✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

स
सुधीरन यांनी
Sat, 04/09/2016 - 00:05  ·  लेख
लेख
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37101 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

झाल्या निर्णयाशी सहमत आणि त्याबाबत खूश

वेल्लाभट
Wed, 04/13/2016 - 11:14 नवीन
यावरून एक गाणं सुचलं (आज ब्लू है पानी पानी) आज गुड है शनी शनी शनी शनी शनी शनी अन चैथर्‍यावर जाऊ शकतो एनी एनी एनी आजा ओ करले अभिषेक काम करले तू भी नेक और हो पुण्याचा धनी धनी धनी धनी धनी चालू द्या ! बाकी भक्ती ही असल्या अटी आणि परवानग्यांच्या पलिकडची गोष्ट असते असं मानणारा वेल्लाभट
  • Log in or register to post comments

धर्माचे दुकान

संदीप ताम्हनकर
Wed, 04/13/2016 - 20:37 नवीन
शिंगणापुर मध्ये मुद्दा धर्माचे दुकान चालण्याचा आहे हे सिद्ध झालय. जात ब्राम्हण नसलेली तरीही कट्टर आणि अडमुठी अशी पुरोहितशाही, ज्याला पुरोगामी विरोध करतात त्याचे हे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

आत्मबंध यांनी सनातनी हा शब्द

सतिश गावडे
Wed, 04/13/2016 - 22:43 नवीन
आत्मबंध यांनी सनातनी हा शब्द सनातनी असाच लिहीलेला वाचून डोळे भरून आले. प्रगो यांचे आयडी बलिदान व्यर्थ गेले नाही तर.
  • Log in or register to post comments

सुधीरन यांना प्रतिसाद

गामा पैलवान
Mon, 04/18/2016 - 12:51 नवीन
सुधीरन, आपला इथला प्रतिसाद वाचला. उशीरा उत्तर देतोय याबद्दल क्षमस्व. तर आपण मुद्द्यांकडे वळूया. १. >> जी कारणे दिली जातात (धार्मिक ग्रंथांत वगैरे), ती तर्काच्या कसोटिवर टिकतात का? धर्मश्रद्धांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणे कितपत योग्य? शिवाय बायकांना प्रवेश नसल्याने त्यांच्यावर असा काय मोठा अन्याय होतोय? त्यांचा जीव जातोय का? २. >> स्त्रियांवर अन्याय करण्याचा, त्यांस कमी लेखण्याचा, त्यांस स्वतःविषयी कमिपणा वाटवण्याचा हेतू सहजच दिसतो. अजिबात नाही. हिंदू धर्मात स्त्रीला शक्तीरूपिणी मानलं आहे. बायकांनी काही ठिकाणी प्रवेश न करणे हा त्या त्या देवतेच्या उपासनेचा भाग आहे. ३. >> अशा प्रथांविषयी स्त्रीया प्रश्न करू लागतील, जागरूकता वाढेल, .... माझ्या मते जागरूकता वाढवायला प्रथा मोडायची गरज नाही. ४. >> .... सोबतच अन्य स्त्रीविषयक प्रश्नांस हात घातला जाईल. हे दिवास्वप्न आहे. तसंही पाहता प्रथांना हात न घालताही प्रश्नांना वाचा फोडता येते. ५. >> चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की! ही जर तुमची स्त्रीपुरूष समानतेची कल्पना असेल तर स्त्रियांसाठी वेगळी सार्वजनिक शौचालये बांधायला नकोत. आगोदर ते प्रबोधन हाती घ्या. मूत्रविसर्जन दिवसभर दाबून ठेवल्याने बायकांना नाना प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांनी Right to Pee ही मोहीम चालवली आहे. तुमच्या समानतेच्या कल्पना जरा त्यांच्या कानावर घालणार का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

घ्या उत्तरं-

सुधीरन
Mon, 04/18/2016 - 21:53 नवीन
>>धर्मश्रद्धांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणे कितपत योग्य? पूर्णतः योग्य. सर्वच गोष्टी तर्काच्या कसोटिवर घासुन पाहिल्याच पाहिजेत. धर्मश्रद्धांचा अपवाद का करायचा? >> माझ्या मते जागरूकता वाढवायला प्रथा मोडायची गरज नाही. >>हे दिवास्वप्न आहे. तसंही पाहता प्रथांना हात न घालताही प्रश्नांना वाचा फोडता येते. हा एकमेव मार्ग नाही. हा ही मार्ग आहे, एवढंच. आणि त्यांना जमतंय ते त्या करत आहेत. तुम्हाला दुसरं काही सुचतंय तर तुम्ही ते करा. हे का? ते का नाही? असे प्रश्न विचारत का बसताय? >> चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की! हे वाक्य पुन्हा नीट वाचा. उत्तर मिळेल (हिंट-डाविकडून ५वा शब्द!). >>Right to Pee यासारखे खूप प्रश्न आहेत. सर्वाना सर्वच प्रश्न हाताळने कसे बरे जमेल? शिवाय माझा पूर्ण लेख तसेच माझे प्रतिसाद नीट वाचा. सर्वच प्रश्नांची उत्तरे आहेत त्यांत. वाक्य बदलून बदलून तेच ते प्रश्न विचारले जात आहेत. तुमच्या धर्माश्रद्धाना धक्का बसल्याने चिडणे समजू शकतो. ज़रा अभिनिवेश बाजूस ठेवून सहानुभूतिने विचार करा, इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

श्रद्धा, दहशतवाद आणि इतर काही

गामा पैलवान
Tue, 04/19/2016 - 23:22 नवीन
सुधीरन, तुमच्या वरील प्रतिसादातलं हे विधान रोचक आहे : १. >> सर्वच गोष्टी तर्काच्या कसोटिवर घासुन पाहिल्याच पाहिजेत. धर्मश्रद्धांचा अपवाद का करायचा? त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. दहशतवादाविरुद्ध लढायला श्रद्धाच कमी येते. तिथे तर्क दुबळा आहे. तुम्ही भले श्रद्धेची चिकित्सा करायला उतावीळ असाल, पण आम्ही श्रद्धाळू त्यास आत्मघात म्हणतो. श्रद्धेचं भंजन करून तुम्हाला दहशतवाद्यांना मदत करायची आहे का? असो. आता उरलेल्या प्रतिसादाकडे वळतो. २. >> हा एकमेव मार्ग नाही. हा ही मार्ग आहे, एवढंच. आणि त्यांना जमतंय ते त्या करत आहेत. >> तुम्हाला दुसरं काही सुचतंय तर तुम्ही ते करा. हे का? ते का नाही? असे प्रश्न विचारत का बसताय? मुळातून हा स्त्रियांवर अन्याय नाही. मग यासंबंधी काही कृती करायची गरज नाही. ३. >> हे वाक्य पुन्हा नीट वाचा. उत्तर मिळेल (हिंट-डाविकडून ५वा शब्द!). मंदिराच्या चौथऱ्यावर वा गाभाऱ्यात प्रवेश मिळवणे हा स्त्रीपुरुष समानतेचा निकष नव्हे. ४. >> सर्वाना सर्वच प्रश्न हाताळने कसे बरे जमेल? भूमाता ब्रिगेडला बायकांचे महत्त्वाचे प्रश्न हाताळायचे नाहीत. जो प्रश्न अस्तित्वात नाही त्याचं अवडंबर माजवून स्त्रीपुरूष समानता प्रस्थापित केल्याचा आव मात्र आणायचाय. यांस पुरोगामी कर्मठपणा म्हणतात. नेहमी ब्राह्मणांना कर्मकांडावरून शिव्या घालणारे पुरोगामी स्वत: निरर्थक कर्मकांडेच करत बसतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

त्याचं काय आहे की जेव्हा

तर्राट जोकर
Tue, 04/19/2016 - 23:57 नवीन
त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. दहशतवादाविरुद्ध लढायला श्रद्धाच कमी येते. तिथे तर्क दुबळा आहे. तुम्ही भले श्रद्धेची चिकित्सा करायला उतावीळ असाल, पण आम्ही श्रद्धाळू त्यास आत्मघात म्हणतो. श्रद्धेचं भंजन करून तुम्हाला दहशतवाद्यांना मदत करायची आहे का? लै म्हणजे लैच हुकलंय हे.
  • Log in or register to post comments

जाउ द्या हो.

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 00:01 नवीन
लंडनच्या उंटावर बसुन ते भारतातील शेळ्या हाकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काय हुकलंय म्हणता?

गामा पैलवान
Wed, 04/20/2016 - 18:30 नवीन
तर्राट जोकर, काय हुकलंय म्हणालात? हा ब्रिगे. मलिक यांच्या पुस्तकातला उतारा आहे : >> Terror struck into the hearts of the enemies is not only a means, it is the end in itself. >> Once a condition of terror into the opponent's heart is obtained, hardly anything is left to be >> achieved. It is the point where the means and the end meet and merge. Terror is not a >> means of imposing decision upon the enemy; it is the decision we wish to impose upon him. >> Psychological and physical dislocation is, at beat, a means, though, by no means, conclusive >> for striking terror into the hears of the enemies. Its effects are related to the physical and >> spiritual stamina of the opponent but are seldom of a permanent and lasting nature. >> An army that practices the Quranic philosophy of war in its totality is immune to >> psychological pressures. पुस्तकाचं नाव : The quranic concept of war. शत्रूच्या (म्हणजे हिंदूंच्या) श्रद्धांचा विनाश केल्याखेरीज त्यांना इस्लामची दहशत बसणार नाहीये. एका हृदयात श्रद्धा आणि दहशत एकत्र नांदत नसतात. आ.न., -ग.पै.
  • Log in or register to post comments

धर्मश्रद्धांची चिकित्सा

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 21:10 नवीन
धर्मश्रद्धांची चिकित्सा करण्यासाठी आपण विरोध करत आहात. ओके? जे ह्या धर्मश्रद्धांच्या चिकित्सेचा आग्रह धरत आहेत त्यांना आपण दहशतवाद्यांचे मदतनीस संबोधित आहात. ओके? तुम्ही सरळ सरळ हिंदू च्या धर्मश्रद्धेची चिकित्सा करणार्‍यांना इस्लामी दहशतवादी असल्याचा आरोप करत आहात. तुम्हाला अभिप्रेत असलेला हाच काय तो चिकित्सेसाठी सदैव तयार असणारा हिंदूधर्म? इथे तर तुमच्यात आणि मुस्लिम कट्टरवाद्यांत काहीच फरक नाही असे दिसत आहे. तुम्ही ठरवाल त्याचीच चिकित्सा व्हावी अन्यथा नको असे धोरण दिसते. इथे हिंदूंच्या श्रद्धेबद्दल चर्चा सुरु असतांना इस्लाम वर चर्चा करण्याचे काय प्रयोजन? मला तर इथले कैक टिकोजीराव इस्लाम, दहशतावादाच्या धाग्यावर हिंदूंवर टिका का करता, चर्चेत अवांतर विषय का आणता असे विचारतात. तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद त्यांना दिसत नसावेत. आता तरी समजले काय काय हुकलंय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

दुसरे असे की हिंदूंच्या

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 21:11 नवीन
दुसरे असे की हिंदूंच्या धर्मश्रद्धांच्या चिकित्सेला तुमचा विरोध आहे पण इस्लामने तेच म्हटले तर तुम्हाला चालत नाही. हा दुटप्पीपणा अनेक बाबी स्पष्ट करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

