✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदीभक्त आम्ही...

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Wed, 03/16/2016 - 07:34
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।। डिजिटल इंडिया जोरात अन् स्वच्छ आमचा भारत झाला जगभरचे धनिक लागले मेक इन इंडिया सारे करायला मन की बात ऐकून तुमच्या प्रत्येकजण धन्य धन्य झाला "दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।

प्रतिक्रिया द्या
15288 वाचन

💬 प्रतिसाद (74)

आदरणीय राहुलजी गांधीजी

प्रचेतस
Wed, 03/16/2016 - 07:36 नवीन
आदरणीय राहुलजी गांधीजी ह्यांचेवरही अशीच गोग्गोड कविता करा ब्वा.
  • Log in or register to post comments

डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 08:15 नवीन
डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे कवितेचे???
  • Log in or register to post comments

वृत्त की वृत्ती?

प्राची अश्विनी
Wed, 03/16/2016 - 08:41 नवीन
वृत्त की वृत्ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 08:54 नवीन
वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती लक्षात आलीच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी

काळा पहाड
Wed, 03/16/2016 - 17:12 नवीन
दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी वृत्त म्हणतात त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मुक्त

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 08:54 नवीन
मुक्त
  • Log in or register to post comments

मुक्त.

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 08:55 नवीन
मुक्त. वृत्त आणि वृत्ती दोन्ही.
  • Log in or register to post comments

मुक्त छंद असतो का वृत्त??

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 09:03 नवीन
मुक्त छंद असतो का वृत्त?? (मला माहीती नाही, ऐकिवात आहे की छंद असतोय), अन हो वृत्ती अतिमुक्त उर्फ़ स्वैर दिसते आहेच! सकाळ सकाळ मोदींच्या नावं शिमगा :D
  • Log in or register to post comments

मस्त मस्त

नाखु
Wed, 03/16/2016 - 09:26 नवीन
चान चान "उठे सुटे,टंकती प्रसिद्धीसाठी नेमाने कुठे! " कोणी काही म्हणा पण एकमेव ज्ञानभांडार दार उघडे आपल्या साहित्यप्रतिभेचा सूर्य असाच तळपत रहावो एक दिवस वांती क्रांती जरूर येईल. अखिल दोरुगडे,कुटे,कात्रे ज्ञानसागर समुद्रम्थन मौक्तीक अभिलाषी बापुडवाणा मिपाकर महासंघ आणि शहरी मिपाकर वाचक चळ्वळ
  • Log in or register to post comments

चुकून नेमाडे वाचलं राव :P

sagarpdy
Wed, 03/16/2016 - 09:29 नवीन
चुकून नेमाडे वाचलं राव :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

क्रांति कुठली येतेय राव!

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:35 नवीन
क्रांति कुठली येतेय राव! कंटाळून हल्ली लोक मुलींची नावे क्रांती ठेवू लागलेत! वांती तुम्ही आताच टंकली ना! आणि कसली डों**ची प्रसिद्धि! ती तुम्हालाच लखलाभ असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आपली येक रिक्वेष्ट

चौकटराजा
Wed, 03/16/2016 - 09:27 नवीन
१९९१ नंतर मनमोहन सिंग यानी मुक्त अर्थ व्यवस्था आणली त्यातून अनेक चांगल्या गोष्टी झाल्या अनेक अनर्थ ही. कोळसा, कॉमनवेल्थ टू जी ,लोकपाल गोन्धळ व मुख्य म्हणजे महागाई, चलनवाढ ,कॉन्ग्रेस या समावेशक पक्षाचे पतन . ई चा ही आढावा घेणारी एखादी कविता येउ द्या. आपली ही कविता मस्त जमली आहे म्हणून म्हणतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:38 नवीन
तशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आवर्जुन करा... फक्त वरून तशी

मोदक
Wed, 03/16/2016 - 12:07 नवीन
आवर्जुन करा... फक्त वरून तशी कविता प्रसिद्ध करायचा आदेश आहे का ते बघा. उगाच हिशोबात घोळ व्हायचा आणि पुन्हा दोष मोदींना जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

एक कविता काय पाडली तर लगेच

बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 16:35 नवीन
एक कविता काय पाडली तर लगेच हायकमांड वगैरे? =)) मज्जाच आहे एकूण. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मुक्त छंदच असतो. वृत्त आणि

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:07 नवीन
मुक्त छंदच असतो. वृत्त आणि वृत्तिबद्दलच्या प्रश्नांस एकत्रित उत्तर द्यावे म्हणून तसे म्हटले.
  • Log in or register to post comments

पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 10:09 नवीन
पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत राहतो न सर, कविता कुठल्या वृत्तात बसवली आहे म्हणे मी?
  • Log in or register to post comments

"छंद = वृत्त" हि माझी समजूत

sagarpdy
Wed, 03/16/2016 - 10:26 नवीन
"छंद = वृत्त" हि माझी समजूत आहे सामान्यतः वृत्त म्हणजे अक्षरगणवृत्त असे आपण समजतो पण याखेरीज मात्रा वृत्त हि असतात (नियमबद्ध पद्याप्रकारांमध्ये). मुक्तछंद (वृत्त) म्हणजे नियमबद्ध पद्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

सकाळी सकाळी पोट साफ झालं का?

अनुप ढेरे
Wed, 03/16/2016 - 10:13 नवीन
सकाळी सकाळी पोट साफ झालं का? छान!
  • Log in or register to post comments

हो, तुम्हाला मात्र पोटदुखी

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:17 नवीन
हो, तुम्हाला मात्र पोटदुखी सुरु झालीय वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मोदी पंतप्रधान झाले नसते

बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 10:16 नवीन
तर डाॅ.दोरुगड्यांनी असल्या भिकार कविता कोणावर केल्या असत्या यावर एक सदाहरित धागा काढावा!
  • Log in or register to post comments

बा डी स

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 10:22 नवीन
मोदी सरकार किंवा त्यांच्या निती अन निर्णयांवर मीही टिका करतो, किंबहुना माझ्यावर फुरोगामी शिक्का बसावा इतकी टिका करतो पण "चला बुआ एक भिकार कविता करू" म्हणून कधीही करत नाही ह्याचा मला सार्थ अभिमान आहे :D, "कवितेत" मांडलेल्या "मुद्द्यांवर" लैच जास्त दळणे दळून झाली आहेत! टिका करायची तर ती डोळस करा की राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नानासाहेब,

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:46 नवीन
नानासाहेब, उगाच का चिडता? मी कुठे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतोय? तुम्ही लिहीता त्यावर मी कधी टीका केलिय का? मी अभिव्यक्त होताना कविता, हलके फुलके लेख यांद्वारे अभिव्यक्त होतो. विद्वान मी नाहिए. तसा आव ही आणत नाही. तुमच्यासारखा. हा, जर तसं काही सुचलं तर निश्चितच मिपावर टंकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मोदी पंतप्रधान होण्याआधीही

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:27 नवीन
मोदी पंतप्रधान होण्याआधीही कविता करितच होतो. कांग्रेसवाले पिसाळुंन चावायला येत नव्हते. आणि मोदी आल्यापासूनच तर तुमच्यासारख्या भिकार माणसाना बोलायला जास्त चेव आलाय. (इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अजुन लिहिले असते पण तुम्हाला

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 10:41 नवीन
अजुन लिहिले असते पण तुम्हाला ह्या कुस्तीत आनंद येतोय अशी पुसट शंका येतेय, तो आनंद मी तुम्हाला मिळवून देऊ इच्छित नाही. (समजणारे समजतीलच) म्हणुन असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

भिकार कवितेला म्हटलंय

बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 11:04 नवीन
तुम्हाला म्हटलं नव्हतं. पण ते उगाच स्वतःवर घेऊन आणि प्रतिसाद देणाऱ्यांवर जळफळून तुम्ही तुमचं आतापर्यंतचं शिक्षण फुकट घालवलंत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

बोका तुमच्या कवितेला भिकार

शलभ
Wed, 03/16/2016 - 11:13 नवीन
बोका तुमच्या कवितेला भिकार म्हणाले तुम्हाला नाही. तुम्ही असे बोलून स्वतःची लायकी दाखवताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. एस. पी. दोरुगडे

टुकार.

नाव आडनाव
Wed, 03/16/2016 - 10:25 नवीन
टुकार.
  • Log in or register to post comments

हे तुमचे खरे नाव का?

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:36 नवीन
हे तुमचे खरे नाव का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

ती स्टेज पेटायची कविता तुमचीच

sagarpdy
Wed, 03/16/2016 - 10:40 नवीन
ती स्टेज पेटायची कविता तुमचीच काय ओ ?
  • Log in or register to post comments

छे!

डॉ. एस. पी. दोरुगडे
Wed, 03/16/2016 - 10:48 नवीन
पेटवा पेटवी ची भाषा मी कधी केलिय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

मोदीसाहेब

तिमा
Wed, 03/16/2016 - 10:56 नवीन
मोदीसाहेब तुम्हारा चुक्याच ! कशाला हो अच्छे दिनांचा वायदा केला ? तो करण्यापूर्वी, इथे बसलेल्या निरगांठी किती पक्क्या आहेत, याचा विचार करायचा होता. आता प्रत्येकाला घाईची लागलीये आणि निरगांठी सुटत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

काटा रूते कुणाला,आक्रंदतात

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 03/16/2016 - 10:58 नवीन
काटा रूते कुणाला,आक्रंदतात कोणी? मज फुलही रूतावे,हा दैवयोग आहे.... घेई छंद भकरंद,
  • Log in or register to post comments

दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 03/16/2016 - 11:03 नवीन
दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।
ख्वा ख्वा ख्वा..... दोरूगडे साहेंबाना कोणीतरी जागे करा प्लीज, झोपेत बडबडतायत बहुतेक.
  • Log in or register to post comments

राहूल गांधी वरची कविता मिटके

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 11:05 नवीन
राहूल गांधी वरची कविता मिटके मारत वेंजॉय करणार्‍यांना ही कविता खड्यासारखी खटकेल . थोडा तो स्पोर्टींग स्पिरिट दिखाना मंगता. ;-)
  • Log in or register to post comments

राहुल गांधींवर कविता

बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 11:10 नवीन
कुणी केलीय? मी त्या कवितेलाही भिकार म्हणेन, जर भिकार असली तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आता यात काय नवीन आहे दादा?

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 03/16/2016 - 11:12 नवीन
आता यात काय नवीन आहे दादा? इकडचे तिकडल्यावंर मिटके मारतात, तिकडचे इकडल्यांवर मिटके मारतात, आणि इथे इकडचे जास्त आहेत त्यात काय नवीन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे हे. थोडा खुलासा करतो.

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 11:24 नवीन
हे हे. थोडा खुलासा करतो. नेहमीसाठी लक्षात असु द्या. काय की धुळवडीत चेहरे ओळकू येत नाहीत म्हणून. आम्ही राहूलभक्त, सोनियाभक्त, कॉंग्रेसभक्त नाही. मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

अगदी मीही तसाच :O:O

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 03/16/2016 - 11:36 नवीन
अगदी मीही तसाच :O:O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 12:20 नवीन
मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत. काय सिक्सर मारलाय देवा!!!

*चाय से केटली गरम

असले की ते विचित्र वाटते असे म्हणु का? *ही एक हिंदीभाषी म्हण आहे तरीही कृपया ह्याचा संबंध मोदींशी जोडू नये ही नम्र इणंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

खीक्क

चेक आणि मेट
Wed, 03/16/2016 - 14:49 नवीन
हे म्हणजे स्वतःची आरती स्वतःच ओवाळून घ्यायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुम्हाला स्वतःबद्दल अन

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 14:54 नवीन
तुम्हाला स्वतःबद्दल अन इतरांबद्दल बरेच गैरसमज आहेत जे तुम्ही लवकरात लवकर क्लियर करा! अशी विनंती करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

टुकार , पांचट , इतर समानार्थी

अद्द्या
Wed, 03/16/2016 - 11:32 नवीन
टुकार , पांचट , इतर समानार्थी शब्द लाऊन घ्या सगळे यमकात बसणारे , तसं हि यमक जुळवण्या शिवाय दुसरं काही नाहीच यात
  • Log in or register to post comments

थोडी भर टाकतो.

गामा पैलवान
Wed, 03/16/2016 - 13:39 नवीन
डॉक्टर एस पी दोरुगडे, तुमची कविता थोडी वाढवतोय. गोड मानून घेणे. वंचितांच्या आडोश्याने देशद्रोह्यांची कारस्थाने चालती सुखेनैव त्यांस बसला नमोंचा फांस म्हणून सगळी मळमळ काढायची झाली घाई पण बिचकल्या मुखी शब्दच फुटंत नाही आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

नमस्कार, दोरुगडे साहेब.

निशांत_खाडे
Wed, 03/16/2016 - 13:43 नवीन
नमस्कार, दोरुगडे साहेब. तुमच्या या धाग्यावर आपली बाचाबाची सुरु असताना, तर्राट जोकर यांनी मध्यस्थी केली आणि तो विषय थेट मोदी भक्त-विरोधक येथे जाऊन पोहचला, आणि या धाग्यावरही तेच चालू आहे. अहो मोदी-अमोदी चा विषयच नाही. विषय आहे या पचगळ कवितेचा. तुम्ही केलेली हि बाळबोध "कविता" एकदम फालतू आणि बेसलेस आहे. मान्य करा दोरुगडे साहेब, तुम्हाला कविता करताच येत नाही (जजमेंटल म्हणा हवे तर), वरून प्रत्येक वेळी तुम्हाला यमक जुळवून मोदीवर टीका करायची असते. एका चारोळी साठी धागा काढणारे तुम्ही, हे सगळे निव्वळ टीआरपी साठी करताय हे सगळ्यांना माहिती आहे. एकतर तुम्ही स्वतः एक नंबरचे मूर्ख आहात किंवा इतर लोक मूर्ख आहेत असे समजताय. (इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.) रच्याकने, तुमच्याकरता एक अत्यंत उपयुक्त दुवा देतोय, व्यवस्थित वाचून घ्या. काही अडचणी आल्यास, यांचेशी संपर्क साधा. https://en.wikipedia.org/wiki/Dunning–Kruger_effect
  • Log in or register to post comments

आवडली.

अत्रे
Wed, 03/16/2016 - 13:46 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली कविता ,मस्त झालिए

गरिब चिमणा
Wed, 03/16/2016 - 13:55 नवीन
आवडली कविता ,मस्त झालिए भक्त इथे थयथयाटाशिवाय काही करणार नाहीत.
  • Log in or register to post comments

सर्वात मोठ्या मोदीभक्त.

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 13:59 नवीन
  • Log in or register to post comments

सर्वात मोठ्या मोदीभक्त.

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 14:00 नवीन
  • Log in or register to post comments

Posted by Unofficial:

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 14:00 नवीन
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Wednesday, March 16, 2016
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा