✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 11/01/2015 - 18:50  ·  लेख
लेख
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
57029 वाचन

💬 प्रतिसाद (316)

प्रतिक्रिया

किती करायचे?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/01/2015 - 19:00 नवीन
किती करायचे? अमचा आयडी कोणाला अवडत असेल असं वाटत नाही तस्मात पास.
  • Log in or register to post comments

तुम्ही ते नाही सांगायचे हो...

माम्लेदारचा पन्खा
Sun, 11/01/2015 - 19:03 नवीन
तुम्हाला कोणता आयडी आवडतो ते सांगा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पंखेराव

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 19:06 नवीन
पंखेराव
व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा
ही अट टाळली असती तर खूप आयडीविषयी अगदी भरभरुन बोललो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

व्यक्तिशः भेटलेले बरेचसे लोक माहीत असतात....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 11/01/2015 - 19:10 नवीन
मग ते एकमेकांचे कौतुकवर्णनसोहळे होतात म्हणून ती सूचना होती... पण हरकत नाही... तेही लिहू शकता !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मला आवडतो

लालगरूड
Sun, 11/01/2015 - 22:40 नवीन
मला आवडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पण काय??????

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 22:42 नवीन
पण काय??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

चिमण्याचा आयडी

लालगरूड
Sun, 11/01/2015 - 22:54 नवीन
चिमण्याचा आयडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

साहेबांना अमित पाटील हा आयडी

सागरकदम
Wed, 11/04/2015 - 01:23 नवीन
साहेबांना अमित पाटील हा आयडी आवडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. त्यांची आणि आमची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/04/2015 - 07:16 नवीन
अगदी अगदी. त्यांची आणि आमची मैत्री एवढी घट्ट होती की मैत्रीचा विळखा त्यांच्या नाजुन तब्बेतीला झेपला नाही. ते हेवनवासी झाले. असो. आपण त्यांचे भाईबंद दिसता. तुमची आमची मैत्री तेवढी जवळची नं होवो हि इश्वरचरणी प्रार्थना. कळावे. लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

भगवान श्रीराम अमर नव्हते

सागरकदम
Mon, 11/09/2015 - 22:52 नवीन
भगवान श्रीराम अमर नव्हते रावण अमर होता असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह आय सी!!

सूड
Mon, 11/09/2015 - 22:55 नवीन
ओह आय सी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

तुला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/10/2015 - 06:57 नवीन
तुला "आँ, अच्चं जालं तलं" असं म्हणायचय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असा सगळा प्रकार आहे तर =))

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 09:11 नवीन
असा सगळा प्रकार आहे तर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पुरवणी:-

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 11:16 नवीन
पुरवणी:- त्यामुळे चांगले लोक अनेक अवतार घेऊन फिरत असत्तात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वॉव मस्त धागा मापं. (माझे नाव

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 19:02 नवीन
वॉव मस्त धागा मापं. (माझे नाव आले म्हणून नै बर्का ;) ) मला प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्या आयडीविषयी अगदी वाचनमात्र होतो तेंव्हापासून कुतुहल होते. मस्त फॉर्मल लाईट पिंक ऑर लाईट ब्ल्यु शर्ट. प्रॉपरली हर्शा भोगले स्टाईल इन केलेला, पॉलिश्ड फॉर्मल शूज घातलेला, अगदी क्लीन शेव्ह अन बॉक्स टाईप मिशा ठेवणारा दिलखुलास माणूस असावा असे वाटायचे. (प्रत्यक्षात तसेच आहेत असे कळलेय, मी पाहिले नाही) सग्ग्ग्ग्ळ्या गोष्टींची माहीती असणारा, नर्म विनोद करणारा, अगदी गरज पडेल तेव्हाच खुलासे देणारा आणि प्रत्येक शब्दात अनुभव दिसणारा माणूस ह्या आयडीचा धनी असावा असे वाटायचे. आता बघू कसे आहेत अ‍ॅक्चुअली सर. औरंगाबादला जावे लागेल पण. ;)
  • Log in or register to post comments

माईसाहेब कुरसूंदीकर हा आयडी

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 19:15 नवीन
माईसाहेब कुरसूंदीकर हा आयडी म्हणून आवडतो. मस्त पैकी बेयरिंग पकडून प्रतिसाद देत असतात. फार क्वचित् व्यक्तिगत हल्ले किंवा बिलो बेल्ट हल्ले हे वैशिष्ट्य. भन्नाट. लौ यु माईआज्जी!
  • Log in or register to post comments

अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे

खटपट्या
Sun, 11/01/2015 - 19:27 नवीन
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे अत्रुप्त आत्मा) ही माझी आवडती आयडी आहे. या आयडीचा शब्दशः अर्थ राहुद्या पण या आयडीच्या लीखाणावरुन ही आयडी धारण करणारा माणूस साधा, सरळ, पापभीरू, प्रामाणिक(शब्दाचीही आतिशयोक्ती नाही) वाटतो. जसजसे त्यांचे लेखन वाचत गेलो तसतसा त्यांचा फॅन होत गेलो. आपली मते निर्भिडपणे आणि परखडपणे मांडणारा, कीतीही विरोधी मते मांडली तरी आपली पातळी न सोडणारा असा हा लेखक. त्यांची भेट होता होता राहीली. कधीना कधी भेट होइलच. मी कर्मकांडामधे अजीबात न रमणारा असून केवळ आणि केवळ त्यांच्या फुलांच्या रांगोळ्यांसाठी मला घरात त्यांच्याकडून एकतरी कार्य करून घ्यायचं आहे.
  • Log in or register to post comments

अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:30 नवीन
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे अत्रुप्त आत्मा) ही माझी आवडती आयडी आहे. या आयडीचा शब्दशः अर्थ राहुद्या पण या आयडीच्या लीखाणावरुन ही आयडी धारण करणारा माणूस साधा, सरळ, पापभीरू, प्रामाणिक(शब्दाचीही आतिशयोक्ती नाही) वाटतो. जसजसे त्यांचे लेखन वाचत गेलो तसतसा त्यांचा फॅन होत गेलो.
तुम्हीसुधा बुवावताराचे फ्यॅण का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खटपट्या >>> मनःपूर्वक

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/10/2015 - 10:05 नवीन
खटपट्या >>> मनःपूर्वक धन्यवाद.. समांतरः- ट्क्या..Image removed.ह्ल्कटा .. का रे जळतोस येव्हढा??? दू दू दू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अता मी काय केलं

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 10:40 नवीन
अता मी काय केलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

थांब तुला फॅन ग्रुप मधुन

खटपट्या
Tue, 11/10/2015 - 11:14 नवीन
थांब तुला फॅन ग्रुप मधुन काढून टकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फॅन ग्रुप ?

सूड
Tue, 11/10/2015 - 14:10 नवीन
वारा घालायला वेगळा ग्रूप आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी

कंजूस
Sun, 11/01/2015 - 19:27 नवीन
बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी.भेटलो नाहीये. आणि दुत्तदुत्त.( लिहिपर्यंत नाव बदलतील तरी हे चालूच राहणार।)याना भेटलो आहे परंतू लेखनात दिसणाय्रा निरीक्षणशक्तीसाठी.
  • Log in or register to post comments

+१ बॅटमन हा आयडी मला

खटपट्या
Sun, 11/01/2015 - 19:31 नवीन
+१ बॅटमन हा आयडी मला त्यांच्या चौफेर व्यासंगासाठी आवडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१

स्वप्नज
Mon, 11/02/2015 - 20:48 नवीन
बॅटमन हा फार व्यासंगी आयडी आहे. - बॅटमनचा फ्यान स्वप्नज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

गणपा हा आयडी पण टीशर्ट आणि

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 19:37 नवीन
गणपा हा आयडी पण टीशर्ट आणि थ्री फोर्थ घालून मस्त सोफ्यावर मांडी घालून लॅपटोप घेऊन बसलाय असे वाटायचे. एका हाताशी फुल्ल चिकनने भरलेली डिश अन स्वतःशीच हसत मिपावर टायपणारा एकदम गट्टू अन गोंडस आयडी दिसायचा. गंपाव.... असे हाक मारली की आव.. असे प्रत्युत्तर येईल असे वाटायचे. ठाकूरसाब शायद वैसेच है. ;)
  • Log in or register to post comments

सतीश गावडे म्हटले की एक

सतिश गावडे
Sun, 11/01/2015 - 19:53 नवीन
सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते ….
धन्यवाद. :)
व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
आपण प्रत्यक्ष भेटलोय, इतकेच नव्हे तर तुझ्या आवडत्या मामलेदारमध्ये एकाच टेबलावर समोरासमोर बसून मिसळ खाल्ली आहे. आता ओळख पाहू. ;) मिपावर मला पावणे आठ वर्ष झाली आता. अगदी सुरुवातीला मला दोन आयडींबद्दल खुप कुतुहल असायचे. दोन्हीही मिपावरील दिग्गज. बिपीन कार्यकर्ते आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे. दोघांचेही मोजकेच आणि नेमके नर्मविनोदी पण तरीही रोखठोक प्रतिसाद आवडायचे. बिका मुंबईला असताना गोरेगांवला राहायचे. माझ्या कोकणातील रायगड जिल्ह्यातील गावाचे नाव गोरेगांव. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी मुंबईला करियरची सुरुवात केली तेव्हा गोरेगावलाच (अर्थात मुंबईच्या) राहत होतो. हा धागा पकडून आमच्या व्यनितून गप्पा सुरु झाल्या. पुढे प्रत्यक्ष भेटीचाही योग आला. माझ्या मनात बिपीनदाची जी प्रतिमा तयार झाली होती तसाच आहे तो. दुसरा आयडी म्हणजे प्रा. डॉ. मी एका अध्यात्मिक धाग्याचा दुसरा एक स्वतंत्र धागा लिहून प्रतिवाद केला. (सरडयाची धाव कुंपणापर्यंत. ;)). धाग्याच्या शेवटी भली मोठी संदर्भ ग्रंथांची यादी दिली होती, त्याने सर प्रभावित झाले आणि आमच्या व्यनि-गप्पा सुरु झाल्या. अर्थात या गप्पा एक अंतर ठेवूण होत्या. पुढे वल्लीच्या कृपेने औरंगाबादला वेरुळला जायचा योग आला. तिथे सरांची भेट झाली आणि माझा भ्रमनिरास झाला. व्यनितील गप्पांमधून सरांची जी एक भारदस्त, इतरांपासून एक ठराविक अंतर राखून उभी राहणारी प्रतिमा होती ती खोटी ठरली. मराठीतून पिएचडी केलेला, महाविद्यालयात मराठी शिकवणारा हा माणूस माझ्यासारख्या तुलनेने कालच्या पोरासोबत अगदी जीवाभावाच्या मित्रासारखा गप्पा मारू लागला, खुप जवळच्या नातेवाईकांची जशी उठबस करावी अगदी तसाच पाहूणचार सरांनी त्या दोन दिवसांत केला. त्या औरंगाबादवारीनंतर मी लेण्यांमध्ये विशेष रस नसताना पुढची दोन वर्षेही वल्लीसोबत औरंगाबादला गेलो, सरांना भेटायला.
  • Log in or register to post comments

आपण भेटलोय रे....मला माहीत आहे....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 11/01/2015 - 20:48 नवीन
ते एक उदाहरण होतं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्या लेका आवर्जून आठवण ठेवली

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/02/2015 - 13:11 नवीन
धन्या लेका आवर्जून आठवण ठेवली आहेस रे! <घट्ट मिठीची स्मायली> :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दोन आय.डी.

लाल टोपी
Sun, 11/01/2015 - 19:59 नवीन
दोन आय.डी. दोघेही आपल्या ख-या नांवानेच मिपावर वावरतात. पेठकर काका नेहमीच त्यांनी मांडलेली स्पष्ट, परखड मते आवडली आहेत, पटली आहेत, आपले अनुभव काहीही शिकवण्याचा आव न आणता सहजपणे येथे मांडतात कळत न कळतपणे त्याचा अनेकांना फायदा होतो. श्रीरंग जोशी अगदी नव्या सदस्याला देखील अश्वासक प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणारे, हवा तो रेफरन्स तात्काळ देणारे हे प्रसन्न व्यक्तिमत्व प्रत्यक्षातही अगदी तसेच असेल असे वाटते. पंखासाहेब, या धाग्याची कल्पना अतिशय आवडली यात अधिकाधिक प्रतिसाद आले तर नक्कीच नव्या जुन्या सदस्यांना एकमेकांची ओळख करुन देण्यासाठी उत्तम धागा ठरावा ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

पैसाताई,

लाल टोपी
Sun, 11/01/2015 - 20:41 नवीन
या देखील आवडत्या आय.डी. नेहमीच प्रोत्साहक प्रतिसाद, संपादक म्हणून कधीहही मदतीला तत्पर प्रसंगी क्वचीत प्रसंगी गरज पडल्यास काही प्रतिसादात आक्रमकताही पाहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Mon, 11/02/2015 - 16:59 नवीन
धन्यवाद, लालटोपी. मी आहेच तसा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

आतिवास

एस
Sun, 11/01/2015 - 20:07 नवीन
आतिवास. बाकी कुठल्याच आयडीमागील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायची तीव्र अशी ओढ कधी जाणवली नाही पण ह्या ताई जर कधी या भेटायला असं म्हणाल्या, तर त्या ओरिसा-छत्तीसगढ, अफगाणिस्तान वा मोझाम्बिक, कुठेही असोत, मी आवर्जून जाऊन त्यांना भेटेन आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांना बोलतं करेन. इतके संयमी, ग्रासरूट्स लेव्हलचं व्यक्तिमत्त्व फार क्वचितच दिसलंय.
  • Log in or register to post comments

या प्रतिसादाला

चांदणे संदीप
Sun, 11/01/2015 - 20:44 नवीन
या प्रतिसादाला माझ्याकडून ५१ रु रोख! (कोणीही लगेच मागायला येऊ नये! कधी भेटलो तर देईनच आठवणीने!) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

मित्रहो
Mon, 11/02/2015 - 07:49 नवीन
+१ भेटायच एकदा तरी. अनुभव आणि त्यावरील भाष्य बरेच काही शिकवून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 20:14 नवीन
माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी साॅफ्ट स्वभाव), कॅप्टन जॅक स्पॅरो(ये दोस्ती हम नही तोडेंगे), टक्या (महाडांबरट), सूड (गूढ-गहन-गुप्त), श्रीरंग जोशी(अगदी गोड स्वभाव), सगा (बेस्ट काव्य), तुडतुडी-दत्ता जोशी-बाहुबली (अगदी कट्टर आस्तिक माझ्यासारखे), प्रगो-प्यारेअण्णा (माझ्यासारखे सातारकर, लैच भांडखोर) अजून किती बोलू? हे मिपाच सारं अवलियांनी भरलेलं!!!
  • Log in or register to post comments

गंमतीत घ्या ही विनंती!!!

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 20:23 नवीन
गंमतीत घ्या ही विनंती!!! अजून एक: बिका (माझ्याशी वाद होऊन पण डोक्यात राग न ठेवणारे), अ.कु.(टैमपासची किती भारी संधी देतात खरंच सांगा..), पिवशी( निरागस निष्पाप), मापं (वजनदार व खाद्यप्रेमी माझ्यासारखे), बॅटमॅन ( हा बाबा अक्षरशः शब्दांची कत्तल करतो!!!), पैजार माऊली (ज्ञानोबाचे भक्त माझ्यासारखे), नाखु (नर्म विनोदी शैली, यांनी चेष्टा केली तर कुणाला राग येईल?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

पिवशी( निरागस निष्पाप)

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:30 नवीन
पिवशी( निरागस निष्पाप)
अत्ता कळ्ळे टोमणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

@ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर

पियुशा
Mon, 11/02/2015 - 09:48 नवीन
@ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर नावा प्रमाणे तस्साच आहे बर्र का ;) @ ट्क्या ईनो घे ईनो.......... पिवशी( निरागस निष्पाप ) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@ ट्क्या ईनो घे ईनो..........

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 13:49 नवीन
@ ट्क्या ईनो घे ईनो.......... पिवशी( निरागस निष्पाप ) =))
असे असेल तर मी मर्यादापुरुषोत्तम राम + न भूतो न भविष्याती असा कृष्ण या दोघांचे गुण असणारा सज्जन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

कृष्ण तर मी आहे

सागरकदम
गुरुवार, 11/12/2015 - 18:45 नवीन
कृष्ण तर मी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कसला राग अन कसलं काय? चार

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/02/2015 - 13:14 नवीन
कसला राग अन कसलं काय? चार घटका या, बसा, दंगा करा, काय ज्ञान वगैरे वाटायचं ते वाटा आणि निघा... कुठे काय डोक्यात ठेवायचं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 20:28 नवीन
लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास म्हात्रे (अगदी सज्जन, मुद्देसूद, जबर ज्ञान मेडिकलचं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अरे जेपी राहिला (निरागस गिफ्ट

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 20:31 नवीन
अरे जेपी राहिला (निरागस गिफ्ट देणारा), आणि बोकोबा (इंग्लिशप्रभू, भाषांतर सम्राट!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

टक्या (महाडांबरट) दू दू दू

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:30 नवीन
टक्या (महाडांबरट)
दू दू दू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/02/2015 - 00:04 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दूत्त दूत्त

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 01:28 नवीन
दूत्त दूत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

परीकथेतला राजकुमार हा आयडी

धनावडे
Sun, 11/01/2015 - 20:25 नवीन
परीकथेतला राजकुमार हा आयडी त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी आवडायचा(तो) हल्ली कधी दिसत नाही
  • Log in or register to post comments

तुमने पुकार और

चिंतामणी
Mon, 11/02/2015 - 23:26 नवीन
वो चला आया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

भारीच धागा आहे हा...

चांदणे संदीप
Sun, 11/01/2015 - 20:42 नवीन
मागे अभ्यादादाच्या टीशर्टाच्या धाग्यात काही खास आयडीचे स्वभाव जरासे दिसलेले आता इथे काय दिसतंय पाहू! मला स्वत:ला "उगा काहीतरीच" यांचा आयडी आवडतो. कारण विनोदी वाटतो फारच! त्यांच्या काही प्रतिसादांचा आशय मला त्यांच्या आयडीसारखाच वाटायचा! त्यांनी प्रतिसाद न देता कुठल्याही धाग्यावर नुसती उपस्थिती जरी दर्शवली तरी काम होईल असे वाटते! (उ.का. कृ.ह.घ्या.!) Sandy
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा