✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

ग
गॅरी शोमन यांनी
Wed, 03/23/2016 - 11:23  ·  लेख
लेख
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20160321&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF% भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत. आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही. आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही. भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा. मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही. भाई वैद्य साहेब. १) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ? २) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ? ३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्‍या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ? ४) सासर्‍याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्‍याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्‍याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ? ५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते. या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल. तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल. राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे. आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ? भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
प्रतिक्रिया
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी

प्रतिक्रिया द्या
28877 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 11:42 नवीन
सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवाद
  • Log in or register to post comments

या राज्यात मुलींचे

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 11:56 नवीन
या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. >> आकडेवारीसह विदा पाहिजे.
  • Log in or register to post comments

त जो साहेब

सुबोध खरे
Wed, 03/23/2016 - 18:22 नवीन
त जो साहेब खालील दुवा वाचून पहा.मुस्लीम मुलींची नव्हे तर सर्व मुस्लीम मुलांची स्थिती आहे. मुलींची स्थिती याहूनही वाईट आहे. तो जे एन यु मधील प्राध्यापकांनी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याला भगव्या रंगाची किनार आहे असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

http://indianexpress.com

सुबोध खरे
Wed, 03/23/2016 - 18:28 नवीन
http://indianexpress.com/article/opinion/columns/modernity-and-the-madrasa/ http://www.sify.com/news/madrasas-in-india-urgently-need-reforms-and-a-new-syllabus-news-columns-obwpQcdchdisi.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही दिलेले दोन्ही दुवे

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 19:04 नवीन
तुम्ही दिलेले दोन्ही दुवे वाचले. पण त्यात शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा मिळाला नाही. दोन्ही लेखात मोघम भाषा आहे. दोन्ही लेखांचा भर मदरश्यांच्या शिक्षनाच्या आधुनिकिकरणाचा आहे. ज्या रिपोर्टचा दाखला अर्शद आलम ह्यांनी दिलाय तो रिपोर्ट इथे http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Standing%20Committee%20Report_0.pdf ह्या रिपोर्टनुसार शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी अंदाजे दहा टक्के मदरशात जातात. सचर कमिटीच्या रिपोर्टनुसार ते ३-४ टके आहे हे आधी दुसर्‍या धाग्यावर दिलेले. ह्या नव्या रिपोर्टनुसार सचर कमिटीने फक्त शासनमान्य मदरशांमधली मुले मोजली होती. ते एक असो. मुद्दा आहे शोमन ह्याम्च्या विधानाचा. ते मुस्लिम मुलींच्या शिक्षणाबद्दल सरसकटीकरण करणारे विधान करुन गैरसमजास हातभार लावत आहेत. वरच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी मुलांपेक्षा मुलींचे शाळांमधली उपस्थिती जास्त आहे. मुली शाळेतही जात आहे, शासकिय शिक्षण घेत आहेत, नोकर्‍याही करत आहेत. मी त्याची आकडेवारी दुसर्‍या एका धाग्यावर दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे. शोमन यांचे विधान सरसकट स्विकारायचे की अनेक शासकिय अहवालांमधे दिसणारी मुस्लिम मुलींची आकडेवारी साफ खोटी आहे असे मानायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

The syllabus being taught

सुबोध खरे
Wed, 03/23/2016 - 19:42 नवीन
The syllabus being taught here is the same old Darse Nizami syllabus that was prepared in the eighteenth century by renowned theologist Mulla Nizamudin Sihalwi, a contemporary of Shah Walilluah Muhaddis Dehlawi. The same syllabus is being followed by almost every big and small madrasa across the country despite the fact that more than 200 years have passed since it was introduced here. तुम्ही मुलगे आणी मुली यात शब्द छल करणे सोडून द्या. त्यांचा मूळ मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. समाजवाद्यांचा/ कम्युनिस्टांचा केवळ भाजप/ संघ याला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम आहे. मी दिलेले दुवे हे कॉंग्रेसच्या राज्यातीलच आहेत. आपल्याला दोनशे वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम शिकवला तर काय होते? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणतेही सरकार आले आणी त्यानी मदरशाचा अभ्यासक्रम सुधारायचा म्हटला कि हे समाजवादी लोक मुसलमानांवर अन्याय म्हणून गळा काढतात. एकीकडे त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे म्हणायचे. त्यांना नोकर्या मिळायला पाहिजेत म्हणायचे आणी शिक्षण दोन "शतके" जुने. मदरशात शिकलेल्या माणसाला लष्करात नोकरी दिली तर त्याला गधड इंग्रजी येत नाही धड हिंदी वाचता येत नाही आधुनिक शास्त्रे कशी शिकवायची? यावर हे समाजवादी लोक म्हणतीलच कि तालिबान किंवा आयसीस चे लोक अत्याधुनिक शास्त्रे चालवतातच की. अशा विचारसरणी असल्यावर काय बोलणार? त्यातून तुम्हाला फक्त "शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा" फक्त पाहिजे असेल तर मी हि चर्चा येथेच थांबवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

का बरे शब्दछल सोडुन द्यावा?

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 20:18 नवीन
का बरे शब्दछल सोडुन द्यावा? शब्दछल करने इथल्याच काही सन्माननीय आयडींकडुन शिकलो आहे. किती मुली-मुलं कुठे जातात काय शिकतात ह्याचा विदा दिल्यानंतरही तुम्ही मदरशांचं घेउन बसलात तर कसे चालायचे? म्हणजे ९० मुले सामान्य शाळेत जातात, १० मुले मदरशात जातात तर ९० कडे साफ दुर्लक्ष करुन १० कडे बोट दाखवुन 'हे असलेच', "ह्यांच्यात सगळं असंच असतं" छाप पिंका टाकणे गैर आहे. तुम्ही आता शोमन ह्यांनी केलेल्या सरसकटीकरणाला थेट अनुमोदन देत आहात. आधीच्या धाग्यावर आपण सरसकटीकरनाविरुद्ध होतात ह्याची आठवण करुन देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काही प्रश्न

विकास
गुरुवार, 03/24/2016 - 03:54 नवीन
माफ करा पण काही प्रश्न ... एका अल्पसंख्य धर्माच्या लोकांबद्दल काही बोलले की लगेच विदा लागतो. पण इतरांची बदनामी करताना विदा मागितला तर तो न देता वाट्टेल ती भाषा वापरून गप्प बसले तर चालते का? एका समुदायाने हिंसा केलेली असली - इतकी की जगभरचे विदाबिंदू घेऊन ती एका आलेखावर मांडली तरी त्यातून आलेख तयार होऊ शकेल. तरी देखील माझ्यासारख्याचे म्हणणे आहे की असे सरसकटीकरण करू नये कारण सगळ्याच माणसांना दोषी ठरवू नये म्हणून. तुमच्या सारखे तर लगेच तावातावाने पुढे येतात... पण जर इतर संघटनेच्या विरोधात एक पुरावा शाबित झालेला नसताना देखील (आणि हो बंदी आणायचा प्रयत्न करून पण ती उठवायला लागलेली असताना देखील) त्या संघटनेला आणि त्याच्याशी जो कोणी संबंधीत असेल अथवा समर्थक असेल त्या सर्वांना जणू गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बोलले तर ते योग्य असते का? नसले तर मग असे कसे करता? का एकीकडे नियम / तत्वआणि दुसरीकडे नुसता जहरी द्वेष पसरायचे उद्योग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अहो तुम्ही ठरवले आहेच ना

तर्राट जोकर
गुरुवार, 03/24/2016 - 11:47 नवीन
अहो तुम्ही ठरवले आहेच ना आम्ही पक्षपाती आहोत. मग काय उरले आता? आम्ही स्पष्ट भूमिका घेतो तरी की आम्ही संघविरोधक, भाजप विरोधक, भक्तविरोधक आहोत म्हणून. पण इथल्या काही निष्पक्ष आणि अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या सदस्यांना तुमचे हे प्रश्न विचारा ना? त्यांना अशी स्पष्ट भूमिका घ्यायला सांगा ना? उगा आपलं ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, वरुन आम्ही कीती विचारवंत, अभ्यासू, निष्पक्ष म्हणून मिरवायचे. दुसर्‍यांकडे बोट दाखवतांना आपण काय करतो हेही बघून घ्यावे. बाकी दहशतवादी कारवायांमधे मुस्लिम असतात ह्याला मी कधीही कुठेही नाकारले नाही. पण त्या सत्याचा आधार घेऊन इतर चांगल्या गोष्टी ज्यापद्धतीने दाबल्या जातात त्याला विरोध आहे. उदा. इथे व ओवेसीचा गळा ह्या धाग्यावर मदरशांचा उल्लेख झाला, चार बायका व मुले, त्यांचे फतवे ह्यांच्याबद्दल मी पुरावे दिले तर मान्य करण्याचा मोठेपणा इथे कोणीच दाखवला नाही. पण तेच मुद्दे घेऊन मुस्लिमांचे सरसकटीकरण करणारे, घृणा करणारे प्रतिसाद आले की त्याला हिरिरीने समर्थन मिळतांना दिसते. म्हणजे आतंकवादी, दंगे ह्यातून मुस्लिमांबद्दल तयार झालेली एकांगी प्रतिमा खरे आकडे पुढे आले तरी बदलायची नाहीच असे काहींनी ठरवले आहे. मग मला नावे ठेवण्याचा अधिकारही कोणाला मिळत नाही हेही लक्षात ठेवावे. रच्याकने, संघाबद्दल तर नंतर बोलणारच आहे. तो विषय एका प्रतिसादात मावण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला थांंबा म्हणत होतो, पण तुम्हाला उतावळेपणा सोडवला नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

भाई वैद्यांना मी सिरिअसली घेत

आनन्दा
Wed, 03/23/2016 - 12:31 नवीन
भाई वैद्यांना मी सिरिअसली घेत नाही. तस्मात पास.
  • Log in or register to post comments

भाई वैद्य मिपावर आहेत?

स्पा
Wed, 03/23/2016 - 12:36 नवीन
भाई वैद्य मिपावर आहेत?
  • Log in or register to post comments

भाई वैद्य मिपावर आहेत?

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/23/2016 - 14:31 नवीन
भाई वैद्य मिपावर आहेत?
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पांSsssssडूऊऊऊऊऊऊ!!!!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/23/2016 - 14:35 नवीन
Image removed. पांSsssssडूऊऊऊऊऊऊ!!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 12:59 नवीन
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे

गरिब चिमणा
Wed, 03/23/2016 - 17:12 नवीन
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.>>>>>>>>> टीनपॉट अतुल भातकळकर किंवा गेलाबाजार राम माधव सारख्याला तुम्ही गांभिर्याने घेता ना, मग बास तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरंय।।

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/23/2016 - 19:02 नवीन
खरंय।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

आम्ही नानासाहेबांना सुद्धा

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 19:11 नवीन
आम्ही नानासाहेबांना सुद्धा गांभिर्याने घेतो. ...))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

मला काही म्हणालात काय साहेब??

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 19:19 नवीन
मला काही म्हणालात काय साहेब??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते तुम्हाला नाही माई

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/23/2016 - 19:23 नवीन
ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

ते तुम्हाला नाही माई

गरिब चिमणा
Wed, 03/23/2016 - 20:22 नवीन
ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
मी या आधीही सांगितले आहे , माझा माईसाहेब या आय्डीशी काहीही संबंध नाही.नानासाहेब कोण होते मला माहीत नाही,पण मला प्रत्येकवेळी नानासाहेब संबोधुन माईसाहेब कुरसुंदीकर या स्त्री आयडीची ऑन रेकॉर्ड बदनामी चालू आहे ते योग्य नाही.माई वयस्कर आहेत ,निदान त्यांच्या वयाचा मान ठेउन यापुढे त्यांचा कुणाशीही संबंध जोडून बदनामी करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हहपुवा

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/24/2016 - 15:00 नवीन
हहपुवा फारच विनोदी तुम्ही नानासाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

तुम्हाला नाही हो. माझा

श्रीगुरुजी
Wed, 03/23/2016 - 19:26 नवीन
तुम्हाला नाही हो. माझा प्रतिसाद ग्रेटथिन्कर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य फुलथ्रॉटल जिनिअस उपाख्य टॉपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य काकासाहेब केंजळे उपाख्य माईसाहेब कुलसुंगीकर उपाख्य गरीब चिमणा उपाख्य .... या सदगृहस्थांना उद्देशून होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मालक!!!

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 19:43 नवीन
मालक!!! ____/\____ ह्या घटोत्कची मायाजालापुढं आमची काय मिजास!! आम्ही एकुलते एक अन हेच आहोत! तेव्हा एक विनंती ह्यापुढे जमल्यास त्यांचा उल्लेख त्यांच्या 24001 महापद्म आयडी पैकी नाना सोडुन एखादा वापरुन करावा ही विनंती!! किमान नानासाहेब नेफळे चे नाने करून वापरा अशी लीं विनंती!! (धसका घेतलेला) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नुसते

विकास
Wed, 03/23/2016 - 19:54 नवीन
नुसते "माईंचे हे.." म्हणले तरी चालू शकेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

उपाख्य इंद्रिय तुष्टीकरणवाले!

DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 15:40 नवीन
उपाख्य इंद्रिय तुष्टीकरणवाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माई मोड़ ऑन

DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 15:46 नवीन
माई मोड़ ऑन निधर्मी म्हणजे हिंदू धर्मावर तोंडसुख घेणारे ना रे चिमणा? मनातल्या मनात- आमच्या ह्यांच्या दुआईडी मुळे अशी पंचायत होते! इच्छा नसताना अरे तूरे करून विचारावे लागते! माई मोड़ ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

कसला भार जोक केलाय

महासंग्राम
Fri, 03/25/2016 - 16:55 नवीन
भाई वैद्य एकवेळ ठीक आहे हो विश्वंभर चौधरी कधी पासून विचारवंत झाले ??? भारीच इनोद करता कि चिमण राव तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

मराठीत पण "ओपन लेटर"

अत्रे
Wed, 03/23/2016 - 13:01 नवीन
मराठीत पण "ओपन लेटर" लिहिण्याची प्रथा सुरु झाली वाटतं।
  • Log in or register to post comments

कुठलाही समाजवादी माणुस हा

प्रसाद१९७१
Wed, 03/23/2016 - 13:28 नवीन
कुठलाही समाजवादी माणुस हा असाच असतो, हे वैद्य का म्हणुन त्याला अपवाद असावेत? दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments

सर्वत्रिकरण वगैरे वगैरे??

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 14:35 नवीन
सर्वत्रिकरण वगैरे वगैरे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

उने बोले तो चलता है भाईजान.

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 15:12 नवीन
उने बोले तो चलता है भाईजान. हमबोले तो सरसकटीकरण? ब्रिगेड लगेच सरसावून प्रश्न विचारायला टपकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

हाऊ!!

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 15:18 नवीन
इने हमकू घफला समजरे यारों!! ऐसी कैसी होता बोलते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ओके ओके.

आनंदी गोपाळ
Wed, 03/23/2016 - 13:32 नवीन
एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
तुम्ही आग्रहच करत आहात, तर म्हणतो ब्वा. "गॅरी शोमन यांनी शेण खाल्लं." धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हो मी शेण खाल्ल

गॅरी शोमन
Wed, 03/23/2016 - 13:46 नवीन
भाई वैद्य ह्यांना अस लिहण म्हणजे शेण खाण आहे. मी ते खाल्ल.
  • Log in or register to post comments

होय हो.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/24/2016 - 21:38 नवीन
भाई वैद्य ह्यांना अस लिहण म्हणजे शेण खाण आहे. मी ते खाल्ल.
तेच तर मी म्हणतोय ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

विपर्यास.

कलंत्री
Wed, 03/23/2016 - 15:26 नवीन
वर्तमानपत्रातील / जालावरील अथवा माध्यमातील बातम्या संदर्भाला सोडुन लोकक्षोभ होईल या पद्धतीने पसरवल्या जातात. उत्तम उपाय म्हणजे त्या व्यक्तिचा भूतकाळ पहा आणि ठरवा.
  • Log in or register to post comments

सहमत.

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 15:36 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

ज्या मुस्लिम सत्यशोधक

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/23/2016 - 15:50 नवीन
ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली हा उतारा भाऊ तोरसेकर ह्यांच्या ब्लॉग वरचा असून ह्यातील खरे खोटेपणा वैद्यच जाणो। फक्त संघाला विरोध हाच एक कलमी कार्यक्रम आहे ह्यांचा।
  • Log in or register to post comments

सत्य शोधक समाज

गॅरी शोमन
Wed, 03/23/2016 - 16:21 नवीन
मी सय्यद भाईंची मुलाखत पाहिली आहे. ते तोंडी तलाक/ मेहेर की रकम विरुध्द कडाडुन बोलतात. सत्यशोधक मंडळच हायजॅक केलेल दिसतय भाईजान लोकांनी.
  • Log in or register to post comments

तावातावाने सगळे राजकाराणावर

नाना स्कॉच
Wed, 03/23/2016 - 18:17 नवीन
तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ Image removed.
  • Log in or register to post comments

सरसकटीकरण...

विकास
Wed, 03/23/2016 - 18:57 नवीन
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. हे सरसकटीकरण अमान्य आहे आहे आणि आक्षेपार्ह देखील आहे. असे सरसकटीकरण कुठल्याच गोष्टींचे, म्हणजे येथे मुस्लीमसमाजाबद्दल असेल पण इतर चर्चेत इतरांबद्दल देखील असते. जे काही या समाजाकडून चुकत गेले त्याला त्या समाजापेक्षा विशेष वागणूक मिळण्याची सवय कारणीभूत आहे असे मला वाटते. हे केवळ भारतातच नाही तर जगभर झालेले आहे. पण हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मिपाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यात फायदा घेतला जात आहे असे वाटते. तेच मोठ्या पातळीवर भारतात होत आहे. त्यामुळे केवळ धार्मिक तत्वावरच नाही तर कुठल्याही तत्वावर जर आपले लेखन हे सामाजिक फूट पाडण्यास आणि द्वेष तयार करण्यास जबाबदार होत असेल तर व्यक्तीस्वातंत्र्य गाजवायच्या आधी सर्वांनी दहादा विचार करावा असे वाटते. असो. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

आम्हाला नाही मुस्लीम

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/23/2016 - 19:15 नवीन
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. भारतच कशाला युरोपात घुसलेले इसिस ग्रस्त निर्वासित छावण्या मध्ये कुराणाची पाने त्यांच्याच अफगाणी समाज बांधवाने फाडली म्हणून दंगल करतात ह्याला काय म्हणावं।आता काल झालेला स्फोटाची जबाबदारी इसिस ने घेतली आहे ,त्यांनी मागेही जाहीर केलं होत कि ह्या निर्वासितात आमचे लोक आहेत म्हणून तरीही सेकुलर यूरोपीय नेत्यांनी त्यांना पायबंद घेतला नाही, बांधावरचे संपन्न अरबी देश त्यांना आत घ्यायला नकार देतात,,आता अधून मधून दिवाळीच्या फटाक्यासारखा युरोपात आवाज येतच राहील,जोपर्यंत आधी धर्म मग बाकी सर्व अशा मानसिकतेचे लोक तिथे आहेत तोवर।
  • Log in or register to post comments

इसिस हे ईस्त्राईल आणि

गरिब चिमणा
Wed, 03/23/2016 - 20:31 नवीन
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे ,त्याची फळे ते भोगत आहेत.यात उगाच कुणा धर्माला दोष देऊ नका.पवित्र कुराण ए शरीफ मानणारा सच्चा मुसलमान दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे त्रिकलाबाधीत सत्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

इसिस

ट्रेड मार्क
Wed, 03/23/2016 - 22:20 नवीन
इसिस कुराण ए शरीफ मानत नाही का? तिथे भरती होणारे सगळे कुराण पढलेले असतात का नाही? समस्त दहशतवादी कुराणाचेच दाखले देऊन सगळी काळी कृत्ये करतात. कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो. हे लोक जो पर्यंत कमी संख्येत असतात तो पर्यंत अगदी सज्जन, गरीब, मनमिळाऊ असतात. जशी संख्या वाढेल तसे नखरे चालू होतात आणि मग दहशत. कोणाला सपोर्ट करतोय याचं भान ठेवा जरा. दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

