✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 04/19/2012 - 12:56  ·  लेख
लेख
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले. तर आजच्या ह्या लेखात आपण डुप्लिकेट आयडी कसे काढावेत व कसे सांभाळावेत ह्याचे मार्गदर्शन घेणार आहोत. मला विचाराल तर खरे म्हणजे डुप्लिकेट आयडी कधी काढूच नयेत. काय आहे, की ह्या आयडीने कुणाची खेचल्यावरती, रेवडी उडवल्यावरती, चार शब्द सुनावल्यावरती देखील मनापासून समाधान असे मिळत नाही. आणि मिळाले तरी दर्शवता येत नाही. असो.. तर आता एकदा डुप्लिकेट आयडी काढायचे ठरवले की मग दुसरा कुठलाही विचार मनात आणू नये. 'जगातील प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतोच !' असे कोणा थोर तत्त्वज्ञानी माणसाने सांगितले आहेत. त्याच प्रमाणे 'आंतरजालावरील प्रत्येक सदस्याच्या मनात एकदा तरी डुप्लिकेट आयडी काढण्याचा विचार हा येतोच!' हे सत्य देखील जाणावे. मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्‍याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये. एकदा का विचार पक्का झाला की ताबडतोब कामाला लागावे. डुप्लिकेट आयडी काढण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. :- १) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता. २) डुप्लिकेट आयडी साठी शक्यतो नाव आणि आडनाव असे निवडावे. शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो आणि संशय देखील घेतला जाण्याचे चान्स कमी होतात. ३) स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा. ताबडतोब काम झालेच समजा. ४) नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अ‍ॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात. ५) आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो. आता एकदा का आयडी अ‍ॅप्रुव्ह झाला की तो वापरणे, टिकवणे आणि त्याला विश्वासपात्र बनवणे हे सगळ्यात जिकरीचे काम. त्यासाठी मेहनत आणि संयम सगळ्यात महत्त्वाचे. ह्या कामात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जाणे आवश्यक आहे. :- १) डुप्लिकेट आयडी अ‍ॅप्रुव्ह झाल्या झाल्या संस्थळावरती धाव घेऊ नये. २) शक्यतो पहिले चार / पाच दिवस निव्वळ वाचनमात्र राहावे. 'कधी एकदा माझ्या विरोधकांना इंगा दाखवतो' हा विचार अशा काळात मनात सतत उसळ्या मारत असतो, अशा वेळी संयम अतिशय आवश्यक. ३) वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्‍याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्‍हाड मारून घ्याल. ४) खरडवहीच्या स्वागत मजकुरात, नवीन असताना शक्यतो जि. ए. , व. पु. ह्यांच्या कथा / कादंबरी मधील एखादा उतारा, अथवा कोंकणातल्या खेड्याचे चित्र किंवा ग्रेस, सुरेश भट इत्यादींचे पद्य लावावे. ५) ह्या काळात विनाकारण स्त्री सदस्यांच्या खरडवहीत जाऊन 'हाय हॅलो' करण्याची, त्यांच्या धाग्यावरती 'भावमारू' प्रतिसाद देण्याची, आपल्याला कोणी ओळखले आहे का ह्याची चाचपणी करण्याची जाम सुरसुरी येते. पुन्हा एकदा संयम धरावा. नाही धरवला तर सरळ लॉग आऊट करावे, मात्र तोल ढळू देऊ नये. ६) नवे नवे डुप्लिकेट खाते घेऊन दिवस दिवस जालावरती पडीक राहू नये. कुठल्याच नवीन सदस्याला एका दिवसात इतकी गोडी लागत नाही ह्याचे भान ठेवावे. ७) विनाकारण डुप्लिकेट आयडीसाठी भारंभार प्रॉक्सी, शेल वापरणे असले चाळे करू नयेत. ८) स्त्री सदस्यांनी आपले डुप्लिकेट आयडी घेऊन आल्या आल्या काथ्याकूट, ललित असल्या धाग्यांवरती भरार्‍या मारू नयेत. आणि पुरुष सदस्यांनी आपले डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन कविता, पाकृ अशा ठिकाणी तोंड मारू नये. ९) डुप्लिकेट आयडी पुरुष नावाने असल्यास शक्यतो एखाद्या व्यक्तिचित्रावरती, माहितीच्या धाग्यावरती किंवा कलादालनात प्रतिक्रिया देऊन लिखाणाला सुरुवात करावी. १०) डुप्लिकेट आयडी स्त्री नावाने असल्यास शक्यतो कविता, पाकृ अथवा कलादालन अशी सुरुवात करावी. ११) आपले राहण्याचे ठिकाण हे उगाच परदेशात असल्याचे भासवू नये. थोडे जरी अज्ञान उघडे पडले तरी निवासी आणि अनिवासी दोघेही तुमच्या अब्रूची लक्तरे काढतील. तेव्हा शक्यतो आपले राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, आंबेजोगाई गेला बाजार बेळगाव, हल्याळ, छत्तिसगढ असे सांगावे. इकडे शक्यतो कोणी अंतराळवीर फिरकण्याचे चान्सेस नसतात. आणि फिरकलाच तरी ताबडतोब आपण सध्या ट्रेनिंगसाठी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलारूला आलो आहोत असे ठोकून द्यावे. १२) पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे. १३) अधे मध्ये लोड शेडिंग, खतांचा काळाबाजार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्याविषयी देखील इकडे तिकडे चर्चा करत फिरण्यास विसरू नये. आयडी स्त्री नामाने असल्यास 'पाडस' , 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'राणी वर्मा' असले विषय घेऊन खरडवह्यांत बोंबलत हिंडावे. १४) आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ते लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचे :- १५) डुप्लिकेट आयडी मिळाल्यापासून वरील सर्व पायर्‍या पूर्ण होईतो चुकून देखील विरोधकाच्या धाग्यावरती गरळ ओकण्याचा, स्वतःची जिलबी पाडण्याचा आणि कोणाच्याही खरडवहीत पांढर्‍याचे काळे करण्याचा अट्टहास करू नये. १६) अगदीच न राहवल्यास 'मराठी लिहिण्यास मदत' ह्या धाग्यावरती नाक खुपसावे. १७) कितीही शहाणपणा केला, अक्कल लावली तरी कुठल्याही संस्थळाच सर्व्हर अ‍ॅडमीन हा प्रत्येक डुप्लिकेट आयडीचा 'चित्रगुप्त' असतो हे कधीही विसरू नये. अशा सर्व पायर्‍या यशस्वी पार पाडल्यात की तुमच्यावरती ५०% सच्चेपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. त्यानंतरचे ५०% अधिक सावधपणे पार पाडणे तुमच्या हातात. आशा करतो की ह्या मार्गदर्शनाने तुम्हाला बहुमोल अशी मदत मिळेल. मिपावरील इतर जाणकार देखील ह्या मार्गदर्शनात भर घालतीलच. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
धोरण
गुंतवणूक
वावर
विनोद
इतिहास
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
विज्ञान
क्रीडा
राजकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
मत
शिफारस
सल्ला
मदत
माहिती
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
25690 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

यक्क....काय फाल्तू पिच्चर आहे

टवाळ कार्टा
Sun, 11/08/2015 - 00:06 नवीन
यक्क....काय फाल्तू पिच्चर आहे तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आवरा...

खटपट्या
Sat, 11/07/2015 - 19:23 नवीन
आवरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

bhaat सांडला सगळ्या ताटातला

अद्द्या
Sat, 11/07/2015 - 19:29 नवीन
bhaat सांडला सगळ्या ताटातला च्यायला =]]]]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अर्र!! लैच!!

सूड
Tue, 11/10/2015 - 15:38 नवीन
अर्र!! लैच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आज्काल आपण डुआयडी आहोत हे

कंजूस
Fri, 11/06/2015 - 13:49 नवीन
आज्काल आपण डुआयडी आहोत हे मिरवणे हे इनथिंग आहे---अशा प्रतिसादांनी उत्साह वाढतो. हे सांगायचं राहिलं.परंतू खंत अशी आहे की पंचेस मारायला पंचिंग बॅगज उर्फ भुशाची पोती न उसवणारी शोधावी लागतात.
  • Log in or register to post comments

अरेच्चा

ब्रिटिश टिंग्या
Sat, 11/07/2015 - 12:28 नवीन
डुआयडी धाग्यावर माझा प्रतिसाद नाही? हा धागा कसा काय मिसला? असो, दुसर्‍या आयडीने सविस्तर प्रतिसाद देतो.....थोड्या एक्सेल शीटा ढुंढाळाव्या लागतील....
  • Log in or register to post comments

मी वर आणला म्हणून सगळ्यांना

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 12:59 नवीन
मी वर आणला म्हणून सगळ्यांना दिसला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मी मी मी मी मी मी मी मी मी मी

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 13:24 नवीन
मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

पऱ्याला बोलवा रे कोणी तरी . .

अद्द्या
Sat, 11/07/2015 - 16:01 नवीन
पऱ्याला बोलवा रे कोणी तरी . . (जर नसेल दुसऱ्या आयडी नि तर ) ३ वर्षांनी परत पेटलाय म्हणावं धागा तुझा
  • Log in or register to post comments

अहो मी पेतावलाय धाग्याला

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 13:41 नवीन
अहो मी पेतावलाय धाग्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

लाभले भाग्य आम्हास करतो

जेपी
Sat, 11/07/2015 - 19:49 नवीन
शंभरी उलटल्याबद्दल श्री.परा आणी श्री.प्यारे 1 यांचा सत्कार एक निरमा सुपर बार,एक धोपाटणे आणी धुणे धुण्यास एक धोंडा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम धोबीघाट कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments

@यांचा सत्कार एक निरमा सुपर

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/07/2015 - 21:16 नवीन
@यांचा सत्कार एक निरमा सुपर बार,एक धोपाटणे आणी धुणे धुण्यास एक धोंडा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम धोबीघाट कार्यकर्ते.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

+११

नाखु
Mon, 11/09/2015 - 09:40 नवीन
ध्ण्यवाद कार्यकर्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ओम शान्ति शान्ति शान्ति

उडन खटोला
Sat, 11/07/2015 - 21:44 नवीन
सर्वानी शान्ती ठेवावी ! किमान शान्ताबाई चा व्हिडियो तरी पहावा ! अशी णम्र इणन्ती ! शान्तीचा उपासक (आणि शान्ताबाई चा फॅन) = उ.ख.
  • Log in or register to post comments

लिंक द्या महाराज उडनखटौलाजी!

मांत्रिक
Sat, 11/07/2015 - 22:01 नवीन
लिंक द्या महाराज उडनखटौलाजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

हर बार हुआ है जो, वही तो नहीं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/07/2015 - 23:06 नवीन
हर बार हुआ है जो, वही तो नहीं होगा डर जिसका सताता है, अभी तो नहीं होगा दुनिया को चलो परखे, नए दोस्त बनाये हर शख्स ज़माने में, वही तो नहीं होगा वो शख्स बड़ा है तो गलत हो नहीं सकता दुनिया को भरोसा ये, अभी तो नहीं होगा है उसका इशारा भी समझने की जरुरत होगा तो कभी होगा, अभी तो नहीं होगा दो चार गड़े मुर्दे उखाड़ेंगे किसी रोज हर बार नया झगडा, तभी तो नहीं होगा कुछ और भी हो सकता है तक़रीर का मतलब जो तुमने सुना सिर्फ, वहो तो नहीं होगा हर बार ज़माने का सितम होगा मुझी पर हाँ; मै ही बदल जाऊ कभी, तो नहीं होगा - अलोक श्रीवास्तव
  • Log in or register to post comments

भित्यापाठी ब्रह्म राक्षस

सागरकदम
Mon, 11/09/2015 - 23:11 नवीन
बाकी व्यासंग चांगला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हम्म

याॅर्कर
Tue, 11/10/2015 - 13:42 नवीन
शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो
असं हाय तर सगळं
  • Log in or register to post comments

तुमच्या आयडीतही "कर" आहे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/10/2015 - 23:18 नवीन
तुमच्या आयडीतही "कर" आहे म्हणून ती पास झाली का !? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा