Skip to main content

(कूणास ठाऊक ?)

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 18/03/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

वाचने 17592
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

पेरनेवर दिलेलाच इथं लिहणार होतो पण आता कंटाळा आला. तुझ्याकडून एवढ्या सोज्वळ विडंबनाची अपेक्षा नव्हती मित्रा. पूर्वीचा टक्या राहिला नाही हेच खरे. सर्दी खाँसी ना मलेरिया हुआ ये गया यारो इसको जिलबीरिया हुआ ^=^

आणि इतका गुळमाट... काही तरी लोच्या आहे, बुवांना विचारावे लागेल (सध्या त्यांचा फोन दिवसा सुद्दा बंद असतो काय करावे ब्रे). वल्लींना साकडे घालणे आले. नित वाचक नाखु

In reply to by नाखु

सध्ध्या ते हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करत असतात....डिश्टर्ब णका क्रू त्येंला ;)

In reply to by स्पा

'Right to Ignore' वापरा. विडंबन धागा ओळखू येण्यासाठी कंस असतात, न उघडणे आपल्या हातात असते, सिंपल !

कुणास ठाऊक ? आहेर देण्यासाठी की फुकट जेवण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? गुलाबजाम चापण्यासाठी की मट्टा ढोसण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? गाठीभेटी घेण्यासाठी की पक्षी पाहण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? कार्यक्रम पार पाडण्यासाठी की नुसतेच हजेरीसाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही मंगलशोध (भव्यसंग्रह)

In reply to by अभ्या..

खिक्क...मला क्काय ** समजलास ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

कुणास ठाऊक ? प्रतिसाद देण्यासाठी की निव्वळ वाचण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? चर्चा करण्यासाठी की दंगा करण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? अनुभव घेण्यासाठी की कुरापत उकरायसाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? ब्लॉगचा निचरा काढण्यासाठी की नुसतेच जाहीरातीसाठी या मिपावर आलोय आम्ही

दंगलबोध (दिव्यसंग्रह)


कुणास ठाउक ? अध्यात्म मिरवण्यास की अं अहं जपण्यास या मिपावर आलोय आम्ही कुंणास ठाउक ? मोदीना बुकलण्यासाठी अन मोदी प्रेम उतू जाण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही

In reply to by अन्या दातार

नाईईईईईई! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-033.gif अज्जुन पडू द्या! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-033.gif नाखू(न) चौरा जिन्नदाबाद! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-033.gif