तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
किती करायचे?
तुम्ही ते नाही सांगायचे हो...
पंखेराव
व्यक्तिशः भेटलेले बरेचसे लोक माहीत असतात....
मला आवडतो
पण काय??????
चिमण्याचा आयडी
साहेबांना अमित पाटील हा आयडी
अगदी अगदी. त्यांची आणि आमची
भगवान श्रीराम अमर नव्हते
ओह आय सी!!
तुला
असा सगळा प्रकार आहे तर =))
पुरवणी:-
वॉव मस्त धागा मापं. (माझे नाव
माईसाहेब कुरसूंदीकर हा आयडी
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे
खटपट्या >>> मनःपूर्वक
अता मी काय केलं
थांब तुला फॅन ग्रुप मधुन
फॅन ग्रुप ?
बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी
+१ बॅटमन हा आयडी मला
+१
गणपा हा आयडी पण टीशर्ट आणि
सतीश गावडे म्हटले की एक
आपण भेटलोय रे....मला माहीत आहे....
धन्या लेका आवर्जून आठवण ठेवली
दोन आय.डी.
पैसाताई,
धन्यवाद.
आतिवास
या प्रतिसादाला
+१
माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी
गंमतीत घ्या ही विनंती!!!
पिवशी( निरागस निष्पाप)
@ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर
@ ट्क्या ईनो घे ईनो..........
कृष्ण तर मी आहे
कसला राग अन कसलं काय? चार
लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास
अरे जेपी राहिला (निरागस गिफ्ट
टक्या (महाडांबरट) दू दू दू
(No subject)
दूत्त दूत्त
परीकथेतला राजकुमार हा आयडी
तुमने पुकार और
भारीच धागा आहे हा...