चिकित्सा आणि भंजन

गामा पैलवान
Wed, 04/20/2016 - 22:31 नवीन
तर्राट जोकर, तृप्ती देसाई यांनी केली ती श्रद्धेची चिकित्सा नसून भंजन होतं. या भंजनाचा लाभ दहशतवाद्यांना झालेलाच आहे. चिकित्सा व्यासपीठावर होते. धागाकर्ते सुधीरन (मिपा व्यासपीठावरून) तर्काधिष्ठित चिकित्सा करू म्हणताहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धार्मिक बाबतीत कुठेही स्त्रियांसाठी वेगळी प्रथा असेल तर ती त्यांच्यावर अन्याय करण्यासाठीच मुद्दाम निर्मिलेली असते. नेमकं हेच मूळ गृहीतक मला मान्य नाही. जमेल तितका खुलासा केला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 23:11 नवीन
मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच योग्य. स्त्रियांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून प्रवेश रोखणे हाच अन्याय आहे. तुमची अन्यायाची व्याख्या काय आहे? व्यासपिठीय चर्चा करायला ही तत्त्वज्ञानाची नाही, अन्यायमूलक वर्तणूकीविरुद्धची लढाई आहे. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' छाप चिकित्सा तुम्हाला मान्य नसेल तर नसू देत. शनीचा कोप होईल म्हणुन प्रवेश बंद होता ह्यावर व्यासपिठीय चर्चेचा उपयोग नाहीए. थेट चौथर्‍यावर प्रवेश घेऊनच केलेली ह्या श्रद्धेची चिकित्सा अतिशय योग्य आहे. देवाचे अस्तित्व कपोलकल्पित भीतीद्वारे दाखवण्याचे प्रयत्न हाणून पाडणे हिंदूंसाठीच चांगलेच आहे पण काहींची दुकाने बंद होतील म्हणून भीती आहे का? बाकी हिंदु जगतात तुमच्या मनाविरुद्ध होणार्‍या प्रत्येक गोष्टीचा इस्लामी दहशतवादाशी संबंध जोडणे हे मजेदार असले तरी हिंदूंसाठीच घातक आहे हे तुमच्या सनातनी मनाला समजणार नाही. त्यामुळे असोच. तुमचा खुलासा गुंजभर उपयोगाचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तृप्ती देसाई यांचे अभिनंदन

सामान्यनागरिक
गुरुवार, 04/21/2016 - 23:40 नवीन
तृप्ती देसाई यांचे कार्य उत्तमच आहे. त्यांच्या पुढील कार्यामध्ये त्या यशस्वी होवोत. पण यांचे नांव या पूर्वी कधी ऐकू आलेले नाही. त्यांच्या या पूर्वीच्या कार्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

यापूर्वी

ट्रेड मार्क
Fri, 04/22/2016 - 00:00 नवीन
त्या पण सामान्य नागरिक होत्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

श्रद्धा मूर्ख कशावरून?

गामा पैलवान
Fri, 04/22/2016 - 01:33 नवीन
तर्राट जोकर, तुमचा वरील प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १. >> मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच योग्य. स्त्रियांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून प्रवेश रोखणे हाच अन्याय आहे. उपरोक्त श्रद्धा मूर्ख आहे हे तुम्ही एकतर्फी कसे ठरवलेत? कुणाशी चर्चा केलीत का? काही शास्त्राधार आहे का? गाभाऱ्यात बायकांना बंदी आहे. लक्षात घ्या देवळात नव्हे. या प्रवेशबंदीमुळे स्त्रीची शारीरिक वा आर्थिक हानी होत नाही. जर कुणाची मानसिक हानी होत असेल तर अशा स्त्रियांनी देवळात जाऊ नये. देवळात जायचं असेल तर तिथले नियम पाळलेच पाहिजेत. स्त्रियांच्या प्रवेशबंदीमागे कारण आहे ते समजावून घ्यायचा प्रयत्न होत नाही. २. >> तुमची अन्यायाची व्याख्या काय आहे? अन्याय झालेला नसल्याने मी व्याख्येच्या भानगडीत पडंत नाही. ३. >> शनीचा कोप होईल म्हणुन प्रवेश बंद होता ह्यावर व्यासपिठीय चर्चेचा उपयोग नाहीए. स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत. ४. >> काहींची दुकाने बंद होतील म्हणून भीती आहे का? दुकाने? कसली दुकाने? बायकांच्या प्रवेशबंदीमुळे कोणाची दुकाने फोफावली? ५. >> बाकी हिंदु जगतात तुमच्या मनाविरुद्ध होणार्‍या प्रत्येक गोष्टीचा इस्लामी दहशतवादाशी संबंध जोडणे >> हे मजेदार असले तरी हिंदूंसाठीच घातक आहे काफीरांच्या श्रद्धाभंजनाचा संबंध जिहादशी जोडला आहे तो ब्रि. मलिक यांनी. जर हिंदूंच्या निरुपद्रवी श्रद्धांचे विनाकारण भंजन होत असेल तर ते दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडणारच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

स्त्रीची इंद्रिये शरीरात

टवाळ कार्टा
Fri, 04/22/2016 - 16:35 नवीन
स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत.
याबद्दल काही विदा मिळेल का वाचायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

स्त्रीची इंद्रिये शरीरात

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 16:57 नवीन
स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत.
मी ही स्वतःला सर्वसाधारण लोकांमध्ये गणतो. मात्र मी याला अडाणभोटपणा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एक आस्काय क्यारेक्टर का

टवाळ कार्टा
Fri, 04/22/2016 - 17:04 नवीन
एक आस्काय क्यारेक्टर का सर्कव्लेस रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अवकृपा होऊ नये म्हणून. :)

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 17:58 नवीन
अवकृपा होऊ नये म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

>>त्याचं काय आहे की जेव्हा

सुधीरन
Fri, 04/22/2016 - 07:14 नवीन
>>त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. तालिबानी जिहादाची प्रेरणाच धार्मिक आहे. आंधळ्या धर्मश्रद्धेतूनच त्याचा उदय झालेला आहे. त्यांचा धर्मचिकित्सेला विरोध आहे (तुमचाही आहे!). >> काही शास्त्राधार आहे का? कसला शास्त्राधार? कधीच्या काळी कुणीतरी कल्पनांचे घोड़े दौडवून लिहिलेल्या भाकडकथांमध्ये तो का शोधायचा? >> अन्याय झालेला नसल्याने मी व्याख्येच्या भानगडीत पडत नाही. हो, दलितांवरसुद्धा अन्याय नव्हता झाला! साने गुरूजी तुम्हारा भी चुक्याच्! >> स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. कैच्याकैच लॉजिक! ११/१२ विची बायोलॉजीची पुस्तके वाचा. तुमचाच तर्क चालवायचा तर स्त्रीची इंद्रिये शरीराच्या आत असल्याने सुरक्षित तर पुरुषाची बाहेर (!) असल्याने असुरक्षित असतात (मेन पार्ट, मेन पार्ट- रा वन). त्यामुळे पुरुषांनाच मंदिरबंदी करावी!!!! >> दुकाने? कसली दुकाने? बायकांच्या प्रवेशबंदीमुळे कोणाची दुकाने फोफावली? भट-ब्राह्मण-बडवे-पुजारी यांची दुकाने. ती लोकांच्या अज्ञानामुळे फोफावली आहेत, फोफावत आहेत. >>काफीरांच्या श्रद्धाभंजनाचा संबंध जिहादशी जोडला आहे तो ब्रि. मलिक यांनी. जर हिंदूंच्या निरुपद्रवी श्रद्धांचे विनाकारण भंजन होत असेल तर ते दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडणारच. परधर्मियांच्या भितीने धर्मसुधारणा करायच्याच नाहीत का? सती प्रथा-जातीव्यवस्था-अस्पृश्यता इ. नासुद्धा यासाठी विरोध करू नये का?
  • Log in or register to post comments

धर्मशास्त्रे आणि उर्वरित प्रतिसाद

गामा पैलवान
Sat, 04/23/2016 - 02:08 नवीन
सुधीरन, तुमचा वरील प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १. >> त्यांचा धर्मचिकित्सेला विरोध आहे (तुमचाही आहे!). माझा धर्मचिकित्सेला विरोध नाही. ती व्यासपीठावर करायची असते. २. >> कसला शास्त्राधार? कधीच्या काळी कुणीतरी कल्पनांचे घोड़े दौडवून लिहिलेल्या भाकडकथांमध्ये तो का शोधायचा? आगोदर तुमचा धर्मशास्त्रांविषयीचा दृष्टीकोन बदला. धर्म म्हणजे भाकडकथा म्हणंत असाल तर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. धर्मचिकित्सा शास्त्राधारेच करायची असते. ३. >> हो, दलितांवरसुद्धा अन्याय नव्हता झाला! साने गुरूजी तुम्हारा भी चुक्याच्! साने गुरुजींनी अन्यायास वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा म्हणजे आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला होता. ते तृप्ती देसाईंसारखे श्रद्धाभंजक नव्हते. ४. >> ११/१२ विची बायोलॉजीची पुस्तके वाचा. सूचनेबद्दल धन्यवाद! तुम्हीसुद्धा धर्मशास्त्र व स्पंदनशास्त्र वाचून आलात तर बरं होईल. ५. >> भट-ब्राह्मण-बडवे-पुजारी यांची दुकाने. ती लोकांच्या अज्ञानामुळे फोफावली आहेत, फोफावत आहेत. या दुकानांचा स्त्रियांनी शिंगणापूर चौथऱ्यावर प्रवेश करण्याशी संबंध नाही. ६. >> परधर्मियांच्या भितीने धर्मसुधारणा करायच्याच नाहीत का? सती प्रथा-जातीव्यवस्था-अस्पृश्यता इ. >> नासुद्धा यासाठी विरोध करू नये का? त्यासाठी सेवामार्ग अनुसरावा लागतो. असा मार्ग फुले, कर्वे, आंबेडकर, शाहू महाराज, सावरकर इत्यादिंनी चोखाळला होता. त्यासाठी श्रद्धा मोडीत काढायची गरज नसते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

>> ती व्यासपीठावर करायची असते

सुधीरन
Sat, 04/23/2016 - 07:11 नवीन
>> ती व्यासपीठावर करायची असते. धर्मचिकित्सा करणारी कितीतरी पुस्तके राजवाड़े, साळुंखे, कुरुंदकर, कॉ. पाटील, बेडेकर, प्रबोधनकार इ. नी लिहिली आहेत. व्यासपीठावरून चर्चा झाल्या आहेत. त्यालाच कृतिची जोड़ देणेसुद्धा आवश्यक ठरते. आणि आधी मंदिराच्या विश्वतांशी चर्चा केली गेली. ते ऐकत नसतील तर काय करायचं? >> धर्म म्हणजे भाकडकथा म्हणंत असाल तर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. धर्मशास्त्रांमध्ये ज्या बालिश गोष्टी (वाचायला नाही सांगत आता- टीवीवरील धार्मिक मालिका पहा) सांगितल्या आहेत त्यांविषयी बोललो होतो! धर्मास भाकड़कथा नाही म्हटलेलं! महादेव, गणपती, हनुमान, कृष्ण इ. देवतांचे जे विकृतिकरण झालेले दिसते त्याविषयी आणि तत्सम विषयांबद्दल राग आहे! >>या दुकानांचा स्त्रियांनी शिंगणापूर चौथऱ्यावर प्रवेश करण्याशी संबंध नाही. मी कुठे जोडतोय? तुम्ही विचारलेल्या प्रश्नास उत्तर दिले फ़क्त! >>धर्मशास्त्र व स्पंदनशास्त्र वाचून आलात तर बरं होईल. रामायण, महाभारत, भगवद्गीता, महादेवावरील १/२ ग्रंथ (शिवा ट्राइलॉजी नव्हे!), सनातन प्रभात, धर्मभास्कर मधील लेख, क़ुरआन, बायबल याबाहेर माझा अभ्यास नाही. अजुन वाचन करायचे आहे. >> श्रद्धाभंजक प्रश्न विचारले, चुकीच्या प्रथांना विरोध केला, चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर कृती केली (लाठ्या-काठया-बंदूका-बॉम्ब घेवून पवेश नव्हता केला! आणि आत जावून पूजाच केली) तर ती व्यक्ति श्रद्धाभंजक ठरते का? >> फुले, कर्वे, आंबेडकर, शाहू महाराज, सावरकर इत्यादिंनी चोखाळला होता. त्यासाठी श्रद्धा मोडीत काढायची गरज नसते. कमाल आहे! फुले, शाहू, आंबेडकर इ. नी कितीतरी श्रद्धा मोडीत काढल्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

माझी मतं मांडतो.

गामा पैलवान
Tue, 04/26/2016 - 02:06 नवीन
सुधीरन, १. >> व्यासपीठावरून चर्चा झाल्या आहेत. त्यालाच कृतिची जोड़ देणेसुद्धा आवश्यक ठरते. शनी शिंगणापूर येथील प्रथेच्या संदर्भात चर्चा वा चिकित्सा झालेली नाही. २. >> आणि आधी मंदिराच्या विश्वतांशी चर्चा केली गेली. ते ऐकत नसतील तर काय करायचं? तृप्ती देसाईंना तीन पर्याय उपलब्ध होते. १. स्थानिक मान्यवरांशी (मंदिराच्या विश्वस्तांशी नव्हे) चर्चा करणे. २. काशी येथील विद्वत्सभेत आपले म्हणणे मांडणे. ३. चारधामपैकी एका वा अधिक शंकराचार्यांना विनंती करणे. वरीलपैकी एकही पर्याय अंमलात न आणता देसाईंनी घुसखोरी केली आहे. त्याकारिता विश्वस्तांशी चर्चा होत नाही अशी लंगडी सबब दिली आहे. विश्वस्त हे प्रशासकीय पद आहे. त्यांना धर्माविषयी माहिती असण्याची अपेक्षा नाही. ३. >> चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर कृती केली (लाठ्या-काठया-बंदूका-बॉम्ब घेवून पवेश नव्हता केला! आणि >> आत जावून पूजाच केली) तर ती व्यक्ति श्रद्धाभंजक ठरते का? चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर मग श्रद्धाभंजाकांचे डोके फोडावे का? तसंही पाहता आत्मा अमर आहेच की. केवळ मर्त्य देह नाहीसा झाला तर काय बिघडलं? लावायचा का जंगलाचा नियम? ४. >> कमाल आहे! फुले, शाहू, आंबेडकर इ. नी कितीतरी श्रद्धा मोडीत काढल्यात! युक्तिवादापुरतं एकवेळ मान्य करू. पण या लोकांनी अरेरावी कधी केल्याचं ऐकिवात नाही. अगदी शाहू महाराज सत्ताधारी होते तरीही त्यांनी लोकभावना पायदळी तुडवल्या नाहीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

एक बातमि

ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 04/28/2016 - 17:46 नवीन
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार आहे. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी विरोध दर्शवलाय. एमआयएमने तर तृप्ती देसाईंना काळं फासणार असा इशारा दिलाय. आता सपाचे आमदार अबू आझमी यांनीही या प्रकरणात उडी घेतलीये. तृप्ती देसाई या प्रसिद्धीसाठी हा ड्रामा करत आहे. दर्ग्यात महिलाने जाणे न जाणे हा आमच्या समाजाचा प्रश्न आहे. त्यात तृप्ती देसाईंनी ढवळाढवळ करू नये. मी, माझ्या मुस्लिम महिला कार्यकर्त्यांना आदेश दिले असून तृप्ती देसाईंनी जर दर्ग्यात मजार (कब्र) पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर धक्के मारून हाक लून द्या असा इशारा अबू आझमी यांनी दिलाय.
  • Log in or register to post comments

मजार पर्यंत जाणार नाही असं

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/28/2016 - 17:51 नवीन
मजार पर्यंत जाणार नाही असं देसाईबाई म्हणाल्यात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

ज्याला जिथे माथा टेकायचा आहे

ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 04/28/2016 - 17:49 नवीन
ज्याला जिथे माथा टेकायचा आहे त्याने तिथे जावे, ह्यामध्ये स्त्रि-पुरुष, जात-धर्म ह्यावरुन कोणिहि कोणाला रोखु नये असे मला वाटते. पण फक्त प्रसिध्दि साठि कोणि सामजिक शांतता, स्थैर्य, सलोखा धोक्यात आणत असेल तर मात्र आपला विरोध आहे.
  • Log in or register to post comments

येस पिरा.दर्ग्यात मजारपर्यंत

ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 04/28/2016 - 17:54 नवीन
येस पिरा. दर्ग्यात मजारपर्यंत जाणार नसून जिथपर्यंत महिला आणि पुरुषांना जाऊ दिलं जातंय तिथपर्यंतच जाऊन दुवा मागणार असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं. अँड द मोस्ट फनी पार्ट इज ज्यांना विरोध करायचा त्यांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा ,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची काळजी घ्यावी असंही देसाईंनी म्हटलंय. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना संधी द्यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. या विषयीचं पत्र सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलं
  • Log in or register to post comments

मुर्खपणा लावलाय.. इग्नोर

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/28/2016 - 17:57 नवीन
मुर्खपणा लावलाय.. इग्नोर करायला हवं ह्या बाईला..
  • Log in or register to post comments

देसाई बै

सुनील
गुरुवार, 04/28/2016 - 18:27 नवीन
बै लै हुश्शार बॉ!! एका दगडात अनेक पक्षी घायाळ करते आहे!! बादवे, सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांत जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे तिथपर्यंत स्त्रीयांनादेखिल प्रवेश मिळाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा