शनिशिंगणापूरात समतेची गुढी
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झाल्या निर्णयाशी सहमत आणि त्याबाबत खूश
धर्माचे दुकान
आत्मबंध यांनी सनातनी हा शब्द
सुधीरन यांना प्रतिसाद
घ्या उत्तरं-
श्रद्धा, दहशतवाद आणि इतर काही
त्याचं काय आहे की जेव्हा
जाउ द्या हो.
काय हुकलंय म्हणता?
धर्मश्रद्धांची चिकित्सा
दुसरे असे की हिंदूंच्या
चिकित्सा आणि भंजन
मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच
तृप्ती देसाई यांचे अभिनंदन
यापूर्वी
श्रद्धा मूर्ख कशावरून?
स्त्रीची इंद्रिये शरीरात
स्त्रीची इंद्रिये शरीरात
एक आस्काय क्यारेक्टर का
अवकृपा होऊ नये म्हणून. :)
>>त्याचं काय आहे की जेव्हा
धर्मशास्त्रे आणि उर्वरित प्रतिसाद
>> ती व्यासपीठावर करायची असते
माझी मतं मांडतो.
एक बातमि
मजार पर्यंत जाणार नाही असं
ज्याला जिथे माथा टेकायचा आहे
येस पिरा.दर्ग्यात मजारपर्यंत
मुर्खपणा लावलाय.. इग्नोर
देसाई बै