Skip to main content

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

वाचने 6104
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मस्त संदीप अभिनंदन घराची ओढ म्हणजे काय कळले असेल आता. ओफिस मध्ये दुपारचे तीन वाजले की घरच्या ओढीने जीव कासावीस होत असेल.

आतली कविता अशी बाहेर येते तर. सेठ पार्टीचं विसरु नका. अभिनंद्न. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्यासाठी........आजही...उद्याही...कधीही* . . . . . *अटी लागू (ही ऑफर फक्त दर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंतच लागू असणार आहे)

In reply to by चांदणे संदीप

सॅण्डीबाबा. मलाबी पार्टीचा वायदा केलेला हैस. लक्षात ठेव. नायतर पुतणीला चिमटे काढायचे शिकवीन. ;)

ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे आणि कन्यारत्न असेल तर मग काय विचारता?

आवडली. परंतु एक शंका - बोबड्या बोलीत सहसा का-का नसतं ता-ता असतं. मात्र अपवाद असू शकतो. :)