Skip to main content

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

लेखक सुधीरन यांनी शनिवार, 09/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 37314
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

तेल वाया जात नाही पण वाहणार्याचा पैसा मात्र जातो. माझ्या माहीतीप्रमाणे हे तेल साबण बनवणार्या कंपन्या विकत घेतात व काही तेल रिसायकल होते. ह्यातून संस्थान व काही हितसंबंधी लोक चांगला पैसा कमावतात व "श्रद्धाळू" हा पैसा आपणहुन नेउन त्यांना अर्पण करतात. आजकाल प्रसाद ही सुद्धा नविन इंडस्ट्री चालु झाली आहे.

In reply to by सतिश गावडे

प्रश्न तत्वाचा आहे. आणि विरोध मोडायला न्यायालयात जावं लागलं याचा अर्थ लढाई सोपी नव्हती. एका गोष्टीत समानता आली की त्याचे साइड इफेक्टस दुसरीकडे ही दिसतील, असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही, आताच्या काळात तो खुळेपणा आहे.
हि केवळ दोन वर्षा पुर्वीची महाराष्ट्रातीलच बातमी आहे की नव विवाहीत दलित दांपत्त्याला एका मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाकारला गेला होता. नास्तिकांना कितीही नको असले तरी मंदिरेही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत हे वास्तव आहे. महाराष्ट्रापेक्षा पुरोगामी असणे अभिप्रेत असलेल्या तामीळनाडु राज्यात ना मंदिर संस्कृती मिटली आहे ना दलितांवरील अत्याचारांचा अंत झाला आहे. दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत. मंदिर या केंद्रीय सांस्कृतिक गोष्टीत समानता येणे हे समता मानसिक पातळीवर स्विकारली जाण्यासाठी कदाचित अजूनही महत्वाचे नाहीच असे नेमकेपणाने सांगणे कठीण असावे.

In reply to by माहितगार

दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत.
कदाचित याचा अर्थ असाही होतो की आंतरजातीय विवाह देखील वाढत आहेत. हे देखील एक चांगले लक्षणच.

चला आता शनिमहारांजाच्या कृपेने महिलांचे प्रश्न सुटणार तसेच त्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून येईल असे वाटते.

चला प्रवेश मिळाला . आता या महिला किती भक्तीभावाने शनिदेवाची पूजा किती दिवस करतात हे पाहणे रोचक ठरेल.

In reply to by प्रचेतस

प्रचेतसजी या विषयावरच्या मागच्या दोन धाग्यापासून तरी मिपा अनाहिता गायब हैत असे वाटते, याचे रहस्य काय असावे ब्रे ?

In reply to by माहितगार

कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. माझ्या बाबतीत म्हटले तर जे काय चालू आहे ते मला ठीक वाटते. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा असे तर माझा पाठिंबा आहेच. पण त्यासाठी मी पदरमोड करून आणि वेळ घालवून आंदोलने करायला जाणार नाही. वयाच्या तिशी पस्तिशी नंतर आपण स्वतःलाही बदलू शकत नाही. तेव्हा लोकांना बदलायचा प्रयत्न करणेही अवघड आहे. लोकांच्या सवयी बदलण्यासाठी भारतात तरी सरकारचे कायदे किंवा न्यायालयाचे निर्णय असा एखाद्या जास्त मोठ्या "दादाचा" हस्तक्षेप लागतो. चौथर्‍यावर फक्त पुरुषांना प्रवेश का यासाठी आंदोलन करणेही बरोबर आहे आणि मुळात अंधश्रद्धा का वाढवावी हेही बरोबर आहे. मुक्तता करायची असेल तर त्र्यंबकेश्वरासारखे अनेक देव पुजार्‍यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्या सगळ्यांचीच मुक्तता व्हायला हवी. देव किंवा राक्षस असा दगड किंवा मूर्तीत नसतो. असलाच तर तुमच्या माझ्यासारख्या माणसात असतो. त्यातल्या काहीजणांना वेगवेगळ्या गुलामगिरीत रहायला भाग पाडणे हे राक्षसी कर्म आहे. बर्‍याच बायकांना कितीतरी लांबून पाणी डोक्यावर उचलून आणावे लागते. घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर बहुधा मुलीला पैसे वाचवण्यासाठी भावापेक्षा कमी दर्जाचे शिक्षण दिले जाते. अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू असतात. हे सगळे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र त्यात काही बदल करणे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही. त्यासाठी हुतात्मा व्हायची तर अजिबात गरज नाही. आपण मरतो तेव्हा आपल्याबरोबर जगही मरते त्यामुळे आपण मेल्यानंतर जग पुढे जातय का मागे जातय याची चिंता करून हातात असलेले आयुष्य फुकट का घालवावे? दर्शनाची सोय झाली. आता त्यातही ५०० रुपये देणार्‍यांना स्पेशल दर्शन, अजून जास्त देणार्‍यांना तेलाचा अभिषेक स्वतःच्या हाताने करता येईल वगैरे प्रकार सुरू होतील. मग ते बंद करा म्हणून कोणीतरी आंदोलने करत राहील. चालू दे सगळे. एव्हरीथिंग इज ओके. मात्र असल्या आंदोलनांसाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा तूरडाळ जर २०० रुपये किलो असताना बागायतदार सोसायटीत १४० ने मिळत असेल तर तिथे रांग लावणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात कोणाला जर शनि चौथर्‍यावर रांग लावायची असेल तर त्यालाही माझी ना नाही. दुसर्‍या कोणाला मूर्ख म्हणायचा मला हक्क पोचत नाही. देव बिव काही आपल्या मदतीला येत नाही हे माझे मत असले तरी एखाद्या काडीच्या आधारामुळे कोणाच्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडच्या ट्रिपा वाचणार असतील तर तेही ठीक. दुसर्‍या कोणाला त्रास होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला घटनेनेच हे स्वातंत्र्य दिले आहे. त्रासात असताना कोणी देवाचा आधार घेतो, कोणी नशेचा घेतो. यात बरे वाईट काय हे कोण तिर्‍हाईत कसे ठरवणार?

In reply to by पैसा

प्रश्न स्त्रीयांचे मत या बाजुचे आहे का त्या बाजुचे असा नाही. शनि शिंगणापूरला प्रवेश मिळतो न मिळतो हे गौण त्या प्रसंगामुळे जी संस्कृतीत समताधिष्टीत मुल्य प्रस्थापना करण्यासाठी लागणारी वैचारीक कलहाची संधी मह्त्वाची. मिपा महिलांनी प्रत्यक्ष आंदोलनात जाणे अभिप्रेत नाही. 'अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात.' हि स्थिती चिंतेची आहे. मंदिर प्रवेश झाला आहे त्यामुळे पुरुषीवृत्ती या धाग्यावर जराशा गप्प झालेल्या दिसतात पण मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला. आणि तरीही गोपाळ गणेश आगरकरांचा एक धागा टाकलाच गोपाळ गणेश आगरकरांना आजच्या काळापेक्षा अधिकच सहन करावे लागले असेल त्यांच्या अग्रलेखांचे पुस्तक प्रुफरिडींगसाठी विकिस्रोतावर आहे. त्यांची बर्‍याच लेखातील वचने अशा विवादातून महिलांना उधृत करण्यासारखी आहेत पण आगरकर विषयक धाग्यात पिराताईच तेवढ्या काय पोहोचल्या आणि त्याही केवळ महाराष्ट्रीय शब्दाच्या योग्यायोग्यते बाबत चर्चा करुन पाय काढता घेऊन गेल्या. तिकडे मराठी विकिपीडियावर स्त्री अभ्यासकेंद्रांच्या विद्यार्थीनींनी दिल्लीतील विद्वान स्त्रियांच्या पुस्तकांची बरीच परिक्षणे मराठी विकिपीडियावर टाकली पण चालू प्रश्नाची-आंदोलनाची दखल घेण्यास त्यांनाही वेळ नाही. तृप्ती देसाईंवरचा विकिपीडिया लेख शेवटी मी स्वतः चालू केला. असो.

In reply to by माहितगार

मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
हा विचार चांगलाच आहे. कारण मग "इथे तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नव्हते आमची बाजू घेऊन भांडा" असा उद्धटपणा ऐकून घ्यावा लागतो.

In reply to by तर्राट जोकर

अगदीच असा अनुभव व्यक्तिशः आत्तापर्यंत आलेला नाही- मी काढलेल्या पहिल्या धाग्यात अनाहितांनी उपस्थिती लावली होती पण त्यासाठी त्या धाग्यात मी अगदीच उचकवले होते - पण शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ?

In reply to by माहितगार

अनुभव आला नसेल तर चांगलंच आहे. पण येणार नाही याची कोणतीच खात्री नाही. शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ? >> =)) चांगला प्रश्न आहे.

In reply to by माहितगार

तुम्ही आठवण काढलीत म्हणुन प्रतिसाद.. पहिली तर गोष्ट की वर पैसाताईने अगदी नीट सांगितले आहे.. जे कित्येकदा आधी सुद्धा सांगितले गेले आहे पण हरदासाची कथा मुळपदावर.. तुम्ही फार तार्किक लिहीता म्हणुन तुमच्याकडुन हे अपेक्षित नव्हते.. सर्व स्त्री आयडी म्हणजे अनाहिता नाहीत. अनाहिताचे एकच असे मत वगैरे नसते. त्यामुळे मिपावर स्त्री आयडींना उद्देशुन बोलताना "अनाहिता" असा उल्लेख करु नये. विषयच अनाहिता असेल तर मी अनाहिता ह्या नात्याने लिहेन कदाचित. पण एरवी मी मिपा सदस्यच आहे. इतरही अनाहितांचे साधारण असेच मत असावे. दुसरं तुमच्या लेखांवर प्रतिसाद न देण्याबद्दल.. मला तुमचे लेख / प्रतिसाद वाचण्याचा अतोनात कंटाळा येतो. प्रश्न मेगाबायटी लेखन वाचण्याचा नाहीये. तुमच्या लेखनाची मांडणी मला अत्यंत बोजड आणि कंटाळवाणी वाटते. ह्या व्यतिरिक्त १. रतीब घातल्यासारखे लेख लिहीणे २. जिथे तिथे त्यांची झैरात करणे इ. कारणेही लागु आहेत. त्यामुळे विधान करताना आधी लोक तुमचे लेख मुळात वाचत आहेतच हे गृहीत धरण्याचे कारण नाही. तुमच्या तुरळकच लेखांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो (त्यातही विषय धार्मिक अथवा गाजत असलेला / राजकीय असेल तर विशेषतः). स्त्री आयडींना खास पाँईट आउट करण्याची गरज नाही. त्यातही धाग्याचे नाव वाचुन तुमच्या स्वयंपाकघराच्या धाग्यावर अनेकींनी प्रतिसाद दिला होता. मी सुद्धा भरपुर लिहीले होते. पण खाली तुम्ही त्याबद्दल "उचकवणे" आणि "नैसर्गिक रिस्पॉन्स" वगैरे बोलुन त्याबद्द्ल पश्चाताप करायला लावल्याबद्दल धन्यवाद! (बाकी तुमच्या कुठल्याही धाग्यावर स्त्री आयडी फारशा आल्याचे मला तरी दिसले नाही.. तुमची विधाने दुसर्‍या धाग्याबद्दल असली तरी आक्षेपार्हच आहेत..) आता मुळ मुद्द्याबद्दल एखाद्या गोष्टीसाठी स्त्रियांनी लढा दिला आणि यश मिळवले ही खरंतर उत्तमच गोष्ट आहे. मी स्वतः देवधर्म मानित नसल्याने मला व्यक्तिशः काही फरक पडला नाही. ही शक्ति इतर जास्त महत्वाच्या आणि गंभीर स्त्री विषयक मुद्द्यांसाठी वापरली गेली असती तर जास्त बरे झाले असते.. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मला हा प्रकार खरं तर राजकीय स्टंटबाजीचा जास्त वाटतो. म्हणुन काही विशेष आनंद वगैरे झाला नाही. बाकी सर्व मत एकम्दरीत पैसाताई सारखेच आहे. आणि हो.. पुन्हा कधी तुम्हाला फुकट निराश व्हावं लागु नये म्हणुन.. खरंच स्त्री आयडींनी आमंत्रण दिलं नव्हतं कोणाताही धागा काढताना. तेव्हा उगाच "आयजीचा जीव बायजीत.. बायजीचा जीव खेटरात.." टाईप सुर लावु नये. इथे कुणीही जेव्हा स्त्तीयांच्या बाजुने लिहीते / भांडते तेव्हा स्वतःच्या मतांसाठी.. विचारांसाठी बोलत असते. स्त्रीयांनी त्याबद्दल उपकृत रहाण्याची अपेक्षा न केल्यास बरे. धन्यवाद!

In reply to by माहितगार

माहितगार, तुमच्याकडून असा प्रतिसाद यावा याचे सखेद आश्चर्य वाटते आहे! मला गेले तीन दिवस मिपा उघडतच नव्हते कसा प्रतिसाद देणार? दुसरे या विषयावर मी एकदा तुमच्याच धाग्यावर मला काय वाटते ते लिहिले आहे.अशा चमको आंदोलन आणि शनिला देव समजून महत्त्व देणे वगैरे गोष्टी माझ्यासाठी दुर्लक्षणीय आहेत.स्त्रियांसाठी करण्यासारख्या अनेक गोष्टी या भूमातांनी केल्या तर जास्त आवडेल.

In reply to by माहितगार

मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
यासाठी धन्यवाद! मात्र खरे सांगायचे तर अशा विषयांवर निकोप चर्चा होऊ शकत नाही हा जुना अनुभव आहे. मग तिथे अनाहिता वगैरे अनेक संबंध नसलेल्या गोष्टी येतात. आणि चर्चा नीटशी होत नाही तर फक्त भांडणे होऊन संपादकांचे काम वाढते त्यामुळे मी अशा प्रकारांना उत्तर द्यायचे फार पूर्वीच बंद केले आहे. बरे काही उत्तर देऊन कोणाचे मत बदलण्याचीही कधी सुतराम शक्यता नसते. या चर्चांमधे आगलावेपणा करणारे कोण हे नेहमीच ठरलेले असतात. त्यामुळे तिथे आपला वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा दुसरे काही विधायक करण्यावर मी लक्ष केंद्रित करते.

In reply to by पैसा

कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती.
अगदी नैसर्गीक. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. नाही नाही आम्हाला त्यांच्या स्वयंघोशीत प्रतिनीधींची अनुपस्थीती जाणवते... आता यात पुन्हा म्हणाल की अशा कोणी स्वयंघोशीत अनाहीता प्रतिनीधी अजिबात अस्तित्वात नाहीत पण लक्षात घ्या त्या आहेत असे अनेक अनाहितांचे गुप्त उघड म्हणने आहे कदाचीत चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवातिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा स्वयंघोशीत प्रतिनीधींच्या बाबत चर्चांमधे फार येत नसाव्यात इतकेच.

In reply to by अ-मॅन

मिपावय पाच महिने आणि नॉन अनाहिता असुन तुम्हाला अनाहिता बद्दल बरीच माहिती दिसते. इतकेच नव्हे तर अगदी अनाहिता तुमच्यापाशी मन मोकळे करताना दिसतात. तुम्हाला त्यांचे गुप्त उघड म्हणणे आणि त्यामागचे कारणही माहिती आहे. इंटरेस्टींग!

In reply to by पिलीयन रायडर

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य उर्फ़ द बाहुबली उर्फ़ शिवाजी द बॉस उर्फ़ भाऊंचे भाऊ उर्फ़..उर्फ़.... असावेत.

In reply to by प्रचेतस

गोष्टीचा एकदम नवल्/अचंबा/रहस्य्गुढता/अनाकालनीय गुंता/वैषम्य वाटते. सरळसोट कायम एकाच नावाने धाडसी लिहिणारा बॅन होतो (किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल) आणी नाना अवतार्धारी सतत भेटत राहतात विनासायास काही महिन्यासाठी तरी नक्की !!! तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे ! चित्ती असू द्यावे समाधान ! मिपा वारकरी नाखु

In reply to by नाखु

किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल
हे कोणाबद्दल बा? आणि ही माहिती तुम्हाला कोणी दिली? त्याचा पूर्वग्रह कशावरून नाही?

In reply to by सूड

मी कधीही काहीही लिहिण्यापूर्वी माझी माहिती आहे का अंदाज आहे ते सांगून टाकते. ज्यांना नीट वाचायची इच्छा असते त्यांचा गैरसमज नको ना! हा, कोणाला दिसत असून कानाडोळा करायचा असेल तर त्याची मर्जी. पण सगळेच जण डोळे मिटून दूध पीत नाहीत.

In reply to by प्रचेतस

सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की. @पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे.

In reply to by प्रचेतस

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य...उर्फ़..उर्फ़..उर्फ़.... असावेत. सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की. तसेही फक्त अंदाजपंचे प्रतिसाद ठोकायची परवानगी असेल तर आपणही मोहिते जिवन या सदस्यनामाने मिपावर वावरत असणार. असो... @पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.

In reply to by टवाळ कार्टा

मी संवादाला विशीष्ट लोकांपुरता बंदीस्त ठेवु इछ्चीत नाही त्यामुळे जाणकारांनी प्रतिसाद दिले नाहीत तरीही चालेल पण महोदया पिलियन रायडर यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत मी आहे. प्रतिसादाचा कोणताही रोख एका व्यक्तीवर अथवा पिलियन रायडर यांचेबाबत नसताना असे धाग्यावरच वैयक्तीक होण्यास परवानगी त्यांना कशी मिळाली, अथवा त्या कोणाच्या वतीने बोलत आहेत, का बोलत आहेत.. कोणाशी बोलत आहेत ( हे बहुदा त्यांनाही समजत नसावे असे त्यांचा प्रतिसाद सुचवतो) याचे स्पश्टकरणही मला महोदयांकडुन अभिप्रेत आहे.

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना त्यांचा वेळ घेउ देत...! वेळ येण्यापुर्वी वेळ घेणे कोणाच्याही बाबतीत अनैसर्गीक नक्किच मानता येणार नाही.

In reply to by टवाळ कार्टा

फ्यान प्रकरणाचा फार धसका घेतला आहे मी. आपल्यापर्यंत (म्हणजे माझ्या) नकोच ही भानगड. म्हणूनच मी पण तुमचा लै आधी पासुनच फ्यान असुनही ते कधी तुम्हा सांगितले नाही.

In reply to by होबासराव

"हिंदु संघटित झाला कि कोणाच्याच बापाला ऐकत नाहि" नाही, नाही. आशुने कधीच कॉणत्या विशीश्ट देवाच्या अथवा धर्माच्या बाजुने फार बोललेले अथवा इतरांनी ते तसेच मान्य करावे म्हणून प्रयत्न केलेले कधी वाचले नाही पण त्याने विज्ञानाच्या व त्याच्या आंधळ्यासमर्थकांची मात्र सडेतोड खिल्ली उडवलेली नजरेत भरते. ( या बाबत अजाणाकरांच्या विरोधी प्रतिसादांच्या प्रतिक्षेत) आशुने कधीही वैयक्तीक धर्मीक भाव-भावना सार्वजनीक केल्याची त्याच एकमेव खर्‍या असल्याचे मानल्याची विषेश उदाहरणे नाहीत. त्यामुळे असली सही तर तो लिहणेच बेशक्य. अर्थात हे वैयक्तीक निरीक्षण असल्याने याच्या मर्यादा मलाही मान्य आहेत.

In reply to by अ-मॅन

विज्ञानाच्या व त्याच्या आंधळ्यासमर्थकांची मात्र सडेतोड खिल्ली उडवलेली नजरेत भरते. हे मात्र खरे हो! आजही "पाहुनि विज्ञानाच्या बला" हे त्यांनी प्रसिद्ध केलेले भजन मला आठवते.

In reply to by विजय पुरोहित

एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे, अन "*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता. असो मला सुध्दा "पाहुनि विज्ञानाच्या बला" हे त्यांनी प्रसिद्ध केलेले भजन मला आठवते, पण त्याच्या त्रोटकपणामुळे पुरेसे पटत नाही.

In reply to by अ-मॅन

*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता.
हा *त्या वाला प्रतिसाद भाऊंचे भाउ ह्या सध्या उडवण्यात आलेल्या आयडीने दिला होता. तो माझ्यामते तसा लगेच उडाला. भाऊंच्या भाऊंनी तर प्रोफाईल मध्येच मी आत्मशुन्य आहे हे डिक्लेअर केलं होतं. तुम्ही साधारण त्याच दिवसानंतर एकदम अ‍ॅक्टिव्ह झालेले दिसत आहात. रोख आल्याक्षणापासुन अनाहिता कडे आणि त्यातही स्पेशली माझ्यावर विशेष खार खाल्लेला.. असंबंद्ध बरळणारे प्रतिसाद.. माझ्या मनात तर काहीही शंका नाही... आशुडी!! संपादक मंडळ, *त्या वाला प्रतिसाद उडवणे ह्यावरुन अ-मॅन ह्या सदस्याने हे जे विधान केलेले आहे...
"एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे, अन "*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता"
ह्यातुनही सरपंचाच्या कुवतीवर शंका घेतली जात आहे असे वाटत नाही का? असेच काही बोलल्याने बॅटमॅन हा आयडी बॅन झाला होता. वरील विधान सरपंचावर केलेला गंभीर आरोप आहे. त्याची दखल घेतली जावी ही विनंती..

In reply to by कपिलमुनी

रेकॉर्ड झिजली. नवीन कायतरी शोधा.

In reply to by कपिलमुनी

असेल असेल...जेव्हा माझ्यावर एका आयडीने शिंतोडॅ उडवलेले तेव्हा मला "ए खवमध्ये काय भांडायचे ते भांडा" असा सल्ला मिळालेला...इथे बघू काय होते

In reply to by टवाळ कार्टा

प्रगोला उडवले - "प्रगोला उडवणार्‍यांची लायकी कळाली" - बॅटमॅन - बॅट्याला उडवले. आमच्या सारख्या सामान्यांना संदेश - उडवणार्‍यांची पक्षी सरपंचाची लायकी काढल्यास कारवाइ होते भाऊंच्या भाऊंना "*त्या" प्रतिसादासकट उडवले - "एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे..... शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते" - अ-मॅन हे माझे लॉजिक.. असो.. मला चुक वाटले, मी तक्रार केली. कपिलमुनी.. पैसाताईसोबतचे स्कोअर तिच्यासोबत सेटल करा. ती धुणी माझ्या प्रतिसादात नकोत. धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

एखाद्या आयडीचा प्रतिसाद नाही आवडला तर दुर्क दुर्लक्ष करा की...आम्हालाही हेच सांगितले जाते...आणि रच्याकने तुम्हालासुध्धा गरज नस्ताना संक्षींना मधे मधे आणताना बघितलेले आहे त्याचे काय??? ते प्रतिसाद वैयक्तीक प्रतिसादांच्या कॅटेगरीत नाही येत का???

In reply to by टवाळ कार्टा

तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की सरपंच? तू ह्यातील कुणीही एक असल्यास आणि इथे विषय तुझ्याविषयी चालु असल्यास बोलावे. अन्यथा मी साधारणत: कसे नि काय प्रतिसाद देते ह्याविषयीची "तुझी" मते ऐकण्यात मला स्वारस्य नाही. माझ्याविषयी काही तक्रार असल्यास ती सरपंचाकडे तू करशीलच. शेवटी इथे काय नि कसे बोलले जावे हा त्यांचा निर्णय असतो. तुझा वा माझा नाही. एकंदरीतच ह्या धाग्यावर मला जे बोलायचे होते ते बोलुन झालेले आहे. जिथे खटकले तिथे वैयक्तिक न होता आणि इतर कुणाविषयी गळे न काढता मी सरळ मार्ग पत्करुन जाहीर तक्रार केलेली आहे. ज्यांना माझ्याविषयी तक्रारी आहेत त्यांनी पुराव्यासकट सरपंचाना द्याव्यात. माझ्याशी काही बोलायच्या भानगडीत पडु नये. धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की सरपंच?
इथे कोणीही प्रतिसाद देउ शकतो ना? वरील ३ पैकी कोणीही नसतानासुध्धा...
तू ह्यातील कुणीही एक असल्यास आणि इथे विषय तुझ्याविषयी चालु असल्यास बोलावे. अन्यथा मी साधारणत: कसे नि काय प्रतिसाद देते ह्याविषयीची "तुझी" मते ऐकण्यात मला स्वारस्य नाही. माझ्याविषयी काही तक्रार असल्यास ती सरपंचाकडे तू करशीलच. शेवटी इथे काय नि कसे बोलले जावे हा त्यांचा निर्णय असतो. तुझा वा माझा नाही.
खिक्क...मी माझी मते सांगितलीच नाहित...मला जे दिसलेले तेच लिहिले आहे...

In reply to by पिलीयन रायडर

पैसाताईसोबतचे स्कोअर तिच्यासोबत सेटल करा.
कपिलमुनी हा आयडी मिपावर फक्त प्रतिसाद द्यायला येतो. त्यांचे लिखाण कधी वाचलेले आठवत नाही त्यामुळे संपादक असताना त्यांचे काही लिखाण कधी अप्रकाशित केले असेल असेही आठवत नाही. किंवा मी त्याना कधी शिव्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी माझा स्कोर सेटल का करावा? माझा काय संबंध?

In reply to by पैसा

काही कल्पना नाही ताई. पण गेले काही दिवस सतत तुला "त्यांचे अंदाज असतील" असा प्रतिसाद अनेकांकडुन (कपिलमुनींकडुनही एक दोनदा) पाहण्यात आला आहे. खव वर सुद्धा तुमचे ह्याविषयक मतभेद वाचले होते. आता माझ्याही प्रतिसादावर हेच वाक्य वापरले गेले म्हणुन पुन्हा तो संदर्भ ओढुन ताणुन इथे का आणला असावा हे कळले नाही. बरं मी वर जे लिहीले आहे (सरपंचांचा अवमान ह्या संदर्भात) तो काही माझा "अंदाज" नसुन स्पष्ट "मत" आहे. मग इथे अशा प्रतिसादाचे प्रयोजन काय?

In reply to by पिलीयन रायडर

त्याना त्यात मजा वाटत असेल. कोणी मिपावर चांगले लिहावाचायला येतात कोणी काड्या टाकायला. ज्याची त्याची जाण समज वगैरे असतेच. जाऊ दे ना! आपल्याला मिपावर वाचण्यासारखे बरेच काही आहे. असले निगेटिव्ह कशाला मनावर घ्यायला पाहिजे?

In reply to by तर्राट जोकर

कुठे मिळेल हे भजन आणि कोण आहेत बॉ हे आशु?
आशु कोणीही नाही. आणी कोण कशाला भजन मानेल याचा काय भरोसा ? तसेही असे कोणते भजन असते तर ते इथे अद्रुश्य झाले असते का कधी ?

In reply to by प्रचेतस

बाकी मला जीवन मोहिते समजणे हा मी माझा बहुमान समजतो. :) तुमचा अपमान मला स्वप्नातही अभिप्रेत नाही. बाकी मी आपल्याला प्रत्यक्ष भेटलेल्यांपैकी कोणीही नाही. तेंव्हा आपण मला अ-मॅन या सदस्यनावानेच जाणून घेणे उत्तम पुढेमागे कदचहीत आपल्यासोबत प्रत्यक्ष भेटायचा योग येइलही आणी तो मी कदापी चुकीवीणार नाही.

In reply to by अ-मॅन

@पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.
हुडुत.... आणि हो.. माझी जी काही तक्रार असेल ना ती पुराव्यासकट सरपंचांकडे करायची.. पुन्हा जर मला टारगेट करुन कुठेही प्रतिसाद दिले तर हयगय करणार नाही हे लक्षात ठेव. तुझा फालतुपणा मी एकदा सहन केलेला आहे. परत परत तोच टाईमपास करायला तुझ्याइतका फुकट वेळ मला नाही. संरपांचांनी कृपया ह्या प्रतिसादाम्ची दखल घ्यावी. मी कुठेही वैयक्तिक झालेले नसताना
काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे.
हा माझ्यावर केलेला आरोप आहे. आपण नुकत्याच केलेल्या सुचनेच्या धाग्यावर लिहील्याप्रमाणे
वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात.
हेच इथेही होत आहे. असे प्रतिसाद आल्यानंतर प्रत्त्युत्तर दिले जाणारच. तेव्हा मुळात असे प्रतिसाद देणार्‍यांना धरबंध घालावा ही विनंती.