✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

न
नीलमोहर यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 15:36  ·  लेख
लेख
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ... ची १५०१५+ वाचने म्हणजे जवळपास ५०,००३+ वाचने, सर्व मिळून गेल्या काही दिवसातच झाली आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी ढिगाने वाचने मिपाच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच झाली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे सारेही एकाच असंबद्ध शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? मराठी वाचकांच्या अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'आक्रमक' आणि 'भडकाऊ' धाग्यांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.) ... हे लेखक मिपावर नवीन नवीन लिहीत असताना त्यांना वाचकांनी ठेंगा दाखवला, कोणी विषयाला अनुसरून प्रतिसाद देईनात, नुसतेच अवांतर चालवलेले, मग हे लोक भयंकर कमेंटी आणि डेंजर धागे टाकायला लागले. यांनी मिपाकरांविषयी जेथे तेथे अद्वा-तद्वा लिहीणे सुरु केले. हे त्यावेळी जिलब्या लिहायचे. त्या जिलब्यांत त्यांनी लिहिलेले असेच क्लिष्ट काही वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना लेखमाला लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन त्यांनी एक धागा लिहिला, तो बघता बघता ट्यारपी-गेनर झाला. मग यांनी काय करावे ? तर नवीन काही लिहायचे सोडून त्याच धाग्यातील तेच विषय आणि तेच संदर्भ उचलून त्यांचे अतार्किक तत्वज्ञान पुढे लांबवले आणि 'That's the way i write!' नावाने आणखी एक बाळबोध लेखमाला लिहून काढली.. तर त्यांच्या फक्त काहीच वाक्यातील जरी तोडक्या मोडक्या लेखनशैलीकडे दुर्लक्ष केले तरी ... अशा महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो. फक्त एक दोन अतर्क्य आणि अगम्य विषय उचलायचे, आणि त्यांच्यातले बळे जुळवून आणलेले बालिश आणि मूर्ख संदर्भ दाखवायचे आणि बेसावध, अबोध आणि निष्पाप वाचक टार्गेट करून हि शब्दांची बंडलं 'लेखमाला' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग. यांना आपण मिपाचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणांसाठी, एक तर यांच्या जबर एकामागून एक पळणार्‍या धाग्यांचे साहित्यिक मूल्य शून्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर मांडलेले काहीतरी विसंगत मुद्दे आणि संदर्भरहित बडबड. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि नॉनसेन्सिकल रायटिंग सिंंड्रोमचा इफ्फेक्ट असणारे धागे वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या अजाण वाचकांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'तत्वज्ञान आणि अमिबाचा आकार' वाचणार्‍या वाचकांना 'अंतरिक्षः मेंदूतील रिकामी जागा' अथवा 'ससे रात्री झोपतात किंवा कसे: एक विचार' वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच वाचकांना ह्या ना..क लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर आठवड्याला एक नवा दुर्बोध धागा वाचायला लावतात. एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक धागा चालला म्हणून "बास, आता हापिसात दुसरे काही करायचेच नाही तर नुसते रिकामे धागे पाडायचे" असला टीपीयुक्त प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेले हे लोक सध्या येता जाता लेख टाकतात (नव्हे खपवतात). आणि जोडधंदा म्हणून 'मिड्टाईम्स ऑफ नॉर्थ ईस्ट महाराष्ट्रा' मध्ये "What marathi reader wants?" या मथळ्याखाली मराठी वाचकांचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात. आजकाल ... महाशय स्वतःला "Motivational writer" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाखमोलाची बँड्विड्थ वाया घालवून हे "अक्सीडेंटल लेखक" अश्राप नव-वाचकांना stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी मराठीतील सर्वोत्तम संस्थळावर लिहीण्यास देण्यास पात्र आहे का? तरी बरे इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये. एक मजेशीर गोष्ट सांगून हे पाल्हाळ संपवूया, काही दिवसांपूर्वी, या ...चा म्हणे कीबोर्ड बडवतांना बोटं मुडपली, किरकोळ फ्रॅक्चर झाले तर हे महाशय पोहचले थेट संस्थळाच्या मालकाकडे, आणि म्हणाले 'आता मला एक महिना लिखाण रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे मेगाबायटी नुकसान होईल आणि मला अगोदरच कितीतरी धागे पेंडिंग आहेत, हे सर्व धागे मला कुणीतरी आयते लिहून द्यावे' पण अ‍ॅडमिनने *** वर लाथ मारून त्यांची बोळवण केली.मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो लेखकू कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे लिखाण को नही रोक सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा ढीगभर धागे बाजारात आणले. आता अशा महान माणसांविषयी आणि यांना 'मिसळपावचे शिलेदार' म्हणणाऱ्या वायझेड माझा विषयी काय लिहू तेच सुचेनासे झालेय. ** आपली मते जाणून घ्यायला आवडतील, ... आणि ... विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात... (लेखन पूर्णपणे ऑन डिमांड लिहीले गेले आहे, त्यामुळे लिखाणाविषयी काहीही आक्षेप असल्यास तो परस्पर डिमांड करणार्‍याकडे लागू होतो याची नोंद घ्यावी ;) आपण काय पेर्र्णा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
नाट्य
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
विडंबन
व्युत्पत्ती
औषधोपचार
भूगोल
राहती जागा
क्रीडा
फलज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद
माध्यमवेध
प्रश्नोत्तरे
मदत
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28183 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

खतरनाक! टोपी काढली आहे!

रातराणी
गुरुवार, 02/25/2016 - 15:41 नवीन
खतरनाक! टोपी काढली आहे!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/25/2016 - 15:44 नवीन
जबरदस्त. प्रचंड आवडले आहे.
  • Log in or register to post comments

लै भारी!

अजया
गुरुवार, 02/25/2016 - 15:44 नवीन
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?
  • Log in or register to post comments

वंटास!!!! जब्बरजस्त!! लॉळ

नाना स्कॉच
गुरुवार, 02/25/2016 - 15:50 नवीन
वंटास!!!! जब्बरजस्त!! लॉळ
  • Log in or register to post comments

__/\__ येथे कर माझे जुळती!

तर्राट जोकर
गुरुवार, 02/25/2016 - 15:51 नवीन
__/\__ येथे कर माझे जुळती!
  • Log in or register to post comments

निखालस विनोदी..

गवि
गुरुवार, 02/25/2016 - 15:52 नवीन
निखालस विनोदी..
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/25/2016 - 15:57 नवीन
भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काय सर आज काय मारामारीचा

उगा काहितरीच
गुरुवार, 02/25/2016 - 16:01 नवीन
काय सर आज काय मारामारीचा विचार आहे का ? ;-) हघ्या हेवेसांनलगे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/25/2016 - 16:07 नवीन
च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

खरंय सर,

नीलमोहर
गुरुवार, 02/25/2016 - 17:22 नवीन
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे घ्या नाव मारेकर्‍यात.

अभ्या..
गुरुवार, 02/25/2016 - 17:24 नवीन
माझे घ्या नाव मारेकर्‍यात. चालतेय मला. नावाला जागुन दाखव म्हणले तर एखादा गेम पण वाजवून दाखवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

गेम वाजवणे आणि गेम करणे यात

टवाळ कार्टा
Fri, 02/26/2016 - 02:09 नवीन
<माई> गेम वाजवणे आणि गेम करणे यात फरक असतोना रे श्याम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोणीतरी माईंचे मोड लावा हो

टवाळ कार्टा
Fri, 02/26/2016 - 02:10 नवीन
कोणीतरी माईंचे मोड लावा हो जरा वरच्या प्रतिसादाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शांत ब्रशधारी शांत ;)

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 14:18 नवीन
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

''राग येऊ द्या हवे तर, पान

खेडूत
गुरुवार, 02/25/2016 - 16:08 नवीन
''राग येऊ द्या हवे तर, पान आपण लिहायाला घाबरत नाही ब्वा!'' हे राहिलंच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन प्लेट मिसळ जास्त खाणा-यांना

बोका-ए-आझम
गुरुवार, 02/25/2016 - 16:37 नवीन
आजकाल मारेकरी म्हणतात काय औरंगाबादमध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/25/2016 - 16:49 नवीन
मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोका इ आझम?

बोका-ए-आझम
गुरुवार, 02/25/2016 - 16:38 नवीन
नाही हो सर. मी आझमचा बोका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी...

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/25/2016 - 16:55 नवीन
ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, कुस्तिचा फड टाकायचा

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/25/2016 - 22:04 नवीन
प्राडॉ, कुस्तिचा फड टाकायचा विचार आहे की काय ?! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खतरनाक! काय तर पंच आहेत एक से

उगा काहितरीच
गुरुवार, 02/25/2016 - 16:00 नवीन
खतरनाक! काय तर पंच आहेत एक से बढकर एक !
  • Log in or register to post comments

नविन सदस्यांना ठरवून जालीय

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/25/2016 - 16:16 नवीन
  • Log in or register to post comments

सॉल्लिड

राही
गुरुवार, 02/25/2016 - 16:16 नवीन
सॉल्लिड.
  • Log in or register to post comments

चांगलय..

जेपी
गुरुवार, 02/25/2016 - 16:19 नवीन
चांगलय.. आता, मिपाकरांची व्यवच्छेदक लक्षणे- येऊद्या..
  • Log in or register to post comments

दोनच प्रश्न,

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 15:52 नवीन
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

=))

मितभाषी
गुरुवार, 02/25/2016 - 16:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments

'आहे' चा महिमा सुद्धा येउद्या

होबासराव
गुरुवार, 02/25/2016 - 16:21 नवीन
.
  • Log in or register to post comments

बर असत थोड़ मनोरंजक, आता

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/25/2016 - 16:23 नवीन
बर असत थोड़ मनोरंजक, आता ह्यांनी नाही जिलेब्या पाडायच्या तर काय जेष्ठ सदस्य पाड़तील
  • Log in or register to post comments

_/\_

एस
गुरुवार, 02/25/2016 - 16:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/25/2016 - 16:26 नवीन
माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित झालेल्या प्रतिक्रिया डिलिट करता येतील काय
  • Log in or register to post comments

राहु द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/25/2016 - 16:35 नवीन
प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

राहु द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/25/2016 - 16:35 नवीन
प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

कसं जमतं हो सर __/\__

नीलमोहर
गुरुवार, 02/25/2016 - 17:45 नवीन
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

नाखु
गुरुवार, 02/25/2016 - 16:34 नवीन
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.
  • Log in or register to post comments

:)

स्वाती दिनेश
गुरुवार, 02/25/2016 - 16:35 नवीन
मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

नीमो _/\_

बोका-ए-आझम
गुरुवार, 02/25/2016 - 16:35 नवीन
रापचिक एकदम!
  • Log in or register to post comments

लिहा!

पैसा
गुरुवार, 02/25/2016 - 16:51 नवीन
आम्ही वाचायला घाबरत नाय!
  • Log in or register to post comments

खत्रा दारूगोळा !

सस्नेह
गुरुवार, 02/25/2016 - 17:56 नवीन
अलिकडं कोण मिपाकर कोण मारेकरी काईच कळंना झालय ;) (दहशतग्रस्त) स्नेहा
  • Log in or register to post comments

जबराट. धूमशाम एकदम. =))

प्रचेतस
गुरुवार, 02/25/2016 - 18:24 नवीन
जबराट. धूमशाम एकदम. =))
  • Log in or register to post comments

खतरा!

जव्हेरगंज
गुरुवार, 02/25/2016 - 21:40 नवीन
खतरा!
  • Log in or register to post comments

Lol ! Bhari !!!!

मितान
गुरुवार, 02/25/2016 - 21:51 नवीन
Lol ! Bhari !!!!
  • Log in or register to post comments

=))

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 02/25/2016 - 22:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments

धम्माल, दे दणादण, धागा !!!

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/25/2016 - 22:06 नवीन
धम्माल, दे दणादण, धागा !!!
  • Log in or register to post comments

=))

टिवटिव
गुरुवार, 02/25/2016 - 22:15 नवीन
लोल !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

भाते
गुरुवार, 02/25/2016 - 22:25 नवीन
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

चुकलं चुकलं पुस्तकाचं नाव चुकलं

भीडस्त
गुरुवार, 02/25/2016 - 23:06 नवीन
'That's the way i write!
असं कुठं नाव असतं का पुस्तकाचं ते That's the way i bite असं आहे म्हणे.. Biter आपलं ते Writer. :) :)
  • Log in or register to post comments

वृत्तपत्रीय लिखाण !!

सतिश गावडे
गुरुवार, 02/25/2016 - 23:09 नवीन
वृत्तपत्रीय लिखाण !! राग येऊ द्या हवा तर, आपण बोलायला खरच घाबरत नाही! :-)
  • Log in or register to post comments

ही माझी तीन नावं.... परा,

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/26/2016 - 00:54 नवीन
ही माझी तीन नावं.... परा, प्राडॉ, विजुभाऊ .... ;) (ह. घ्या हो लेकाहो, नाही तर जीव घ्याल!) चला आपापली लिष्टं टाका पटापट!
  • Log in or register to post comments

आम्ही शांतीदूत आहोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 11:44 नवीन
बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हा धागा वाचल्यावर उगाचच महान

श्रीगुरुजी
Sun, 02/28/2016 - 14:13 नवीन
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा