मोदीभक्त आम्ही
रात्रंदिन जपतो
नमो नमः ।।धृ।।
तुमचे दौरे तुमच्या भेटी
तुम्ही जोडलेली जगभरची नाती
शिंझो अबे तुमचा मित्र
बराक तुमचा जणू शाळूसोबती
फेसबुक अन गूगलवाले
जीव भारी त्यांचा तुमच्यावरती
मिडियाच कशाला इथला
जग सारे गुणगान गाते पहा ।।१।।
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
कारखान्यांमधून पुन्हा
निघू लागला सोन्याच्या धूर
साऱ्या देशाचा आता
बदलत चालला पुरता नूर
झाली सुखाची परमावधी
अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।।
डिजिटल इंडिया जोरात
अन् स्वच्छ आमचा भारत झाला
जगभरचे धनिक लागले
मेक इन इंडिया सारे करायला
मन की बात ऐकून तुमच्या
प्रत्येकजण धन्य धन्य झाला
"दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?"
हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।
काव्यरस
वाचने
15495
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदरणीय राहुलजी गांधीजी
आदरणीय राहुलजी गांधीजी ह्यांचेवरही अशीच गोग्गोड कविता करा ब्वा.
डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे
डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे कवितेचे???
वृत्त की वृत्ती?
In reply to डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे by नाना स्कॉच
वृत्त की वृत्ती?
वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती
In reply to वृत्त की वृत्ती? by प्राची अश्विनी
वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती लक्षात आलीच!!
दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी
In reply to वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती by नाना स्कॉच
दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी वृत्त म्हणतात त्याला.
मुक्त
मुक्त
मुक्त.
मुक्त.
वृत्त आणि वृत्ती दोन्ही.
मुक्त छंद असतो का वृत्त??
मुक्त छंद असतो का वृत्त?? (मला माहीती नाही, ऐकिवात आहे की छंद असतोय), अन हो वृत्ती अतिमुक्त उर्फ़ स्वैर दिसते आहेच! सकाळ सकाळ मोदींच्या नावं शिमगा :D
मस्त मस्त
चान चान
"उठे सुटे,टंकती प्रसिद्धीसाठी नेमाने कुठे! "
कोणी काही म्हणा पण एकमेव ज्ञानभांडार दार उघडे
आपल्या साहित्यप्रतिभेचा सूर्य असाच तळपत रहावो एक दिवस
वांतीक्रांती जरूर येईल.अखिल दोरुगडे,कुटे,कात्रे ज्ञानसागर समुद्रम्थन मौक्तीक अभिलाषी बापुडवाणा मिपाकर महासंघ आणि शहरी मिपाकर वाचक चळ्वळ
चुकून नेमाडे वाचलं राव :P
In reply to मस्त मस्त by नाखु
चुकून नेमाडे वाचलं राव :P
क्रांति कुठली येतेय राव!
In reply to मस्त मस्त by नाखु
क्रांति कुठली येतेय राव! कंटाळून हल्ली लोक मुलींची नावे क्रांती ठेवू लागलेत! वांती तुम्ही आताच टंकली ना!
आणि कसली डों**ची प्रसिद्धि! ती तुम्हालाच लखलाभ असो!
आपली येक रिक्वेष्ट
१९९१ नंतर मनमोहन सिंग यानी मुक्त अर्थ व्यवस्था आणली त्यातून अनेक चांगल्या गोष्टी झाल्या अनेक अनर्थ ही. कोळसा,
कॉमनवेल्थ टू जी ,लोकपाल गोन्धळ व मुख्य म्हणजे महागाई, चलनवाढ ,कॉन्ग्रेस या समावेशक पक्षाचे पतन . ई चा ही आढावा घेणारी एखादी कविता येउ द्या.
आपली ही कविता मस्त जमली आहे म्हणून म्हणतो.
धन्यवाद!
In reply to आपली येक रिक्वेष्ट by चौकटराजा
तशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो.
आवर्जुन करा... फक्त वरून तशी
In reply to धन्यवाद! by डॉ. एस. पी. दोरुगडे
आवर्जुन करा... फक्त वरून तशी कविता प्रसिद्ध करायचा आदेश आहे का ते बघा. उगाच हिशोबात घोळ व्हायचा आणि पुन्हा दोष मोदींना जायचा.
एक कविता काय पाडली तर लगेच
In reply to आवर्जुन करा... फक्त वरून तशी by मोदक
एक कविता काय पाडली तर लगेच हायकमांड वगैरे? =)) मज्जाच आहे एकूण. =))
मुक्त छंदच असतो. वृत्त आणि
मुक्त छंदच असतो. वृत्त आणि वृत्तिबद्दलच्या प्रश्नांस एकत्रित उत्तर द्यावे म्हणून तसे म्हटले.
पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत
पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत राहतो न सर, कविता कुठल्या वृत्तात बसवली आहे म्हणे मी?
"छंद = वृत्त" हि माझी समजूत
In reply to पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत by नाना स्कॉच
"छंद = वृत्त" हि माझी समजूत आहे
सामान्यतः वृत्त म्हणजे अक्षरगणवृत्त असे आपण समजतो पण याखेरीज मात्रा वृत्त हि असतात (नियमबद्ध पद्याप्रकारांमध्ये). मुक्तछंद (वृत्त) म्हणजे नियमबद्ध पद्य नाही.
सकाळी सकाळी पोट साफ झालं का?
सकाळी सकाळी पोट साफ झालं का? छान!
हो, तुम्हाला मात्र पोटदुखी
In reply to सकाळी सकाळी पोट साफ झालं का? by अनुप ढेरे
हो, तुम्हाला मात्र पोटदुखी सुरु झालीय वाटतं!
मोदी पंतप्रधान झाले नसते
तर डाॅ.दोरुगड्यांनी असल्या भिकार कविता कोणावर केल्या असत्या यावर एक सदाहरित धागा काढावा!
बा डी स
In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम
मोदी सरकार किंवा त्यांच्या निती अन निर्णयांवर मीही टिका करतो, किंबहुना माझ्यावर फुरोगामी शिक्का बसावा इतकी टिका करतो पण "चला बुआ एक भिकार कविता करू" म्हणून कधीही करत नाही ह्याचा मला सार्थ अभिमान आहे :D, "कवितेत" मांडलेल्या "मुद्द्यांवर" लैच जास्त दळणे दळून झाली आहेत! टिका करायची तर ती डोळस करा की राव !
नानासाहेब,
In reply to बा डी स by नाना स्कॉच
नानासाहेब,
उगाच का चिडता? मी कुठे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतोय? तुम्ही लिहीता त्यावर मी कधी टीका केलिय का? मी अभिव्यक्त होताना कविता, हलके फुलके लेख यांद्वारे अभिव्यक्त होतो. विद्वान मी नाहिए. तसा आव ही आणत नाही. तुमच्यासारखा. हा, जर तसं काही सुचलं तर निश्चितच मिपावर टंकेन.
मोदी पंतप्रधान होण्याआधीही
In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम
मोदी पंतप्रधान होण्याआधीही कविता करितच होतो. कांग्रेसवाले पिसाळुंन चावायला येत नव्हते. आणि मोदी आल्यापासूनच तर तुमच्यासारख्या भिकार माणसाना बोलायला जास्त चेव आलाय.
(इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.)
अजुन लिहिले असते पण तुम्हाला
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
अजुन लिहिले असते पण तुम्हाला ह्या कुस्तीत आनंद येतोय अशी पुसट शंका येतेय, तो आनंद मी तुम्हाला मिळवून देऊ इच्छित नाही.
(समजणारे समजतीलच)
म्हणुन
असोच.
भिकार कवितेला म्हटलंय
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
तुम्हाला म्हटलं नव्हतं. पण ते उगाच स्वतःवर घेऊन आणि प्रतिसाद देणाऱ्यांवर जळफळून तुम्ही तुमचं आतापर्यंतचं शिक्षण फुकट घालवलंत. असो.
बोका तुमच्या कवितेला भिकार
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
बोका तुमच्या कवितेला भिकार म्हणाले तुम्हाला नाही. तुम्ही असे बोलून स्वतःची लायकी दाखवताय.
टुकार.
टुकार.
हे तुमचे खरे नाव का?
In reply to टुकार. by नाव आडनाव
हे तुमचे खरे नाव का?
ती स्टेज पेटायची कविता तुमचीच
ती स्टेज पेटायची कविता तुमचीच काय ओ ?
छे!
In reply to ती स्टेज पेटायची कविता तुमचीच by sagarpdy
पेटवा पेटवी ची भाषा मी कधी केलिय का?
मोदीसाहेब
मोदीसाहेब तुम्हारा चुक्याच ! कशाला हो अच्छे दिनांचा वायदा केला ? तो करण्यापूर्वी, इथे बसलेल्या निरगांठी किती पक्क्या आहेत, याचा विचार करायचा होता. आता प्रत्येकाला घाईची लागलीये आणि निरगांठी सुटत नाहीयेत.
काटा रूते कुणाला,आक्रंदतात
काटा रूते कुणाला,आक्रंदतात कोणी?
मज फुलही रूतावे,हा दैवयोग आहे....
घेई छंद भकरंद,
दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे
ख्वा ख्वा ख्वा.....
दोरूगडे साहेंबाना कोणीतरी जागे करा प्लीज,
झोपेत बडबडतायत बहुतेक.
राहूल गांधी वरची कविता मिटके
राहूल गांधी वरची कविता मिटके मारत वेंजॉय करणार्यांना ही कविता खड्यासारखी खटकेल . थोडा तो स्पोर्टींग स्पिरिट दिखाना मंगता. ;-)
राहुल गांधींवर कविता
In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर
कुणी केलीय? मी त्या कवितेलाही भिकार म्हणेन, जर भिकार असली तर.
आता यात काय नवीन आहे दादा?
In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर
आता यात काय नवीन आहे दादा?
इकडचे तिकडल्यावंर मिटके मारतात,
तिकडचे इकडल्यांवर मिटके मारतात,
आणि इथे इकडचे जास्त आहेत त्यात काय नवीन?
हे हे. थोडा खुलासा करतो.
In reply to आता यात काय नवीन आहे दादा? by खालीमुंडी पाताळधुंडी
हे हे. थोडा खुलासा करतो. नेहमीसाठी लक्षात असु द्या. काय की धुळवडीत चेहरे ओळकू येत नाहीत म्हणून. आम्ही राहूलभक्त, सोनियाभक्त, कॉंग्रेसभक्त नाही. मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत.
अगदी मीही तसाच :O:O
In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर
अगदी मीही तसाच
:O:O
मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त
In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर
मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत.
काय सिक्सर मारलाय देवा!!!
*चाय से केटली गरम
असले की ते विचित्र वाटते असे म्हणु का?
*ही एक हिंदीभाषी म्हण आहे तरीही कृपया ह्याचा संबंध मोदींशी जोडू नये ही नम्र इणंती
खीक्क
In reply to मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त by नाना स्कॉच
हे म्हणजे स्वतःची आरती स्वतःच ओवाळून घ्यायची.
तुम्हाला स्वतःबद्दल अन
In reply to खीक्क by चेक आणि मेट
तुम्हाला स्वतःबद्दल अन इतरांबद्दल बरेच गैरसमज आहेत जे तुम्ही लवकरात लवकर क्लियर करा! अशी विनंती करतो
टुकार , पांचट , इतर समानार्थी
टुकार , पांचट , इतर समानार्थी शब्द लाऊन घ्या सगळे यमकात बसणारे ,
तसं हि यमक जुळवण्या शिवाय दुसरं काही नाहीच यात
थोडी भर टाकतो.
डॉक्टर एस पी दोरुगडे,
तुमची कविता थोडी वाढवतोय. गोड मानून घेणे.
वंचितांच्या आडोश्याने
देशद्रोह्यांची कारस्थाने
चालती सुखेनैव त्यांस
बसला नमोंचा फांस
म्हणून सगळी मळमळ
काढायची झाली घाई
पण बिचकल्या मुखी
शब्दच फुटंत नाही
आ.न.,
-गा.पै.
नमस्कार, दोरुगडे साहेब.
नमस्कार, दोरुगडे साहेब.
तुमच्या या धाग्यावर आपली बाचाबाची सुरु असताना, तर्राट जोकर यांनी मध्यस्थी केली आणि तो विषय थेट मोदी भक्त-विरोधक येथे जाऊन पोहचला, आणि या धाग्यावरही तेच चालू आहे. अहो मोदी-अमोदी चा विषयच नाही. विषय आहे या पचगळ कवितेचा.
तुम्ही केलेली हि बाळबोध "कविता" एकदम फालतू आणि बेसलेस आहे. मान्य करा दोरुगडे साहेब, तुम्हाला कविता करताच येत नाही (जजमेंटल म्हणा हवे तर), वरून प्रत्येक वेळी तुम्हाला यमक जुळवून मोदीवर टीका करायची असते. एका चारोळी साठी धागा काढणारे तुम्ही, हे सगळे निव्वळ टीआरपी साठी करताय हे सगळ्यांना माहिती आहे. एकतर तुम्ही स्वतः एक नंबरचे मूर्ख आहात किंवा इतर लोक मूर्ख आहेत असे समजताय.
(इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.)
रच्याकने, तुमच्याकरता एक अत्यंत उपयुक्त दुवा देतोय, व्यवस्थित वाचून घ्या. काही अडचणी आल्यास, यांचेशी संपर्क साधा.
https://en.wikipedia.org/wiki/Dunning–Kruger_effect
आवडली.
आवडली.
आवडली कविता ,मस्त झालिए
आवडली कविता ,मस्त झालिए
भक्त इथे थयथयाटाशिवाय काही करणार नाहीत.
सर्वात मोठ्या मोदीभक्त.
सर्वात मोठ्या मोदीभक्त.
Posted by Unofficial:
हा हा हा! फ्रॉयिडिअन स्लिप!
In reply to Posted by Unofficial: by तर्राट जोकर
हा हा हा! फ्रॉयिडिअन स्लिप!
छान
कविता प्रचंड आवडली आहे. आणखी येऊ द्या.
(No subject)
सॉरी, विसरलोच! ती तर तुमची
In reply to (No subject) by अनुप ढेरे
सॉरी, विसरलोच! ती तर तुमची मक्तेदारी आहे ना!
तुम्ही औषधाचे डाक्टर का
In reply to सॉरी, विसरलोच! ती तर तुमची by डॉ. एस. पी. दोरुगडे
तुम्ही औषधाचे डाक्टर का डॉक्टरेट वाले डॉक्टर हो? दुसरे असाल तर आपल्या पी.एच.डी. च्या थेसिस वर अंमळ चर्चासत्र आयोजित करावं म्हणतो.
रच्याकने
ह्याच्यामधे अल्पोत्पन्नी मध्यमवर्गीय ब्राह्मण, मराठा ई.ई. का नै ओ? शेतकर्यांचं अनुदान ज्या पैशातुन दिलं जातं ना त्या लाखो करदात्यांची होणारी कुतरओढ का नै ओ?
तुमच्यासारखेचं अजुन एक मुटेसर म्हणुन आहेत. त्यांना हे प्रश्ण विचारुन किमान एक वर्ष तरी झालं असेल पण उत्तर नाही आलं अजुन. थांबा दुवा डकवतो.
https://www.misalpav.com/user/8199/guestbook
ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर
In reply to तुम्ही औषधाचे डाक्टर का by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर असतील,त्यांनी माझ्या कांजण्या संबंधी प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही।
तुम्ही
In reply to ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर by श्री गावसेना प्रमुख
दोघे दु दु आहात डोळ्यासमोर कांजण्या येणारे प्रश्न विचारताय. ते वैचारीक क्रांती का काय ती आणणार आहेत जरा थांबा !
उगा कुठे गडे असे प्रश्न विचारू नका.
उत्कृष्ट कविता! मिपावर आता
उत्कृष्ट कविता! मिपावर आता महाकवी व शीघ्रकवी ए. आर. दास यांची उणीव भासणार नाही.
अगर तुम और लिखोगे ऐसी कविताएं,
तुम्हे मिलेगी हजारो बबिताएं!
- महाकवी व शीघ्रकवी ए. आर. दास
प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
१. कुणाला आपली कविता आवडली नसेल वा कुणी त्यास नावे ठेवित असेल तर माणसाने चिडू नये, ही आम्हास झालेली पश्चातबुद्धी. प्रत्येकजण वेगळा असतो, आवड़निवड वेगवेगळी असू शकते.
२. राहुल गांधींवर मी कविता केली होती. मिपावर राजकीय कविता टाकण्याची सुरुवात त्या कवितेनेच केली होती (मोजून २च टाकल्यात).
३. अशा कविता बऱ्याचदा प्रासंगिक असतात. मी ठाकरे बंधू, शरद पवार इ. वर केलेल्या कवितांमधील संदर्भ त्यावेळचे असल्याने त्या मिपावर टाकल्या नाहीत.
४. जो सत्तेवर असतो त्याच्यावरच जास्त टीका होणे साहजिक आहे.
५. मोदींवर वैयक्तिक टीकाटिपण्णी मी कधीही केलेली नाही. "योजना" चा रोख आणि या कवितेचा निशाना मोदी नाहीत.
६. "योजना" आणि ही कविता यांचा रचनाकाल एकच आहे. एकत्र टाकू नये म्हणून ही नंतर अपलोड केली. फेसबुक वर उलट्या क्रमाने टाकल्या.
७. कवीतेची साहित्यिकदृष्टया चीरफाड़ झाली तरी बरे. निदान काय इम्प्रूवमेंट करावी हे तरी कळेल.
८. कृपया राग नसावा.
'योजना'
In reply to प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार. by डॉ. एस. पी. दोरुगडे
"योजना" या तुमच्या काव्यरत्नाचा दुवा देता का जरा?
बाकी ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यावर केलेल्या कविता मिपावर न टाकल्याबद्दल जाहीर आभार!
उन्हाळ्यात कांजण्या होतात कि
उन्हाळ्यात कांजण्या होतात कि नाही हो?
Don't waste your time with
Don't waste your time with explanations, people only hear what they want to hear.
- Paulo Coelho
हे तुम्ही स्वतःला शिकवताय कि आम्हाला?
In reply to Don't waste your time with by डॉ. एस. पी. दोरुगडे
हे तुम्ही स्वतःला शिकवताय कि आम्हाला?
Don't waste your time with
Don't waste your time with explanations, people only hear what they want to hear.
- Paulo Coelho
Hatred is ...
In reply to Don't waste your time with by डॉ. एस. पी. दोरुगडे
Hatred is the sign of a secret attraction that is eager to flee from itself and furious to deny its own existence. That too is God's play in His creature. - Sri Aurobindo
Welcome to the wonderful
Welcome to the wonderful
world of jealousy, he thought. For
the price of admission, you get a
splitting headache, a nearly
irresistable urge to commit
murder, and an inferiority
complex. Yippee.
-J. R. Ward
Are you serious?
In reply to Welcome to the wonderful by डॉ. एस. पी. दोरुगडे
Are you serious?
Are you serious?
Are you serious?
Are you serious?
- Robert Vadra
मोदीभक्त आम्ही
एवढी कविता आवडली.
च्या मारी
लोकाच काय बी एेकु नगा, लोक तुमाले तेच ऎकवित्या जे तुमाला ऎक्याचे नसतं.
- देव पावलो
कवितेचा आशय काहीही असो, कविता
कवितेचा आशय काहीही असो, कविता वृत्तात भारी मार खातेय. कुठलीतरी एक कविता डोळ्यासमोर ठेवा आणि त्या ठेक्यात बसवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या कडव्याचं काही झेपलं नाही, पण दुसऱ्या कडव्याच्या सुरूवातीला थोडी चांगली लय आहे.
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
याला विंदांच्या सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते या कवितेची लय आहे (त्यातला आता शब्द काढून टाकला तर)
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
हे कडवं आपल्या त्या ठेक्यात बसवता येतं का बघू.
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता पूर
कारखान्यांतून निघू लागे
सुवर्णाचा पुन्हा धूर
देशाचाच साऱ्या आता
बदलत चालला पुरता नूर
सुखाची तर परमावधी
अच्छे दिन आले अहा!
नमो नमः, नमो नमः।।२।।
आता निदान ही रेलगाडी, रेलगाडी सारख्या ठेक्यात म्हणता येते आणि अर्थ आवडो न आवडो, कविता गुणगुणावीशी वाटते. मला वाटतं इतकाही प्रयत्न न करता नुसतंच थोडंसं यमक जुळवून ओळी लिहिणं फारच अपरिपक्व वाटतं.
इतर कडव्यांचंही असं काही जमलं तर पहा.
धन्यवाद सर! इथून पुढे नक्की
धन्यवाद सर! इथून पुढे नक्की प्रयत्न करेन.
मस्त कवीता
पण 'मोकलाया'ची सर नाहि :)
सुधीर
येऊ द्या आणखी कविता.इथे कवितांचे वावडे नाही. फक्त एक सूचना. इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते. ते तसे आहे असे समजून प्रतिसाद देउ नका.दोन हात आडवे -उभे हे तर ऑन्लाइन मिडीयाचे उत्तम लक्षण आहे. स्वागत आहे.
खरंच?
In reply to सुधीर by रामदास
>>इथे टिकेत वैयक्तिक काहीच नसते.
खरंच?
धाग्यावरील प्रतिसाद नीट वाचा. गैरसमज दूर होईल!