Skip to main content

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता. "ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!" "त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो." "अहो दुष्काळ पडलाय." दुष्काळ? म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली! "बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली. क्षणार्धात आकाश भरून आलं एक क्षणात दुष्काळ संपला! लोक आनंदाने नाचू लागले. म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला! एक चिमुरडी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली! "बाबा खाली वाका" म्हातारा थबकला! "बरं बाई या जगण्याच्या ओझ्याने वाकलोय, आता तुझ्यासाठी वाकतो!" आणि तिने त्याच्या चिंधि बांधलेल्या कपाळावर आपले ओठ टेकवले! म्हातारा अवाक झाला! त्याच्या ओठावर हसू फुलले! आणि त्याच क्षणी तो समाधानी होऊन खाली कोसळला! आकाशवाणी झाली, 'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'

वाचने 12169
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by नीळा

किती दिवस फिरणार बिचारा! म्हटलं चला एका कथेत तो अडकला, त्याला कथेतूनच मोकळं करू! कसा वाटला प्रयत्न?

वाचकांना एक विनंती आहे! ह्या कथेतील म्हातारा नट्सम्राट मधील नाना आहे अशी कल्पना करून वाचा!

एकदम वेगळी आणि छान कल्पना. खूप आवडली. पण मला अश्वत्थामा हीच कल्पना जास्त अपीलींग वाटली.

:)

बाकी, आकाशवाणी झाली, 'अश्वत्थाम्या - नागपूरचा होता का आकाशवाणीवाला :)

'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
सुंदर आहे हे वाक्य जाम आवडले. पुलेशु

मॉडर्न आर्ट, दुसरे काय, माफी असावी पण काईबी पल्ले पडले नाही

In reply to by आकाश कंदील

लहानपणीची एक गंमत आठवली गु रु जी रु मा जी ल बी

'अश्वत्थाम्या जगण्याचा शाप मिटवण्यासाठी मरणात समाधान असावं लागतं!'
या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कथा छानच, आवडली.

छान...

तुमच्या सर्वच महाभारत कथा मस्त आहेत.