✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

स
सुधीरन यांनी
Sat, 04/09/2016 - 00:05  ·  लेख
लेख
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37108 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर

सतिश गावडे
Sat, 04/09/2016 - 08:46 नवीन
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही; आताच्या काळात तो खुळेपणा आहे. हे म्हणजे पुरुष जो मुर्खपणा करतात तो मुर्खपणा करायचा अधिकार स्त्रीयांनाही हवा असा प्रकार झाला आहे. आता खर्‍या अर्थाने समाजाची "स्त्री-पुरुष समानते"च्या दिशेने पावले पडू लागली आहेत असे म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

..तर त्यात हरकत काय काय ?

माहितगार
Sat, 04/09/2016 - 08:58 नवीन
पुरुष जो मुर्खपणा करतात तो मुर्खपणा करायचा अधिकार स्त्रीयांनाही हवा
शहाणपणा अथवा मुर्खपणा कशाला म्हणावे या सापेक्ष गोष्टी असतात, आपण कदाचित श्रद्धा अंधश्रद्धेचा तराजू लावत आहात तो क्षणभर बाजूला ठेऊन त्याकडे संस्कती म्हणून पाहीले आणि समानतेची संस्कृती रुजवण्यासाठी रोज दररोजच्या सांस्कृतीक बाबतीत समानता मागितली तर त्यात हरकत काय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा

सतिश गावडे
Sat, 04/09/2016 - 09:03 नवीन
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा मुर्खपणा नाही का? किती तेल वाया जाते याचा माझ्याकडे विदा नसला तरी ते प्रमाण खचितच कमी नसेल. ही संस्कृती आहे? समानता चांगल्या गोष्टीमध्ये मागायलाच हवी. या असल्या बाबतीत जर स्त्रीयांना समानता हवी असेल तर मग नक्कीच प्रबोधनाची चळवळ उलट दिशेने चालू लागली आहे असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

संस्कृती आहे?

माहितगार
Sat, 04/09/2016 - 09:30 नवीन
संस्कृती आहे?
'काय आहे' आणि 'काय असावे' हे भिन्न प्रश्न आहेत. मला किंवा तुम्हाला संस्कृतीतील काय आवडते अथवा नाही यावर संस्कृती ठरत नाही. स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना शरीराला पूर्ण व्यायाम देणारे कबडी असो वा फूटबॉल सारखे खेळ न खेळता लोक (तुमचे शब्द वापरावयाचे झाल्यास मुर्खांसारखे) तोंडात बोटे घालून क्रिकेट पहात बसतात, क्रिकेट हिरोंचे व्यक्तिपूजन करतात, ते चांगल आहे का वाईट ती एक संस्कृती आहे पैशाचा स्रोतांचा येथे सुद्धा अपव्यय होतोच. अंशतः स्रोत वापरल्या शिवाय संस्कृती उभी सुद्धा रहात नाही. तेल वाहील्या मुळे शनिदेव प्रसन्न होतात असे काही जणांना वाटत असेल तर त्यांना तसे वाटण्याचे स्वातंत्र्य असावे. पण शनीदेव असणे आणि तेल वाहण्याने प्रसन्न होण्यावर शंका व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य असावे. दोन्ही पक्षांनी तर्कावर भर द्यावा 'मूर्खपण' या विशेषणातून तुमचा रोष व्यक्त होत असेल तर्क व्यक्त होत नाही. आणि जिथे तर्क व्यक्त होत नाही तो रोष स्विकारला जाणेही कठीण असावे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच

दिग्विजय भोसले
Sat, 04/09/2016 - 09:40 नवीन
दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच आहे,आणि तसा मुर्खपणा करण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. आणि तर्क वापरून कथित देवाधर्माची चिकित्सा करण्याइतपत आपला समाज तितका आधुनिक झाला नाहीये. कर्मकांड आणि निखळ भक्ती यातला फरक लोकांना माहित नाही,निखळ भक्ती असेल तर नैवेद्य,तेल,धूप,कापूर,घंटा(मंदिरातील) या गोष्टी गौण आहेत. निराकार तो निर्गुण ईश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

विशेषणातून तुमचा रोष व्यक्त

माहितगार
Sat, 04/09/2016 - 09:45 नवीन
विशेषणातून तुमचा रोष व्यक्त होत असेल तर्क व्यक्त होत नाही. दुसर्‍यांना दुषणे देणे सोपे असावे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले

स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना

विजय पुरोहित
Sat, 04/09/2016 - 11:58 नवीन
स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना शरीराला पूर्ण व्यायाम देणारे कबडी असो वा फूटबॉल सारखे खेळ न खेळता लोक (तुमचे शब्द वापरावयाचे झाल्यास मुर्खांसारखे) तोंडात बोटे घालून क्रिकेट पहात बसतात, क्रिकेट हिरोंचे व्यक्तिपूजन करतात, ते चांगल आहे का वाईट ती एक संस्कृती आहे पैशाचा स्रोतांचा येथे सुद्धा अपव्यय होतोच. अंशतः स्रोत वापरल्या शिवाय संस्कृती उभी सुद्धा रहात नाही. +१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

थोडेसे सुलभीकरण(सिम्प्लिफिकेशन)?

राही
Sat, 04/09/2016 - 19:27 नवीन
"अंशतः स्रोत वापरल्याशिवाय संस्कृतीसुद्धा उभी राहत नाही" मुळात संस्कृती हाच एक स्रोत असतो आणि उलटही. या स्रोताची मुळे सभोवतालात असतात. या सभोवतालातून संस्कृती पुष्ट होते आणि वायसे वर्सा म्हणजे संस्कृतीतून सभोवताल पुष्ट होते. एका परीने संस्कृती आपल्याला घडवीत असते आणि दुसर्‍या परीने क्रियाशील समाज आपल्या क्रियेतून संस्कृती घडवीत असतो. असे हे परस्परावलंबी नाते आहे. समाज जडशीळ, मूढ झाला की संस्कृतीची वाढ मंदावते, ज्याला आपण र्‍हास म्हणतो. चैतन्यशील, गतिशील, परिवर्तनशील समाजात संस्कृती वर्धमान असते, आणि अशा संस्कृतीची लेकरे नवनवोन्मेषशाली निपजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा

माहितगार
Sat, 04/09/2016 - 21:34 नवीन
हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा आर्थीक म्हटले, जसे की परकिय चलनाच्या गंगाजळीवर ताण टाकणारे सोन्यावरचे भारतीयांचे अतीप्रेम मला खटकते पण सोन्याच्या वापरा शिवाय कोल्हापुरी साज सुद्धा बनत नाही. जर रांगोळी केवळ रंगांनी काढली तर ठिकच पण बदल म्हणुन कुणी धान्य वापरुन रांगोळी काढली तर एका अर्थाने धान्याचा अपव्यय होतोच. समईत तेल वापरण्याने तेलाचा अपव्यय होतोच पण तीच रांगोळी किंवा समई सास्म्कृतीक वातावरण निर्मितीसही हातभार लावत असते. अर्थात स्रोतांचा अती अपव्यय टाळण्यासाठी प्रबोधन केले पाहीजे. आपल्या संस्कृतीत अपव्यय टाळण्याचे अप्रत्यक्षपणे सुचवणार्‍या खुलभर दुधाची कहाणी सारख्याही कथा आहेत. बेसिकली लोकांसमोर संस्कृतीची रचनात्मक आणि सकारात्मक बाजू पुढे ठेवणे एक मोठे आहान असावे. अंधश्रद्धेतून नाही पण अंधश्रद्धेशिवाय चोरी न होणारे जग पहाण्यास कुणालाही आवडेल किंवा चोरी झाली तरीही काळजी करणार नाही हाही दृष्टीकोण असू शकतो. अंधश्रद्धा दूर ठेऊन केवळ संस्कृती म्हणून आम्ही आमच्या गावातील दारांना दरवाजे शक्यतो लावणार नाही हि अंधश्रद्धा टाळून जपलेली संस्कृती राहू शकते. अंधश्रद्धा टाळणे म्हणजे संस्कृतीचे दमन केले पाहीजे असे नाही. शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात शनी ग्रहाची माहिती देणारे प्रदर्शन कदाचीत ऑब्झ्र्वेटरी कदाचित प्लॅनेटोरीअम उभारुन संस्क्र्तीतील अंधश्रद्धा कमी करुन संस्कृती वेगळ्या पद्धतीने जपता येऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात

तर्राट जोकर
Sat, 04/09/2016 - 22:16 नवीन
शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात शनी ग्रहाची माहिती देणारे प्रदर्शन कदाचीत ऑब्झ्र्वेटरी कदाचित प्लॅनेटोरीअम उभारुन संस्क्र्तीतील अंधश्रद्धा कमी करुन संस्कृती वेगळ्या पद्धतीने जपता येऊ शकतील. बाकी सगळे ठिक असले तरी हे मात्र काहीच उपयोगाचे नाही बरं का. कारण प्रतिमासंयोजन. सुर्याभोवती फिरणारा कडे असलेला ग्रह आणि साडेसातीत त्रास देणारा देव हे एकच आहे हे काही सत्य नाही. हे अंधश्रद्धाळू लोकांनाही पक्के ठावूक आहे. प्लॅनेटोरियम नाहीत किंवा कुंडलीतले ग्रह म्हणजेच सुर्यमालेतले ग्रह असा समज असल्याने लोक अंधश्रद्धाळू आहेत अशी आपली काहीशी अंधश्रद्धा झालेली वाटते. :) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

..

lgodbole
Sat, 04/09/2016 - 22:59 नवीन
शनी साडेसाती करतो या विश्वासावरच तर देव व देउळत्व टिकुन आहे. ते संपले तर बाजारच संपेल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बायका शनीच्या मागे लागल्या

संजय पाटिल
Mon, 04/11/2016 - 10:16 नवीन
बायका शनीच्या मागे लागल्या आहेत............ लागू द्या , शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole

शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते...

होबासराव
Mon, 04/11/2016 - 20:35 नवीन
पाटिल साहेब ______/\______ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

खीऽक

पेशवा भट
Wed, 04/13/2016 - 16:59 नवीन
शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते... +११११११११११११११११११११ ... संपुर्ण प्रतिसादांच्या काथ्याकुटात या एकच प्रतिसादाने हसुन हसुन पार वाट लागली. पाटिल साहेब कोपरापासुन ______/\______.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा

नाना स्कॉच
Sat, 04/09/2016 - 10:27 नवीन
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा मुर्खपणा नाही का? किती तेल वाया जाते याचा माझ्याकडे विदा नसला तरी ते प्रमाण खचितच कमी नसेल. ऐकिव माहीतीनुसार, शनि चौथर्यावरील अर्पण केलेले तेल वाया जात नाही तर ते तेल जमा करून लिलावात साबण निर्मात्या कंपन्यांना विकले जाते, ज्यातून येणारा पैसा हा येणाऱ्या भक्तजनांसाठी नव्या सोईसुविधा पुरवणे इत्यादी वर ट्रस्ट खर्च करत असावा खरे खोटे शनिदेव जाणे __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

खरे खोटे

राही
Sat, 04/09/2016 - 11:55 नवीन
दोनतीन देवळांमध्ये तेच तेल जमा करून पुनर्विक्रीसाठी छोट्याछोट्या पणतीसारख्या द्रोणातून ठेवलेले बघितले आहे. रुईच्या पानांच्या माळाही मूर्तीवर (जिथे शनिमूर्ती असेल तेथे-शनी व मारुती जोडीने असतात अलीकडे.) वाहिल्यानंतर काही वेळाने बाजूला काढून गाभार्‍याच्या मागील बाजूने पुढच्या दरवाज्यासमोर विक्रीस आणतानाही पाहिले आहे. नारळही पुनर्विक्रीसाठी येतात. अधिकृत लिलाव होतोच असे नाही. ख.खो.शनिदेव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

यात चूक देवाची का देवाच्या

विजय पुरोहित
Sat, 04/09/2016 - 11:59 नवीन
यात चूक देवाची का देवाच्या नावावर बाजार मांडणा-या मानवी स्वार्थ वृत्तीची? ही स्वार्थी वृत्ती सर्वच क्षेत्रात दिसून येत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

तेच तर.

