स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
@ट.का. ह्रुदयातून उपाशी आहात
साधं सरळ सोपं तत्वज्ञान
हे अध्यात्माचे मुक्तीधाम ;)
ट का, इथे अध्यात्माचे तत्वज्ञान काय म्हणते ?
खिक्क
राधेमा (सु.कौर पंजाब) वरच्या
संपूर्ण प्रतीसाद पटला
:)
कालपासुन सगळ्या चर्चा वाचून
प्रत्येक वेळी अनाहिता आणि
ट.का. त्यांनी सामोपचार
तुम्हाला गच्ची नक्कोय का?
तुम्हाला गच्ची नक्कोय का?
पॉइंट बरोबरच आहे. त्याला
आपण प्रॅक्टिकल नस्तो रे ;)
हो ना. एकमेकांची उणीदुणी
एक मिनिट हं...
जेपीला बोल्वा रे कुणीतरी...
अच्छा.. ख.फ.. सॉरी.. मी तिकडे
ठिकै...जे खफवर अस्तात त्यांना
साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि
हेच इतरांनी म्हटलं की लगेच
हो बरोबर आहे टक्या आणि ते
तर तर....चिरडले गेले आंदोलन,
मग जर घरात अनाहितांचा गाभारा
तुम्ची गल्ली चुक्ली...
पुरुषांसाठी वेगळी गच्ची
संन्यास नै घ्यायचाय ओ :)
ते सगळं ठीके पण विनोदबुद्धी
विनोदबुद्धी आणि खेळकरपणा व
पुरुषांच्या बाबतीत असे काही
फारच सालस बुआ तुम्ही :)प्यारी
नाही मी सालस् नाहीय.पण उगाच
मी वैयक्तीक कधीच लिहित नाही..
पुरुषांच्या बाबतीत असे काही
पुरुषांच्या बाबतीत असे काही
स्त्रिया आणि तत्वज्ञान या दोन
खिक्क....TKM क्लब असे
प्र.गो.ंचे मत
+१११११११
+११
कोणत्याही अध्यात्मिक
सहमत
आजपर्यंतचा माहितगारांचा
त्यातल अर्धशतकं मिपा गाभारा
गच्ची गच्ची वाचून बटाट्याची
आक्रंदून, स्फुंदून मिपाचे
ब्याटमनराव हा धागा
पयले तुम अपना धागा का विषय