कुठल्या मुसलमानाने कधी

तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 22:33 नवीन
कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो ओवेसीच्या धाग्यावर आताच शेअर केले होते. https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=++fatwa+against+isis http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-clerics-issue-fatwa-against-isis-the-taliban-al-qaida-and-other-terror-groups-a6768191.html https://en.wikipedia.org/wiki/List_of_fatwas#Fatwas_against_terrorism.2C_Al-Qaeda_and_ISIS आता ह्या विरोधाला तोंडदेखला म्हणून तुम्ही रद्दबातल करु शकता. हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अरे वा

ट्रेड मार्क
गुरुवार, 03/24/2016 - 00:12 नवीन
बातमीत कशी गोलमाल केलीये बघा. पहिल्या परिच्छेदात "Nearly 70,000 Indian Muslim clerics have signed a fatwa" असं म्हणलाय. मग नंतर हळूच "Around 70,000 clerics from across the world, who were part of the event, passed the fatwa.". एकूण १५ लाख लोकांनी निषेध केला म्हणतात. जर फक्त भारतातून मुस्लिम आले असतील तर भारतातील एकूण मुस्लिम संख्येपैकी 0.8720% मुस्लिमांनी आणि जर जगभरातून आले असतील तर जगातील एकूण मुस्लीमांपैकी 0.09375% मुस्लिमांनी निषेध केला. आधीचा विचार न करता नजीकच्या काळातलं बघितलं तर मुस्लिम दहशतवाद १९८० च्या दशकात वाढीस लागला. तेव्हाच विरोध दर्शवला असता तर एवढा वाढला नसता. दुर्दैवाने अजूनही तथाकथित पुरोगामी लोक या ना त्या मार्गाने पाठीशी घालत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अपेक्षित प्रतिसाद. आधी

तर्राट जोकर
गुरुवार, 03/24/2016 - 12:03 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. आधी विचारायचे एकाने तरी विरोध केला का, उत्तर दिल्यावर सांख्यिकी मांडतायत. तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर विदा-पुरावा तरी कशाला मागता? रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. बाकीचे तथाकथित पुरोगामी आहेत. दुर्दैव आहे ब्वा तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

विरोध आणि निषेध

ट्रेड मार्क
गुरुवार, 03/24/2016 - 19:24 नवीन
विरोध आणि निषेध यातला फरक तुम्हाला कळतोय का? मी एक तरी मुसलमान विरोध करतोय का विचारतोय आणि तुम्ही निषेधाचा सूर कोणी काढला ते सांगताय. हे म्हणजे पोर हाताबाहेर गेल्यावर बाप नुसता अरे नको रे असा वागू असं म्हणण्यासारखं आहे. एक तर पहिल्यापासून शिस्त लावायला पाहिजे होती ती लावली नाही आणि आता कान उपटायची वेळ पण निघून गेली तरी पोराला काही न करता नुसतं बाकीच्यांना सांगत बसलेत. तुम्ही सांख्यिकी मध्ये परत गडबड केलीत. आपण पाठींबा किती लोंकांचा आहे याबद्दल बोलतोय. संघाला किती लोकांचा पाठींबा आहे ती संख्या असेल तर सांगा. बादवे, तुम्ही या हाताबाहेर गेलेल्या पोराची एवढी का बाजू घेता याचं बाकी आम्हाला भारी कुतूहल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 13:11 नवीन
कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास अपेक्षित आहे आणि कुणाकडून ते स्पष्ट करावे. सांख्यिकीचा खेळ तुम्हीच मांडायला नको होता. कारण मुळात तो मला कधीच आवडत नाही. सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हो का? सांख्यिकीतून काहीच

श्रीरंग
Fri, 03/25/2016 - 23:30 नवीन
हो का? सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसत, म्हणता? मग या धाग्यावर सर्वप्रथम तुम्हीच विदा का मागवलात तेही सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा