Skip to main content

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

लेखक सुधीरन यांनी शनिवार, 09/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 37314
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

नाना देवांच्या नाना प्रतिमा|लोक पूजिती धरून प्रेमा | ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा|कैसा आहे ||६|| ऐसें वोळखिलें पाहिजे|वोळखोन भजन कीजे | जैसा साहेब नमस्कारिजे|वोळखिल्याउपरी ||७|| तैसा परमात्मा परमेश्वर|बरा वोळखावा पाहोन विचार | तरीच पाविजे पार|भ्रमसागरचा ||८|| (इति श्रीदासबोध)

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

मार्मिक

In reply to by नितिन थत्ते

.. पण मुळात नको त्या गोष्टीसाठी भांडायची गरज नव्हती.
कुणी ? कोण कोणाशी भांडत होते ? (मला शाळेतल्या धड्यावरुन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न तयार केल्या सारखे वाटले ह.घ्या :) )

In reply to by नितिन थत्ते

शनी वगैरे कल्पनांतून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अधिक गुंतता यावे म्हणून भांडत होत्या.
समजा क्रिकेटच्या स्टेडीअमवर स्त्रियांना प्रवेश नाही, स्त्रीयांनी स्टेडीयमवर जाऊन क्रिकेट पाहील्याने अपशकुन होतो असा समज समाजात आहे, स्त्री क्रिकेटच्या खेळपट्टीवर गेली की खेळपट्टी अशुद्ध झाली समजून गाईच्या दुधाने धुतली जाते किंवा त्यावर सौदी आरेबीयातली माती टाकून लिंपली जाते मग स्त्रियांनी खेळपत्टी आणि स्टेडीयमवर प्रवेशासाठी भांडावयास हवे की नको ? तुमचे मत काय असेल ?

In reply to by माहितगार

आणि मंदीर यात फरक आहे ना माहितगारसाहेब! असल्या गोष्टींसाठी आंदोलन करायलाच पाहिजे. मंदिरात श्रद्धा हा मुद्दा असू शकतो. क्रिकेटला तो मुद्दा येणार नाही. शिवाय मंदिरात जाण्याचा हेतू आणि क्रिकेट स्टेडियममध्ये जाण्याचा हेतू यांच्यातही फरक आहे. मी तर म्हणतो की पुरुषांचेही डान्स बार असावेत आणि तिथे बायकांनी दौलतजादा करावा. होऊ दे खर्च!

In reply to by बोका-ए-आझम

क्रिकेट उदाहरण म्हणुन घेतले. क्रिकेट मध्ये सध्या अंधश्रद्धा नाही म्हणजे असू शकणार नाही असे नसावे. इराण ते मध्यपुर्व स्त्रीयांच्या क्रिडा सहभागावर अद्यापही बरेच निर्बंध आहेत आणि त्या मागे पुरुषी वर्चस्व आणि ग्रंथ प्रामाण्य अज्ञानश्रद्धा आहेतच. अलिकडील फुटबॉलच्या खेळांची भाकीते आक्टोपस का काय प्राण्यावरुन केली जात होती. सुपरस्टीशन्स केहाही डोके वर काढू शकतात विषमताही सोईने रुजवल्या जातात.

In reply to by बोका-ए-आझम

वाह बोका भौ क्या बोले है आप. ति तमन्ना का काय कोण होति बारबाला करोडपति होति म्हणे आणि तशा कित्येक बाला लोकांचा बाल्या करुन करोडपति झाल्या होत्या. हे सगळे ऐकिव माहिति आणि ढकललेले जे काहि व्यनि होते त्यातुन कळाले होते

In reply to by नितिन थत्ते

शनीत गुंतावे म्हणून नव्हे तर सर्वांना मंदिरप्रवेश असावा म्हणून आंदोलन होते. ही एक प्रथा तर मोडली. त्याचबरोबर 'प्रकोप होईल' ही अंधश्रद्धादेखील मोडली गेली. आता हळू हळू इतर प्रश्नांविषयीच्या जागृतीसाठी चळवळी होतच राहातील. 'देव' या कल्पनेशी जोडलेला श्रद्धेचा बाजार खूपच मोठा आहे. महिला आणि पुरुष दोघांनी मिळून या प्रश्नाला हात घालायला हवा.

मग आता काय पुढे ?

In reply to by इरसाल

मग आता काय पुढे ?
अहंकार हरण ! मंदिरे व आक्रमणे या धाग्यावर आपल्याला पुरुषी अंहकारांचे, विषमेतच्या समर्थनाचे नानाविध प्रकार दिसतील आणि त्या तशा अहंकरांचे विषमेतच्या समर्थनाचे हरण हेच लक्ष्य मंदिर प्रवेश इत्यादी निमीत्तमात्र

छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षीत नाही,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.

In reply to by गरिब चिमणा

कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता
ओह ओके भेदभाव प्रथा बंद करणे/करवणे उचितच. (अर्थात अशा पद्धतीने भेदभाव दूर करण्यास हरकत नाही, पण समजा जगातल्या सातही अब्ज किंवा जेवढी काही लोकसंख्या आहे त्या सर्वांनाच जानवी फ्रीत वाटली तर हैकैनैकै असा एक विचार गमतीने मनात येऊन गेला असो.)

In reply to by माहितगार

3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत बायकांना जानवी वाटली म्हणून सनातनी शिमगा करतील अन त्यांना जानवी नाहीत म्हणून नवे आंदोलन होईल!

In reply to by नाना स्कॉच

मी तरी जानवी स्त्रीयांसाठी सुद्धा मोजली. जगातील सर्व स्त्रीयांनी जानवे घालण्यात मला व्यक्तिशः काहीच वावगे वाटत नाही.

In reply to by तिमा

जान्हवं घातलेली जान्हवी!!! (डिस्क्लेमरः प्रतिसाद कोणालाही टॉचु नये म्हणून ज्याला जो पाहिजे तो इथे आहे असं समजून घ्या.)

In reply to by गरिब चिमणा

धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? किंवा दक्षिणेतल्या कोणत्याही मंदिरात ? बाकी गोन्दाव्लेला हा नियम असलेला मी कधी ऐकलेला नाही , आणि माझ्या घरातल्या ३ पिढ्या तिथे जात आहेत , उगा कैच्या काय ओकत राहायचं नुसतं

In reply to by अद्द्या

गोंदवल्याला शर्ट किंवा अंगरखा काढायची सख्ती होती, आम्ही सुद्धा बरेच वर्षांपासून जातोय तिथे, माझ्या लहानपणी ही परंपरा असल्याचे आठवते नीट मला तरी, फ़क्त ती कोण ब्राह्मण कोण अब्राह्मण हे शोधायला असेल का ह्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही.

In reply to by अद्द्या

बाकी गोन्दाव्लेला हा नियम असलेला मी कधी ऐकलेला नाही , आणि माझ्या घरातल्या ३ पिढ्या तिथे जात आहेत , उगा कैच्या काय ओकत राहायचं नुसत
साहेब ,गोंदवल्याजवळचं फलटण हे माझं गाव आहे,तुमच्यापेक्षा मला जास्त माहीती आहे,तुम्ही तुमच्या वडीलांना विचारल्यास ते योग्य माहीती देतील ,विचारुन बघा.

In reply to by गरिब चिमणा

तुमच गाव कुठलं हि असो, त्याने मला काही फरक पडत नाही , प्रत्येक गोष्टी हिंदू आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण द्वेष करण्यासाठी काहीही करायची तुमची तयारी अगदी ब्रिगेडिंच्या पातळी ची आहे . दुसरी गोष्ट , मी कोणाला विचारवं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही , जर डोळ्यावरची पट्टी काढून जगाकडे बघा , आणि सारखं सारखं निलाजरे पणाने वेगवेगळ्या आयडी घेऊन इथे घाण करणे बंद करा. रोज जवळपास ५-६ हजार लोकांना एक रुपया न घेत जेवू घालणारी संस्था आहे ती. कधीच तिथे कोण कुठल्या जातीच्या आहे यावरून कोणीही कोणालाही थांबवलेलं नाही .

In reply to by गरिब चिमणा

छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षीत नाही,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.
गरीब चिमणा, मनाला येईल ते वाटेल ते खोटे आरोप करून नका. या नवीन अवतारातही तुमचा ब्राह्मणद्वेष गेलेला नाही. एखादा जानवेधारी आहे का नाही असला कोणताही हेतू उघडे बसण्यामागे नव्हता. तिथे आजतगायत कोणत्याही कारणासाठी कोणतेही आंदोलन झालेले नाही. आंदोलन झाले व त्यामुळे ही प्रथा बंद झाली हा धडधडीत खोटा व खोडसाळ आरोप आहे. गोंदवले येथे मी गेली अनेक वर्षे नियमित दर्शनासाठी जातो. तिथे दररोज हजारो भक्त येतात. तिथे आजतगायत एकदासुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेलेला नाही. खूप पूर्वीपासूनच तिथे जेवताना पुरूषांनी उघडे बसावे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या काळापासूनच तिथे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या समाधीनंतर ती पद्धत काही वर्षे सुरू राहीली इतकंच. एक जुनी पद्धत यापलिकडे त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी कधीच जानवे वापरीत नाही. परंतु तिथे उघडे बसल्यावर जानवे नसल्याबद्दल आजतगायत कोणीही एका शब्दानेसुद्धा विचारलेले नाही. तिथे रोज दुपारी व संध्याकाळी मोफत जेवण असते. रोज तिथे दुपारच्या जेवणासाठी कमीतकमी २००० भक्त असतात. त्यातले ९०% हून अधिक जानवे नसलेले असतात. आजूबाजूच्या खेड्यातील धोतर, पैरण, गांधी टोपी असा पेहराव असलेले व नऊवारी नेसलेल्या ग्रामीण स्त्रिया बहुसंख्येने असतात. हे सर्वजण आपल्या शेजारी कोण बसलेला आहे याचा विचार न करता शेजारी बसून जेवतात. उघडे बसण्यामागे जानवे आहे की नाही हे बघण्याचा छुपा हेतू होता हा आरोप पूर्णपणे खोटा, खोडसाळ व ब्राह्मणद्वेषी आरोप आहे. गोंदवले या गावाचे रूपांतर शिर्डी किंवा शेगाव सारखे झालेले नाही. अजून ते खेडे या स्वरूपातच आहे. परंतु तिथले व्यवस्थापन सातत्याने बदल करीत असते. जुन्या प्रथांना चिकटून राहण्याचा त्यांचा अट्टाहास नाही. पूर्वी जेवायला जमिनीवर बसावे लागायचे, जेवण्यापूर्वी सर्व भक्त तोंडाने "जय जय श्रीराम" असा घोष करत असत, जेवताना तिथले सेवेकरी व आलेले स्री-पुरूष स्वतःहून ताटात वाढत असत, जेवताना पुरूष उघड्याने जेवायचे. पण आता बदल झाला आहे. आता जेवण्यासाठी ताट वाढून हातात देतात व टेबल-खुर्चीवर बसून जेवायची सोय केलेली आहे. उघड्याने बसणे बंद केले आहे. तोंडाने रामाचे नाव घ्यायच्या ऐवजी कॅसेट लावली जाते. देवळात आरतीच्या वेळी सीसीटीव्ही बसविले आहेत. वर्गणी देण्याची इच्छा असणार्‍यांसाठी ऑनलाईन ट्रान्स्फरची सोय केलेली आहे. मंदीरात व इतरत्र अत्यंत स्वच्छ व शिस्तबद्ध व्यवस्था आहे. तिथे दर्शनासाठी, जेवण्यासाठी, वास्तव्यासाठी वा इतर कोणत्याही कारणासाठी कधीही कोणत्याही स्वरूपात मोबदला मागितला जात नाही. अन्नदान हे तिथले मुख्य काम आहे. स्वतः श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही जातिभेद पाळला नाही. त्यांच्या शिष्यांमध्ये सर्व जातींचे लोक होते. आजही तिथे कोणत्याही प्रकारचा जातिभेद पाळला जात नाही. अशा देवस्थानवर धडधडीत खोटे, द्वेषी व खोडसाळ आरोप करताना जनाची नसली तरी मनाची तरी वाटावयास हवी. गरीब चिमणा या व्यक्तीचे आजवर किमान १० आयडी अशाच प्रक्षोभक व द्वेषी लेखनामुळे सरपंचांनी ब्लॉक करून त्यांना इथून हाकलून लावले. परंतु अजिबात स्वाभिमान नसल्याने ते पुन्हा पुन्हा नवीन आयडी धारण करून इथे येतच राहतात आणि तसेच प्रक्षोभक व द्वेषी लेखन करतच राहतात. हा प्रकार अत्यंत उबग आणणारा आहे.

In reply to by गरिब चिमणा

एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन ऐकण्यात नव्हता. गोंदवल्याला पुर्वी उघड्याने जेवायला बसायची सक्ती होती. पण ती केवळ एक प्रथा होती. त्यात जानवेधारी कोण हे जाणुन घ्यायची कुणालाही कसलीही उत्सुकता नव्हती. ते जाणुन घ्यायचे काही कारणही नव्हते. मी लहान पणापासुन गोंदवल्याला जातो. तिथे ब्राह्मणांना कुठलीही विशेष सवलत नाही, ब्राह्मण म्हणुन कुठे वेगळी विशेष वागणूक मिळत नाही. केवळ जेवायला बसताना कोण ब्राह्मण आणी कोण इतर हे जाणुन देवस्थानाआ कुठलाही फायदा / उपयोग नाही. ब्राह्मणांच्या ताटात २ बुंदीचे लाडू / २ मुदी शिरा / नारळीभात जास्त मिळतो असा प्रकार नाही. जात्पात न विचारता तिथे अन्नदान केले जाते आणि सर्वांना पोटभर दिले जाते. फुकट अन्नासाठी गावकरी देखील रोज रांगा लावतात हे माहिती असुनही सेवेकरी कधी अन्न नाकारत नाहित. पंगतीत बसलेल्या ब्राह्मणांना वेगळी दक्षिणा वगैरे मिळत नाही. त्यामुळे वेगळा ब्राह्मण ओळखण्याचे काहीएक कारणही नाही. महाराजांच्या भक्तगणात सर्व जातीचे लोक आहेत. त्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही. भक्तगण / सेवेकरी हा भेदभाव पाळत नाही आणि संस्थानही नाही. असे असताना केवळ महाराज ब्राह्मण होते या द्वेषापोटी असले किळसवाणे आरोप करण्याची लोकांना खरेतर लाज वाटली पाहिजे. पण निलाजर्‍या लोकांकडुन याहुन जास्त अपेक्षा नाहितच. असल्या ओकार्‍या काढण्यामागे जातीय विद्वेष पसरवण्याव्यतिरिक्त जातीयवादी लोकांचा इतर कुठलाही हेतु नाही हे तर स्पष्टच आहे. अश्या लोकांच्या विकृत मनोवृत्तीची खरोखर किळस येते. सडक्या मेंदुमधुन केवळ किडके विचार निघु शकतात.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युंजय साहेबांच्या शब्दाशब्दाशी सहमत... गोंदवलेकर महाराजांचे चरित्र ग.चि. यांनी वाचावे म्हणजे सर्व गैरसमज दूर होतील. पण तसे न करता ते जुनाच चिखलफेकीचा खेळ चालू ठेवतील यात शंका नाही.

In reply to by विजय पुरोहित

गोंदवलेकरांचे चरित्र वाचुन त्यांच्या मृत्युपस्चात तिथले भक्तगण्कसे वागतात हे कसे समजणार ? म्हणजे सेना चुकीची वागत नाही याचा पुरावा म्हणुन शिवचरित्र वाचा असे म्हटल्यासारखे आहे.

In reply to by lgodbole

तुम्ही नक्की वाचले आहे का? आणि गोंदवल्यास जाऊन आलायत का? का सगळया सांगोवांगीच्या कथा. वरील आवाह्नात एक जागा (गाडीत) तुमच्यासाठी रिकामी ठेवतो नक्की येणे. श्रद्धावान पण कट्टर अतिरेकी नसलेला नाखु

In reply to by नाखु

या चिमण्याला उर्फ लंबोदर गोडबोलेला (बगदादीची अजून किती अनधिकृत संतती आहे कोण जाणे!) इतकं महत्व देण्याचं कारण कळलं नाही. एक्तर हे पात्र उगीचच खोट्या नावाने खोट्या पोस्ट लिहून मजा बघतंय किंवा सायको आहे. दोन्ही पैकी काहिही असो, एनकाऊंटर मधे उडवा आणि प्रश्न सोडवून टाका. - (कट्टर अतिरेकी) काळा पहाड.

In reply to by मृत्युन्जय

अशा जातीय द्वेष पसरवणाऱ्या गरीब चिमणा आयडीवर त्वरीत कारवाई व्हावी. किमान त्याचा प्रतिसाद उडवा

In reply to by कपिलमुनी

सहमत.

In reply to by गरिब चिमणा

करीब चिमणा, @,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता >> यामागचा धर्मशास्त्रीय उद्देश सांगतो. तो वस्त्रपरीधानाशी संबंधित आहे . वस्त्र शिवलेली घालायची नाहीत. जेवतानाच नव्हे तर कधीच नाही! म्हणजे पुरुषांची वस्त्र- लंगोटी,धोतर, उपरणे, डोक्याला फेटा , मुंडासे इत्यादी वस्त्र असावी ,असा नियम. पुढे त्यातील उपरण्याची जागा नेहेरूशर्ट सारख्या शिवलेल्या वस्त्रानी घेतली. डोक्याला शिवलेली टोपी आली. हा जो ऐहिकात म्हणजे रोजच्या जीवनात धर्म तुटला ,तो किमान देवळात ,धार्मिक कार्यात, भोजनाचा प्रसाद किंवा प्रासादिक भोजन .. यात पाळला जावा असा जो धार्मिक आग्रह असतो, त्यामुळे जेवताना धोत्राच्या वरील शर्ट काढणं हि प्रथा रूढ झाली. नन्तर त्यामागील उद्देश विसरला गेला . आणि मग पँट असतानाहि फक्त शर्ट उतरावा आणि जेवायला बसा असा अर्धवट आचार आता पाळला जाऊ लागला , हे त्या मागचं मूळ रूप आहे. सदर धार्मिक आचार योग्य/अयोग्य , चूक/बरोबर कसाही असो..तो तसा आहे हे आधी लक्षात घ्या. बाकी अज्जुन गैरसमज करून घेण्यास तुम्ही मोकळे आहातच! त्यामुळे चालू दे आता तुमचे ... असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे घालू नये ह्यामागे काय तर्क असावा? बाकी, मला स्वतःला असा पेहराव आवडतो. पन साला आजकाल पब्लिक अडाणी समजतं म्हणून... ;-)

In reply to by तर्राट जोकर

ब्रह्मास्त्र , विमान यांचे शोध लावणार्‍या महान लोकाना शिवणयंत्र , फॅन , झेरॉक्स असले फालतु शोध लावायला वेळ मिळाला नाही.

In reply to by mugdhagode

पिछवाडे पे लात पडी कि फिर दुसरे आयडी से लॉगिन करते हो. जंत बरे झाले का ? तुम्हाला आठवत असेल तर एक दौर चला था जब आपको जवाब दिया जाता था "ऐ हाssड हाssड"

In reply to by तर्राट जोकर

@शिवलेली वस्त्रे घालू नये ह्यामागे काय तर्क असावा? >> जास्तीत जास्त (तथाकथित)नैसर्गिक रहाणी असावी. हा! शिऊन वस्त्र केलं, कि ते अनैसर्गिक! असं आमच्याकडल्या काही सनातनिंच मत आहे. म्हणूनच फाटक वस्त्र तसच चालतं,पण शिवल कि ते पाखंड होत.अस ते म्हणतात!

In reply to by अत्रुप्त आत्मा

ज्यांनी सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा यांची संगत नको रे बाप्पा अशा म्हणी प्रचलित केल्या त्यांनीच असल्या धन्यवाद प्रथा आणल्या असाव्यात असा एक णम्र अंदाज आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अस्सें कांय. धन्स. सनातनींच्या वेबसाईटवर फुलप्यांट शर्ट ह्यातून अल्फा, गॅमा किरणे बाहेर पडतांना दाखवतात. जीन्समधून काळा काळा धूर... =)) =))

In reply to by अ-मॅन

आता का अनाहिता जॉइन करता का ? मग आयडि निदान अ-वुमॅन तरि घ्यायचा. अनाहिता सदस्यत्व मिपा महिला विभाग 'अनाहिता' मध्ये सदस्यत्वासाठी इच्छुक महिला सदस्यांनी कृपया पैसा, अजया, रेवती, मितान, लीमाउजेट यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधावा.

चला शिंगणापूरचा धंदा वाढीला लागेल म्हणायचा. चांगलंय

त्या नेपाळी बायंकावर दिल्ली मधे अत्याचार केले गेले त्यावर ह्या महीला अघाड्यांनी काय केले ? इथे त्या मानाने क्षुद्र काराणा साठी शक्ती वाया घालवली

In reply to by मराठी_माणूस

साहेब दुसर्‍या देशाच्या डिप्लोमॅतीक पासपोर्टच्या मंडळींना खाली हात वर पाय करुन चालले तरीही हात लावता येत नाही तो आंतरराष्ट्रीय संकेत आहे. हम्म.. कारवाई सौदी अरेबियाच्या डिप्लोमॅटवर सौदी अरेबियाने सौदी अरेबीयन कायद्याखाली कारवाई करणे अभिप्रेत होते -तशी ती सौदी अरेबियाने केली असण्याची शक्यता कमी आहे- त्यासाठी खरे आंदोलन सौदी अरेबियात जाऊन अथवा सौदी अरेबियातील महिलांनी करावयास हवे होते, अर्थात भारतात आणि + इतर मुस्लिम बहुल देशात मुस्लिम महिलांना सोबत घेऊन खरेच आंदोलन करण्यास हरकत नव्हती किमान मुस्लिम स्त्रीयांचे डोळे उघडण्यास मदत झाली असती किंवा आपण हाच प्रश्न जे एन युच्या कन्हय्या कुमारला विचारला असतात तरीही कदाचित चपखल राहीला असता.
इथे त्या मानाने क्षुद्र काराणा साठी शक्ती वाया घालवली
तिथे शरीर गेल इथे स्त्री कुठेतरी वावरली म्हणून गाईच्या दुधाने जमीन धुताना स्त्रीच मन मारलं गेलं, स्त्रीचे शरीर असो वा मन त्यावर राज्य करण्याची इच्छा पाशवीच एका गोष्ट केल्याने अथवा न केल्याने दुसर्‍या गोष्टीच्या करण्याचे महत्व कमी होत नाही कोणत्या न कोणत्या गोष्टीत पाशवी विचारांचा मुकाबला केला गेला हे महत्वाचे

In reply to by मराठी_माणूस

महिलासुरक्षा हा पोलिसांचा प्रांत आहे,पोलिसांनी तंगड्या टाकून पसरायचे अनि लोकांनी आंदोलने करायची हे गैरलागू आहे.

In reply to by गरिब चिमणा

ग.चि. हा प्रतिसाद देण्यापुर्वी आपण मराठी माणूस म्हणताहे त्या केस मधील पोलीसांची भूमिका अभ्यासली आहेत का ? आंतरराष्ट्रीय संकेतांच्या मर्यादा लक्षात घेता पोलीसांनी दिलेल्या स्थितीत जमेल तेवढे कर्तव्य पार पाडले असावे. लोलीस चुकत नसावेत असे नाही पण घे हातात आणि टोलास काही पॉइंट नाही. सौदी एंबसींसमोर मुस्लीम महिलांनीच आंदोलन केले असते तर त्यांच्या सौदींना थोडी फार लाज वाटण्याची आंतरराष्ट्रीय बदनामी टळावी म्हणुन त्यांनी काहीतरी हालचाल केली असती. आणि असे आंदोलन खरेच जरुरी असावे कारण अशा प्रकारच्या सौदी डिप्लोमॅटच्या वर्तनाचा काही आफ्रीकन देशातही इतिहास असावा -इंग्लंडात सौदी श्रीमंत वेगळ्या पद्धतीने सुटल्याच्याही बातम्या असाव्यात.

चांगली चर्चा आहे. =)) आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी आंदोलने करावी ह्याबद्दल रोचक मार्गदर्शन मिळाले.

In reply to by तर्राट जोकर

आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी आंदोलने करावी ह्याबद्दल रोचक मार्गदर्शन मिळाले.
पंढरपूरमध्ये (कदाचित विधवा) महिला प्रवेशासाठी -पहिल्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातले- आंदोलनाचे वर्णन बहुधा चिंतामण विनायक जोशींच्या 'चार दिवस सुनेचे' या कादंबरीत (१९५५च्या आसपास प्रकाशित) आहे बहुधा सत्यघटनेवर आधारीत असावे असे वाटते अर्थात संदर्भ दुजोरा उपलब्ध होऊ शकले नाही -(पै ताईंना काहि ह्या विषयावर माहिती आहे का ते त्यांना विचारावयास हवे) (चुभूदेघे) . योगा योगाने 'चार दिवस सुनेचे' मधील स्त्री आंदोलन स्टाईलचे वर्णन आणि तृप्ती देसाई स्टाईल बर्‍याच सारख्या वाटल्या. अर्थात साने गुरुजींनी पंढरपुरात केलेला उपवास आणि त्या सोबत प्र.के. अत्रेंनी पंढरपुरच्या चौका चौकात उभे राहून केलेली भाषणे प्रबोधनाच्या दृष्टीने अधिक प्रभावी असावीत. तृप्ती देसाईंनी आंदोलन केले ते ठिक पण स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर स्त्रीयांना पुरेशी संधी मिळालेली असताना स्त्रीयांमधून साने गुरुजींच्या (व्यक्तिमत्व) उंचीची आणि प्र.के. अत्रेंनी पंढरपुरात जशी भाषणे दिली तशी भाषणे करणारी स्त्री या आंदोलनात दिसली नाही. याच नव्हे स्त्री विषयक इतर आंदोलनातही बहुतांश स्त्रीया झाडाच्या फांदीवरच बसलेल्या दिसतात.

In reply to by माहितगार

माझा रोख कदाचित आपल्या लक्षात आला नाही. आंदोलकांनी कुठे, कशासाठी, कधी आंदोलन करावे ह्याबद्दल इथले काय प्रतिसाद अभिनिवेशयुक्त मार्गदर्शन करतात. 'एवढीच हिंमत, कळकळ,इत्यादी आहे तर मग अमुक धमुक का करत नाही' छापाचे प्रतिसाद मनोरंजक आहेत.

माझ्या एका सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर देईल का कुणी? मंदिरात अमुक हे व्हावे, हे होऊ नये, अमुक लोकांना प्रवेश द्यावा, पैसे घेऊन स्पेशल प्रवेश द्यावा ह्याचे अधिकार मंदिरसमिती, ट्रस्टीला कसे काय मिळतात. देव व देवाचे मंदिर ही समाजाची मालमत्ता आहे की तळे राखील त्याच्या मालकीची?

१००

धाग्याच्या शंभरी प्रित्यर्थ आता धडाडीच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई महिलांच्या इतर प्रश्नांद्दल जसे स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूया

In reply to by महासंग्राम

म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत जास्ती हस्तक्षेप करू नये असे वाटते का?
स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूया
वरील कार्यांमध्ये स्त्रियांचाच 50% सहभाग असतो. म्हणजे पूर्ण छळ पुरूषी नसतो. म्हणजे हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी सासू ही स्त्रीच असते. भ्रूणहत्या करवून घेणारी आई ही स्त्रीच असते.

हम्म, चौथर्यावर प्रवेश मिळाला हे उत्तमच झाले, आता ही भूमाता ब्रिगेड आमच्या कोल्हापूरात येवून महालक्ष्मी(कि अंबाबाई?) मंदिर गाभार्यात प्रवेश करणार आहेत अशी बातमी आहे.

जगात अनेक प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नाला कोणी हात घातला की लगेच त्याचे विरोधक या प्रश्नांचे काय? त्या प्रश्नांचे काय? असे मुद्दे मांडू लागतात. त्या त्या व्यक्तिवर अवलंबून असतं की त्यास कोणता मुद्दा महत्वाचा वाटावा व त्याने कोणत्या मुद्द्यास हात घालावा. स्त्री पुरुष समानता ही निदान तत्वतः तरी सर्वांस मान्य असते (वा तसे दाखवावे लागते). त्यामुळे इतर मुद्दे रेटले जातात. वेदाधिकारांविषयी बोलले तर, काय ठेवले आहे त्या वेदांत?, मंदिर प्रवेशाविषयी बोलले की, काय गरज आहे मंदिरांची? असे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु ज्यास हे अधिकार नाहीत वा नव्हते त्यास या अधिकारांचे महत्त्व वाटावे वा वाटू नये, हे आपण कसे सांगायचे? हो, २१वे शतक आहे, या अशा प्रश्नांत जास्त गुंतू नये. मात्र अनेक व्यक्तींची ही शिक्षण घेणारी केवळ पहिली वा दूसरी पीढ़ी आहे, त्यानी लगेच आपण वैश्विक वगैरे विचार करावा, हे सांगणे व त्यांची कीव करणे थोडेसे त्यांवर अन्याय करण्यासारखे ठरते. त्यात आपली शिक्षण व्यवस्था स्वतंत्र विचारांस कितपत वाव देते ते आपल्याला माहितच आहे!

In reply to by सुधीरन

ते लंडन पैलवान लंडनात बसुन विचरत आहेत .... बायकाना या आंदोलनाची काय गरज होती ? मतदानाच्या अधिकारासाठी इंग्लंडातही एके काली स्त्रीयानी मोर्चे काढले होते ना ?

In reply to by lgodbole

आ न लंडन पैलवान

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात गेल्याने तुम्हाला नसेल फरक पडत, ज्यांना पडतो, त्यांना पडतो. पुरुष मंदिरात गेलेला चालतो, स्त्री का नाही चालत?

In reply to by सुधीरन

वस्तुस्थिती नाही. मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते माझं मत नाहीये. आणि मुळात असला भेदभाव करणारी मंदिरं किंवा कोणतीही धार्मिक स्थळं हवीत कशाला हा माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणीही दिलेलं नाही.