Skip to main content

धर्मसंस्था

स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/04/2020 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सोशल मीडियावर कोरोना कोविड19 या रोगाच्या अनुषंगाने याप्रकारचं समर्थक लेखन आढळत आहे. यातले भेद ,हेतू दुसऱ्या उदाहरणांवरून दाखवून देणे हा सदर लेखनाचा हेतू आहे. 1)भस्मधारण विधी:- हा विधी धर्मशास्त्रात (शरीर)शुद्धीचा विधी म्हणून(अनेक ठिकाणी) सांगितला गेलेला आहे. सामान्यतः भस्म म्हणजे होमहवनातील आहुती दिलेल्या पदार्थांची राख. या राखेत लाकडं गोवऱ्या तूप तीळ भात दुर्वा असे बरेच घटक जळालेल्या अंश रूपांनी येतात. स्वाभाविकच याचे काही रासायनीक गुणधर्म त्यात असतात.

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.