राही
Sat, 04/09/2016 - 12:08 नवीन
चूक निश्चितच लोकांचीच आहे. त्यासाठीच लोकांचे प्रबोधन आवश्यक आहे. सर्व चळवळी या लोकप्रबोधनासाठीच असतात. देव बिचारा (असलाच तर) एका कोपर्‍यात असतो. तो सांगतच नाही की मला तेल वाहा म्हणून. त्याने तर 'पत्रं पुष्पं फलं तोयम्' असे कधीचेच म्हणून ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अ‍ॅडेंडम

राही
Sat, 04/09/2016 - 12:22 नवीन
भ्रष्टाचार सर्वच क्षेत्रांत आहे. आणि त्याविरुद्ध देशव्यापी, जगद्व्यापी लढे चालू आहेत. मग श्रद्धेचे क्षेत्र तरी मागे कसे राहील? पनामा पेपर्स हे विश्वव्यापी लढ्याचे उदाहरण आहे. व्यापम घोटाळ्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. माहिती अधिकारकायद्याखाली माहितीची मागणी करणार्‍यांचे खून झाले आहेत. तूरडाळीचा घोटाळा, महानंद(आरे) डेअरी घोटाळा, गर्भलिंगनिश्चिती घोटाळा असे अनेक क्षेत्रातले भ्रष्टाचार उघडकीस आणणारे लढे सर्वत्र चालू आहेत. मग श्रद्धेचे क्षेत्र या लढ्यांना अपवाद कसे ठरेल? आणि का ठरावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

चूक देवाचीही!!!

सुधीरन
Sat, 04/09/2016 - 18:24 नवीन
जर देव असेल- सर्व काही त्याच्या मर्जीने होत असेल- तर चूक देवाचीही आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

तेल वाया जात नाही...

एक सामान्य मानव
Sat, 04/09/2016 - 12:01 नवीन
तेल वाया जात नाही पण वाहणार्याचा पैसा मात्र जातो. माझ्या माहीतीप्रमाणे हे तेल साबण बनवणार्या कंपन्या विकत घेतात व काही तेल रिसायकल होते. ह्यातून संस्थान व काही हितसंबंधी लोक चांगला पैसा कमावतात व "श्रद्धाळू" हा पैसा आपणहुन नेउन त्यांना अर्पण करतात. आजकाल प्रसाद ही सुद्धा नविन इंडस्ट्री चालु झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

प्रश्न तत्वाचा आहे. आणि विरोध

अत्रे
Sat, 04/09/2016 - 09:19 नवीन
प्रश्न तत्वाचा आहे. आणि विरोध मोडायला न्यायालयात जावं लागलं याचा अर्थ लढाई सोपी नव्हती. एका गोष्टीत समानता आली की त्याचे साइड इफेक्टस दुसरीकडे ही दिसतील, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर

माहितगार
Sat, 04/09/2016 - 09:43 नवीन
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही, आताच्या काळात तो खुळेपणा आहे.
हि केवळ दोन वर्षा पुर्वीची महाराष्ट्रातीलच बातमी आहे की नव विवाहीत दलित दांपत्त्याला एका मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाकारला गेला होता. नास्तिकांना कितीही नको असले तरी मंदिरेही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत हे वास्तव आहे. महाराष्ट्रापेक्षा पुरोगामी असणे अभिप्रेत असलेल्या तामीळनाडु राज्यात ना मंदिर संस्कृती मिटली आहे ना दलितांवरील अत्याचारांचा अंत झाला आहे. दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत. मंदिर या केंद्रीय सांस्कृतिक गोष्टीत समानता येणे हे समता मानसिक पातळीवर स्विकारली जाण्यासाठी कदाचित अजूनही महत्वाचे नाहीच असे नेमकेपणाने सांगणे कठीण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दलितांवरील तेथील सर्वाधिक

आनन्दा
Mon, 04/11/2016 - 12:17 नवीन
दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत.
कदाचित याचा अर्थ असाही होतो की आंतरजातीय विवाह देखील वाढत आहेत. हे देखील एक चांगले लक्षणच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

शंभर टक्के सहमत सगाभौ!

बोका-ए-आझम
Sat, 04/09/2016 - 10:54 नवीन
पण पुलंचे पेस्तनकाका म्हणतात तसं - एकतरी नल्लासारखा हॅबिट पाहिजे ना भाऊसाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

:'(

दिग्विजय भोसले
Sat, 04/09/2016 - 09:32 नवीन
चला आता शनिमहारांजाच्या कृपेने महिलांचे प्रश्न सुटणार तसेच त्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

चला प्रवेश मिळाला . आता या

उगा काहितरीच
Sat, 04/09/2016 - 09:45 नवीन
चला प्रवेश मिळाला . आता या महिला किती भक्तीभावाने शनिदेवाची पूजा किती दिवस करतात हे पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments

पुरोगाम्यांची अंधश्रद्धा.

प्रचेतस
Sat, 04/09/2016 - 09:48 नवीन
पुरोगाम्यांची अंधश्रद्धा.
  • Log in or register to post comments

प्रचेतसजी या विषयावरच्या

माहितगार
Sat, 04/09/2016 - 09:54 नवीन
प्रचेतसजी या विषयावरच्या मागच्या दोन धाग्यापासून तरी मिपा अनाहिता गायब हैत असे वाटते, याचे रहस्य काय असावे ब्रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते मला कसं माहीत असणार ब्वा?

प्रचेतस
Sat, 04/09/2016 - 10:00 नवीन
ते मला कसं माहीत असणार ब्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का?

पैसा
Sat, 04/09/2016 - 12:56 नवीन
कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. माझ्या बाबतीत म्हटले तर जे काय चालू आहे ते मला ठीक वाटते. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा असे तर माझा पाठिंबा आहेच. पण त्यासाठी मी पदरमोड करून आणि वेळ घालवून आंदोलने करायला जाणार नाही. वयाच्या तिशी पस्तिशी नंतर आपण स्वतःलाही बदलू शकत नाही. तेव्हा लोकांना बदलायचा प्रयत्न करणेही अवघड आहे. लोकांच्या सवयी बदलण्यासाठी भारतात तरी सरकारचे कायदे किंवा न्यायालयाचे निर्णय असा एखाद्या जास्त मोठ्या "दादाचा" हस्तक्षेप लागतो. चौथर्‍यावर फक्त पुरुषांना प्रवेश का यासाठी आंदोलन करणेही बरोबर आहे आणि मुळात अंधश्रद्धा का वाढवावी हेही बरोबर आहे. मुक्तता करायची असेल तर त्र्यंबकेश्वरासारखे अनेक देव पुजार्‍यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्या सगळ्यांचीच मुक्तता व्हायला हवी. देव किंवा राक्षस असा दगड किंवा मूर्तीत नसतो. असलाच तर तुमच्या माझ्यासारख्या माणसात असतो. त्यातल्या काहीजणांना वेगवेगळ्या गुलामगिरीत रहायला भाग पाडणे हे राक्षसी कर्म आहे. बर्‍याच बायकांना कितीतरी लांबून पाणी डोक्यावर उचलून आणावे लागते. घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर बहुधा मुलीला पैसे वाचवण्यासाठी भावापेक्षा कमी दर्जाचे शिक्षण दिले जाते. अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू असतात. हे सगळे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र त्यात काही बदल करणे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही. त्यासाठी हुतात्मा व्हायची तर अजिबात गरज नाही. आपण मरतो तेव्हा आपल्याबरोबर जगही मरते त्यामुळे आपण मेल्यानंतर जग पुढे जातय का मागे जातय याची चिंता करून हातात असलेले आयुष्य फुकट का घालवावे? दर्शनाची सोय झाली. आता त्यातही ५०० रुपये देणार्‍यांना स्पेशल दर्शन, अजून जास्त देणार्‍यांना तेलाचा अभिषेक स्वतःच्या हाताने करता येईल वगैरे प्रकार सुरू होतील. मग ते बंद करा म्हणून कोणीतरी आंदोलने करत राहील. चालू दे सगळे. एव्हरीथिंग इज ओके. मात्र असल्या आंदोलनांसाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा तूरडाळ जर २०० रुपये किलो असताना बागायतदार सोसायटीत १४० ने मिळत असेल तर तिथे रांग लावणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात कोणाला जर शनि चौथर्‍यावर रांग लावायची असेल तर त्यालाही माझी ना नाही. दुसर्‍या कोणाला मूर्ख म्हणायचा मला हक्क पोचत नाही. देव बिव काही आपल्या मदतीला येत नाही हे माझे मत असले तरी एखाद्या काडीच्या आधारामुळे कोणाच्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडच्या ट्रिपा वाचणार असतील तर तेही ठीक. दुसर्‍या कोणाला त्रास होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला घटनेनेच हे स्वातंत्र्य दिले आहे. त्रासात असताना कोणी देवाचा आधार घेतो, कोणी नशेचा घेतो. यात बरे वाईट काय हे कोण तिर्‍हाईत कसे ठरवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

प्रश्न स्त्रीयांचे मत या

माहितगार
Sat, 04/09/2016 - 13:19 नवीन
प्रश्न स्त्रीयांचे मत या बाजुचे आहे का त्या बाजुचे असा नाही. शनि शिंगणापूरला प्रवेश मिळतो न मिळतो हे गौण त्या प्रसंगामुळे जी संस्कृतीत समताधिष्टीत मुल्य प्रस्थापना करण्यासाठी लागणारी वैचारीक कलहाची संधी मह्त्वाची. मिपा महिलांनी प्रत्यक्ष आंदोलनात जाणे अभिप्रेत नाही. 'अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात.' हि स्थिती चिंतेची आहे. मंदिर प्रवेश झाला आहे त्यामुळे पुरुषीवृत्ती या धाग्यावर जराशा गप्प झालेल्या दिसतात पण मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला. आणि तरीही गोपाळ गणेश आगरकरांचा एक धागा टाकलाच गोपाळ गणेश आगरकरांना आजच्या काळापेक्षा अधिकच सहन करावे लागले असेल त्यांच्या अग्रलेखांचे पुस्तक प्रुफरिडींगसाठी विकिस्रोतावर आहे. त्यांची बर्‍याच लेखातील वचने अशा विवादातून महिलांना उधृत करण्यासारखी आहेत पण आगरकर विषयक धाग्यात पिराताईच तेवढ्या काय पोहोचल्या आणि त्याही केवळ महाराष्ट्रीय शब्दाच्या योग्यायोग्यते बाबत चर्चा करुन पाय काढता घेऊन गेल्या. तिकडे मराठी विकिपीडियावर स्त्री अभ्यासकेंद्रांच्या विद्यार्थीनींनी दिल्लीतील विद्वान स्त्रियांच्या पुस्तकांची बरीच परिक्षणे मराठी विकिपीडियावर टाकली पण चालू प्रश्नाची-आंदोलनाची दखल घेण्यास त्यांनाही वेळ नाही. तृप्ती देसाईंवरचा विकिपीडिया लेख शेवटी मी स्वतः चालू केला. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मीही उत्तरे देण्यास कंटाळलो

तर्राट जोकर
Sat, 04/09/2016 - 13:37 नवीन
मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
हा विचार चांगलाच आहे. कारण मग "इथे तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नव्हते आमची बाजू घेऊन भांडा" असा उद्धटपणा ऐकून घ्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अगदीच असा अनुभव व्यक्तिशः

माहितगार
Sat, 04/09/2016 - 13:43 नवीन
अगदीच असा अनुभव व्यक्तिशः आत्तापर्यंत आलेला नाही- मी काढलेल्या पहिल्या धाग्यात अनाहितांनी उपस्थिती लावली होती पण त्यासाठी त्या धाग्यात मी अगदीच उचकवले होते - पण शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अनुभव आला नसेल तर चांगलंच आहे

तर्राट जोकर
Sat, 04/09/2016 - 14:42 नवीन
अनुभव आला नसेल तर चांगलंच आहे. पण येणार नाही याची कोणतीच खात्री नाही. शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ? >> =)) चांगला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुम्ही आठवण काढलीत म्हणुन

पिलीयन रायडर
Sun, 04/10/2016 - 00:38 नवीन
तुम्ही आठवण काढलीत म्हणुन प्रतिसाद.. पहिली तर गोष्ट की वर पैसाताईने अगदी नीट सांगितले आहे.. जे कित्येकदा आधी सुद्धा सांगितले गेले आहे पण हरदासाची कथा मुळपदावर.. तुम्ही फार तार्किक लिहीता म्हणुन तुमच्याकडुन हे अपेक्षित नव्हते.. सर्व स्त्री आयडी म्हणजे अनाहिता नाहीत. अनाहिताचे एकच असे मत वगैरे नसते. त्यामुळे मिपावर स्त्री आयडींना उद्देशुन बोलताना "अनाहिता" असा उल्लेख करु नये. विषयच अनाहिता असेल तर मी अनाहिता ह्या नात्याने लिहेन कदाचित. पण एरवी मी मिपा सदस्यच आहे. इतरही अनाहितांचे साधारण असेच मत असावे. दुसरं तुमच्या लेखांवर प्रतिसाद न देण्याबद्दल.. मला तुमचे लेख / प्रतिसाद वाचण्याचा अतोनात कंटाळा येतो. प्रश्न मेगाबायटी लेखन वाचण्याचा नाहीये. तुमच्या लेखनाची मांडणी मला अत्यंत बोजड आणि कंटाळवाणी वाटते. ह्या व्यतिरिक्त १. रतीब घातल्यासारखे लेख लिहीणे २. जिथे तिथे त्यांची झैरात करणे इ. कारणेही लागु आहेत. त्यामुळे विधान करताना आधी लोक तुमचे लेख मुळात वाचत आहेतच हे गृहीत धरण्याचे कारण नाही. तुमच्या तुरळकच लेखांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो (त्यातही विषय धार्मिक अथवा गाजत असलेला / राजकीय असेल तर विशेषतः). स्त्री आयडींना खास पाँईट आउट करण्याची गरज नाही. त्यातही धाग्याचे नाव वाचुन तुमच्या स्वयंपाकघराच्या धाग्यावर अनेकींनी प्रतिसाद दिला होता. मी सुद्धा भरपुर लिहीले होते. पण खाली तुम्ही त्याबद्दल "उचकवणे" आणि "नैसर्गिक रिस्पॉन्स" वगैरे बोलुन त्याबद्द्ल पश्चाताप करायला लावल्याबद्दल धन्यवाद! (बाकी तुमच्या कुठल्याही धाग्यावर स्त्री आयडी फारशा आल्याचे मला तरी दिसले नाही.. तुमची विधाने दुसर्‍या धाग्याबद्दल असली तरी आक्षेपार्हच आहेत..) आता मुळ मुद्द्याबद्दल एखाद्या गोष्टीसाठी स्त्रियांनी लढा दिला आणि यश मिळवले ही खरंतर उत्तमच गोष्ट आहे. मी स्वतः देवधर्म मानित नसल्याने मला व्यक्तिशः काही फरक पडला नाही. ही शक्ति इतर जास्त महत्वाच्या आणि गंभीर स्त्री विषयक मुद्द्यांसाठी वापरली गेली असती तर जास्त बरे झाले असते.. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मला हा प्रकार खरं तर राजकीय स्टंटबाजीचा जास्त वाटतो. म्हणुन काही विशेष आनंद वगैरे झाला नाही. बाकी सर्व मत एकम्दरीत पैसाताई सारखेच आहे. आणि हो.. पुन्हा कधी तुम्हाला फुकट निराश व्हावं लागु नये म्हणुन.. खरंच स्त्री आयडींनी आमंत्रण दिलं नव्हतं कोणाताही धागा काढताना. तेव्हा उगाच "आयजीचा जीव बायजीत.. बायजीचा जीव खेटरात.." टाईप सुर लावु नये. इथे कुणीही जेव्हा स्त्तीयांच्या बाजुने लिहीते / भांडते तेव्हा स्वतःच्या मतांसाठी.. विचारांसाठी बोलत असते. स्त्रीयांनी त्याबद्दल उपकृत रहाण्याची अपेक्षा न केल्यास बरे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माहितगार, तुमच्याकडून असा

अजया
Wed, 04/13/2016 - 16:36 नवीन
माहितगार, तुमच्याकडून असा प्रतिसाद यावा याचे सखेद आश्चर्य वाटते आहे! मला गेले तीन दिवस मिपा उघडतच नव्हते कसा प्रतिसाद देणार? दुसरे या विषयावर मी एकदा तुमच्याच धाग्यावर मला काय वाटते ते लिहिले आहे.अशा चमको आंदोलन आणि शनिला देव समजून महत्त्व देणे वगैरे गोष्टी माझ्यासाठी दुर्लक्षणीय आहेत.स्त्रियांसाठी करण्यासारख्या अनेक गोष्टी या भूमातांनी केल्या तर जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

यासाठी धन्यवाद!

पैसा
Wed, 04/13/2016 - 16:28 नवीन
मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
यासाठी धन्यवाद! मात्र खरे सांगायचे तर अशा विषयांवर निकोप चर्चा होऊ शकत नाही हा जुना अनुभव आहे. मग तिथे अनाहिता वगैरे अनेक संबंध नसलेल्या गोष्टी येतात. आणि चर्चा नीटशी होत नाही तर फक्त भांडणे होऊन संपादकांचे काम वाढते त्यामुळे मी अशा प्रकारांना उत्तर द्यायचे फार पूर्वीच बंद केले आहे. बरे काही उत्तर देऊन कोणाचे मत बदलण्याचीही कधी सुतराम शक्यता नसते. या चर्चांमधे आगलावेपणा करणारे कोण हे नेहमीच ठरलेले असतात. त्यामुळे तिथे आपला वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा दुसरे काही विधायक करण्यावर मी लक्ष केंद्रित करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का?

अ-मॅन
Sat, 04/09/2016 - 13:20 नवीन
कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती.
अगदी नैसर्गीकच. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. नाही नाही आम्हाला त्यांच्या स्वयंघोशीत प्रतिनीधींची अनुपस्थीती जाणवते... आता यात पुन्हा म्हणाल की अशा कोणी स्वयंघोशीत अनाहीता प्रतिनीधी अजिबात अस्तित्वात नाहीत पण लक्षात घ्या त्या आहेत असे अनेक अनाहितांचे गुप्त उघड म्हणने आहे कदाचीत चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवातिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा स्वयंघोशीत प्रतिनीधींच्या बाबत चर्चांमधे फार येत नसाव्यात इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिपावय पाच महिने आणि नॉन

पिलीयन रायडर
Sun, 04/10/2016 - 00:44 नवीन
मिपावय पाच महिने आणि नॉन अनाहिता असुन तुम्हाला अनाहिता बद्दल बरीच माहिती दिसते. इतकेच नव्हे तर अगदी अनाहिता तुमच्यापाशी मन मोकळे करताना दिसतात. तुम्हाला त्यांचे गुप्त उघड म्हणणे आणि त्यामागचे कारणही माहिती आहे. इंटरेस्टींग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अ-मॅन

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत

प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 09:29 नवीन
ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य उर्फ़ द बाहुबली उर्फ़ शिवाजी द बॉस उर्फ़ भाऊंचे भाऊ उर्फ़..उर्फ़.... असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

याच

नाखु
Mon, 04/11/2016 - 10:22 नवीन
गोष्टीचा एकदम नवल्/अचंबा/रहस्य्गुढता/अनाकालनीय गुंता/वैषम्य वाटते. सरळसोट कायम एकाच नावाने धाडसी लिहिणारा बॅन होतो (किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल) आणी नाना अवतार्धारी सतत भेटत राहतात विनासायास काही महिन्यासाठी तरी नक्की !!! तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे ! चित्ती असू द्यावे समाधान ! मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

???

पैसा
Mon, 04/11/2016 - 11:02 नवीन
किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल
हे कोणाबद्दल बा? आणि ही माहिती तुम्हाला कोणी दिली? त्याचा पूर्वग्रह कशावरून नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्यांचाही अंदाज असेल हो.

सूड
Mon, 04/11/2016 - 11:25 नवीन
त्यांचाही अंदाज असेल हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते त्यांना लिहू देत ना

पैसा
Mon, 04/11/2016 - 11:47 नवीन
मी कधीही काहीही लिहिण्यापूर्वी माझी माहिती आहे का अंदाज आहे ते सांगून टाकते. ज्यांना नीट वाचायची इच्छा असते त्यांचा गैरसमज नको ना! हा, कोणाला दिसत असून कानाडोळा करायचा असेल तर त्याची मर्जी. पण सगळेच जण डोळे मिटून दूध पीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गप्रांव...वशाड मेलो

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 13:54 नवीन
गप्रांव...वशाड मेलो असे ब्रेच दिवस ल्हिले नैस ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अंदाज अपना अपना

कपिलमुनी
Mon, 04/11/2016 - 14:25 नवीन
ठ्ठो ! जबर्‍या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 11:11 नवीन
+११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सतत ब्यान होत असलेले....

अ-मॅन
Mon, 04/11/2016 - 20:23 नवीन
सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की. @पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत

अ-मॅन
Mon, 04/11/2016 - 20:48 नवीन
ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य...उर्फ़..उर्फ़..उर्फ़.... असावेत. सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की. तसेही फक्त अंदाजपंचे प्रतिसाद ठोकायची परवानगी असेल तर आपणही मोहिते जिवन या सदस्यनामाने मिपावर वावरत असणार. असो... @पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा