अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ... ची १५०१५+ वाचने म्हणजे जवळपास ५०,००३+ वाचने, सर्व मिळून गेल्या काही दिवसातच झाली आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी ढिगाने वाचने मिपाच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच झाली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे सारेही एकाच असंबद्ध शैलीत लिहिणारे लेखक आहेत.
आता यांच्या यशाचे गमक काय? मराठी वाचकांच्या अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'आक्रमक' आणि 'भडकाऊ' धाग्यांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)
... हे लेखक मिपावर नवीन नवीन लिहीत असताना त्यांना वाचकांनी ठेंगा दाखवला, कोणी विषयाला अनुसरून प्रतिसाद देईनात, नुसतेच अवांतर चालवलेले, मग हे लोक भयंकर कमेंटी आणि डेंजर धागे टाकायला लागले. यांनी मिपाकरांविषयी जेथे तेथे अद्वा-तद्वा लिहीणे सुरु केले. हे त्यावेळी जिलब्या लिहायचे. त्या जिलब्यांत त्यांनी लिहिलेले असेच क्लिष्ट काही वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना लेखमाला लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन त्यांनी एक धागा लिहिला, तो बघता बघता ट्यारपी-गेनर झाला. मग यांनी काय करावे ? तर नवीन काही लिहायचे सोडून त्याच धाग्यातील तेच विषय आणि तेच संदर्भ उचलून त्यांचे अतार्किक तत्वज्ञान पुढे लांबवले आणि 'That's the way i write!' नावाने आणखी एक बाळबोध लेखमाला लिहून काढली..
तर त्यांच्या फक्त काहीच वाक्यातील जरी तोडक्या मोडक्या लेखनशैलीकडे दुर्लक्ष केले तरी ... अशा महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो. फक्त एक दोन अतर्क्य आणि अगम्य विषय उचलायचे, आणि त्यांच्यातले बळे जुळवून आणलेले बालिश आणि मूर्ख संदर्भ दाखवायचे आणि बेसावध, अबोध आणि निष्पाप वाचक टार्गेट करून हि शब्दांची बंडलं 'लेखमाला' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग.
यांना आपण मिपाचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणांसाठी, एक तर यांच्या जबर एकामागून एक पळणार्या धाग्यांचे साहित्यिक मूल्य शून्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर मांडलेले काहीतरी विसंगत मुद्दे आणि संदर्भरहित बडबड. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि नॉनसेन्सिकल रायटिंग सिंंड्रोमचा इफ्फेक्ट असणारे धागे वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या अजाण वाचकांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'तत्वज्ञान आणि अमिबाचा आकार' वाचणार्या वाचकांना 'अंतरिक्षः मेंदूतील रिकामी जागा' अथवा 'ससे रात्री झोपतात किंवा कसे: एक विचार' वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच वाचकांना ह्या ना..क लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर आठवड्याला एक नवा दुर्बोध धागा वाचायला लावतात.
एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक धागा चालला म्हणून "बास, आता हापिसात दुसरे काही करायचेच नाही तर नुसते रिकामे धागे पाडायचे" असला टीपीयुक्त प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेले हे लोक सध्या येता जाता लेख टाकतात (नव्हे खपवतात). आणि जोडधंदा म्हणून 'मिड्टाईम्स ऑफ नॉर्थ ईस्ट महाराष्ट्रा' मध्ये "What marathi reader wants?" या मथळ्याखाली मराठी वाचकांचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात.
आजकाल ... महाशय स्वतःला "Motivational writer" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाखमोलाची बँड्विड्थ वाया घालवून हे "अक्सीडेंटल लेखक" अश्राप नव-वाचकांना stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी मराठीतील सर्वोत्तम संस्थळावर लिहीण्यास देण्यास पात्र आहे का? तरी बरे इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.
एक मजेशीर गोष्ट सांगून हे पाल्हाळ संपवूया, काही दिवसांपूर्वी, या ...चा म्हणे कीबोर्ड बडवतांना बोटं मुडपली, किरकोळ फ्रॅक्चर झाले तर हे महाशय पोहचले थेट संस्थळाच्या मालकाकडे, आणि म्हणाले 'आता मला एक महिना लिखाण रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे मेगाबायटी नुकसान होईल आणि मला अगोदरच कितीतरी धागे पेंडिंग आहेत, हे सर्व धागे मला कुणीतरी आयते लिहून द्यावे' पण अॅडमिनने *** वर लाथ मारून त्यांची बोळवण केली.मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो लेखकू कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे लिखाण को नही रोक सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा ढीगभर धागे बाजारात आणले.
आता अशा महान माणसांविषयी आणि यांना 'मिसळपावचे शिलेदार' म्हणणाऱ्या वायझेड माझा विषयी काय लिहू तेच सुचेनासे झालेय.
**
आपली मते जाणून घ्यायला आवडतील, ... आणि ... विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...
(लेखन पूर्णपणे ऑन डिमांड लिहीले गेले आहे, त्यामुळे लिखाणाविषयी काहीही आक्षेप असल्यास तो परस्पर डिमांड करणार्याकडे लागू होतो याची नोंद घ्यावी ;)
आपण काय पेर्र्णा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
28360
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक! टोपी काढली आहे!
जबरदस्त
लै भारी!
वंटास!!!! जब्बरजस्त!! लॉळ
__/\__ येथे कर माझे जुळती!
निखालस विनोदी..
=))
काय सर आज काय मारामारीचा
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to काय सर आज काय मारामारीचा by उगा काहितरीच
खरंय सर,
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझे घ्या नाव मारेकर्यात.
In reply to खरंय सर, by नीलमोहर
गेम वाजवणे आणि गेम करणे यात
In reply to माझे घ्या नाव मारेकर्यात. by अभ्या..
कोणीतरी माईंचे मोड लावा हो
In reply to गेम वाजवणे आणि गेम करणे यात by टवाळ कार्टा
शांत ब्रशधारी शांत ;)
In reply to माझे घ्या नाव मारेकर्यात. by अभ्या..
''राग येऊ द्या हवे तर, पान
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन प्लेट मिसळ जास्त खाणा-यांना
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to दोन प्लेट मिसळ जास्त खाणा-यांना by बोका-ए-आझम
बोका इ आझम?
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओ डिबी...
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ, कुस्तिचा फड टाकायचा
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खतरनाक! काय तर पंच आहेत एक से
नविन सदस्यांना ठरवून जालीय
सॉल्लिड
चांगलय..
दोनच प्रश्न,
In reply to चांगलय.. by जेपी
=))
'आहे' चा महिमा सुद्धा येउद्या
बर असत थोड़ मनोरंजक, आता
_/\_
माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित
राहु द्या.
In reply to माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित by श्री गावसेना प्रमुख
राहु द्या.
In reply to माझ्या वरच्या अर्धवट प्रकाशित by श्री गावसेना प्रमुख
कसं जमतं हो सर __/\__
In reply to राहु द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.:)
नीमो _/\_
लिहा!
खत्रा दारूगोळा !
जबराट. धूमशाम एकदम. =))
खतरा!
Lol ! Bhari !!!!
=))
धम्माल, दे दणादण, धागा !!!
=))
अभिनंदन
चुकलं चुकलं पुस्तकाचं नाव चुकलं
वृत्तपत्रीय लिखाण !!
ही माझी तीन नावं.... परा,
आम्ही शांतीदूत आहोत.
In reply to ही माझी तीन नावं.... परा, by बिपिन कार्यकर्ते
हा धागा वाचल्यावर उगाचच महान
In reply to आम्ही शांतीदूत आहोत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खो खो खो!
कळलं का?
In reply to खो खो खो! by निशांत_खाडे
_/\_ मुजरा स्वीकारा..प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!कळले कळले..
In reply to कळलं का? by बहुगुणी
आणि हे इतके कनस्ट्रकटीव
In reply to कळलं का? by बहुगुणी
तळंही नाही, हा मिपाचा भवसागर आहे.
In reply to आणि हे इतके कनस्ट्रकटीव by निशांत_खाडे
(No subject)
शमत रे भावा!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
जास्त झालं...
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
भन्नाट
पाउलखुणा आवडल्या. मस्तेत. काय एकेक रत्नं शोधलीयेत.
धन्यवाद !!
ते सगळं खरं,
In reply to धन्यवाद !! by नीलमोहर
हो ना..
In reply to ते सगळं खरं, by सस्नेह
:(
In reply to धन्यवाद !! by नीलमोहर
जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली
=))
In reply to जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली by होबासराव
मतबल तै ये आपने पढ्याच नै
नाही हो,
In reply to मतबल तै ये आपने पढ्याच नै by होबासराव