प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
वाचने
74857
प्रतिक्रिया
322
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन
In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश
बहुतेक 'पुरूषांसोबत
In reply to धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन by संदीप डांगे
तेच तर..
In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश
स्त्रियांना किंवा अन्य
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी
In reply to स्त्रियांना किंवा अन्य by गॅरी ट्रुमन
या निमित्ताने उहापोह होतो आहे
शनि मंदिरात स्त्रियांना
गवि सर,
दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि
चाल तीच- हट्टीकट्टी ...
In reply to दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि by बॅटमॅन
कुणाला कशाचं नि प्यारेला
In reply to चाल तीच- हट्टीकट्टी ... by pacificready
आपणास मुद्दा समजलेला नाही.
In reply to कुणाला कशाचं नि प्यारेला by बॅटमॅन
स्त्रिया काही बोलत नाहीत
मितान बोल्लीये ना वर..
In reply to स्त्रिया काही बोलत नाहीत by संदीप डांगे
+१
In reply to मितान बोल्लीये ना वर.. by पिलीयन रायडर
आपल्या प्रतिसादातून ते अधिक
In reply to +१ by नीलमोहर
अर्रर..
In reply to आपल्या प्रतिसादातून ते अधिक by संदीप डांगे
आपण आपले कर्तव्य अचूक बजावत
In reply to अर्रर.. by नीलमोहर
जाऊ द्या हो,
In reply to आपण आपले कर्तव्य अचूक बजावत by संदीप डांगे
अगं तसं नाही नीमो
In reply to जाऊ द्या हो, by नीलमोहर
मालक येतील मजुरीवरून. भाकरी
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
=))=))=)))))))))
In reply to मालक येतील मजुरीवरून. भाकरी by पिलीयन रायडर
ही ही ही !!
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
=)) (ह.घ्या.) भाकरीला पीठ कंच
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं
In reply to =)) (ह.घ्या.) भाकरीला पीठ कंच by माहितगार
जाते ओढताना ओव्या गाऊन
In reply to काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं by मितान
ओव्या गाऊन???
In reply to जाते ओढताना ओव्या गाऊन by गवि
दू दू दू अभ्या =))
In reply to ओव्या गाऊन??? by अभ्या..
मागचे ऑर्डरचे टी-शर्ट झाले
In reply to ओव्या गाऊन??? by अभ्या..
आपण पीठ दळता हे वाचून भरुन
In reply to काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं by मितान
१०० निम्मित
:) धन्यवाद ! जो जे वांच्चील
In reply to १०० निम्मित by पगला गजोधर
150
In reply to :) धन्यवाद ! जो जे वांच्चील by माहितगार
१९९
In reply to 150 by पगला गजोधर
२००
In reply to 150 by पगला गजोधर
शनिदेवास आमचा प्रणाम
In reply to २०० by पगला गजोधर
३०० निमित्त,
In reply to शनिदेवास आमचा प्रणाम by माहितगार
शनि हि उग्र देवता आहे. शनीला
करेक्ट
In reply to शनि हि उग्र देवता आहे. शनीला by तुडतुडी
नुकतीच दक्षिण भारताची सहल करू
नोबडी वॉन्ट्स टू टेक अ चान्स.
In reply to नुकतीच दक्षिण भारताची सहल करू by तुडतुडी
जरा जपून हो, नैतर.....
In reply to नोबडी वॉन्ट्स टू टेक अ चान्स. by संदीप डांगे
कन्याकुमारीला तिकिट?
In reply to नुकतीच दक्षिण भारताची सहल करू by तुडतुडी
ते सर्वांभूती परमेश्वर
आधी भूत व्हा!
In reply to ते सर्वांभूती परमेश्वर by यशोधरा
आहेत तेवढी पुरेत की! थैमान
In reply to आधी भूत व्हा! by pacificready
ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय
In reply to आहेत तेवढी पुरेत की! थैमान by यशोधरा
अरेरे.
In reply to ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय by pacificready
माझं स्पष्ट मत आहे. भक्ती ही
अरे काय हे !!
काडी !
लोजीक म्हंतेत त्येला
In reply to काडी ! by इरसाल
१५०+ प्रतिसादांसाठी धन्यवाद.
वाह!
तुमच्यासारख्या ( =समोरच्याला
:)
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
:) बाकी ठिक. पण हि चर्चा
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
आता तत्वज्ञानची व्याख्या
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
त्येला बैकांचे जन्रल णाआलेज
In reply to आता तत्वज्ञानची व्याख्या by बॅटमॅन
हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष
In reply to आता तत्वज्ञानची व्याख्या by बॅटमॅन
बायका अतिशय प्रॅक्टिकल
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
+११११११११११११२२२२
In reply to बायका अतिशय प्रॅक्टिकल by अत्रुप्त आत्मा
बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे
In reply to +११११११११११११२२२२ by टवाळ कार्टा
हे गुर्जींना की मला?
In reply to बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे by अजया
@ अजया तै धागा लेखाच्या
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
आज खूप कामात आहे.पण
In reply to @ अजया तै धागा लेखाच्या by माहितगार
+१
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
अग्दी अग्दी....जोर्दार
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
स्वतःच्या आयुष्याचे तत्वज्ञान
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल
In reply to स्वतःच्या आयुष्याचे तत्वज्ञान by अभ्या..