Skip to main content

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&Secti…% भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत. आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही. आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही. भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा. मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही. भाई वैद्य साहेब. १) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ? २) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ? ३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्‍या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ? ४) सासर्‍याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्‍याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्‍याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ? ५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते. या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल. तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल. राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे. आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ? भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.

वाचने 28991
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवाद

या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. >> आकडेवारीसह विदा पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

त जो साहेब खालील दुवा वाचून पहा.मुस्लीम मुलींची नव्हे तर सर्व मुस्लीम मुलांची स्थिती आहे. मुलींची स्थिती याहूनही वाईट आहे. तो जे एन यु मधील प्राध्यापकांनी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याला भगव्या रंगाची किनार आहे असे म्हणता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही दिलेले दोन्ही दुवे वाचले. पण त्यात शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा मिळाला नाही. दोन्ही लेखात मोघम भाषा आहे. दोन्ही लेखांचा भर मदरश्यांच्या शिक्षनाच्या आधुनिकिकरणाचा आहे. ज्या रिपोर्टचा दाखला अर्शद आलम ह्यांनी दिलाय तो रिपोर्ट इथे http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Standing%20Committee%2… ह्या रिपोर्टनुसार शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी अंदाजे दहा टक्के मदरशात जातात. सचर कमिटीच्या रिपोर्टनुसार ते ३-४ टके आहे हे आधी दुसर्‍या धाग्यावर दिलेले. ह्या नव्या रिपोर्टनुसार सचर कमिटीने फक्त शासनमान्य मदरशांमधली मुले मोजली होती. ते एक असो. मुद्दा आहे शोमन ह्याम्च्या विधानाचा. ते मुस्लिम मुलींच्या शिक्षणाबद्दल सरसकटीकरण करणारे विधान करुन गैरसमजास हातभार लावत आहेत. वरच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी मुलांपेक्षा मुलींचे शाळांमधली उपस्थिती जास्त आहे. मुली शाळेतही जात आहे, शासकिय शिक्षण घेत आहेत, नोकर्‍याही करत आहेत. मी त्याची आकडेवारी दुसर्‍या एका धाग्यावर दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे. शोमन यांचे विधान सरसकट स्विकारायचे की अनेक शासकिय अहवालांमधे दिसणारी मुस्लिम मुलींची आकडेवारी साफ खोटी आहे असे मानायचे?

In reply to by तर्राट जोकर

The syllabus being taught here is the same old Darse Nizami syllabus that was prepared in the eighteenth century by renowned theologist Mulla Nizamudin Sihalwi, a contemporary of Shah Walilluah Muhaddis Dehlawi. The same syllabus is being followed by almost every big and small madrasa across the country despite the fact that more than 200 years have passed since it was introduced here. तुम्ही मुलगे आणी मुली यात शब्द छल करणे सोडून द्या. त्यांचा मूळ मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. समाजवाद्यांचा/ कम्युनिस्टांचा केवळ भाजप/ संघ याला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम आहे. मी दिलेले दुवे हे कॉंग्रेसच्या राज्यातीलच आहेत. आपल्याला दोनशे वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम शिकवला तर काय होते? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणतेही सरकार आले आणी त्यानी मदरशाचा अभ्यासक्रम सुधारायचा म्हटला कि हे समाजवादी लोक मुसलमानांवर अन्याय म्हणून गळा काढतात. एकीकडे त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे म्हणायचे. त्यांना नोकर्या मिळायला पाहिजेत म्हणायचे आणी शिक्षण दोन "शतके" जुने. मदरशात शिकलेल्या माणसाला लष्करात नोकरी दिली तर त्याला गधड इंग्रजी येत नाही धड हिंदी वाचता येत नाही आधुनिक शास्त्रे कशी शिकवायची? यावर हे समाजवादी लोक म्हणतीलच कि तालिबान किंवा आयसीस चे लोक अत्याधुनिक शास्त्रे चालवतातच की. अशा विचारसरणी असल्यावर काय बोलणार? त्यातून तुम्हाला फक्त "शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा" फक्त पाहिजे असेल तर मी हि चर्चा येथेच थांबवतो

In reply to by सुबोध खरे

का बरे शब्दछल सोडुन द्यावा? शब्दछल करने इथल्याच काही सन्माननीय आयडींकडुन शिकलो आहे. किती मुली-मुलं कुठे जातात काय शिकतात ह्याचा विदा दिल्यानंतरही तुम्ही मदरशांचं घेउन बसलात तर कसे चालायचे? म्हणजे ९० मुले सामान्य शाळेत जातात, १० मुले मदरशात जातात तर ९० कडे साफ दुर्लक्ष करुन १० कडे बोट दाखवुन 'हे असलेच', "ह्यांच्यात सगळं असंच असतं" छाप पिंका टाकणे गैर आहे. तुम्ही आता शोमन ह्यांनी केलेल्या सरसकटीकरणाला थेट अनुमोदन देत आहात. आधीच्या धाग्यावर आपण सरसकटीकरनाविरुद्ध होतात ह्याची आठवण करुन देतो.

In reply to by तर्राट जोकर

माफ करा पण काही प्रश्न ... एका अल्पसंख्य धर्माच्या लोकांबद्दल काही बोलले की लगेच विदा लागतो. पण इतरांची बदनामी करताना विदा मागितला तर तो न देता वाट्टेल ती भाषा वापरून गप्प बसले तर चालते का? एका समुदायाने हिंसा केलेली असली - इतकी की जगभरचे विदाबिंदू घेऊन ती एका आलेखावर मांडली तरी त्यातून आलेख तयार होऊ शकेल. तरी देखील माझ्यासारख्याचे म्हणणे आहे की असे सरसकटीकरण करू नये कारण सगळ्याच माणसांना दोषी ठरवू नये म्हणून. तुमच्या सारखे तर लगेच तावातावाने पुढे येतात... पण जर इतर संघटनेच्या विरोधात एक पुरावा शाबित झालेला नसताना देखील (आणि हो बंदी आणायचा प्रयत्न करून पण ती उठवायला लागलेली असताना देखील) त्या संघटनेला आणि त्याच्याशी जो कोणी संबंधीत असेल अथवा समर्थक असेल त्या सर्वांना जणू गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बोलले तर ते योग्य असते का? नसले तर मग असे कसे करता? का एकीकडे नियम / तत्वआणि दुसरीकडे नुसता जहरी द्वेष पसरायचे उद्योग?

In reply to by विकास

अहो तुम्ही ठरवले आहेच ना आम्ही पक्षपाती आहोत. मग काय उरले आता? आम्ही स्पष्ट भूमिका घेतो तरी की आम्ही संघविरोधक, भाजप विरोधक, भक्तविरोधक आहोत म्हणून. पण इथल्या काही निष्पक्ष आणि अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या सदस्यांना तुमचे हे प्रश्न विचारा ना? त्यांना अशी स्पष्ट भूमिका घ्यायला सांगा ना? उगा आपलं ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, वरुन आम्ही कीती विचारवंत, अभ्यासू, निष्पक्ष म्हणून मिरवायचे. दुसर्‍यांकडे बोट दाखवतांना आपण काय करतो हेही बघून घ्यावे. बाकी दहशतवादी कारवायांमधे मुस्लिम असतात ह्याला मी कधीही कुठेही नाकारले नाही. पण त्या सत्याचा आधार घेऊन इतर चांगल्या गोष्टी ज्यापद्धतीने दाबल्या जातात त्याला विरोध आहे. उदा. इथे व ओवेसीचा गळा ह्या धाग्यावर मदरशांचा उल्लेख झाला, चार बायका व मुले, त्यांचे फतवे ह्यांच्याबद्दल मी पुरावे दिले तर मान्य करण्याचा मोठेपणा इथे कोणीच दाखवला नाही. पण तेच मुद्दे घेऊन मुस्लिमांचे सरसकटीकरण करणारे, घृणा करणारे प्रतिसाद आले की त्याला हिरिरीने समर्थन मिळतांना दिसते. म्हणजे आतंकवादी, दंगे ह्यातून मुस्लिमांबद्दल तयार झालेली एकांगी प्रतिमा खरे आकडे पुढे आले तरी बदलायची नाहीच असे काहींनी ठरवले आहे. मग मला नावे ठेवण्याचा अधिकारही कोणाला मिळत नाही हेही लक्षात ठेवावे. रच्याकने, संघाबद्दल तर नंतर बोलणारच आहे. तो विषय एका प्रतिसादात मावण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला थांंबा म्हणत होतो, पण तुम्हाला उतावळेपणा सोडवला नाही. असो.

भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.

In reply to by श्रीगुरुजी

भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.>>>>>>>>> टीनपॉट अतुल भातकळकर किंवा गेलाबाजार राम माधव सारख्याला तुम्ही गांभिर्याने घेता ना, मग बास तर!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
मी या आधीही सांगितले आहे , माझा माईसाहेब या आय्डीशी काहीही संबंध नाही.नानासाहेब कोण होते मला माहीत नाही,पण मला प्रत्येकवेळी नानासाहेब संबोधुन माईसाहेब कुरसुंदीकर या स्त्री आयडीची ऑन रेकॉर्ड बदनामी चालू आहे ते योग्य नाही.माई वयस्कर आहेत ,निदान त्यांच्या वयाचा मान ठेउन यापुढे त्यांचा कुणाशीही संबंध जोडून बदनामी करु नका.

In reply to by नाना स्कॉच

तुम्हाला नाही हो. माझा प्रतिसाद ग्रेटथिन्कर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य फुलथ्रॉटल जिनिअस उपाख्य टॉपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य काकासाहेब केंजळे उपाख्य माईसाहेब कुलसुंगीकर उपाख्य गरीब चिमणा उपाख्य .... या सदगृहस्थांना उद्देशून होता.

In reply to by श्रीगुरुजी

मालक!!! ____/\____ ह्या घटोत्कची मायाजालापुढं आमची काय मिजास!! आम्ही एकुलते एक अन हेच आहोत! तेव्हा एक विनंती ह्यापुढे जमल्यास त्यांचा उल्लेख त्यांच्या 24001 महापद्म आयडी पैकी नाना सोडुन एखादा वापरुन करावा ही विनंती!! किमान नानासाहेब नेफळे चे नाने करून वापरा अशी लीं विनंती!! (धसका घेतलेला) नाना

In reply to by नाना स्कॉच

नुसते "माईंचे हे.." म्हणले तरी चालू शकेल. :)

In reply to by गरिब चिमणा

माई मोड़ ऑन निधर्मी म्हणजे हिंदू धर्मावर तोंडसुख घेणारे ना रे चिमणा? मनातल्या मनात- आमच्या ह्यांच्या दुआईडी मुळे अशी पंचायत होते! इच्छा नसताना अरे तूरे करून विचारावे लागते! माई मोड़ ऑफ

In reply to by गरिब चिमणा

भाई वैद्य एकवेळ ठीक आहे हो विश्वंभर चौधरी कधी पासून विचारवंत झाले ??? भारीच इनोद करता कि चिमण राव तुम्ही

In reply to by नाना स्कॉच

उने बोले तो चलता है भाईजान. हमबोले तो सरसकटीकरण? ब्रिगेड लगेच सरसावून प्रश्न विचारायला टपकते.

एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
तुम्ही आग्रहच करत आहात, तर म्हणतो ब्वा. "गॅरी शोमन यांनी शेण खाल्लं." धन्यवाद!

भाई वैद्य ह्यांना अस लिहण म्हणजे शेण खाण आहे. मी ते खाल्ल.

In reply to by गॅरी शोमन

भाई वैद्य ह्यांना अस लिहण म्हणजे शेण खाण आहे. मी ते खाल्ल.
तेच तर मी म्हणतोय ना. ;)

वर्तमानपत्रातील / जालावरील अथवा माध्यमातील बातम्या संदर्भाला सोडुन लोकक्षोभ होईल या पद्धतीने पसरवल्या जातात. उत्तम उपाय म्हणजे त्या व्यक्तिचा भूतकाळ पहा आणि ठरवा.

ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली हा उतारा भाऊ तोरसेकर ह्यांच्या ब्लॉग वरचा असून ह्यातील खरे खोटेपणा वैद्यच जाणो। फक्त संघाला विरोध हाच एक कलमी कार्यक्रम आहे ह्यांचा।

मी सय्यद भाईंची मुलाखत पाहिली आहे. ते तोंडी तलाक/ मेहेर की रकम विरुध्द कडाडुन बोलतात. सत्यशोधक मंडळच हायजॅक केलेल दिसतय भाईजान लोकांनी.

तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ .

आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. हे सरसकटीकरण अमान्य आहे आहे आणि आक्षेपार्ह देखील आहे. असे सरसकटीकरण कुठल्याच गोष्टींचे, म्हणजे येथे मुस्लीमसमाजाबद्दल असेल पण इतर चर्चेत इतरांबद्दल देखील असते. जे काही या समाजाकडून चुकत गेले त्याला त्या समाजापेक्षा विशेष वागणूक मिळण्याची सवय कारणीभूत आहे असे मला वाटते. हे केवळ भारतातच नाही तर जगभर झालेले आहे. पण हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मिपाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यात फायदा घेतला जात आहे असे वाटते. तेच मोठ्या पातळीवर भारतात होत आहे. त्यामुळे केवळ धार्मिक तत्वावरच नाही तर कुठल्याही तत्वावर जर आपले लेखन हे सामाजिक फूट पाडण्यास आणि द्वेष तयार करण्यास जबाबदार होत असेल तर व्यक्तीस्वातंत्र्य गाजवायच्या आधी सर्वांनी दहादा विचार करावा असे वाटते. असो. इति लेखनसीमा.

आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. भारतच कशाला युरोपात घुसलेले इसिस ग्रस्त निर्वासित छावण्या मध्ये कुराणाची पाने त्यांच्याच अफगाणी समाज बांधवाने फाडली म्हणून दंगल करतात ह्याला काय म्हणावं।आता काल झालेला स्फोटाची जबाबदारी इसिस ने घेतली आहे ,त्यांनी मागेही जाहीर केलं होत कि ह्या निर्वासितात आमचे लोक आहेत म्हणून तरीही सेकुलर यूरोपीय नेत्यांनी त्यांना पायबंद घेतला नाही, बांधावरचे संपन्न अरबी देश त्यांना आत घ्यायला नकार देतात,,आता अधून मधून दिवाळीच्या फटाक्यासारखा युरोपात आवाज येतच राहील,जोपर्यंत आधी धर्म मग बाकी सर्व अशा मानसिकतेचे लोक तिथे आहेत तोवर।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे ,त्याची फळे ते भोगत आहेत.यात उगाच कुणा धर्माला दोष देऊ नका.पवित्र कुराण ए शरीफ मानणारा सच्चा मुसलमान दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे त्रिकलाबाधीत सत्य आहे

In reply to by गरिब चिमणा

इसिस कुराण ए शरीफ मानत नाही का? तिथे भरती होणारे सगळे कुराण पढलेले असतात का नाही? समस्त दहशतवादी कुराणाचेच दाखले देऊन सगळी काळी कृत्ये करतात. कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो. हे लोक जो पर्यंत कमी संख्येत असतात तो पर्यंत अगदी सज्जन, गरीब, मनमिळाऊ असतात. जशी संख्या वाढेल तसे नखरे चालू होतात आणि मग दहशत. कोणाला सपोर्ट करतोय याचं भान ठेवा जरा. दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?

In reply to by ट्रेड मार्क

कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो ओवेसीच्या धाग्यावर आताच शेअर केले होते. https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=… http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-cleric… https://en.wikipedia.org/wiki/List_of_fatwas#Fatwas_against_terrorism.2… आता ह्या विरोधाला तोंडदेखला म्हणून तुम्ही रद्दबातल करु शकता. हरकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

बातमीत कशी गोलमाल केलीये बघा. पहिल्या परिच्छेदात "Nearly 70,000 Indian Muslim clerics have signed a fatwa" असं म्हणलाय. मग नंतर हळूच "Around 70,000 clerics from across the world, who were part of the event, passed the fatwa.". एकूण १५ लाख लोकांनी निषेध केला म्हणतात. जर फक्त भारतातून मुस्लिम आले असतील तर भारतातील एकूण मुस्लिम संख्येपैकी 0.8720% मुस्लिमांनी आणि जर जगभरातून आले असतील तर जगातील एकूण मुस्लीमांपैकी 0.09375% मुस्लिमांनी निषेध केला. आधीचा विचार न करता नजीकच्या काळातलं बघितलं तर मुस्लिम दहशतवाद १९८० च्या दशकात वाढीस लागला. तेव्हाच विरोध दर्शवला असता तर एवढा वाढला नसता. दुर्दैवाने अजूनही तथाकथित पुरोगामी लोक या ना त्या मार्गाने पाठीशी घालत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

अपेक्षित प्रतिसाद. आधी विचारायचे एकाने तरी विरोध केला का, उत्तर दिल्यावर सांख्यिकी मांडतायत. तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर विदा-पुरावा तरी कशाला मागता? रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. बाकीचे तथाकथित पुरोगामी आहेत. दुर्दैव आहे ब्वा तुमचे.

In reply to by तर्राट जोकर

विरोध आणि निषेध यातला फरक तुम्हाला कळतोय का? मी एक तरी मुसलमान विरोध करतोय का विचारतोय आणि तुम्ही निषेधाचा सूर कोणी काढला ते सांगताय. हे म्हणजे पोर हाताबाहेर गेल्यावर बाप नुसता अरे नको रे असा वागू असं म्हणण्यासारखं आहे. एक तर पहिल्यापासून शिस्त लावायला पाहिजे होती ती लावली नाही आणि आता कान उपटायची वेळ पण निघून गेली तरी पोराला काही न करता नुसतं बाकीच्यांना सांगत बसलेत. तुम्ही सांख्यिकी मध्ये परत गडबड केलीत. आपण पाठींबा किती लोंकांचा आहे याबद्दल बोलतोय. संघाला किती लोकांचा पाठींबा आहे ती संख्या असेल तर सांगा. बादवे, तुम्ही या हाताबाहेर गेलेल्या पोराची एवढी का बाजू घेता याचं बाकी आम्हाला भारी कुतूहल आहे.

In reply to by ट्रेड मार्क

कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास अपेक्षित आहे आणि कुणाकडून ते स्पष्ट करावे. सांख्यिकीचा खेळ तुम्हीच मांडायला नको होता. कारण मुळात तो मला कधीच आवडत नाही. सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसतं.

In reply to by तर्राट जोकर

हो का? सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसत, म्हणता? मग या धाग्यावर सर्वप्रथम तुम्हीच विदा का मागवलात तेही सांगा..

In reply to by श्रीरंग

साहेब, मनमानी पद्धतीने मांडलेल्या सांख्यकितून काहीच सिद्ध होत नसतं असे म्हणायचे आहे. विदा आणि सांख्यिकी ही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतर्फे असेल तर ती मान्य करण्यास हरकत नसावी. तिरपाग्डे लॉजिक लावून स्वतःच सोयिस्कर सांख्यिकी मांडणे ह्याला अर्थ नसतो.

In reply to by तर्राट जोकर

संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. >>>>>> परंतु संघाचीच विचारधारा असलेल्या भाजपच्या सदस्यांचा आकडा सांगाल का? आणि १२० कोटी जनतेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनतेने भाजपाला मतदान केले म्हणजे बघा ३० कोटी अल्पसंख्य सोडले तर ९० कोटीपैकी ६० कोटी हिंदूंची या विचारधारेला समर्थन आहे! शब्दांचे खेळ सोडा आता!

In reply to by DEADPOOL

मनाला येईल ते मान्य करायचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सत्य पाहायचे असेल तर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जालावर उपलब्ध आहे. १. तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांकांनी भाजपाला वोट केले नाही. हे तुम्ही सिद्ध करु शकाल काय? २. १२० कोटी जनता मतदान करत नाही. ८१.४५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी भाजपाला ३१ टक्के वोट मिळालेत. ३. भाजपाचा निवडणूकीचा जाहिरनामा देशाचा सर्वांगिण विकास ह्यावर आधारित होता. सबका साथ सबका विकास. असे स्लोगन होते. 'सबको लाथ सिर्फ हिंदूका विकास' असे नव्हते. ४. भाजपाला विजय मिळण्याचे कारण काँग्रेसचे भ्रष्टाचारी विश्वरुपदर्शन होते. त्यावर भाजपाने पुढे केलेला विकासाचा, प्रामाणीक सरकार देण्याचा मुद्दा होता. संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना नाही. बाकी तुम्ही ही सांख्यिकी मांडून जर असे म्हणत असाल का बहुसंख्य हिंदूंनी हिंदूराष्ट्र साठी भाजपाला मतदान केले तर भाजपाचा निवडणूक जाहिरनामा ही धुळफेक होती, खरा अजेंडा हिंदुराष्ट्र हाच आहे. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. इतक्या अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर स्वतःला सेक्यूलर म्हणणारे लोकं हल्ले करून स्वतःची असहीष्णुता दाखवतात असे वाटते. त्याव्यतिरीक्त संख्या ०.१८% और गरळ (पक्षी: शाब्दीक खोटारडे हल्ले/बदनामी) १८०%* ये बहौत नाइन्साफी है! खरे की नाही? ;) का स्युडोसेक्यूलर आवाज ०.१८% पुढे पण तोकडा पडतोय? * १८०% म्हणजे थोडक्यात ०.१८% च्या कितीतरी पट अधिक इतकेच म्हणण्याच्या दृष्टीने वापरलेला आकडा आहे.

In reply to by तर्राट जोकर

तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

In reply to by ट्रेड मार्क

दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?>>>>>> दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .

In reply to by गरिब चिमणा

तुम्हाला सांगायला आले होते का कि आम्ही कुराण मानीत नाही।बरं नाही तर नाही मग जिहाद हा शब्द कोठून घेतला आहे त्यांनी ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

दहशतवादी कुराण मानतात हा निष्कर्ष कशावरुन काढलात? जिहाद या शब्दाचा ते गैरवापर करतात,मुस्लिमाण्ना बदनाम करण्यासाठी.

In reply to by गरिब चिमणा

एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग? ही बदनामी कोण करत आहे? तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत? भारतीय उपखंडातील मुस्लिमांना( हे म्हणे कुराणा नुसार वागत नाही) आपले न म्हणणारे श्रीमंत अरबी मुस्लिम पैसा देतात त्यांना ।

In reply to by गरिब चिमणा

तुमचे तर्क आपण एक वेळ बरोबर मानू, कुरआन दहशतवाद शिकवत नाही. मग या जगभरच्या जिहादी कारवाईमागे कसले खुळ आहे हो? अमेरिका आमच्यात भांडणे लावुन देते म्हणतात. स्वताची अककल नावाची काही वस्तु आहे की नाही? बाकी इसिस वाले थोड़े डोके बाळगुन आहेत हो! आत्तापर्यन्त केलेल्या इन कॅमेरा हत्याकांडात त्यांनी एकाही ज्यूला मारले नाही आहे. यांना काय ज्यू मिळाला नाही? करून बघा म्हणाव, इस्राईली असे हात धुवून मुस्लिमाच्या पाठी लागतील की इसिसच्या पाठीराख्या देशानाच् त्यांचा म्हणजे इसिसचा खात्मा करावा लागेल.

In reply to by भंकस बाबा

इसिसला बढावा देऊन मध्यपुर्वेतले वातावरण अस्थीर ठेवायचे आहे अमेरीकेला.जसा लादेनचा भस्मासूर अमेरीकेने उभा केला ,नंतर तो त्यांच्यावरच उलटला तसेच आताही होत आहे.मध्यपुर्वेतल्या तेलाचे राजकारन आहे सगळे .यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही.

In reply to by गरिब चिमणा

@यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही. >> बिगरमुस्लिम म्हणजे काफिर आणि त्याचे मृत्यू पश्चात स्थान - नरकाग्नी. हे कुराणात (अल्लाहने) वारंवार स्पष्ट केले आहे. असे का आहे? हे कळले तरी कळतं दहशतवाद कशात आह?,आणि तो कुणी सांगितला.

In reply to by गरिब चिमणा

Quran (8:15) - "O ye who believe! When ye meet those who disbelieve in battle, turn not your backs to them. (16)Whoso on that day turneth his back to them, unless maneuvering for battle or intent to join a company, he truly hath incurred wrath from Allah, and his habitation will be hell, a hapless journey's end." Quran (9:73) - "O Prophet! strive hard against the unbelievers and the hypocrites and be unyielding to them; and their abode is hell, and evil is the destination." Dehumanizing those who reject Islam, by reminding Muslims that unbelievers are merely firewood for Hell, makes it easier to justify slaughter. It also explains why today's devout Muslims have little regard for those outside the faith. Quran (48:17) - "There is no blame for the blind, nor is there blame for the lame, nor is there blame for the sick (that they go not forth to war). And whoso obeyeth Allah and His messenger, He will make him enter Gardens underneath which rivers flow; and whoso turneth back, him will He punish with a painful doom." Contemporary apologists sometimes claim that Jihad means 'spiritual struggle.' Is so, then why are the blind, lame and sick exempted? This verse also says that those who do not fight will suffer torment in hell. word used for 'hard' or 'ruthless' in this verse shares the same root as the word translated as 'painful' or severe' to describe Hell in over 25 other verses including 65:10, 40:46 and 50:26..

In reply to by तर्राट जोकर

मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया, सुन्नी, अहमदी, बोहरी, यझदी इ. सुन्नींची संख्या अंदाजे ८०% आहे. यातल्या अहमदींना अमुस्लिम असे जाहीर केले गेले आहे. सुन्नी महंमद हाच शेवटचा प्रेषित मानतात तर शिया भविष्यात अजून एक प्रेषित येईल असे मानतात. महंमदाच्या मृत्युनंतर वारसदार कोण यातून वाद होऊन हे दोन पंथ निर्माण झाले व नंतर कर्बालामध्ये युद्ध होऊन महंमदाच्या मुलीचे पुत्र हसन व हुसेनला मारण्यात आले. त्याचे दु:ख म्हणून शिया मोहर्रम पाळून छाती बडवून शोक व्यक्त करतात. जगभरात ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे सुन्नी शियांचे हत्याकांड करतात (उदा. पाकिस्तान, इराक). अजून एक वेगळा कोन आहे. लादेनच्या हस्तकांनी ९० च्या दशकात टांझेनिया व केनयात बॉम्बस्फोट घडवून २१२ जणांचा मृत्यु घडवून आणला होता. त्यात फक्त १२ अमेरिकन होते व उर्वरीत स्थानिक मुस्लिम होते. लादेनने बॉम्बस्फोटानंतर आनंद व्यक्त केल्यावर त्याच्या मुलाने हे निदर्शनास आणून दिले की त्यातले बहुसंख्य मुस्लिम होते. त्यावर लादेनची ही प्रतिक्रिया होती की ते मरावे अशी अल्लाचीच इच्छा होती. त्यामुळे त्याचे दु:ख नाही. पण १२ अमेरिकन मारले गेल्याचा अत्यांनद झालेला आहे. अशी मानसिकता असणारे इतरांना मारतामारता त्यात मुस्लिम मेले तरी दु:ख करीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते. मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात. मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.