ढिस्क्लेमर :-
१) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही.
२) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही.
मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले. तर आजच्या ह्या लेखात आपण डुप्लिकेट आयडी कसे काढावेत व कसे सांभाळावेत ह्याचे मार्गदर्शन घेणार आहोत.
मला विचाराल तर खरे म्हणजे डुप्लिकेट आयडी कधी काढूच नयेत. काय आहे, की ह्या आयडीने कुणाची खेचल्यावरती, रेवडी उडवल्यावरती, चार शब्द सुनावल्यावरती देखील मनापासून समाधान असे मिळत नाही. आणि मिळाले तरी दर्शवता येत नाही.
असो..
तर आता एकदा डुप्लिकेट आयडी काढायचे ठरवले की मग दुसरा कुठलाही विचार मनात आणू नये. 'जगातील प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतोच !' असे कोणा थोर तत्त्वज्ञानी माणसाने सांगितले आहेत. त्याच प्रमाणे 'आंतरजालावरील प्रत्येक सदस्याच्या मनात एकदा तरी डुप्लिकेट आयडी काढण्याचा विचार हा येतोच!' हे सत्य देखील जाणावे. मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये. एकदा का विचार पक्का झाला की ताबडतोब कामाला लागावे.
डुप्लिकेट आयडी काढण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. :-
१) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता.
२) डुप्लिकेट आयडी साठी शक्यतो नाव आणि आडनाव असे निवडावे. शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो आणि संशय देखील घेतला जाण्याचे चान्स कमी होतात.
३) स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा. ताबडतोब काम झालेच समजा.
४) नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात.
५) आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो.
आता एकदा का आयडी अॅप्रुव्ह झाला की तो वापरणे, टिकवणे आणि त्याला विश्वासपात्र बनवणे हे सगळ्यात जिकरीचे काम. त्यासाठी मेहनत आणि संयम सगळ्यात महत्त्वाचे. ह्या कामात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जाणे आवश्यक आहे. :-
१) डुप्लिकेट आयडी अॅप्रुव्ह झाल्या झाल्या संस्थळावरती धाव घेऊ नये.
२) शक्यतो पहिले चार / पाच दिवस निव्वळ वाचनमात्र राहावे. 'कधी एकदा माझ्या विरोधकांना इंगा दाखवतो' हा विचार अशा काळात मनात सतत उसळ्या मारत असतो, अशा वेळी संयम अतिशय आवश्यक.
३) वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्हाड मारून घ्याल.
४) खरडवहीच्या स्वागत मजकुरात, नवीन असताना शक्यतो जि. ए. , व. पु. ह्यांच्या कथा / कादंबरी मधील एखादा उतारा, अथवा कोंकणातल्या खेड्याचे चित्र किंवा ग्रेस, सुरेश भट इत्यादींचे पद्य लावावे.
५) ह्या काळात विनाकारण स्त्री सदस्यांच्या खरडवहीत जाऊन 'हाय हॅलो' करण्याची, त्यांच्या धाग्यावरती 'भावमारू' प्रतिसाद देण्याची, आपल्याला कोणी ओळखले आहे का ह्याची चाचपणी करण्याची जाम सुरसुरी येते. पुन्हा एकदा संयम धरावा. नाही धरवला तर सरळ लॉग आऊट करावे, मात्र तोल ढळू देऊ नये.
६) नवे नवे डुप्लिकेट खाते घेऊन दिवस दिवस जालावरती पडीक राहू नये. कुठल्याच नवीन सदस्याला एका दिवसात इतकी गोडी लागत नाही ह्याचे भान ठेवावे.
७) विनाकारण डुप्लिकेट आयडीसाठी भारंभार प्रॉक्सी, शेल वापरणे असले चाळे करू नयेत.
८) स्त्री सदस्यांनी आपले डुप्लिकेट आयडी घेऊन आल्या आल्या काथ्याकूट, ललित असल्या धाग्यांवरती भरार्या मारू नयेत. आणि पुरुष सदस्यांनी आपले डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन कविता, पाकृ अशा ठिकाणी तोंड मारू नये.
९) डुप्लिकेट आयडी पुरुष नावाने असल्यास शक्यतो एखाद्या व्यक्तिचित्रावरती, माहितीच्या धाग्यावरती किंवा कलादालनात प्रतिक्रिया देऊन लिखाणाला सुरुवात करावी.
१०) डुप्लिकेट आयडी स्त्री नावाने असल्यास शक्यतो कविता, पाकृ अथवा कलादालन अशी सुरुवात करावी.
११) आपले राहण्याचे ठिकाण हे उगाच परदेशात असल्याचे भासवू नये. थोडे जरी अज्ञान उघडे पडले तरी निवासी आणि अनिवासी दोघेही तुमच्या अब्रूची लक्तरे काढतील. तेव्हा शक्यतो आपले राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, आंबेजोगाई गेला बाजार बेळगाव, हल्याळ, छत्तिसगढ असे सांगावे. इकडे शक्यतो कोणी अंतराळवीर फिरकण्याचे चान्सेस नसतात. आणि फिरकलाच तरी ताबडतोब आपण सध्या ट्रेनिंगसाठी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलारूला आलो आहोत असे ठोकून द्यावे.
१२) पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे.
१३) अधे मध्ये लोड शेडिंग, खतांचा काळाबाजार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्याविषयी देखील इकडे तिकडे चर्चा करत फिरण्यास विसरू नये. आयडी स्त्री नामाने असल्यास 'पाडस' , 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'राणी वर्मा' असले विषय घेऊन खरडवह्यांत बोंबलत हिंडावे.
१४) आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ते लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
आणि सगळ्यात महत्त्वाचे :-
१५) डुप्लिकेट आयडी मिळाल्यापासून वरील सर्व पायर्या पूर्ण होईतो चुकून देखील विरोधकाच्या धाग्यावरती गरळ ओकण्याचा, स्वतःची जिलबी पाडण्याचा आणि कोणाच्याही खरडवहीत पांढर्याचे काळे करण्याचा अट्टहास करू नये.
१६) अगदीच न राहवल्यास 'मराठी लिहिण्यास मदत' ह्या धाग्यावरती नाक खुपसावे.
१७) कितीही शहाणपणा केला, अक्कल लावली तरी कुठल्याही संस्थळाच सर्व्हर अॅडमीन हा प्रत्येक डुप्लिकेट आयडीचा 'चित्रगुप्त' असतो हे कधीही विसरू नये.
अशा सर्व पायर्या यशस्वी पार पाडल्यात की तुमच्यावरती ५०% सच्चेपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. त्यानंतरचे ५०% अधिक सावधपणे पार पाडणे तुमच्या हातात.
आशा करतो की ह्या मार्गदर्शनाने तुम्हाला बहुमोल अशी मदत मिळेल. मिपावरील इतर जाणकार देखील ह्या मार्गदर्शनात भर घालतीलच.
धन्यवाद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
25904
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना प्रधान
In reply to कल्पनाविलास , भावनाचोर by होबासराव
वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि
हाहा!
In reply to वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि by सुबोध खरे
पैसा ताई
In reply to हाहा! by पैसा
अजून एक फायदा आहे
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
एक
+१
In reply to एक by नाखु
माई कुरसुंदीकर , नाना साहेब
धन्यवाद
मी आणलाय
In reply to धन्यवाद by चिंतामणी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
In reply to मी आणलाय by सागरकदम
सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला
In reply to मी मी मी मी मी मी मी मी मी मी by टवाळ कार्टा
णक्को
In reply to सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला by कॅप्टन जॅक स्पॅरो
'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही
In reply to सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला by कॅप्टन जॅक स्पॅरो
डॉन डॉन डॉन
In reply to 'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही by सूड
पातेलं पातेलं पातेलं =))
In reply to डॉन डॉन डॉन by सागरकदम
दिल ने
In reply to पातेलं पातेलं पातेलं =)) by टवाळ कार्टा
खि खि खि....श्टैल भारीयाइ
In reply to दिल ने by सागरकदम
अहो त्यामुळेच तर स्त्री
In reply to खि खि खि....श्टैल भारीयाइ by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to अहो त्यामुळेच तर स्त्री by सागरकदम
हा लाल नाही magneta आहे
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
बरं मग?
In reply to हा लाल नाही magneta आहे by सागरकदम
delusions of grandeurhttps:/
In reply to अहो त्यामुळेच तर स्त्री by सागरकदम
कहि ये अमितपतिल तो नही;)
In reply to अहो त्यामुळेच तर स्त्री by सागरकदम
आज्काल आपण डुआयडी आहोत हे
काय झकास पंच मारला!!!
In reply to आज्काल आपण डुआयडी आहोत हे by टवाळ कार्टा
खरं सांगायचं आणि खोटं नाही
खरंच सांगतो ...
In reply to खरं सांगायचं आणि खोटं नाही by कंजूस
=))
In reply to खरंच सांगतो ... by पगला गजोधर
या संदर्भात त्या शीनचा अर्थ
In reply to =)) by टवाळ कार्टा
यक्क....काय फाल्तू पिच्चर आहे
In reply to या संदर्भात त्या शीनचा अर्थ by बॅटमॅन
आवरा...
In reply to खरंच सांगतो ... by पगला गजोधर
bhaat सांडला सगळ्या ताटातला
In reply to खरंच सांगतो ... by पगला गजोधर
अर्र!! लैच!!
In reply to खरंच सांगतो ... by पगला गजोधर
आज्काल आपण डुआयडी आहोत हे
अरेच्चा
मी वर आणला म्हणून सगळ्यांना
In reply to अरेच्चा by ब्रिटिश टिंग्या
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
In reply to मी वर आणला म्हणून सगळ्यांना by सागरकदम
पऱ्याला बोलवा रे कोणी तरी . .
अहो मी पेतावलाय धाग्याला
In reply to पऱ्याला बोलवा रे कोणी तरी . . by अद्द्या
लाभले भाग्य आम्हास करतो
@यांचा सत्कार एक निरमा सुपर
In reply to लाभले भाग्य आम्हास करतो by जेपी
+११
In reply to @यांचा सत्कार एक निरमा सुपर by अत्रुप्त आत्मा
ओम शान्ति शान्ति शान्ति
लिंक द्या महाराज उडनखटौलाजी!
In reply to ओम शान्ति शान्ति शान्ति by उडन खटोला
हर बार हुआ है जो, वही तो नहीं
भित्यापाठी ब्रह्म राक्षस
In reply to हर बार हुआ है जो, वही तो नहीं by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम्म
तुमच्या आयडीतही "कर" आहे
In reply to हम्म by याॅर्कर