुंदर भयपट आहे.

अप्पा जोगळेकर
Mon, 10/18/2010 - 11:55 नवीन
'१४०८' हा एक सुंदर भयपट आहे. तात किळसवाणी दॄश्ये अजिबात नाहीत तरीदेखील अंगावर काटा येतो. एका हॉटेलात '१४०८' या नंबरची खोली भुतांनी झपाटलेली असते तिथे एक पत्रकार हट्टाने राहायला जातो आणि मग त्याची कशी भंबेरी उडत जाते याचे फार सुंदरे चित्रण आहे. सगळ्यात जास्त धमाल येत ती या प्रसंगात - 'तो लॅपटॉपवरुरुन आपल्या बायकोला (जिच्याशी त्याचे ब्।आंडण झालेले असते) चॅटवरुन सांगतो की मी अमुक एका खोलीत अडकलो आहे जी झपाटलेली आहे. तू ताबडतोब पोलिसांना कळव. ती आधी नाही म्हणते पण मग तयार होते. थोड्या वेळाने ती सांगते की पोलिस खोलीत येउन खोली तपासून गेले पन काहीच सापडले नाही.' हे कळल्यावर त्याला आणि प्रेक्षकांना जो धक्का बसतो तो अनुभवण्यासारखाच आहे.
  • Log in or register to post comments

हे सही आहे. हा बघितला पाहिजे.

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:12 नवीन
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा