Skip to main content

मोदीभक्त आम्ही...

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी बुधवार, 16/03/2016 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।। डिजिटल इंडिया जोरात अन् स्वच्छ आमचा भारत झाला जगभरचे धनिक लागले मेक इन इंडिया सारे करायला मन की बात ऐकून तुमच्या प्रत्येकजण धन्य धन्य झाला "दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 15350
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

येऊ द्या आणखी कविता.इथे कवितांचे वावडे नाही. फक्त एक सूचना. इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते. ते तसे आहे असे समजून प्रतिसाद देउ नका.दोन हात आडवे -उभे हे तर ऑन्लाइन मिडीयाचे उत्तम लक्षण आहे. स्वागत आहे.

In reply to by रामदास

>>इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते. खरंच? धाग्यावरील प्रतिसाद नीट वाचा. गैरसमज दूर होईल!