✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदीभक्त आम्ही...

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Wed, 03/16/2016 - 07:34
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।। डिजिटल इंडिया जोरात अन् स्वच्छ आमचा भारत झाला जगभरचे धनिक लागले मेक इन इंडिया सारे करायला मन की बात ऐकून तुमच्या प्रत्येकजण धन्य धन्य झाला "दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।

प्रतिक्रिया द्या
15288 वाचन

💬 प्रतिसाद (74)

हा हा हा! फ्रॉयिडिअन स्लिप!

अनुप ढेरे
Wed, 03/16/2016 - 14:32 नवीन
हा हा हा! फ्रॉयिडिअन स्लिप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

छान

गॅरी ट्रुमन
Wed, 03/16/2016 - 14:08 नवीन
कविता प्रचंड आवडली आहे. आणखी येऊ द्या.
  • Log in or register to post comments

(No subject)

अनुप ढेरे
Wed, 03/16/2016 - 14:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सॉरी, विसरलोच! ती तर तुमची

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 16:01 नवीन
सॉरी, विसरलोच! ती तर तुमची मक्तेदारी आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

तुम्ही औषधाचे डाक्टर का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/16/2016 - 22:30 नवीन
तुम्ही औषधाचे डाक्टर का डॉक्टरेट वाले डॉक्टर हो? दुसरे असाल तर आपल्या पी.एच.डी. च्या थेसिस वर अंमळ चर्चासत्र आयोजित करावं म्हणतो. रच्याकने
"दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?"
ह्याच्यामधे अल्पोत्पन्नी मध्यमवर्गीय ब्राह्मण, मराठा ई.ई. का नै ओ? शेतकर्‍यांचं अनुदान ज्या पैशातुन दिलं जातं ना त्या लाखो करदात्यांची होणारी कुतरओढ का नै ओ? तुमच्यासारखेचं अजुन एक मुटेसर म्हणुन आहेत. त्यांना हे प्रश्ण विचारुन किमान एक वर्ष तरी झालं असेल पण उत्तर नाही आलं अजुन. थांबा दुवा डकवतो. http://www.misalpav.com/user/8199/guestbook
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/17/2016 - 08:19 नवीन
ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर असतील,त्यांनी माझ्या कांजण्या संबंधी प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही

नाखु
गुरुवार, 03/17/2016 - 09:03 नवीन
दोघे दु दु आहात डोळ्यासमोर कांजण्या येणारे प्रश्न विचारताय. ते वैचारीक क्रांती का काय ती आणणार आहेत जरा थांबा ! उगा कुठे गडे असे प्रश्न विचारू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

उत्कृष्ट कविता! मिपावर आता

श्रीगुरुजी
Wed, 03/16/2016 - 15:02 नवीन
उत्कृष्ट कविता! मिपावर आता महाकवी व शीघ्रकवी ए. आर. दास यांची उणीव भासणार नाही. अगर तुम और लिखोगे ऐसी कविताएं, तुम्हे मिलेगी हजारो बबिताएं! - महाकवी व शीघ्रकवी ए. आर. दास
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 15:41 नवीन
१. कुणाला आपली कविता आवडली नसेल वा कुणी त्यास नावे ठेवित असेल तर माणसाने चिडू नये, ही आम्हास झालेली पश्चातबुद्धी. प्रत्येकजण वेगळा असतो, आवड़निवड वेगवेगळी असू शकते. २. राहुल गांधींवर मी कविता केली होती. मिपावर राजकीय कविता टाकण्याची सुरुवात त्या कवितेनेच केली होती (मोजून २च टाकल्यात). ३. अशा कविता बऱ्याचदा प्रासंगिक असतात. मी ठाकरे बंधू, शरद पवार इ. वर केलेल्या कवितांमधील संदर्भ त्यावेळचे असल्याने त्या मिपावर टाकल्या नाहीत. ४. जो सत्तेवर असतो त्याच्यावरच जास्त टीका होणे साहजिक आहे. ५. मोदींवर वैयक्तिक टीकाटिपण्णी मी कधीही केलेली नाही. "योजना" चा रोख आणि या कवितेचा निशाना मोदी नाहीत. ६. "योजना" आणि ही कविता यांचा रचनाकाल एकच आहे. एकत्र टाकू नये म्हणून ही नंतर अपलोड केली. फेसबुक वर उलट्या क्रमाने टाकल्या. ७. कवीतेची साहित्यिकदृष्टया चीरफाड़ झाली तरी बरे. निदान काय इम्प्रूवमेंट करावी हे तरी कळेल. ८. कृपया राग नसावा.
  • Log in or register to post comments

'योजना'

निशांत_खाडे
Wed, 03/16/2016 - 16:23 नवीन
"योजना" या तुमच्या काव्यरत्नाचा दुवा देता का जरा? बाकी ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यावर केलेल्या कविता मिपावर न टाकल्याबद्दल जाहीर आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

उन्हाळ्यात कांजण्या होतात कि

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/16/2016 - 16:41 नवीन
उन्हाळ्यात कांजण्या होतात कि नाही हो?
  • Log in or register to post comments

Don't waste your time with

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 17:05 नवीन
Don't waste your time with explanations, people only hear what they want to hear. - Paulo Coelho
  • Log in or register to post comments

हे तुम्ही स्वतःला शिकवताय कि आम्हाला?

निशांत_खाडे
Wed, 03/16/2016 - 17:50 नवीन
हे तुम्ही स्वतःला शिकवताय कि आम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

Don't waste your time with

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 17:11 नवीन
Don't waste your time with explanations, people only hear what they want to hear. - Paulo Coelho
  • Log in or register to post comments

Hatred is ...

मूकवाचक
Wed, 03/16/2016 - 17:55 नवीन
Hatred is the sign of a secret attraction that is eager to flee from itself and furious to deny its own existence. That too is God's play in His creature. - Sri Aurobindo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

Welcome to the wonderful

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 18:10 नवीन
Welcome to the wonderful world of jealousy, he thought. For the price of admission, you get a splitting headache, a nearly irresistable urge to commit murder, and an inferiority complex. Yippee. -J. R. Ward
  • Log in or register to post comments

Are you serious?

काळा पहाड
Wed, 03/16/2016 - 18:21 नवीन
Are you serious? Are you serious? Are you serious? Are you serious? - Robert Vadra
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

मोदीभक्त आम्ही

उगा काहितरीच
Wed, 03/16/2016 - 21:13 नवीन
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।। डिजिटल इंडिया जोरात अन् स्वच्छ आमचा भारत झाला जगभरचे धनिक लागले मेक इन इंडिया सारे करायला मन की बात ऐकून तुमच्या प्रत्येकजण धन्य धन्य झाला
एवढी कविता आवडली.
  • Log in or register to post comments

च्या मारी

इरसाल
Wed, 03/16/2016 - 21:50 नवीन
लोकाच काय बी एेकु नगा, लोक तुमाले तेच ऎकवित्या जे तुमाला ऎक्याचे नसतं. - देव पावलो
  • Log in or register to post comments

कवितेचा आशय काहीही असो, कविता

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/17/2016 - 04:43 नवीन
कवितेचा आशय काहीही असो, कविता वृत्तात भारी मार खातेय. कुठलीतरी एक कविता डोळ्यासमोर ठेवा आणि त्या ठेक्यात बसवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या कडव्याचं काही झेपलं नाही, पण दुसऱ्या कडव्याच्या सुरूवातीला थोडी चांगली लय आहे. परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर याला विंदांच्या सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते या कवितेची लय आहे (त्यातला आता शब्द काढून टाकला तर) माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते हे कडवं आपल्या त्या ठेक्यात बसवता येतं का बघू. परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता पूर कारखान्यांतून निघू लागे सुवर्णाचा पुन्हा धूर देशाचाच साऱ्या आता बदलत चालला पुरता नूर सुखाची तर परमावधी अच्छे दिन आले अहा! नमो नमः, नमो नमः।।२।। आता निदान ही रेलगाडी, रेलगाडी सारख्या ठेक्यात म्हणता येते आणि अर्थ आवडो न आवडो, कविता गुणगुणावीशी वाटते. मला वाटतं इतकाही प्रयत्न न करता नुसतंच थोडंसं यमक जुळवून ओळी लिहिणं फारच अपरिपक्व वाटतं. इतर कडव्यांचंही असं काही जमलं तर पहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर! इथून पुढे नक्की

डॉ. एस. पी. दोरुगडे
गुरुवार, 03/17/2016 - 07:38 नवीन
धन्यवाद सर! इथून पुढे नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

मस्त कवीता

अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 08:28 नवीन
पण 'मोकलाया'ची सर नाहि :)
  • Log in or register to post comments

सुधीर

रामदास
गुरुवार, 03/17/2016 - 09:21 नवीन
येऊ द्या आणखी कविता.इथे कवितांचे वावडे नाही. फक्त एक सूचना. इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते. ते तसे आहे असे समजून प्रतिसाद देउ नका.दोन हात आडवे -उभे हे तर ऑन्लाइन मिडीयाचे उत्तम लक्षण आहे. स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

खरंच?

डॉ. एस. पी. दोरुगडे
Fri, 03/18/2016 - 07:10 नवीन
>>इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते. खरंच? धाग्यावरील प्रतिसाद नीट वाचा. गैरसमज दूर होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा