Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मितान on Sat, 12/05/2015 - 22:14
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

Submitted by दमामि on Sat, 12/05/2015 - 22:28

Permalink

वा! क्या बात!!!

वा! क्या बात!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 07:06

In reply to वा! क्या बात!!! by दमामि

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 12/05/2015 - 22:37

Permalink

काय कळलं रे दमाम्या तुला?

काय कळलं रे दमाम्या तुला?
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sun, 12/06/2015 - 07:49

In reply to काय कळलं रे दमाम्या तुला? by अजया

Permalink

ही कविता पंचशील उतारा

ही कविता पंचशील उतारा (antidote) आहे, जरी गूढगर्भाचा रस्ता चोखाळते तरी चुकूनही ग्रेसचा छाप जाणवत नाही. कविता स्त्रीपोटी जन्मलेली आहे असे जाणवते. कविता नाद आणि लय यांचा हात पकडून चालतेय, त्यामुळे वाचताना खूप मजा येते, अशा कविता चालसिद्ध असतात. हुश्श, हे झाले कवितेच्या बाह्यरुपाबद्दल. अर्थ? व्यनि करतो, चालेल?;)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 12/06/2015 - 11:53

In reply to ही कविता पंचशील उतारा by दमामि

Permalink

कृ. मलाही व्यनि करावा.

अर्थ? व्यनि करतो, चालेल?;
कृ. मलाही व्यनि करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 12/07/2015 - 09:16

In reply to कृ. मलाही व्यनि करावा. by माहितगार

Permalink

किती जणांना व्यनि करणार?

किती जणांना व्यनि करणार? त्यापेक्षा इथेच लिहितो.स्त्री ची अनेक रुपे या कवितेत दिसतात. १ ती म्हणजे जणू तलवारीप्रमाणे चराचराला कापत जाणारी रात्र. तिचे शुद्ध प्रेम म्हणजे सात्विकतेचा प्रकाश देणारी मंदपणे तेवणारी समई. त्यात कुठेही मशालीची आक्रमकता नाही, आहे ती भरजरी , हळुवार तलम अशी सहनशीलता. परिस्थितिच्या अगतिकतेमुळे जरी तिच्या आशेची पौर्णिमा काळवंडली असली तरी अजूनही ती विझली नाहीय, तेवत आहे. २ ती जगाला झुकल्या वेलीप्रमाणे , नाजूक, सदानकदा कुठल्यातरी वृक्षावर आधारासाठी अवलंबून अशी वाटते. पण तिच्या आत जर डोकावून पहाता आले तर लक्षात येइल की ती एक अवखळ सारिका आहे, तिला पडलेली तिच्या सख्याची भूल इतकी प्रभावी आहे की, सारी बंधने उधळून देऊन एखाद्या नदीप्रमाणे मिलनोत्सुक अशी तिची अवस्था आहे. 3 ती सुखदु:खाच्या पलिकडे पोचली आहे, तिचे दगड झालेले मन सन्याशाप्रमाणे आता कसल्याही मोहात अडकत नाही. ( असं तिला वाटतय) मग चंद्राचे शीतल चांदणे का बरे मनाला डागण्या देतय? कुठची अत्रुप्त इच्छा मनात अजून तग धरून आहे की वेराग्यात सुद्धा गीताचा म्हणजेच लपवलेल्या आर्ततेचा जोगवा मागतेय? मग मनाचं वैराग्य , संवेदनाविरहितता वगैरे खरी का? ४ ती जिच्या मनाच्या सृजनेतलाच या जगाने नख लावलेय, आता ती कधीच फुलणार नाही हे तिला पक्के माहित आहे . . पार्थाचे बाण जसे लक्ष्याचा अचूक वेध घेतात तसा अचूकपणे तिच्या मोहोराला जणू लक्ष्य केलेय, नेहमीचा जीवनदायी पाऊस आज जणूआग बनून बरसतोय. मिळून मिळून काय मिळणार तर विष, जीवन नव्हे तरीही जगण्याची आशा, तहान चिवट आहे. ५ ती वरून जरी तिचे घाव भरलेले वाटले तरी आत अजूनही जखम ओली आहे. ती सुकली नाहीये तर आत दु:ख साकळले आहे, वरून जरी पाणी गंगेप्रमाणे लोभस हिरवे शांत वाटले तरी आत विखारी शेवाळ आहे. हे बाकी कुणी नाही पण त्या मुक्या जीवांनी ओळखलेय म्हणून त्या पाण्याला तोंड देखिल न लावता उधळून लांब पळत सुटल्या. 6 ती मांडीतील आग न लपवणारी, जगाची पर्वा न करता उन्मादात गाणारी, ज्या भावना , क्रीडा किळसवाण्या रातकिड्यांप्रमाणे काळोखात उरकण्याचा जगाचा संकेत तो धुडकाऊन , त्या भावनांना अभय देणारी, जगाने तिच्यावर निर्लज्ज असा शिक्का मारलाय. 7 ती, आदिमाया, ज्यात शिरले की अंत ठरलेला असे मायेचे चकवे निर्माण करणारी, की शेवटी फक्त राख उरते, शुन्य हेच सत्य हे माहित असूनही जगण्याची ओढ रंध्रांध्रात निनादत ठेवणारी!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 12/07/2015 - 09:23

In reply to किती जणांना व्यनि करणार? by दमामि

Permalink

साक्षात दंडवत महाराजा....

साक्षात दंडवत महाराजा.... (कवितेप्रमाणेच रसघ्रणही डोक्याव्रून गेल्यात आले आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 12/07/2015 - 09:29

In reply to साक्षात दंडवत महाराजा.... by संदीप डांगे

Permalink

अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही

अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही अॅब्स्ट्रॅक्ट आहे. लोक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? कवितेतून जे अमूर्त भाव उभे केलेत त्याच्यामागच्या कवीच्या भावना जाणून घेणे आवश्यकच आहे काय? अमूक एक शब्द का वापरला याचा किस पाडून नक्की काय मिळणार
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 12/07/2015 - 09:58

In reply to अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही by दमामि

Permalink

रसग्रहण----?

रसिकाच्या जाणिवेच्या कक्षा मर्यादित असतांना संवेदनांचा अपेक्षित पल्ला गाठू शकत नसल्याने अल्पगतीधारक बुद्धीने मनाच्या कल्पनाशक्तीपुढे पत्करलेली हार प्रत्यक्ष दिसत असतांना कविता समजली आहे असे म्हणणे कवीच्या मूळ प्रेरणेच्या आणि प्रकटनाच्या उद्देशाविरूद्ध वर्तन असून असे वर्तन रसिकाला मान्य नसल्यास त्याला शब्दांचा किस पाडण्यात किंचितही रस राहत नाही ह्या अवस्थेला डोक्यावरून जाणे म्हणतात असे आमचे पूज्य गुरुजी (गाढववाले)-कानाला हात लावल्याची स्मायली कल्पावी-(ज्यांनी एखाद्या शूरवीर पराक्रमी योद्ध्याप्रमाणे अशा लाखोंच्या झुंडींना सामोरे जात आयुष्यभर विजय मिळवला आहे -आकाशाकडे डोळे करून आदर व्यक्त करणारी स्मायली कल्पावे) सांगुन गेलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 12/07/2015 - 10:04

In reply to रसग्रहण----? by संदीप डांगे

Permalink

---श्या! शतशब्दकथेला पंधरा

---श्या! शतशब्दकथेला पंधरा शब्द कमी पडलेत--- एका वाक्यात यापेक्षा जास्त शब्द वापरण्याचा विक्रम कुणी केलाय का मिपावर ? अन्यथा माझे नाव मिपावर्ल्ड्रेकॉर्डमध्ये नोंदवावे अशी मी याठिकाणी घोषणा करतो. - कीबोर्डखान मीचीबाराखडीवाले.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 12/07/2015 - 10:26

In reply to ---श्या! शतशब्दकथेला पंधरा by संदीप डांगे

Permalink

शतशब्दकथा की शतशब्दव्यथा?

शतशब्दकथा की शतशब्दव्यथा?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 12/07/2015 - 09:57

In reply to किती जणांना व्यनि करणार? by दमामि

Permalink

बर्‍याच रुपकांचा अंदाजा

बर्‍याच रुपकांचा अंदाजा येण्यास मदत झाली. आता तुम्ही सुचवलेल्या अर्थांसहीत पुन्हा वाचून पाहतो. मी बर्‍यापैकी वेगळे अर्थ काढून वाचण्याचा प्रयत्न केला होता पण काही रुपकांचा अंदाज न आल्यामुळे गाडी अडली होती. रसग्रहणासाठी खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 12/07/2015 - 10:27

In reply to बर्‍याच रुपकांचा अंदाजा by माहितगार

Permalink

:):)

:):)
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Mon, 12/07/2015 - 15:26

In reply to :):) by दमामि

Permalink

@ दमामि

पैजारबुवांचा प्रतिसाद पचतो न पचतो तोच तुमचा प्रतिसाद आला. अर्थाचे एवढे आरोप माझ्या कवितेवर झालेले बघून मूर्च्छित होऊन जी पडले ती एवढ्या तासांनी शुद्ध आली !!!! तुम्हालाही साष्टांग नमन !!!!! पण अजून एका थोर व्यक्तीच्या प्रतिसादाची आस लागली आहेच ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 12/07/2015 - 19:06

In reply to @ दमामि by मितान

Permalink

:)))

वो हाथ मुझे दे दे... का?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 12/07/2015 - 11:25

In reply to ही कविता पंचशील उतारा by दमामि

Permalink

कुछ तो गडबड है ….

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 12/05/2015 - 22:40

Permalink

शष्प काही समजले नाही...कोणी

शष्प काही समजले नाही...कोणी मराठीत अर्थ लिहिल काय
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 07:08

In reply to शष्प काही समजले नाही...कोणी by टवाळ कार्टा

Permalink

टवाळजी कार्टाजी,

टवाळजी कार्टाजी, काविता वाचल्याबद्दल धन्यवाद. ही कविता खरंच मी मराठीतच लिहिली आहे हो. वाटल्यास अवतीभवती असणार्‍या भाषा अभ्यासकांना विचारा. तरीही तुम्हाला समाजायला अवघड गेली याचे वाईट वाटले. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sat, 12/05/2015 - 22:52

Permalink

काय न कळण्याजोगं आहे यात?

काय न कळण्याजोगं आहे यात? स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचत गेलं की तरल अर्थ उमटत जातो . आयुष्याचं सार मांडलं आहे जणु !! वाह वा !!
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 07:15

In reply to काय न कळण्याजोगं आहे यात? by स्रुजा

Permalink

स्रुजाताई,

स्रुजाताई, हो, या कवितेतून असाही एक अर्थ निघू शकतो. मनाच्या संस्काराच्या गाभार्‍यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आणि ती चौकट वापरण्याचा पूर्ण अधिकार रसिकांचा असतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 12/05/2015 - 23:10

Permalink

तुमचा अनर्थशास्त्राचा गाढा

तुमचा अनर्थशास्त्राचा गाढा अभ्यास बघून वारल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sun, 12/06/2015 - 00:20

In reply to तुमचा अनर्थशास्त्राचा गाढा by अजया

Permalink

बघ एस भौंना आणि अकुंना पण

बघ एस भौंना आणि अकुंना पण आवडली आहे. त्यांना नाही सांगायला गेलीस ते तुझ्या वारण्याची कथा :प
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 12/05/2015 - 23:23

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 12/05/2015 - 23:48

Permalink

हम्म!

कविता अनर्थशास्त्रावर असली तरी का कुणास ठाऊक आवडली आहे. वाखुसाआ.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 07:09

In reply to हम्म! by एस

Permalink

अकु, एसभाऊ,

अकु, एसभाऊ, अनेकानेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 12/06/2015 - 01:10

Permalink

शून्य कशाचे प्रतिक आहे ते

शून्य कशाचे प्रतिक आहे ते नक्की सांग, मगच मी रसग्रहण करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 07:06

Permalink

माऊताई,अजयाताई

सभोवतालच्या अनुभवल्या जाणार्‍या वातावरणामुळे माझी कलात्मक प्रेरणा संजिवीत होताना एक कलाकार म्हणुन सवेदनांच अटॅच-डिटॅच फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट वेगाने तयार झाली. त्यातून हे अमूर्त काव्य प्रसवले. कविता झाल्यामुळे अर्थात मी कवयित्री झाले. आणि कवीने आपल्या उपमांचे स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये म्हणून मी कोणतेही स्पष्टीकरण द्यायला जाणार नाही. रसिकांनी आपल्या जाणिवांच्या रंध्रांवरची फोल पटे दूर सारली तर नक्कीच या कवितेचा आस्वाद घेता येईल ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sun, 12/06/2015 - 08:04

In reply to माऊताई,अजयाताई by मितान

Permalink

थोडक्यात रसिकांनी आपल्या

थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sun, 12/06/2015 - 08:04

In reply to माऊताई,अजयाताई by मितान

Permalink

थोडक्यात रसिकांनी आपल्या

थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 08:11

In reply to माऊताई,अजयाताई by मितान

Permalink

मी शेंगा खाल्ल्या नाही.मी

मी शेंगा खाल्ल्या नाही.मी फोलपटे टाकणार नाही.आधीच सांगून ठेवतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 12/06/2015 - 11:57

In reply to माऊताई,अजयाताई by मितान

Permalink

पहिली कविता आहे ? निश्चितच

पहिली कविता आहे ? निश्चितच अभिनंदन, असेच लिहित रहा. प.ले.शु (पुढील लेखनास शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 07:50

Permalink

नुसती शब्दांची चमकती माळ

नुसती शब्दांची चमकती माळ मांडली की कविता झाली असे वाटत असेल तर ती केवळ पोकळ अभिव्यक्ती ठरेल.आपण ग्रेस यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास न केल्याने असे अॅबस्ट्रॅक्ट काव्य प्रसवले आहे. कितव्या पाणीपुरीनंतर ही कविता तुम्हांस झाली हे कळु शकेल का? नवरातकिडे कुठे आढळतात? निर्लज्ज उगवतो अंकी म्हणजे काय? रुपकांचं स्पष्टीकरण देता येत नसेल तर हा कवितारुपी शब्दांचा बाजार भरवून आपण भ्रष्ट नकलेची नक्कल काढता आहात असा हा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 09:26

In reply to नुसती शब्दांची चमकती माळ by अजया

Permalink

अजयाताई, तुमचा प्रतिसाद

अजयाताई, तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत होत आहे. नसेल पाणीपुरी पचत तर मान्य करावे ना...उगाच ते पोकळ अन्न वगेरे रडरड करत राहू नये. कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कवयित्री पक्षी आम्ही म्हणजे मी बांधील नाही हे ठणकावून सांगतेय !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 10:04

In reply to अजयाताई, तुमचा प्रतिसाद by मितान

Permalink

पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर

पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर पोसलेली कविता सपष्ट दिसत असताना आपण अमान्य करत आहात.एक पक्षी साॅरी एक कवयित्री म्हणून आपण आपल्या भावनांचे फेशीयल तटस्थ राहुन करु शकत नाही असा याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 12/06/2015 - 13:00

In reply to पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर by अजया

Permalink

अजयाताई तुमची टिका नक्की

अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 12/06/2015 - 13:01

In reply to पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर by अजया

Permalink

अजयाताई तुमची टिका नक्की

अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल? अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 12/06/2015 - 13:17

In reply to नुसती शब्दांची चमकती माळ by अजया

Permalink

Déjà vu !!

Déjà vu !! (नवरातकिडे हे मी चुकून 'नवरा तिकडे' असं वाचलं त्यामुळे confusion मध्ये अंमळ भर पडली.)
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 12/06/2015 - 13:32

In reply to Déjà vu !! by पैसा

Permalink

खिक्क!आता नव्याने कवितेचे

खिक्क!आता नव्याने कवितेचे रसग्रहण करावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 12/06/2015 - 08:21

Permalink

रसग्रहणासाठी माहितगार यांना

रसग्रहणासाठी माहितगार यांना आवाहन.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/06/2015 - 09:21

In reply to रसग्रहणासाठी माहितगार यांना by संदीप डांगे

Permalink

=)) =))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 12/06/2015 - 11:53

In reply to रसग्रहणासाठी माहितगार यांना by संदीप डांगे

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 12/06/2015 - 08:25

Permalink

काही कळले नाही.

काही कळले नाही. "स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! ----" आणखी एक वकील. जाऊ द्या समजावत बसू नका कारण सोपी गोष्ट आणखी सोप्पी करता येत नाही आणि सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही असं आमचं मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Sun, 12/06/2015 - 08:35

In reply to काही कळले नाही. by कंजूस

Permalink

अय्या सरळ रेषा कशाला सऱळ

अय्या सरळ रेषा कशाला सऱळ करायची अजुन ?? वाकडी करण्यात च गंमत आहे :P
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 12/06/2015 - 08:33

Permalink

हल्लीच्या मराठी मालिका पाहून

हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे.पुरूष त्यांना समजून घेतात/समजूतदारपणा दाखवतात त्यामुळे ते अगोदरच रिंगणाबाहेर गेलेत.उर्वरित निरूपणासाठी बॅटन टवाळ कार्टाकडे सोपवण्यात येत आहे आणि आज रविवार असला तरी ठाणे मॅरथॅान नाहीये.चालू/पळी द्या धागा हळहळू २१ किमीटरकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 12/06/2015 - 09:26

In reply to हल्लीच्या मराठी मालिका पाहून by कंजूस

Permalink

@हल्लीच्या मराठी मालिका पाहून

@हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे. >> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Mon, 12/07/2015 - 13:12

In reply to @हल्लीच्या मराठी मालिका पाहून by अत्रुप्त आत्मा

Permalink

हल्लीच्या मराठी मालिका पाहून

हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे काय लॉलताय बुवा :प पुरुशी व्यथा जाणुन घ्यायला कोण त्या काळातल्या मालिका पाहयच्या बर्र ? ? (प ळा... )
  • Log in or register to post comments

Submitted by भुमी on Sun, 12/06/2015 - 08:37

Permalink

फार फार आवडली

अति सुंदर काव्य.मितानजींच्या प्रतिसादामुळे कवितेचे अंतरंग नीट उलगडले आहेत असे वाटतेय. रसिक ,अभ्यासू ,जाणकार, सुज्ञ अजून प्रकाश पाडतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 12/06/2015 - 09:09

Permalink

मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द

मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द अनेक अर्थान उलगडत जातो य. स्त्रि व्यथेचि कथा मनाला भिडलि. अजयाताइच्या प्रतिसादाचे नवल वाटतेय.कविता समजुन घ्या बर.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 12/06/2015 - 09:27

In reply to मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द by इशा१२३

Permalink

कविता १९७८ आमच्या मैत्रीण

कविता १९७८ आमच्या मैत्रीण असल्याने केव्हाच्या समजूनच घेतोय :(
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Sun, 12/06/2015 - 09:34

In reply to कविता १९७८ आमच्या मैत्रीण by अजया

Permalink

मला समजतीयेना कविता मग

मला समजतीयेना कविता मग अजयाताई तुम्हाला समजायला काय कठीण आहे??? तुम्ही तर कीती कठीण कठीण दात पाडता हो महाभागान्चे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 39643 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com